Pages

Friday, 25 May 2018

एच.ए.कंपनीची ५६ एकर जागा पोलीस आयुक्तालयासाठी घ्यावी – खासदार श्रीरंग बारणे

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील एच.ए. कंपनीची ५६ एकर जागा राज्य सरकारने घेतल्यास एच.ए. कंपनी आर्थिक संकटातुन बाहेर येईल. पिंपरी चिंचवड शहराच्या मध्यभागी पोलिस आयुक्तालय होईल. यासंदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. दरम्यान, पिंपरी येथील हिंदुस्थान अॅन्टीबायोटिक्स कंपनीच्या व तेथील कामगारांच्या प्रश्नाबाबत आज खासदार श्रीरंग बारणे यांनी कंपनीच्या मुख्य व्यवस्थापक नीरजा सराफ यांच्या समवेत बैठक घेवून चर्चा केली. या वेळी त्यांच्या समवेत सुनिल पाटसकर, अरूण बोऱ्हाडे व इतर कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment