Pages

Friday, 25 May 2018

पावसाळ्यापूर्वी शहर खड्डेमुक्त करा; आमदार लक्ष्मण जगताप यांची पालिका प्रशासनाला सुचना

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्वत्र खडड्यांमुळे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर पाऊसामुळे आणि जड वाहतूकीमुळे रस्त्यावर खड्डे निर्माण होतात. पावसाळ्यात अस्तित्वातील खड्ड्यांमुळे त्यांचा आकार वाढून खोली वाढते. त्यामुळे वाहन धारकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे ही बाब लक्षात घेवून येत्या पावसाळ्या अगोदर संपूर्ण शहर खड्डे मुक्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात यावी, अशी भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी पालिका प्रशासनास लेखी निवेदनाव्दारे सुचना दिलेली आहे.

No comments:

Post a Comment