Pages

Wednesday, 31 October 2018

दिवाळीनंतर शास्ती कर सवलतीची “मिठाई’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड मधील 600 चौरस फुटाच्या निवासी बांधकामांना शंभर टक्‍के, 601 ते 1 हजार चौरस फुटाच्या बांधकामांना 50 टक्‍के शास्ती करात सवलत देण्यात येणार आहे. त्यासाठी कर संकलन विभागाच्या संगणक प्रणालीत बदल सुरू असून दिवाळीनंतर त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळेल. राज्य शासनाच्या महापालिका अधिनियम कलम 267 अ मध्ये दुरुस्तीची अंमलबजावणी 4 जानेवारी 2008 पासून केली आहे. 1 हजार 1 चौरस फुटांपुढील सर्व प्रकारच्या बांधकामांना पूर्वीप्रमाणे 200 टक्के शास्ती कर आकारणार आहे, अशी माहिती पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली. 

No comments:

Post a Comment