Pages

Wednesday, 31 October 2018

मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी शास्तीकराचे गाजर

पिंपरी चिंचवड : निगडीमध्ये दि. 3 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी भाजपाने पुन्हा एकदा शहरवासीयांना शास्तीकर माफीचे गाजर दिले आहे, असा आरोप महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. शहरातील 600 चौरस फुट आकाराच्या निवासी बांधकामधारकांना शास्तीकर माफी आणि 601 ते 1 हजार चौरस फुट आकाराच्या बांधकामांना 50 टक्के शास्तीकर अशी सवलत पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली जाणार आहे. दिवाळीनंतर संगणक प्रणालीमध्ये बदल केल्यानंतर 15 दिवसात या कामाचा प्रत्यक्ष लाभ दिवाळीनंतर मिळणार असल्याचे भाजपाचे शहरातील नेते एकनाथ पवार यांनी जाहीर केले आहे.

No comments:

Post a Comment