Pages

Wednesday, 10 October 2018

आरोग्य शिबिरामध्ये पाचशे नागरिकांची तपासणी

दिघी- भारतीय जनता पक्षाच्या वतीने बोपखेल येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा सुमारे 500 नागरिकांनी लाभ घेतला. बऱ्याच नागरिकांना त्यांना होत असलेल्या आजाराबद्दल माहितीच नव्हती. या शिबिरामुळे अनेकांना आपल्या तब्येतीविषयी योग्य ती माहिती मिळाली असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. शिबिराचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्यावतीने दिघी बोपखेल प्रभागाच्या नगरसेविका हिराबाई गोवर्धन घुले व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष चेतन घुले यांनी पुढाकार घेऊन केले.

No comments:

Post a Comment