Pages

पिंपरीतील ४२ डॉक्टर आणि ५० कर्मचारी क्वारन्टाईन

पिंपरी – एका अपघातग्रस्त रिक्षा चालकावर शस्रक्रिया केली. त्यानंतर केलेल्या तपासणीत तो रुग्ण करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करणारे ४२ डॉक्टर आणि ५० कर्मचारी यांना क्वारन्टाईन करण्यात आले. ही घटना पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णात घडली आहे.

निवारा केंद्रे ठरताहेत बेघरांचा आसरा

महापालिका : शहर सोडणाऱ्या 395 जणांची केंद्रामध्ये व्यवस्था

पिंपरी – करोना व्हायरसचा प्रादुर्भाव थांबला पाहिजे यासाठी सर्वच स्तरांतून प्रयत्न सुरू असतानाच पिंपरी चिंचवड महापालिकेने देखील आता बेघर असणाऱ्या व्यक्तींना तात्पुरता निवारा देण्यासाठी विविध शाळांमध्ये राहण्याची सोय केली आहे. त्यामुळे बेघरांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निवारा केंद्रात शहर सोडून जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

गरीब, गरजूंना पालिका पुरविणार घरपोच ‘भोजन’

पिंपरी – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर घरात अडकून पडलेल्या व काम नसल्यामुळे उदरनिर्वाहाचे साधन नसणाऱ्या शहरातील गरीब, गरजू, दिव्यांग, कामगारांसह ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना सामाजिक संस्थांच्या माध्यमातून महापालिका घरपोच “भोजन’ सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी दिली.

अन्नपदार्थ घरपोच द्या; अन्यथा कारवाई

शहरातील हॉटेल व्यावसायिकांना महापालिकेचा इशारा

गरजूंना मदत पोहोचविण्यासाठी पालिका समन्वय कक्ष

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक, विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्था होण्याच्या दृष्टीने सर्व हॉटेल्स व्यावसायिक, विद्यार्थ्यांसाठीच्या खानवळी, महाविद्यालय, वसतिगृहातील मेस यांनी फोनवरून खाद्यपदार्थांची मागणी केल्यानंतर “होम डिलेव्हरी’ पार्सल स्वरूपात करावी. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा महापालिकेने दिला आहे. तसेच अन्न आणि शिधा याची गरज असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविण्यासाठी महापालिकेने समन्वय कक्ष स्थापन केला आहे.

फायद्याची गोष्ट ! ‘फ्री’मध्ये LPG सिलेंडर देतंय मोदी सरकार, ‘लाभ’ घेण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोना विषाणू विरूद्ध युद्धात केंद्र सरकारने देशभरात 21 दिवस लॉकडाउन लागू केले आहे. या दरम्यान गरीब वर्गाला दिलासा देण्यासाठी सरकारने 1.7 लाख कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले आहे. या मदत पॅकेजचा एक भाग म्हणजे उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र सरकार मोफत एलपीजी सिलेंडर पुरवेल. सरकारच्या या योजनेचा लाभ केवळ या योजनेंतर्गत नोंदणीकृत असलेल्या लोकांनाच मिळणार आहे.

EPFO कडून 6 कोटी ग्राहकांना मोठा दिलासा ! आता घर बसल्या ‘आधार’ कार्डव्दारे होईल ‘हे ‘काम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आता जन्मतारीख अद्ययावत करण्यासाठी ऑनलाइन वैध पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारेल. ई-केवायसी प्रक्रियेत, ग्राहकांना जन्म प्रमाणपत्र देण्याची एक प्रणाली आहे. कामगार मंत्रालयाने रविवारी याबाबत माहिती दिली. कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘कोविड -१९’ या साथीच्या आजरा दरम्यान ऑनलाइन सेवांना चालना देण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. ईपीएफओने आपल्या क्षेत्रीय कार्यालयांना या संदर्भात सुधारित अधिसूचना जारी केली आहे, जेणेकरुन पीएफ सदस्यांचा जन्म प्रमाणपत्र म्हणून आधार कार्डचा वापर होऊ शकेल. अशा प्रकारे हे सुनिश्चित केले जाऊ शकते की युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) साठी केवायसीची पूर्तता वाढेल.

सरकारनं दिली सूट, PF अकाऊंटमधून पैसे काढणं झालं सोपं, फक्त ‘या’ 8 स्टेप्स फॉलो करा, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) अलीकडेच आपल्या ग्राहकांसाठी काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, जेणेकरून त्यांना EPF खात्यातून पैसे काढताना कोणतीही अडचण येऊ नये. अशात तुम्हाला क्लेमच्या अगोदर या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत जेणेकरुन तुम्ही कोणती चूक करणार नाही. यात EPFO ने माहिती दिली आहे की, पात्रता काय असेल आणि या रकमेवर तुम्हाला कर भरावा लागेल की नाही.

IRDAI नं घेतला निर्णय ! कोट्यवधी जीवन विमा पॉलिसीधारकांना मोठा ‘दिलासा’, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (Irdai) जीवन विमा पॉलिसीधारकांना एक मोठी भेट दिली आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने जीवन विमा पॉलिसीधारकांना प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा अधिक कालावधी दिला आहे. कोरोना विषाणू साथीमुळे देशात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नियामकाने हे पाऊल उचलले आहे. ज्या जीवन विमा पॉलिसीधारकांची नूतनीकरण तारीख मार्च आणि एप्रिलमध्ये येते त्यांना प्रीमियम भरण्यासाठी अतिरिक्त 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. आयआरडीएने अगोदरच आरोग्य विमा पॉलिसीचे नूतनीकरण प्रीमियम आणि थर्ड पार्टी मोटर विमा भरण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला आहे.

कोरोनामुळे चिंताग्रस्त झालेल्या लोकांना मिळणार मानसिक आधार; राज्याने सुरू केला हेल्पलाईन नंबर

एमपीसी न्यूज – कोरोना या आजारामुळे संपूर्ण जगात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या महामारी पासून बचाव करण्यासाठी राज्यात आणि देशात वेगवेगळे प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला व सोशल डिस्टन्सिंग तसेच वारंवार हात धुणे या सारख्या सवयींचा घरी राहूनच अवलंब करण्याची सूचना करण्यात आली. पण या […]

पुणे परिसरात १० टक्के विजेच्या मागणीत घट; पंतप्रधानांच्या आवाहनाचा परिणाम

पुणे - लॉकडाऊनमुळे राज्यातील विजेची मागणी निम्म्याने घटली आहे. त्यातच शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिल्यामुळे त्यामध्ये आणखी दहा टक्‍क्‍यांनी घट झाली. परिणामी शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास गेल्या अनेक वर्षातील सर्वांत कमी म्हणजे 10 ते 11 हजार मेगावॅट एवढा वीजपुरवठा झाला. तर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात मिळून सुमारे 600 ते 700 मेगावॅटपर्यंत विजेचा पुरवठा झाला.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह मावळमध्येही दिवे लावून दिला ‘गो कोरोना गो..’चा नारा

एमपीसी न्यूज – पुणे, पिंपरी-चिंचवडसह मावळमध्येही नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 9 वाजता 9 मिनिटे दिवे लावून ‘गो कोरोना गो..’ नारा दिला. तर, काही ठिकाणी ‘वंदे मातरम’च्या घोषणाही देण्यात आल्या. मागील तीन दिवसांत पुण्यात ‘कोरोना’चे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या कोरोनाला हरविण्यासाठी पुणेकरांनी घरोघरी दिवे लावून एकतेचा संदेश दिला. काही ठिकाणी ‘गो […]

डीआरडीओचे 'पर्सनल सॅनिटायझेशन एनक्लोझर' आणि 'फेसशिल्ड'

पुणे : कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) देशातील विविध प्रयोगशाळांमध्ये विविध वैद्यकीय संसाधनांचा उत्पादनाचे कार्य वेगाने सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर डीआरडीओच्या वतीने आणखीन दोन यंत्रणे तयार करण्यात आले आहेत.

हातावर पोट असणाऱ्यांसाठी मदतीचे असंख्य हात

माथाडी, बांधकाम मजुरांना सामाजिक संघटनांचा दिलासा

चऱ्होली – देशात करोनामुळे संचारबंदी, जमावबंदी कायदा लागू झाल्याने सर्व उद्योग, व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या असंख्य शेकडो लोकांचे हाताला मिळणारे काम बंद झाले आहे. परिणामी त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय लागत नसल्याने परप्रांतीय कुटुंबे आपल्या गावी जाण्यासाठी निघाल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे.