Sunday 21 October 2012

सांगवीच्या सराफाला गंडविणारा आरोपी गुजरातमध्ये जेरबंद

सांगवीच्या सराफाला गंडविणारा आरोपी गुजरातमध्ये जेरबंद
पिंपरी, 20 ऑक्टोबर
अकरा लाखाऐवजी 11 हजाराचा धनादेश देऊन सराफाची फसवणुक करणा-या तिघा भामटय़ांचा पर्दाफाश करण्यात सांगवी पोलिसांना यश आले आहे. यापैकी एकाला पोलिसांनी गुजरातमधून ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 8 लाख 31 हजारांचा मुद्देमाल आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


बेकायदा बांधकामांचा प्रश्न सोडविता येत नसेल तर राजीनामा द्या - खडसे

बेकायदा बांधकामांचा प्रश्न सोडविता येत नसेल तर राजीनामा द्या - खडसे
पिंपरी, 20 ऑक्टोबर
राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत भागीदार आहे. तर महापालिकेतही राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे, असे असतानाही पक्षाच्या नेत्यांना आणि आमदारांना शहरातील बेकायदा बांधकामांचा प्रश्न सोडविता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आज (शनिवारी) पिंपरीमध्ये दिले.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


राज्यस्तरीय अजिंक्यपद लगोरी स्पर्धेला सुरूवात

राज्यस्तरीय अजिंक्यपद लगोरी स्पर्धेला सुरूवात
पिंपरी, 20 ऑक्टोबर
लगोरी असोसिएशन महाराष्ट्र आणि लगोरी फेडरेशन ऑफ इंडीयाशी संलग्न असलेल्या पुणे जिल्हा लगोरी असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय अजिक्यपद लगोरी स्पर्धेचे उद्‌घाटन आज सायंकाळी पिंपळे निलख येथील महापालिकेच्या शाळा क्र.52 व 53 च्‍या मैदानात करण्यात आले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड विरुद्ध रायगड असा प्रदर्शनीय सामनाही घेण्यात आला.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


आणखी 111 व्यावसायिक बांधकामे महापालिकेच्या 'रडार'वर

आणखी 111 व्यावसायिक बांधकामे महापालिकेच्या 'रडार'वर
पिंपरी, 20 ऑक्टोबर
पिंपरी-चिंचवड महापालिकेने गेल्या तीन महिन्यात 95 अनधिकृत बांधकामे भुईसपाट केली आहेत. आणखीन 111 व्यावसायिक स्वरुपाची बांधकामे महापालिकेच्या 'रडार'वर आहेत. तब्बल 12 लाख 92 हजार 646 चौरस फूट जागेत ही बांधकामे असून पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने त्यावरील कारवाई पुढे ढकलण्यात आली आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


सिंचन घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करावी - एकनाथ खडसे

सिंचन घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करावी - एकनाथ खडसे
पिंपरी, 20 ऑक्टोबर
सिंचन खात्याची श्वेतपत्रिका काढण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने दर्शविली असली तरी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या माध्यमातून होणा-या चौकशीला 'राष्ट्रवादी'चा विरोध का आहे, असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. पाटबंधारे खात्यात कोट्यवधी रूपयांच्या गैरव्यवहाराची उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


सामाजिक जबाबदारी पुरस्कार टाटा मोटर्सला प्रदान

सामाजिक जबाबदारी पुरस्कार टाटा मोटर्सला प्रदान
पिंपरी, 20 ऑक्टोबर
मराठा चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे दरवर्षी दिला जाणारा बी.जी.देशमुख अवॉर्ड फॉर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलिटी - एक्सलन्स अवॉर्ड हा यंदा टाटा मोटर्सला देण्यात आला. मेरीको इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक हर्ष मरिवाला यांच्या हस्ते टाटा मोटर्सचे पुणे प्रकल्प प्रमुख श्री. अनिल सिन्हा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


सराफानेच गंडविले सराफाला

सराफानेच गंडविले सराफाला: पिंपरी -&nbsp सोनेखरेदीच्या बहाण्याने हिंजवडीतील एका सराफाने मुंबईतील सराफाला लाखो रुपयांचा गंडा घातला.

Auto Ancillary Show 2012 to be held in Pimpri

Auto Ancillary Show 2012 to be held in Pimpri: The Mahratta Chamber of Commerce Industries and Agriculture (MCCIA) and India Trade Promotion Organization has organizing the 'Auto Ancillary Show 2012,' at the Auto Cluster Exhibition Complex, Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC).

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून भरघोस देणगी

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून भरघोस देणगी: राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून भरघोस देणगीनारायण मेघाजी लोखंडे सभागृह, पिंपरी&nbsp - 'सकाळ'च्या "पुणे बस डे' या उपक्रमात तन, मन आणि धनाने सहभागी होण्याची शपथ पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी बुधवारी घेतली.

वर्षाला सहा सिलिंडर फक्त; कुटुंब होताहेत विभक्त

वर्षाला सहा सिलिंडर फक्त; कुटुंब होताहेत विभक्त: वर्षाला सहा सिलिंडर फक्त; कुटुंब होताहेत विभक्तपिंपरी - वर्षाला फक्त सहा गॅस सिलिंडर अनुदानित किमतीत देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे एकत्र कुटुंब पद्धती विभक्त होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

स्थायीमध्ये नगरसेविकांचा 'चंडिकावतार'

स्थायीमध्ये नगरसेविकांचा 'चंडिकावतार': पिंपरी -&nbsp वेळोवेळी माहिती मागवूनही ती दिली जात नाही, कामाचे आदेश देऊनही कामे सुरू होत नाहीत, प्रभागातील कामांची माहिती अधिकारी देत नाहीत, या कारणामुळे स्थायी समितीमधील महिला सदस्यांनी मंगळवारी "चंडिकावतार' घेतला व अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणासाठी दोनशे कोटींचा प्रकल्प

इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणासाठी दोनशे कोटींचा प्रकल्प: पिंपरी -&nbsp इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणासाठी दोनशे कोटी रुपयांचा प्रकल्प केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून राबविला जाणार आहे.

डिझेल शेगडीचा भडका; आठ जण गंभीर भाजले

डिझेल शेगडीचा भडका; आठ जण गंभीर भाजले: पिंपरी -&nbsp स्वीट होममधील डिझेल भट्टीचा (शेगडी) भडका उडाल्याने कढईतील गरम तेलाने एकाच कुटुंबातील आठ जण भाजले आहेत.

Pimpri Chinchwad Municipal Corporation told to pay 8 lakh as service tax to revenue department

Pimpri Chinchwad Municipal Corporation told to pay 8 lakh as service tax to revenue department: Following a court directive, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will pay Rs 8 lakh as service tax to the department of revenue, Union finance department.

Civic officials not acting on complaints, say Pune corporators

Civic officials not acting on complaints, say Pune corporators: Women members of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation's (PCMC) standing committee on Wednesday alleged during the panel's meeting that civic officials were not taking cognizance of their complaints about civic works.

शोषित महिलांसाठी आशेचा किरण

शोषित महिलांसाठी आशेचा किरण: बाजारू लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने लवकरच रोजगार प्रशिक्षण विषयक उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी भोसरीतील चैतन्य महिला मंडळाने पुढाकार घेतला आहे.

पीएमपीकडून नवरात्रौत्सवाची भेट

पीएमपीकडून नवरात्रौत्सवाची भेट: नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) पिंपरी-चिंचवडमधील महिलांसाठी दोन मार्गांवर विशेष बससेवा सुरू करून गुरुवारी (१८ ऑक्टोबर) अनोखी भेट दिली.

विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे ‘मिशन १००’!

विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे ‘मिशन ...:
‘पिंपरी पॅटर्न’ राज्यभरासाठी
 बाळासाहेब जवळकर
लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुण्यात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रवादीने रणिशगच फुंकले आहे.
Read more...

देवीच्या दर्शनाला जाताना तरुणाचा चिंचवड येथे रेल्वेतून पडून मृत्यू

देवीच्या दर्शनाला जाताना तरुणाचा ...:
पाच वर्षांचा मुलगा सुदैवाने बचावला
पिंपरी / प्रतिनिधी
नवरात्रीनिमित्त त्याने सुट्टी घेतली. पाच वर्षांचा मुलगा जयेशला एकवीरा देवीच्या दर्शनाला न्यायचे म्हणून सकाळी तो निघाला. लोणावळ्याला जाणारी लोकल पकडली.
Read more...

अजितदादांच्या मध्यस्थीनंतरही पिंपरीत जकात समानीकरणाचा तिढा कायम

अजितदादांच्या मध्यस्थीनंतरही ...:
पालिकेला १२० कोटींचा तोटा; सभेत आज निर्णय
पिंपरी / प्रतिनिधी
महापालिका व उद्योजक या दोघांचे हित लक्षात घेऊन जकात दरात समानता आणण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी केली.
Read more...

वाहनांच्या सुटय़ा भागांच्या प्रदर्शनाची सुरुवात

वाहनांच्या सुटय़ा भागांच्या ...:
चिंचवड येथे २१ ऑक्टोबपर्यंत खुले
पिंपरी / प्रतिनिधी
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि आयटीपीओ यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथे वाहनांच्या सुटय़ा भागांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून गुरुवारी त्याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. येत्या २१ ऑक्टोबपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
Read more...

Art of Living group extends support

Art of Living group extends support: PUNE: Teachers from ‘The Art of Living’ group in Pune and Pimpri-Chinchwad pledged their support for the Pune Bus Day movement on November 1.
Art of Living group extends support

PCMC to replicate 24x7 water scheme

PCMC to replicate 24x7 water scheme: After the success of the pilot project to provide 24x7 water to Yamunanagar, Nigdi, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to replicate the round-the-clock water supply scheme in the twin town.

6 years on, PCMC’s 24x7 water supply plan a success story

6 years on, PCMC’s 24x7 water supply plan a success story: Under the pilot project, Yamunanagar residents are getting round-the-clock water supply.

युवकांनो, अपमान, अपयश पचवायला शिका !

युवकांनो, अपमान, अपयश पचवायला शिका !
पिंपरी, 20 ऑक्टोबर
काहीतरी करून दाखवण्याच्या वयात तरुणांच्या हाती तलवारी, चाकू, पिस्तुल यांसारखी हत्यारे येत आहेत. जिथे या तरुणांनी काहीतरी रचनात्मक कार्य करायचे तिथे सूड भावनेने एकमेकांचा गळा घोटण्याची, आत्महत्या करण्याची दुष्कृत्ये केली जात आहेत.
मागील आठवडयात मित्राला हल्ला करणा-या युवकांना रोखणा-या बावीस वर्षीय युवकाला आपले प्राण गमविण्याची दुर्दैवी वेळ आली. तर दुसरीकडे एका 22 वर्षीय युवतीने आत्महत्या करून तडकाफडकी आपली जीवनयात्रा संपविली.या दोन्ही घटनांच्या विचार केला, तर तरूणाच्या खुनाचे कारण क्षुल्लक होते. तर युवतीच्या आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. तरुणांनी अशा मानसिकतेला बळी जाण्यापूर्वी अपयश, अपमान पचवायला शिकले पाहिजे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


पाण्याच्या टबमध्ये पडून एक वर्षाची चिमुरडी दगावली

पाण्याच्या टबमध्ये पडून एक वर्षाची चिमुरडी दगावली
पिंपरी, 19 ऑक्टोबर
खेळता - खेळता पाण्याच्या टबात पडल्याने एक वर्षाच्या मुलीचा दुर्देवी अंत झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी अकरा वाजता यमुनानगर - निगडी येथे घडली.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


दिवाळीपूर्वीच चार स्फोटांनी हादरले वडगाव मावळ

दिवाळीपूर्वीच चार स्फोटांनी हादरले वडगाव मावळ
वडगाव मावळ, 19 ऑक्टोबर
रानडुकरांच्या शिकारीसाठी बेकायदेशीरपणे जवळ बाळगण्यात आलेल्या स्फोटकांचे अचानक चार स्फोट झाल्याने आज दुपारी वडगाव मावळ गाव हादरून गेले. वडगावात बाजारपेठेच्या मागील बाजूला तसेच वडगाव न्यायालयाच्या जवळ दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ही घडली. दिवाळीत वाजविण्यात येणा-या बॉम्बच्या आवाजापेक्षा मोठा आवाज झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी तीन कुटुंबातील संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ज्या व्यक्तीकडे हा स्फोटकांचा साठा होता तो कुटुंबासह पसार झाला आहे. सुदैवानं या स्फोटामध्ये कोणीही जखमी झाले नाही.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


महिला नवरात्रौत्सव मंडळाने स्थापन केले स्वतःचे ढोलपथक

महिला नवरात्रौत्सव मंडळाने स्थापन केले स्वतःचे ढोलपथक
पिंपरी, 19 ऑक्टोबर
गणेश विसर्जन मिरवणुकीतील डिजेवरील बंदीमुळे पारंपारीक वाद्यांचा नाद पुन्हा एकदा घुमल्याचे पहायला मिळाले. त्यातून प्रेरणा घेवून तसेच डिजेच्या दणादणाटासाठी विसर्जन मिरवणुकीवर होणारा वारेमाप खर्च आणि ध्वनीप्रदुषण टाळण्यासाठी पिंपळेगुरव येथील सुवर्ण पार्क नवरात्रौत्सव महिला मंडळाने स्वतःचे ढोलपथक तयार केले आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


चिंचवडमध्ये नोव्हेंबरपासून महाराष्ट्राची खरेदी जत्रा

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34027&To=5
चिंचवडमध्ये नोव्हेंबरपासून महाराष्ट्राची खरेदी जत्रा
यशस्वी अभियान व सुनेत्रा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथे येत्या 7 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत 'महाराष्ट्राची खरेदी जत्रा' या महिला बचतगट उत्पादीत वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याची माहिती आमदार लक्ष्मण जगताप यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत दिली.

'पीएमपी'ची पिंपरी-चिंचवड महिला विशेष बससेवा पहिल्याच दिवशी 'फेल'

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34026&To=9
'पीएमपी'ची पिंपरी-चिंचवड महिला विशेष बससेवा पहिल्याच दिवशी 'फेल'
पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. ने (पीएमपीएमएल) पुण्या पाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्येही महिला विशेष बससेवा आजपासून (गुरुवारी) सुरु केली. मात्र ही बससेवा उद्‌घाटनानंतर अवघ्या काही तासातच 'फेल' झाली. पिंपरी येथे शुभारंभ होवून पुणे महापालिकेपासून पुन्हा पिंपरीकडे येत असताना ही बस संचेती रुग्णालयाजवळ बंद पडली. त्यामुळे या सेवेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मोकाट जनावरांमुळे रेल्वे प्रशासनाला डोकेदुखी

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34023&To=1
मोकाट जनावरांमुळे रेल्वे प्रशासनाला डोकेदुखी
पुणे-लोणावळा लोहमार्गावर मोकाट जनावरांच्या अपघातांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मोकाट जनावरे रेल्वे प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहेत.

'ऑटो अ‍ॅन्सीलरी' प्रदर्शनाचे उद्‌घाटन

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34018&To=10
'ऑटो अ‍ॅन्सीलरी' प्रदर्शनाचे उद्‌घाटन
इंडीयन ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन व मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज आणि अ‍ॅग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'ऑटो अ‍ॅन्सीलरी शो 2012' चे उद्‌घाटन फ्युरोशिया इंडीयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अ‍ॅड्रीयन विल्यम्स यांच्या हस्ते करण्यात आले.

पुणे महापालिकेत नवीन 28 गावांचा समावेश

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34016&To=7
पुणे महापालिकेत नवीन 28 गावांचा समावेश
पुणे महापालिकेत नवीन 28 गावे समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यापूर्वी प्रस्तावित करून वगळण्यात आलेल्या 15 गावांबरोबरच नवीन 13 गावांचा पुणे महापालिका क्षेत्रात समावेश करण्यात येणार आहे.