Sunday 10 December 2017

Aadhaar linking deadlines for these 6 services are fast approaching

According to the government’s mandate, you have to link your Aadhaar number with various key documents and services to continue using them. The deadlines for doing so are fast approaching, therefore, if you haven’t done it yet, it’s time to get a move on. Read on to find out how to go about the linking process.

The deadlines for doing so are fast approaching, so if you haven’t done it yet, it’s time to get a move on.

Civic body renews effort for better cleanliness ranking

PIMPRI CHINCHWAD: After the Pimpri Chinchwad Municipal Corporation slipped to the 72nd rank in the cleanliness ranking under Swachh Bharat Abhiyan in May 2017, the civic body will be making a renewed effort for cleanliness in housing societies, localities, schools, markets and hotels from January 2018.

माण- हिंजवडी रस्त्याच्या कामाला गती

हिंजवडी – माण ते हिंजवडी व फेज 3 पर्यंतच्या रस्त्यांचे काम प्रगतिपथावर आहे. हिंजवडी-माण एमआयडीसीतील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई व हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशन यांच्यासोबत मुंबई येथील विशेष बैठकीत कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिल्यानंतर कामाची गती वाढली आहे. बैठकीत दिलेल्या मंत्र्यांनी दिलेल्या आदेशांचा परिणाम रस्त्यावर दिसू लागला असल्याने नागरिक आणि आयटीयन्सला वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची आशा वाटू लागली आहे.

पर्यायी मार्गाचा विचार करण्याचे आश्‍वासन

पिंपरी – एचसीएमटीआर रिंगरोड बाधित नागरिकांसाठी प्रयत्नशील असलेल्या घर बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांची भेट घेवून चर्चा केली. या बैठकी दरम्यान नजीकच्या काळातील शहर विकास आराखडा रिव्हीव करते वेळी पर्यायी मार्गाचा विचार होऊ शकेल असे मत मनपा आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले असल्याची माहिती घर बचाव संघर्ष समितीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

AWBI seeks explanation on dog death at pound

Pune: The Animal Welfare Board of India (AWBI) has sought an explanation from the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) for the death of a dog from maggot wounds at its pound recently. Animal welfare officers alleged that dogs not meant for sterilization as well as lactating are illegally picked up by PCMC and left to die at the pound without food, water or treatment.

राज्यमंत्र्यांसमोरच भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

पिंपरी विधानसभा मतदार संघातील संघटनात्मक बांधणी व बूथनिहाय पक्षाचा विस्तार वाढविण्यासाठी आकुर्डीतील एका खासगी हॉटेलमध्ये अचानक भाजप पदाधिका-यांची बैठक घेण्यात आली. यावेळी पिंपरी विधानसभेचे प्रभारी तथा सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे हे पिंपरी विधानसभेतील जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेत असताना भाजपचे निष्ठावंत माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांनी जून्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाच्या विविध पदांचे वाटप करण्याची मागणी केली. यावरून शहर सरचिटणीस प्रमोद निसळ यांनी काही हातवारे व इशारे केल्याने, खाडे यांनी निसळ यांच्यावर निशाना साधत तुला माज आलाय का? अशी शिवराळ भाषा वापरल्याने दोघांमध्ये चांगलाच वाद पेटला. त्यांच्यातील वाद एवढा विकोपाला गेला की, दोघांनी एकमेकांची कॉलर पकडून शिवीगाळ केली. दरम्यान, नगरसेवक शितल शिंदे आणि अनुप मोरे यांनी मध्यस्थी करुन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिंपरीचे प्रभारी दिलीप कांबळे यांना या पदाधिकाऱ्यांचा चांगलाच अनुभव आल्याने त्यांनी अचानक बैठक पुढे ढकलली.

मोरया गोसावी मंदिर परिसरातून टनभर कचरा जमा

नवी सांगवी : मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने चिंचवडगावातील श्री मोरया गोसावी गणपती मंदिर आणि पवना नदी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून गणपती मंदिर, बाजूचा परिसर व नदीपरिसरातून सुमारे एक टन कचरा जमा करण्यात आला.

क्रीडा समिती सभापतींची नाराजी

पिंपरी – महापालिकेच्या क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या पाक्षिक सभेत अधिकारी अजेंड्यावर विषयच आणत नाहीत. एखादा दुसरा विषय सोडला तर अधिकारी काहीच कामे करीत नसल्याने क्रीडा वगळता अन्य कोणतेच विषय पत्रिकेवर नसतात. त्यामुळे क्रीडा समिती सभापतीचे लक्ष्मण सस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना नाराजी व्यक्‍त केली.

“स्वाइन फ्लू’ आटोक्‍यात?

पिंपरी – शहरात स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या आटोक्‍यात येत आहे. मागील दोन आठवड्यात एकही बाधित रुग्ण आढळला नाही. त्यामुळे शहरवासियांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आहे. शहरातील वातावरणात बदल होवून थंडी अधिक जाणवू लागली आहे.

वैद्यकीय अधिक्षकांना डॉक्‍टराकडून दमदाटी?

पिंपरी – महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय सतत डॉक्‍टरांच्या विविध कारणांनी चर्चेचा विषय ठरते. महापालिकेच्याच एका डॉक्‍टरने रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज देशमुख यांना दमदाटी करून धमकावण्यात आले आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.8) घडला आहे. त्याची तक्रार महापालिका आयुक्तांपर्यंतही पोहचली असून डॉ. देशमुख यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी मागितली आहे.

अनधिकृत फ्लेक्‍सवरून प्रशासन धारेवर

पिंपरी – बेकायदेशीरपणे चौकात, बाजारपेठेत अथवा महत्वाच्या गजबजलेल्या ठिकाणी वाढदिवस, खासगी कार्यक्रम, उपक्रम आणि व्यवसायीक जाहिराती लावून शहराचे विद्रुपीकरण केले जात असताना महापालिकेतील आकाशचिन्ह परवाना विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही, हे लज्जास्पद आहे. या विभागाचे सहायक आयुक्त याला जबाबदार असून त्यांच्या हलगर्जीपणामुळेच शहरातील बकालपणा वाढला आहे, अशा शब्दांत नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला धारेवर धरले. त्यावर येत्या सोमवार (दि. 11) पर्यंत सरसकट अनधिकृत फ्लेक्‍सवर कारवाई करावी, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले, अशी माहिती स्थायी सभापती सीमा सावळे यांनी दिली.