Thursday 28 February 2019

भोसरीत महाशिवरात्री निमित्त भव्य कीर्तन महोत्सव

पिंपरी (Pclive7.com):- महेशदादा स्पोट्‌र्स फाऊंडेशन यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री निमित्त 26 फेब्रुवारी ते 5 मार्च 2019 दरम्यान भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे देखील कीर्तन होणार आहे. याबाबतची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.

स्थायीकडून 14 कोटीच्या विकास कामांना मंजुरी

पिंपरी चिंचवड – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 14 कोटी 76 लाख 4 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थायी सभा सभापती ममता गायकवाड यांच्या उपस्थितीत बुधवारी झाली.

महापालिकेच्या सफाई कामगारांना

पिंपरी चिंचवड ः महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना सुरक्षेची आवश्यकता असून त्यांना जीवनावश्य वस्तूंसह आरोग्याच्या सुविधा मोफत पुरविण्यात याव्यात, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी आयुक्तांना निवेदन दिले.  त्यात म्हटले की, पिंपरी चिंचवड शहरात स्वच्छतेची कामे करणार्‍या कामगारांच्या आरोग्याबाबत महापालिका प्रशासन निष्काळजीपणा करीत आहे. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी योजना असल्या तरी त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सफाई कामगारांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर होण्याची भीती आहे. सफाई कामगारांना सुरक्षेची आवश्यक साधने मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. हातमोजे, गमबुट, मास्क,रेनकोट, गणवेश,साबण, अशा किमान सुविधाही त्यांना पुरविल्या जात नसल्याने या कामगारांमध्ये कर्करोग, त्वचारोग, टीबी, श्‍वसनविकाराचे प्रमाण वाढत आहे. त्यातच आता पावसाळा सुरू झाल्याने पुढील तीन-महिने कामगारांना वाईट परिस्थितीत काम करावे लागते, असेही त्यांनी नमूद केले आहे.

पुणे – औंध-सांगवी पुलाच्या रुंदीकरणास मंजुरी

पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीवरील औंध येथील मुळा नदीवरील सांगवी व वाकडला जोडणाऱ्या कै. रामजी विठ्ठल शिंदे पुलाच्या रुंदीकरणाच्या कामाला बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. या कामासाठी सुमारे 23 कोटींचा खर्च येणार आहे. या मार्गावरील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यांचे रुंदीकरण झाले असून पुणे महापालिकेनेही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते औंधपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण केले आहे. या पुलाच्या रुंदीकरणामुळे या मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षीत आणि गतीमान होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली. दरम्यान, या पुलामुळे या भागात होणारी वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.

20 हजार कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर

मुंबई  – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळे सरकारी तिजोरीवर पडलेल्या आर्थिक भाराचे परिणाम राज्याच्या अर्थसंकल्पातही उमटले. सुधारीत वेतन आयोगामुळे 19 हजार 784 कोटींचा महसुली तुटीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. वस्तू व सेवा करामुळे राज्याला 1 लाख 15 हजार कोटींचा महसूल मिळाल्यामुळे महसूली उत्पन्न 3 लाख 14 हजारांपर्यंत पोहोचले. मात्र, महसूली खर्च 3 लाख 34 हजार 273 कोटी रूपयांपर्यंत वाढल्याने तुटीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या पाच वर्षांत योग्य नियोजनामुळे सरकारला कर्जाचे प्रमाण कमी राखण्यात यश आल्यामुळे कर्जाची रक्कम 4 लाख 14 हजार 411 कोटी एवढी पोहोचली असली तरी वर्षअखेर कर्जाचा बोजा 4 लाख 71 हजार कोटींवर जाणार आहे.

स्वारगेट ते निगडीदरम्यान मेट्रोला मंजुरी

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका भवनापासून निगडी येथील भक्तीशक्ती चौकापर्यंत मेट्रो रेल्वे मार्गाचा विस्तार करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने बुधवारी (ता. २७) मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी एक हजार ४८ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे आता स्वारगेटपासून निगडीपर्यंत २१ किलोमीटर मार्गावर मेट्रो धावेल. 

अनधिकृत घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अधिकृत करा: आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी- पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर उभारण्यात आलेली अनधिकृत घरे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अधिकृत करण्यात यावेत. तसेच बांधकामांचा आराखडा एफएसआयनुसार मंजूर करण्यात यावा, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी अर्थसंकल्पीय अ धिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.

आयुक्तांची चौकशी करा: नगरसेवक तुषार कामठे

पिंपरी- पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने काढलेल्या विकास कामांच्या निविदांमध्ये ’रिंग’ जात आहेत. पुरावे देऊन आयुक्त ’रिंग’ झाली नसल्याचा दावा करतात. ’रिंग’ मध्ये आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप करत त्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक तुषार क ामठे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून त्यांनी ही मागणी केली आहे. नगरसेवक कामठे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून निविदांमध्ये ठेकेदारांनी संगनमत (रिंग) केल्या आहेत. रिंगमध्ये महापालिका अधिकारी सहभागी आहेत. त्यांच्या सहकार्यानेच ’रिंग’ चालू आहेत. यामुळे करदात्या नागरिकांचे नुकसान होत आहे. ठेकेदार आणि रिंगमधील अधिका-यांना मोठा लाभ होत असल्याचे सांगितले आहे.

‘सोशल मिडीया एक्स्पर्ट’वर महापालिका दरमहिन्याला करणार 70 हजारांचा खर्च

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फे शहर परिवर्तन कार्यालयांतर्गत सिटीझन एन्गेजमेंट कार्यक्रम आणि सोशल मिडीया कॅम्पेन राबविण्याचे काम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘सोशल मिडीया एक्स्पर्ट’ची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी अमोल देशपांडे यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी दरहमहा 70 हजार रुपये मोजले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे.महापालिकेतर्फे राबविण्यात येणा-या विविध प्रकल्पांच्या कामकाजांसाठी शहर परिवर्तन कार्यालय (सिटी ट्रान्फॉर्मेशन ऑफीस तथा सीटीओ) स्थापन करण्यात आली आहे. या कार्यालयामार्फत विविध माध्यमांचा उपयोग करून सिटीझन एन्गेजमेंट कार्यक्रम आणि सोशल मिडीया कॅम्पेन राबविण्यात येणार आहे.

पंतप्रधान आवास योजनेतंर्गत आणखी 5 हजार घरे

पुणे : पंतप्रधान आवास योजने अंतर्गत महानगरपालिकेच्या खाजगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावरील 8 प्रकल्पांना राज्य व केंद्र शासनाने नुकतीच मान्यता दिली.
महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी या प्रकल्पाचे सादरीकरण केले.

विद्यापिठातील अतिरिक्त भत्ते बंद

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अधिकारी व कर्मचार्‍यांना वेतनाव्यतिरिक्त दिले जाणारे भत्ते बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला होता. त्यानुसार कार्यवाही करीत विद्यापीठामार्फत येत्या 1 एप्रिल 2019 पासून अतिरिक्त भत्ते बंद करण्याची अंमलबजावणी होणार आहे. त्याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने प्रसिद्ध केल्याने अतिरिक्त Aभत्ते बंद होण्याच्या निर्णयावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

महापालिका तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हाती; शनिवारी फैसला

आरती चोंधे, शीतल शिंदे की संतोष लोंढे एमपीसी न्यूज – श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक चाव्या कोणाच्या हाती असणार आहेत, याचा फैसला शनिवारी (दि. 2 मार्च ) रोजी होणार आहे. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शनिवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज करायचे आहेत. त्यामुळे अर्ज भरल्यानंतर लगेच अध्यक्ष कोण होणार हे स्पष्ट होणार 

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पिंपरी रेल्वे स्थानकावर सरकता जिना

एमपीसी न्यूज – वेळ आणि शारीरिक श्रम वाचविण्यासाठी बहुतांश प्रवासी जिना चढणे नापसंद करतात. जीव धोक्यात घालून बेकायदेशीरपणे रेल्वे रूळ ओलांडला जातो. यासाठी पिंपरी रेल्वे प्रशासनाने सरकता जिना बसविण्याचे काम हाती घेतले. या जिन्याचे काम पूर्ण झाले आहे.

रावेत बंधा-यातील गाळ काढण्यास सुरुवात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने रावेत बंधा-यातील गाळ काढण्यास बुधवार पासून सुरुवात करण्यात आली आहे. पुढील 20 ते 25 दिवस गाळ काढण्यात येणार आहे. त्यानंतर बंधा-याच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होईल. अशुद्ध जल उपसा केंद्राकडे येणा-या प्रवाहातील अडथळे दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. 

दहावीची परीक्षा उद्यापासून

पुणे –  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा शुक्रवारपासून (दि.१ मार्च) सुरू होत आहे. परीक्षेला राज्यातील नऊ विभागीय मंडळातील एकूण १७ लाख ८२३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यावर्षी परीक्षेला ५० हजारांनी विद्यार्थी संख्या घटली.  ही माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सचिव डॉ. अशोक भोसले उपस्थित होते. यंदाची दहावीची परीक्षा नवीन अभ्यासक्रमानुसार होणार आहे.