Tuesday 7 April 2020

42 docs of Pune’s Dr DY Patil hospital test negative for Covid-19


Good New : पिंपरी-चिंचवडच्या त्या 42 डॉक्टरांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह


महापालिकेचे निवारा केंद्र ठरतेय बेघरांचा आसरा

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न सुरू असून पिंपरी-चिंचवड महापालिकेने देखील बेघर असणा-या व्यक्तींना तात्पुरता निवारा देण्यासाठी 11 ठिकाणी निवारा केंद्र निर्माण केले आहेत. त्यापैकी सहा केंद्रात 213 नागरिकांना ठेवण्यात आले आहे. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आलेल्या मदतीतून या नागरिकांना महापालिकेमार्फत जेवण पुरविले जाते. यामुळे […]

PCMC urges residents to wear cloth masks, avoid going out to buy medical ones


Coronavirus : पिंपरीतील डॉक्टरचे नायडू रुग्णालयात कोरोनाशी दोन हात

पिंपरी - कोरोनाच्या भयान वातावरणात देव आणि धर्माच्या पलिकडे खरे देवदूत आहेत ते डॉक्टर आणि त्यांचे वैद्यकीय कर्मचारी. आपल्या जगण्याची लढाई आता डॉक्टर लढताहेत. स्वतः जोखीम स्वीकारून हीच डॉक्टर मंडळी कोरोनाबाधितांवर उपचार करत आहेत. या कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आम्ही लढत राहू असा विश्वास ते बाळगून आहेत. पिंपरीतील एका युवा डॉक्टर पुण्यात कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असलेल्या नायडू रुग्णालयात कोरोनाशी दोन हात करताहेत. डॉ. अमर अंकुशराव बारा तास या युद्धात आघाडी सांभाळत आहेत.

‘निजामुद्दीन’च्या कार्यक्रमाला गेला असाल तर पालिकेला माहिती द्या – आयुक्‍त हर्डीकर

पिंपरी – दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या मरकजच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेले अनेकजण माहिती लपवित आहेत. त्यामुळे शहरात करोनाचा धोका वाढण्याची शक्‍यता आहे. ही बाब लक्षात घेऊन या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या नागरिकांनी स्वत: पुढे येत महापालिकेला माहिती द्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

लॉकडाऊनमध्ये थेट ‘फेसबुकवर’ दारूच्या ‘जाहिराती, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केले ‘हे’ आवाहन

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  जगभरात कोरोना व्हायरसने धूमाकूळ घातला आहे. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असून भारतात देखील कोरोना व्हायरने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र, लॉकडाऊनचाही काही समाजकंटकांकडून गैरवापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांनी ट्विट करून नागरिकांना जागृत केले आहे.

[Video] आमदार महेश लांडगे यांची मातीशी जोडलेली नाळ.. कोरोनाच्या एकांतवासात गाई म्हशींची साथ...!

“जरी जाहलो आमदार,तरी नाही विसरलो माती, जरी झालो मोठा, तरी तीच आईची कुशी, कितीही मोठा असलो राणा, तरी दुधदुभत्या गाईम्हशी आणि शेती हाच बाणा”

[Video] नगरसेवक शाम लांडे यांच्यावतीने कासारवाडीत ‘एक हात मदतीचा’ उपक्रम

पिंपरी (Pclive7.com):- कोरोनामुळे मागील बारा दिवसांपासून देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरीभागातील हजारो कुटुंबियांची आर्थिक अडचण झाली आहे. अशा गरीब कुटुंबांना, शहरात भाड्याने राहणा-या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अन्नाची टंचाई भासत आहे. अशा गरजू, गरीब, कुटुंबांना व विद्यार्थ्यांना सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मदत करण्याच्या उद्देशाने कासारवाडीतील स्व. सीताबाई लांडे प्रतिष्ठान आणि नगरसेवक शाम लांडे मित्र परिवारच्या वतीने ‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेतून अन्नधान्य, किराणा व सॅनिटायझर किटचे मोफत वाटप करण्यात येत आहे. कासारवाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते शाम लांडे यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमात कासारवाडी परिसरातील सुमारे दीड हजार कुटुंबांना या किटचे मोफत वाटप सोमवारपासून (दि.६) सुरु करण्यात आले. यावेळी शाम लांडे, भोसरी मंडलाधिकारी जयश्री महेश कवडे, भोसरी गाव कामगार तलाठी अश्विनी होडगे, जैन समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक पगारीया, शांतीलाल ओसवाल, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सयाजी लांडे, रमेशबापू लांडगे, राजेंद्र शेळके, विजय गाढवे, नितीन आगरवाल आदींच्या उपस्थित होते.

पाणी, दिवाबत्ती, आरोग्याच्या सक्षम सुविधेमुळे पिंपरी-चिंचवडकरांनाचा ‘लॉकडाऊन’ झाला सुसह्य!

एमपीसी न्यूज – ‘लॉकडाऊन’मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने यंत्रणा सक्षमपणे राबविली. अतिशय उत्तम नियोजन करत पाणी, दिवाबत्ती, झाडलोट, नियमित कचरा उचलून दररोज शहर स्वच्छ ठेवले. नागरिक घरी असल्याने पाण्याचा अधिकचा वापर असतानाही पाणीपुरवठा सुरळीत ठेवला. पाच हजार स्वच्छता कर्मचारी रस्त्यावर आहेत. महापालिकेने चांगली यंत्रणा राबविल्याने  नागरिकांना  ‘लॉकडाऊन’ देखील सुसह्य झाला आहे. उत्तम नियोजन केल्यानिमित्त हर्डीकर प्रशासनाचे कौतुक […]

स्वयंसेवी संस्थांची ‘माणुसकी’, 30 हजार गरजूंना जेवणाचे डब्बे

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू संसर्गामुळे आपत्कालीन परिस्थिती उदभवली आहे. या कालखंडामध्ये शहरातील गरजू व्यक्तींपर्यंत अन्न आणि शिधा पोहचविण्यासाठी महापालिका स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून समन्वय साधत आहे. या कार्यात सहभागी झालेले स्वयंसेवक स्वतःची काळजी घेऊन प्राप्त परिस्थितीमध्ये आपले योगदान देत आहेत. या यंत्रणेव्दारे शहरातील विविध भागातील सुमारे 29 हजार 953  गरजू व्यक्तींना आज (सोमवारी) डब्बे व […]

पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालयाकडून गरजुंना मदतीचा हात

एमपीसी न्यूज : कोरोनामुळे सध्या संपूर्ण देश लॉकडाऊनने बंद आहे. अशावेळी हातावर पोट असलेल्या व रोजंदारीवर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांचे प्रचंड हाल होत आहेत. अशा अनेक कुटुंबांना पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालयातील तहसिदारांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्व:खर्चातून जीवनावश्यक साहित्याची मदत केली. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासकीय यंत्रणा दिवसरात्र कार्यरत आहे. शासकीय पातळीवर आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत […]

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिखली गाव राहणार तीन दिवस बंद

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिखली गाव बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी एकमताने  घेतला आहे. यामध्ये केवळ रुग्णालये आणि मेडिकल दुकाने सुरू राहणार आहेत. हा बंद 10 ते 12 एप्रिल या कालावधीत राहणार आहे. संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तू आणि सेवा  यांचा पुरवठा सुरू असतो. चिखलीकरांनी मात्र बंदच्या काळात केवळ दूध आणि वैद्यकीय सेवा सुरू […]

इस्कॉन आणि उद्योजक राहुल बजाज यांच्या सहकार्यातून दररोज 30 हजार गरजूंना मिळतोय ‘मायेचा घास’

एमपीसी न्यूज – कोरोना या विषाणूंचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. या जीवघेण्या विषाणूपासून बचाव करायचा असेल तर घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले. सर्व राज्यांच्या व जिल्ह्यांच्या सीमा सील केल्यामुळे बाहेरगावचे कामगार, मजूर, रोजंदारी वरचे कर्मचारी, विद्यार्थी, गरीब […]

पंधरा मिनिटांत निर्जंतुकीकरण करणारा ‘युव्ही फॅन’ विकसित; पुण्यातल्या लॅबची निर्मिती

रुग्णालये निर्जंतुक ठेवण्यासाठी हे यंत्र उपयुक्त ठरणार असून, आता त्याची निर्मिती सुरू करण्यात आली आहे.

मुंबई-पुण्यासाठी आता ही शेवटची संधी! नाहीतर होईल न्यूयॉर्कसारखी स्थिती

AIIMS च्या संचालकांनी कोरोनाची साथ देशाच्या काही भागांमध्ये तिसऱ्या टप्प्यात पोहोचली असल्याचं सांगितलं. या भागांत वेळीच खबरदारी घेतली नाही तर...

बनावट देणगी संकलकांपासून सावध रहा : धर्मादाय आयुक्तांचे आवाहन

पुणे : लाॅकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक औषधोपचार व वैद्यकीय सुविधा तातडीने पुरवण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे.

विद्यापीठांमध्ये मल्टीपर्पज लॅब सुरू करा : उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांची सूचना

पुणे : साथीचे आजार पसरत असताना त्याच्या चाचण्या घेण्यासाठी विद्यापीठांमध्ये मल्टिपर्पज लॅब सुरू कराव्यात अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कुलगुरूंना दिल्या. 

Coronavirus : किराणा मालाच्या भावात दहा टक्‍क्‍यांनी वाढ

मार्केट यार्ड - कोरोनाच्या धास्तीने माल वाहतुकीसाठी ड्रायव्हर व अन्य कर्मचारी मिळत नाहीत. वाहतुकदारांकडून माल वाहतुकीस टाळाटाळ केली जात आहे. परतीचे भाडेदेखील द्यावे लागत असल्याने वाहतूक खर्चात दुप्पट वाढ झाली आहे. यामुळे सध्या सर्वच किराणा मालाच्या भावामध्ये साधारणतः १० टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाल्याची माहिती दि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली आहे.

Coronavirus : गरजूंच्या मदतीसाठी दानशूरांनी पुढे यावे - डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक ठिकठिकाणी अडकलेले आहेत. त्यांच्या मदतीसाठी संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.

शिक्षकानों वर्क फ्रॉम होम करताय! ऑनलाईन पध्दतीने होणार मुल्यमापन

पुणे : अभियांत्रिकी महाविद्यालये आणि तंत्र निकेतनांमधील शिक्षकांनो, वर्क फ्रॉम होम करीत असाल, तर तंत्र शिक्षण संचालनालय त्याचे मूल्यमापन ऑनलाइन पद्धतीने करणार आहे. केलेल्या कामाचा तपशील  द्यावा लागणार आहे. शिक्षकांच्या या कामाची दखल गोपनीय अहवालात घेतली जाणार आहे.

ज्युनिअर वकिलांना मदतीचा हात

पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनचा निर्णय

पिंपरी – पाच वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वकिलीची प्रॉक्‍टिस असणाऱ्या वकिलांना लॉकडाऊनच्या काळात अडचण येऊ शकते. त्यामुळे त्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनने घेतला आहे, अशी माहिती अध्यक्ष ऍड. दिनकर बारणे यांनी दिली.

लॉकडाउनमुळे रखडले कामगारांचे पगार

कंपनी कर्मचाऱ्यांना वाहन पास द्यावेत

पिंपरी – करोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे कंपनीचे कार्यालयीन कामकाजदेखील ठप्प झाले आहे. त्यामुळे कामगारांचे पगार करणे कठीण झाले आहे. तेव्हा प्रशासनाने याची दखल घेऊन कार्यालय उघडण्यासाठी परवानगी देऊन त्यांच्यासाठी वाहन पास द्यावेत. तसे कंपन्यांना अर्ज करण्यासाठी त्वरित लिंक तयार करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आता घरबसल्या पाठविता येणार मीटर रीडिंग

ग्राहकांसाठी ऑनलाइन वीजबिल भरण्याचा पर्याय उपलब्ध

पिंपरी – करोना संसर्गाला पायबंद घालण्यासाठी शासन स्तरावर आखल्या जात असलेल्या विविध उपाययोजनांचाच एक भाग म्हणून महावितरणकडून आता वीज ग्राहकांचे मीटर रीडिंग घेणे व वीज बिल वितरीत करण्याची प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात आली आहे. या कालावधीत ग्राहकांना सरासरी वीज देयक आकारण्यात येणार आहे. तसेच ग्राहक मोबाइल ऍपद्वारे घरबसल्या मीटर रीडिंग घेऊन त्यानुसारच ऑनलाइन बिल भरू शकतात.

सोसायट्यांच्या दारी ‘एटीएम’ची वारी

पिंपरी – वाकड परिसरातील सोसायट्यांमध्ये पिंपरी-चिंचवड गृहनिर्माण सहकारी संस्था फेडरेशनच्या वतीने आणि पंजाब नॅशनल बॅंकेच्या सहकार्याने सध्या “एटीएम आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबविला आहे.