Wednesday 8 August 2018

पिंपरी रेल्वे स्थानकासाठी सरकता जीना

काम प्रगती पथावर : प्रवाशांसाठी सुविधा

पिंपरी – प्रवाशांचा प्रवास गतीमान आणि सुरक्षित होण्यासाठी रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र, रेल्वे स्थानकावरील असुविधेमुळे अनेक प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पोचायला जीना चढून जावे लागते. त्यामुळे 70 टक्‍के प्रवासी रुळ ओलांडून दुसऱ्या बाजूला जातात आणि त्या प्रयत्नात अनेक प्रवाशांना आत्तापर्यंत जीव गमवावा लागला आहे. यावर प्रभावी तोडगा काढण्यासाठी आता पिंपरी रेल्वे स्थानकावर सरकता जीना बनवण्यात येणार आहे. त्याचे काम प्रगती पथावर आहे.

पिंपरी चिंचवड शहरासाठी देहूच्या बंधा-यातून पाणी उचलणार – आयुक्त हर्डीकर यांची माहिती

येथील शहराला तत्काळ पाणी मिळावे, याकरिता भामा-आसखेड, आंद्रा धरणातून पाणी आणण्यात येणार आहे. याकरिता इंद्रायणी नदीच्या देहू बंधा-यातून पाणी उचलण्याची परवानगी द्यावी, तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

मेट्रोचे काम 40 टक्के पूर्ण

 महापालिका ते दापोडीपर्यंत 7.6 किमीचे काम सुरू
185 सेगमेंट ट्रॅकवर बसविले, तर 788 सेगमेंट तयार
पिंपरी-चिंचवड : शहरात मेट्रोचे काम वेगात सुरु आहे. दापोडीपासून ते पिंपरी-चिंचवड महापालिकेपर्यंत 7.619 किलोमीटर अंतराचे हे काम सुरु असून मागील दीड वर्षात मेट्रोने कार्यपूर्तीचा 40 टक्क्यांचा टप्पा गाठला आहे. सेगमेंट खांबांवर बसविणे ही सर्वात वेळखाऊ प्रक्रिया आहे. सध्या 185 सेगमेंट ट्रॅकवर बसवले असून 788 सेगमेंट तयार आहेत. यामध्ये 2.263 किलोमीटर अंतरापर्यंत सेगमेंट टाकता येणार आहेत. आणखी 1576 सेगमेंट मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड मधील कामासाठी लागणार असून सेगमेंट निर्मितीचे मेट्रोने 40 टक्के काम पूर्ण केले आहे.

दापोडी-निगडी ‘बीआरटी’चा मार्ग बिकट

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दापोडी ते निगडी हा दुहेरी बीआरटीएस मार्ग विकसित केला आहे. मात्र, या मार्गावर महामेट्रोच्या वतीने खोदकाम सुरू असून, अनेक ठिकाणी बॅरिकेट्स तोडफोड करून त्याची नासधूस केली गेली आहे. त्यामुळे हा मार्गाची वाट बिकट झाली आहे. 

तक्रारींसाठी पोलीस आयुक्तांकडून व्हॉट्सअॅप नंबर जाहीर

नागरिकांच्या तक्रारींवर यापुढे १२० टक्के कारवाई करण्यात येईल असा सक्त निरोप शहराच्या नवनियुक्त पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी दिला. तसेच त्यांनी तक्रारींसाठी 8975283100 व्हॉट्सअॅप नंबर जाहीर केेेेला.

परमिट एक; रिक्षा मात्र अनेक

पिंपरी - कायद्यानुसार एका परमिटवर (परवाना) एकच रिक्षा नोंदणी केली जाते. मात्र, पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एका परमिटवर अनेक रिक्षांची नोंदणी होत असल्याचा प्रकार माहिती कायद्यात समोर आला आहे. 

पदपथ, उद्यानांमध्ये धार्मिक स्थळे

पिंपरी - शहरातील १९८ पैकी १२४ धार्मिक स्थळे महापालिकेने नियमित केली आहेत; तर काही स्थलांतरित केली असून काही नागरिक वा संबंधित संस्थांनी स्वतः काढून टाकली आहेत. अगदी बोटावर मोजण्याइतक्‍या धार्मिक स्थळांवरच महापालिकेने कारवाई केलेली आहे.

नाल्यांमुळे ‘पवना’ प्रदूषित

पिंपरी - पवना नदीला मिळणाऱ्या नाल्यांमुळे पवनेच्या प्रदूषणात वाढ होत असल्याचा निष्कर्ष महापालिका पर्यावरण (२०१७-१८) अहवालातून समोर आला आहे. शहरातील विविध ठिकाणी असलेल्या नाल्यातील पाणी नमुन्याचे परीक्षण केल्यानंतर पाण्यातील विरघळलेल्या प्राणवायूचे (डीओ) प्रमाण कमी होत असल्याचे आढळले आहे. तुलनात्मकदृष्ट्या रासायनिक (सीओडी) आणि जैविक प्राणवायूचे (बीओडी) प्रमाण दुपटीने वाढले आहे. त्यामुळे पाणी प्रदूषणात लक्षणीय वाढ होत आहे.

आयुक्तांच्या भूमिकेविषयी संशयकल्लोळ वाढला!

बोर्‍हाडेवाडी गृहप्रकल्पाचा खर्च 134 कोटींवरून 112 कोटींवर

पिंपरी-चिंचवड : महापालिकेमार्फत राबविल्या जाणार्‍या बोर्‍हाडेवाडी येथील पंतप्रधान आवास योजनेच्या निविदा वाढीव दराने मंजूर केल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर त्याची फेरतपासणी करण्यात आली. यानंतर हा गृहप्रकल्प 134 कोटीत नव्हे तर 112 कोटींमध्ये बांधण्याची तयारी ठेकेदाराने दर्शविली आहे. यामुळे वाढीव दराने निविदा मंजूर केल्याचा आरोपाला पुष्टी मिळाली असून या गोलमालमुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या भूमिकेविषयी संशयकल्लोळ वाढला आहे.

पिंपरी पालिका मुख्यालयावर वाहनभार

७५ वाहनांची क्षमता असताना ५०० वाहनांची ये-जा; सुरक्षा कर्मचाऱ्यांची दररोज तारेवरची कसरत

पिंपरी-चिंचवड शहरात वाहनतळांच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असतानाच, शहराचा प्रशासकीय कारभार जेथून चालतो, त्या पालिका मुख्यालयातही या समस्येने उग्र स्वरूप धारण केल्याचे चित्र समोर आले आहे. मुख्यालयात जेमतेम ७५ वाहने लावण्याची क्षमता असताना, दिवसभरात तब्बल ५०० वाहनांची ये-जा होत असल्याने या व्यवस्थेवर प्रचंड ताण पडतो आहे. सात-आठ वर्षांपासून ही समस्या कायम आहे. मात्र, त्यावर तोडगा निघू शकलेला नाही. सतत वादावादीच्या प्रकाराने सुरक्षारक्षक हैराण झाले आहेत.

Maratha reservation: Schools, colleges in city may be closed tomorrow, protests will remain peaceful say Maratha leaders

Schools and colleges in Pune district may remain closed on Thursday due to the statewide protests planned by the Maratha Kranti Morcha to press for its demand for Maratha reservation. District authorities will take a final decision on this by Wednesday. District Collector Naval Kishore Ram said educational institutions may be closed for a day to avoid “undue trouble” to parents.

Schools, colleges in city may be closed tomorrow

स्वागताप्रित्यर्थ पुष्पगुच्छ नको, वह्या-पुस्तके भेट द्या; नव्या महापौरांचे आवाहन

श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव यांनी आपल्या स्वागताचा नवा आदर्शवत असा पायंडा पाडला आहे. स्वागताप्रित्यर्थ हारतुऱ्यांऐवजी पुस्तके,वह्या असे शालोपयोगी साहित्य स्वीकारण्याचे त्यांनी ठरविले आहे. त्यामुळे उद्यापासून पुष्पगुच्छ स्वीकारणार नसल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

महत्त्वाच्या प्रश्नांवर पिंपरी महापौरांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली.

नवे गडी, नवे राज्य!

पिंपरीच्या महापौर निवडीवरून सत्तारूढ भाजपमध्ये झालेले राजकारण, खरे ओबीसी आणि खोटे ओबीसी यांच्यातील वाद, त्यातून माळी समाजाला मिळालेली संधी, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे अधिकारी कोंडून टाकण्याचे आंदोलन, त्यावरून भाजप-राष्ट्रवादीतील संघर्ष आणि महापौर निवडणुकीच्या दिवशीच भाजप कार्यकर्त्यांनी घातलेला धुडगूस अशा घडामोडींमुळे सरत्या आठवडय़ात शहरातील राजकारण ढवळून निघाले.

राष्ट्रध्वज उभारणीच्या कामाची होणार चौकशी

ठेकेदार, अधिकार्‍यांवर कारवाई करणार
पिंपरी-चिंचवड : निगडीतील भक्ती शक्ती उद्यानात उभारलेल्या 107 मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाच्या कामाची सखोल चौकशी करुन संबंधित ठेकेदार व अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

संत तुकाराम महाराज पालखी चिंचवडगावात मुक्कामी रहावी

चिंचवड ग्रामस्थांची देहू संस्थानकडे मागणी
पिंपरी-चिंचवड :श्री संत तुकाराम महाराज पालखीचे परतीच्या प्रवासाचे आगमन बुधवारी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये होत आहे. चिंचवड गावात मुक्कामी ही पालखी थांबविण्यात यावी, अशी मागणी श्री काळभैरवनाथ उत्सव समिती, चिंचवड देवस्थान ट्रस्ट, चिंचवड ग्रामस्थ यांनी देहू संस्थान यांच्याकडे केली आहे.

नेटमीटर रीडिंगच्या अडचणी सोडविणार

पुणे - रुफटॉप सौरऊर्जा प्रकल्पांच्या वीजग्राहकांच्या नेटमीटरचे रीडिंग आणि बिलिंगसंदर्भात असलेल्या अडचणी लवकरच सोडविण्यात येतील तसेच नेटमीटर व बिलिंग सुरू करण्याची प्रशासकीय कार्यवाही आणखी वेगवान करण्यात येईल, अशी माहिती महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी दिली.

दुकाने निरीक्षक कार्यालयात असुविधा

पिंपरी - जुनी नादुरुस्त इमारत, इमारतीसमोर लाकूड आणि कचऱ्याचा ढीग, तुटलेल्या खिडक्‍या हे चित्र आहे, चिंचवड स्टेशन, दवाबाजार जवळील दुकाने निरीक्षक (सुविधाकार) कार्यालयाच्या इमारतीचे. कार्यालयात प्रवेश करताना जिन्याच्या पायऱ्या चढून जाताना दक्षता बाळगा; अन्यथा कपाळमोक्ष निश्‍चित आहे. कारण कार्यालयाजवळ आल्यानंतर पायऱ्यांचे लोखंडी संरक्षक ग्रील तुटले आहेत. 

कर भरण्याच्या व्यावसायिकांना नोटिसा

पिंपरी - कराचा भरणा न करणाऱ्या शहर आणि परिसरातील सुमारे ७०० व्यावसायिकांना वस्तू आणि सेवाकर विभागाकडून नोटिसा पाठविल्या आहेत. त्यात २० व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे वस्तू आणि सेवाकर विभागातील विश्‍वसनीय सूत्रांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

प्रस्तावित वीज दरवाढीला विरोध

भोसरी - महावितरणने आधीच वीस टक्के दरवाढ केलेली असताना पुन्हा दरवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. ही दरवाढ झाल्यास लघुउद्योजकांसाठी ही वाढ चाळीस टक्‍क्‍यांपर्यंत पोचणार आहे. औद्योगिक क्षेत्रात सुरू असलेल्या मंदीत दरवाढ झाल्यास लघुउद्योजकांना लघुउद्योग चालविणे अवघड होणार असल्याने महावितरणने दरवाढीचा प्रस्तावित निर्णय मागे घेण्याची मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी महावितरणकडे केली आहे.

पिंपरीच्या आयडीटीआरची केरळला भुरळ

पिंपरी - वाहनांच्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी चालकांना अत्याधुनिक पद्धतीचे प्रशिक्षण देण्यासाठी पिंपरीत चालविण्यात येणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरची (आयडीटीआर) भुरळ केरळ राज्याला पडली आहे. नुकतेच केरळ राज्याचे परिवहनमंत्री ए. के. शशिधरन, परिवहन विभागाचे मुख्य सचिव ज्योतीलाल आणि आयुक्‍त पद्मनाभन यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेला भेट देऊन त्यासंदर्भातील प्रस्ताव सादर केल्याचे संचालक कॅप्टन डॉ. राजेंद्र सनेर पाटील यांनी ‘सकाळ’ला सांगितले.  

राष्ट्रीय सौर ऊर्जा प्राधिकरणाची स्थापना करावी !

– खासदार श्रीरंग बारणे यांची खासगी विधेयकाद्वारे लोकसभेत मागणी

पिंपरी – जीवाश्‍म इंधनाच्या ज्वलनामुळे दिवसेंदिवस वाढत जाणारे प्रदूषण आणि त्याचा ग्लोबल वॉर्मिंगवर होणारा परिणाम यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रीय सौर ऊर्जा प्राधिकरणाची स्थापना करून सौर उर्जेला तसेच सौर उर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर करण्यास चालना द्यावी, जेणेकरून वाढत जाणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगवर नियंत्रण राहील आणि पर्यावरणाचे संरक्षण होईल, अशा आशयाचे खासगी विधेयक खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत सादर केले.