Wednesday 10 January 2018

पिंपळे सौदागर होणार सिग्नल फ्री

स्मार्ट होण्याच्या दिशेने अग्रेसर ः लवकर सुरू होणार ग्रेड सेपरेटर व सब वे चे काम
पिंपळे सौदागर, (वार्ताहर) – शहर स्मार्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना सर्वांच्या नजरा खूपचे वेगाने नियोजित झालेल्या उच्चभ्रू पिंपळे सौदागरकडे वळतात. स्मार्ट होण्याच्या प्रक्रियेत पिंपळे सौदागर अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. पिंपळे सौदागरला सिग्नल फ्री बनविण्याचे स्वप्न ही लवकरच पूर्ण होईल असे आता वाटू लागले आहे. चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणजगताप यांच्या प्रेरणेने आणि नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांच्या पाठपुराव्यामुळे गोविंद यशदा चौक, सुदर्शन नगर चौक तसेच कोकणे चौक येथे पादचाऱ्यांसाठी तसेच वाहतुकीच्या दृष्टीने सिग्नल फ्री पिंपळे सौदागर करण्याच्या दृष्टीने ग्रेड सेपरेटर तसेच सब वे चे काम लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकृत रित्या सांगण्यात आले आहे.

मांजामुळे चिमुकल्याच्या डोळ्याला गंभीर इजा

पिंपरी चिंचवड : नातेवाईकांसोबत दुचाकीवर बसून घरी निघालेल्या लहान मुलाच्या डोळ्यात रस्त्यावर काटलेल्या पतंगाचा लटकत असणारा मांजा घुसल्याने डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काळेवाडी परिसरातील राजवाडेनगर येथे घडली.

पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनांची तोडफोड

वाहन तोडफोडीचे सत्र पिंपरी-चिंचवडमध्ये अद्याप थांबलेले नाही. सोमवारी रात्री साडेदहा वाजता मोहनगर-रामनगरमधील सैनिक वसाहतीतील परिसरात टोळक्याने सहा गाड्यांची तोडफोड करून काही घरांच्या काचाही फोडल्या. पिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळावरूनच दोघांना या प्रकरणी अटक केली. तर त्यांचे साथीदार पसार झाले आहेत.

उद्योगनगरीत नाटकांना अघोषित प्रवेशबंदी?

सुट्टीच्या दिवशी नाटकांना प्राधान्य देण्याचे धोरण कागदावरच राहिले आहे.

शहरबात पिंपरी : राष्ट्रवादीतील मरगळ दूर करण्याचा निर्धार

दारुण पराभवामुळे मरगळ आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सांगवी येथे मेळावा झाला

Sensible Metropolis plan implementation to take off quickly

PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Limited (PCSCL) board of directors has asked to streamline development works in the city. 
These include Wi-Fi, improvement of public transport, streetscape design, urban design, landscape design, environmental services, solid waste management, e-governance, security and surveillance.

Chinchwad to screen 46 PIFF movies


Pimpri Chinchwad: Cinema buffs will be able to catch 46 films from 22 countries as part of the Pune International Film Festival(PIFF) jointly organized by Pune Film Federation, the state government and Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC). The week-long festival will begin on January 12.

पिंपळे सौदागर येथील उद्यानाला राजमाता जिजाऊंचे नाव देण्याची मागणी

नवी सांगवी - पिंपळे सौदागर येथील शिवार रोडवरील नव्याने विकसित होत असलेल्या उद्यानाला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात येण्याची मागणी स्थानिक नगरसेवक नाना काटे यांनी केली आहे. रोझलँड रेसिडेन्सी सोसायटी शेजारील स. नं. १३०, १३२, १३३, १३४ मधील महानगरपालिका उद्यानांसाठी आरक्षण क्र. ३७१ ब प्रमाणे २ हेक्टर जागेत प्रशस्त उद्यान तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पिंपळे सौदागर येथील हे सर्वात मोठे व सर्व सोयींनी युक्त असे उद्यान होणार आहे. यामध्ये वैशिष्ट्य पूर्ण कारंजे, लहान मुलांसाठी खेळायचे हिरवळ युक्त मैदान, जॉगिंग ट्रँक, हास्य क्लब परिसर, मिनी ट्रेन, ध्यानधारना करण्यासाठी जागा, रंगी बेरंगी छोटे रोपटे, हस्त कला दालन, बोटिंग सहल केंद्र अशी अनेक सोयींनी युक्त उद्यान साकारण्यात येत आहे.

कसं फसलो, ते कळलंच नाही !

पिंपरी - ऑनलाइन व्यवहारांमुळे बॅंक कारभारात सुलभता आल्याचे चित्र दिसत असले तरी यात होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्यावर्षी पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात एक लाख रुपयांवरील रकमेच्या फसवणुकीच्या सुमारे ५० ते ५५ घटना झाल्या असून त्यातून दोन ते अडीच कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

‘अटल लॅब’मध्ये शहरातील दोन शाळा

पिंपरी - निती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘अटल टिंकरिंग लॅब’ या अभिनव योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड शहरातील दोन शाळांचा समावेश करण्यात आला आहे. यात महापालिकेची पिंपळे गुरव माध्यमिक शाळा व खासगी विद्यादीप माध्यमिक विद्यालय, काळेवाडी यांचा समावेश आहे. या निवडीमुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यात आला आहे. या शाळांना प्रत्येकी २० लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. 

प्रभाग क्रमांक 27 मधील विविध कामांची पाहणी; महापालिका आयुक्‍तांची उपस्थिती*

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी प्रभाग क्र. 27 रहाटणी मध्ये नाला सफारी, जॉगिंग ट्रॅक, डी-मार्ट समोरील भूमिगत मार्गाला भेट दिली. विकास कामांची पाहणी करताना त्यांच्या समवेत प्रभागाचे नगरसेवक चंद्रकांत नखाते, नगरसेविका सुनीता तापकीर, सविता खुळे, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन व इतर युवा कार्यकर्ते उपस्थित होते. हरितशिल्प सोसायटी, बळीराज कॉलनी, विमल गार्डनसमोरील नाला, तपकीर चौकामधील मोठ्या प्रमाणात डुक्कर प्राणी व घाणीचे साम्राज्य असलेला भाग, पवना नदीमध्ये गार्डन आरक्षित असलेले बेट विकसित करण्यासाठी पाहणी केली. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

"पीएमआरडीए'च्या रिंगरोडचा "भारतमाला' प्रकल्पात समावेश

पुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी "भारतमाला' प्रकल्पामध्ये पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) रिंगरोडचा समावेश केला आहे. याअंतर्गत केंद्राकडून पंधराशे कोटी रुपयांचा निधी मिळणार असून पहिल्या टप्प्यात कात्रज ते नगर रस्ता दरम्यानचा 34 किलोमीटर लांबीच्या रिंगरोडचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी रिंगरोडचा सर्वंकष प्रकल्प आराखडा (डीपीआर) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सादर केला आहे. 

‘एमएसआरडीसी’च्या रिंगरोडचे काय?

केंद्र सरकारने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) रिंगरोडचा समावेश भारतमाला प्रकल्पामध्ये केला आहे. ही बातमी पुणेकरांसाठी आनंदाचीच आहे. यामुळे गेल्या वीस वर्षांहून अधिककाळ रखडलेला हा प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे; परंतु महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा (एमएसआरडीसी) रिंगरोड अद्याप कागदावरच राहिला आहे. त्याच्या कामाला देखील गती मिळावी, यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करण्याची गरज आहे. भविष्यातील गरज ओळखून हा रिंगरोड मार्गी लावणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत पीसीएमसी कॉलनीतील रहिवाशी

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथे ३० ते ३५ वर्षांपूर्वी बांधलेल्या पीसीएमसी कॉलनीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यातील अनेक इमारती ढासळण्याच्या स्थितीत आहेत. येथील रहिवाशांचे लवकर पुनर्वसन करावे. तसेच पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली.