पुणे - पीएमपीच्या ताफ्यात 200 मिडीबस 8 मार्चपासून टप्प्याटप्याने पुणे आणि पिंपरी- चिंचवड या दोन्ही शहरांतील प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहेत. तर महिलांसाठीच्या खास "तेजस्विनी' बसची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यावर येत्या सोमवारी (ता. 26) निर्णय होईल. दरम्यान, बीआरटी मार्गांसाठी 550 एससी बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या दोन दिवसांत स्वतः घेणार आहेत.



