Monday 3 September 2018

Hinjawadi: Infra woes spark exodus of IT firms

The city seems to be losing its sheen as one of the country’s top IT capitals, all thanks to the shoddy civic infrastructure at its largest IT Park in Hinjawadi. Now, techies in large numbers have escalated the issue to Chief Minister Devendra Fadnavis, requesting him to ‘Free Up Hinjawadi’ via a petition

सावरकर मंडळाच्या वतीने पर्यावरणपूरक गणपती बनविण्याची कार्यशाळा उत्साहात

पिंपरी (Pclive7.com):- स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या महिला विभागाच्या वतीने पर्यावरणपूरक गणपती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत निगडी, प्राधिकरण आणि आकुर्डी तसेच खेड, दिघी, चाकण, वडगाव मावळ भागातील विद्यार्थी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. पर्यावरणपूरक पद्धतीने शाडूच्या मातीने सर्वांनी गणपती बनविला.

नुतनीकरणानंतर प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह ठरेल रसिक, कलावंतांसाठी पर्वणी – एकनाथ पवार

पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाचे नुतनीकरण झाल्यानंतर  पिंपरी चिंचवडमधील रसिक, कलावंतासाठी हे प्रेक्षागृह पर्वणी ठरेल. त्यासाठी पेक्षागृहाचे दुरुस्तीची कामे झटपट पूर्ण करावीत, अशा सूचना महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी महापालिका अधिका-यांना केल्या आहेत. 

आयुक्तांवर सल्लागारांचे प्रवक्ते असल्याचा आरोप

'पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा एककलमी कारभार सुरू आहे. सल्लागारांनी उत्तरे देणे अपेक्षित असताना भाजपचे प्रवक्ते असलेले आयुक्त हर्डीकरच उत्तरे देतात. मी कसा सल्लागारांच्या बाजूने आहे, असे ते दाखवत असून ते आयुक्त न राहता सल्लागारांचे प्रवक्ते झाले आहेत, ' असा आरोप शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी केला. तसेच, 'आयुक्त हे शहरवासीयांना भाजपप्रमाणे विकासाचे गाजर दाखवत आहेत,' असेही ते म्हणाले.

मॉल-मल्टिप्लेक्सच्या वाहनांमुळे कोंडीत भर

शहरात मेट्रो आणि वादग्रस्त बीआरटीमुळे रस्ता अरुंद झाला असतानाच मॉल-मल्टिप्लेक्समध्ये येणाऱ्यांनी रस्त्यावर वाहने लावल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. मॉल-मल्टिप्लेक्सच्या वाहनांमुळे कायमच कोंडी होत असून, पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष होते. नवनियुक्त पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन आणि दोन उपायुक्तांच्या कार्यालयजवळ होणाऱ्या कोंडीकडे वाहतूक विभागाचे निरीक्षक-कर्मचारी आता तरी लक्ष देतील का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मोठी स्वप्ने पाहावीत - हर्डीकर

पिंपरी - आयुष्यात प्रत्येकाने मोठे स्वप्न पाहिले पाहिजे. भविष्याचा विचार करून आपल्या कल्पना बाजारपेठेत किती वर्षे टिकू शकतात, याचा विचार करून त्याला मूर्त स्वरूप द्यावे, तरच तुम्ही यशस्वी उद्योजक होऊ शकता, असा सल्ला महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला. येत्या काही दिवसांमध्ये महापालिकेतर्फे स्टार्टअप इन्क्‍युबेशन सेंटर सुरू केले जाईल. शहरातील स्टार्टअप्सना एका छताखाली सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना असल्याचे ते म्हणाले. 

हिंजवडीचे गतवैभव मिळवून देणार : सुप्रिया सुळे

वारजे माळवाडी : "हिंजवडीतील वाहतूक कोंडीमुळे
राजीव गांधी इन्फोटेक पार्क मधील कंपन्यानी बाहेर गेल्याने राज्याचे सुमारे 1500 कोटी रुपयांचे नुकसान व नोकऱ्या गेल्या आहेत. या परिसराचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी. आमच्या या हिंजवडीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देणार आहे." असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

‘जीएसटी’ची बनवाबनवी

पिंपरी - दुकानात आलेल्या ग्राहकाकडून वस्तूच्या मूळ किमतीसह जीएसटीची रक्कम वसूल करायची. त्याची रीतसर पावती द्यायची. मात्र, त्यावरील जीएसटी नोंदणी क्रमांक बनावट टाकायचा. व्यापाऱ्यांची ही बनवाबनवी महापालिकेच्या नागरवस्ती विकास विभागामुळे उघडकीस आली. त्यांच्या महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत शिलाई मशिन खरेदीच्या तब्बल १४७ पावत्यांवरील जीएसटीचा नोंदणी क्रमांक बनावट असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

हडपसरमधील उड्डाण पुलाखाली ‘वटछाया’ साकारली

पुणे -  हडपसर उड्डाण पुलाखाली प्रिन्सिपल ग्लोबल सर्व्हिसेस आणि जुम्बिश क्रिएशन्सच्या वतीने साकारण्यात आलेल्या ‘वटछाया’ या ‘फ्लायओव्हर आर्ट इन्स्टॉलेशन्स’चे उद्‌घाटन शनिवारी अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

बेकायदेशीर वृक्षतोडीविरोधात मानवी साखळी

पिंपरी – शहरात होत असलेल्या बेकायदेशीर वृक्षतोडीविरोधात पिंपरी-चिंचवड शहरातील 30 सामाजिक, निसर्गप्रेमी संघटनांनी मानवी साखळी केली. निगडीमधील पवळे उड्डाणपुलाखाली झालेल्या या मानवी साखळीमध्ये शहरातील नागरिक व वृक्षप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दैनिक “प्रभात’ने या बेकायदा वृक्षतोडीविरोधात आवाज उठवला होता.

आजवरची सर्वांत उच्चांकी इंधन दरवाढ

पुणे – महागाईने वैतागलेल्या मध्यवर्गीयांच्या चिंतेत आणखी भर पडली असून रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. शहरात आज सोमवारी ‘पिंपरीचिंचवड’ शहरात पेट्रोलचे भाव 86.48 रूपये तर डिझेलची किंमत 74.26 रुपये इतकी झाली आहे. त्याचबरोबर ‘पुणे’ शहरात पेट्रोलचा भाव 86.42 रूपये आणि डिझेलची किंमत 74.24 रूपये अशी आहे. ही दरवाढ अभूतपूर्व असून स्वातंत्र्यानंतरची सर्वांत उच्चांकी आहे.