Sunday 2 February 2014

शहरासाठी सर्वंकष एकात्मिक आराखडा करणार

पिंपरी - एमआयडीसी, नवनगर विकास प्राधिकरण आणि विविध शासकीय संस्थांना एकत्रित घेऊन पिंपरी-चिंचवड शहराची 2041 ची संभाव्य लोकसंख्या व विकास लक्षात घेऊन सर्वंकष एकात्मिक आराखडा महापालिका तयार करणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली. 

महापालिकेच्या करसंकलन विभागाने गाठला दोन कोटींचा टप्पा

महापालिकेला 'वाजवा रे वाजवा'चा चांगलाच धनलाभ 
मालमत्ताकराच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने बँडपथकाच्या आधारे मोठय़ा प्रमाणावर कर थकविणा-या संस्था, व्यक्तीच्या दारात 'वाजवा रे वाजवा' हा उपक्रम सुरू केला. हा उपक्रम महापालिकेला चांगलाच फायदेशीर ठरत असून त्यामुळे करसंकलन

वर्षभरात 95 टक्‍के तक्रारींचा निपटारा

पिंपरी - गेल्या वर्षभरात पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे 18 हजार 920 तक्रारी आल्या. यापैकी 18 हजार 11 तक्रारी निकाली काढण्यात आल्या. महापालिकेने 95 टक्‍के तक्रारींचा निपटारा केला असला, तरी अद्याप 909 तक्रारींचा निपटारा करणे बाकी आहे.

चांगले काम करणे हा गुन्हा आहे का?

लोकप्रिय निर्णयांमुळे एखादी राजकीय व्यक्ती जनतेच्या गळ्यातील ताईत होते. मात्र, प्रशासनातील अधिकाऱ्यांबाबत असे सुख फारच दुर्मिळ असते. पिंपरी-चिंचवडकर सध्या हाच अनुभव घेत आहेत. काही राजकीय मंडळींनी आपले हितसंबंध दुखावल्याने महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना बदलण्याचा घाट घातला आहे. त्यांना हटविण्यासाठी मोजक्‍याच नगरसेवक, ठेकेदार व दलालांनी देव पाण्यात ठेवले आहेत. "राजकारणातून पैसा अन्‌ पैशातून राजकारण' या प्रचलित समीकरणालाच आपल्या कामकाजातून आयुक्तांनी सुरुंग लावला. त्यामुळे जनता आयुक्तांवर जाम खूष आहे. या आयुक्तांना त्यांचा कार्यकाल पूर्ण करू द्यावा, या मागणीने चांगलाच जोर धरला आहे. आयुक्तांसाठी कधी नव्हे त्या सामान्य जनतेनेच रणशिंग फुंकले. विरोधी पक्षांनीसुद्धा थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. 

डॉ. श्रीकर परदेशींच्या पाठींब्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरु

पिंपरीत मुस्लिम महिला संघटनेकडून पाठिंबा 
महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची संभाव्य बदली थांबविण्यासाठी शहरातील विविध स्तरातून त्यांना पाठिंबा मिळत आहे. मोर्चे, आंदोलनाबरोबरच स्वाक्षरी मोहिमेतून महाविद्यालयीन युवक व नागरिक आपला पाठिंबा नोंदवत आहे. पिंपरीतील डिलक्स

आयुक्त परदेशी यांना सर्वच स्तरांमधून पाठिंबा

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना पाठिंबा देण्यासाठी सर्वच स्तरांमधून आवाज सुरू झाला आहे. शहरातील रोटरी व लायन्स क्‍लबच्या सभासदांनीही मोकळेपणाने प्रतिक्रिया दिली. विविध जाती-धर्मांच्या संस्था, संघटना आणि मान्यवर पुढे सरसावले आहेत. सजग नागरी मंचने सलग दुसऱ्या दिवशी राबविलेल्या स्वाक्षरी मोहिमेला प्राधिकरणातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. मुस्लिम यंग सर्कलच्या महिलांनी डीलक्‍स चौकात स्वाक्षरी मोहीम घेऊन आयुक्तांना पाठिंबा दिला.

सहविचार सभेला पालकांचा प्रतिसाद

आकुर्डीच्या म्हाळसाकांत विद्यालयात अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेची माहिती देण्यासाठी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस पालक आणि विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
पालकांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेविषयी माहिती देण्यात यावी

एचए कंपनीच्या कामगारांना पाच महिन्यांचा पगार नाही

कामगारांना एक महिन्याचा, तर अधिका-यांना काहीच नाही
पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एचए) कंपनीच्या कामगारांना थकलेल्या पगारापैकी फक्त एकाच महिन्याचा पगार कंपनीने देऊ केला. मात्र, उर्वरित पाच महिन्यांचा पगार या कामगारांना अद्याप दिला नाही. अधिका-यांना एका महिन्याचाही पगार