Saturday 1 June 2013

नालेसफाईतील टक्केवारीला पिंपरी आयुक्तांचा चाप!

नालेसफाईतील टक्केवारीला पिंपरी आयुक्तांचा चाप!: पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांची सफाई व नदीत साठलेली जलपर्णी काढण्याच्या कामात आतापर्यंत पालिकेचे अधिकारी, ठेकेदार व लोकप्रतिनिधींचे टक्केवारीचेच राजकारण होत होते., त्यास आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी चाप लावला आहे.

Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd's Pravasi Din today

Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd's Pravasi Din today: The PMPML Pravasi Din, a forum where bus commuters can submit their suggestions and register complaints about passenger services, will be held at all the 10 bus depots in the city on Saturday.

महापालिका 60 लाख खर्चून करणार ...

महापालिका 60 लाख खर्चून करणार ...:
पिंपरी-चिंचवड महापालिका नदी, नाले, घनकचरा, हवा, ध्वनी व जमिनीच्या प्रदूषणाची रासायनिक चाचणी करणार आहे. अवनिरा बायोटेक प्रा. लि. यांच्यामार्फत तीन वर्षांच्या कालावाधीसाठी हे काम दिले जाणार आहे. त्यावर सुमारे 60 लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

वैद्यकीय अधिका-यांच्या मानधनात ...

वैद्यकीय अधिका-यांच्या मानधनात ...:
डॉक्टर असलेल्या आयुक्त श्रीकर परदेशी यांनी महापालिकेच्या मानधनावरील डॉक्टरांची दुखरी नस शोधून काढली आहे. वर्षानुवर्षे मानधनवाढीच्या प्रतिक्षेत असलेल्या नऊ तज्ज्ञ वैद्यकीय अधिका-यांच्या मानधनात जवळपास दुप्पटीने वाढ करण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी येत्या 4 जून रोजी होणा-या स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.

विषय समित्यांवर जवळकर, बोकड, सुपे, ...

विषय समित्यांवर जवळकर, बोकड, सुपे, ...:
पिंपरी-चिंचवड महापालिका विषय समिती सभापती पदासाठी शुक्रवारी राष्ट्रवादी काँगेसकडून विधी समितीसाठी वैशाली जवळकर, क्रीडा समितीसाठी रामदास बोकड, शहर सुधारणा समितीसाठी आशा सुपे तर महिला बालकल्याण समितीसाठी शुभांगी लोंढे यांचे एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामुळे चारही जणांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे.

वाकडमधील अवैध बांधकामांवर ...

वाकडमधील अवैध बांधकामांवर ...:
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने अवैध बांधकामाविरोधात आता जोरदार मोहिम उघडली आहे. दोन दिवसांपूर्वी वाकड येथील चार अनधिकृत बांधकामे भुईसपाट केल्यानंतर आज प्राधिकरणाच्या जागेत असणा-या वाकड येथील तीन अवैध बांधकामांवर प्राधिकरणाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई केली.

सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर चौगुले ...

सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर चौगुले ...:
पोलीस परिमंडळ तीन अंतर्गत येणा-या पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर चौगुले आज (शुक्रवारी) निवृत्त झाले. चौगुले हे 1978 साली पोलिसदलात फौजदार म्हणून भरती झाले. त्यानंतर त्यांनी विविध पदावर पस्तीस वर्ष पोलिस खात्यात सेवा केली.

अधिकारी, कर्मचा-यांमुळेच ...

अधिकारी, कर्मचा-यांमुळेच ...:
वाढती लोकसंख्या आणि मर्यादित मनुष्यबळ यांचा ताळमेळ साधत नागरिकांना दर्जेदार सेवासुविधा देण्यासाठी महापालिकेत काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी सातत्याने प्रयत्न करतात. यामुळेच पिंपरी-चिंचवड महापालिकेला बेस्ट सिटीचा बहुमान मिळाला आहे असे गौरवोद्‌गार महापौर मोहिनी लांडे यांनी काढले.

साहेब, आमचेही प्रगतिपुस्तक तपासा! - पिंपरी मनसेतील सूर

साहेब, आमचेही प्रगतिपुस्तक तपासा! - पिंपरी मनसेतील सूर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्याच पध्दतीने पिंपरी-चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांचीही बैठक व्हावी, असा सूर पक्षातून व्यक्त होत आहे.

‘बॅकडेटेड’ नोंदीमुळे अधिकारी गोत्यात

‘बॅकडेटेड’ नोंदीमुळे अधिकारी गोत्यात: - अनधिकृत बांधकाम : अभय देण्याचा प्रयत्न उघड

पिंपरी : जाधववाडी-चिखली येथे सद्य:स्थितीत सुरू असलेल्या तीन मजली इमारतीची नोंदणी मागील तारखेने करून अनधिकृत बांधकामास अभय देण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब निदर्शनास आली असून, काळेवाडीतील अशाच प्रकरणानंतर करसंकलन विभागाचे अधिकारी अडचणीत आले आहेत. बांधकामावर कारवाई होणारच आहे. करसंकलन विभागाच्या अधिकार्‍यावरदेखील कारवाई होणार असल्याचे आयुक्त श्रीकर परदेशी यांनी स्पष्ट केले.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या मानधनात दुपटीने वाढीचा प्रस्ताव

तज्ज्ञ डॉक्टरांच्या मानधनात दुपटीने वाढीचा प्रस्ताव: पिंपरी : महापालिका सेवेतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी प्रशासनामार्फत स्थायी समितीपुढे ठेवला आहे. या डॉक्टरांसह आयटीआयमधील निदेशकांचेही मानधन दुपटीने वाढणार आहे. तसा प्रस्ताव ४ जूनला होणार्‍या स्थायी समितीपुढे ठेवण्यात येणार आहे.

महापालिका सेवेतील ९ तज्ज्ञ डॉक्टरांना दुप्पट मानधन मिळणार आहे. महापालिका सेवेतील जे डॉक्टर व्यवसायरोध भत्ता घेऊन खासगी प्रॅक्टिस करतात, त्यांची माहिती घेण्याचे काम सुरू असताना, तज्ज्ञ डॉक्टरांचे मानधन दुप्पट करण्याची भूमिका आयुक्त परदेशी यांनी घेतली आहे. या डॉक्टरांना ४५ ते ६0 हजारांपर्यंत मासिक मानधन मिळणार आहे. मोरवाडी व कासारवाडीतील औद्योगिक तंत्र प्रशिक्षण संस्थेतील निदेशकांचे मानधन दुपटीने वाढविण्याचाही प्रस्ताव आहे. त्यांचे मानधन ८ वरून १५ हजारांवर पोहोचणार आहे. (प्रतिनिधी)

प्राधिकरणातील उद्याने फुलली

प्राधिकरणातील उद्याने फुलली: निगडी : मॉन्सूनच्या आगमनाची चाहूल लागल्याने वातावरणात थोडासा बदल झाला असला, तरी दुपारच्या उकाड्यामुळे व उन्हाळ्याच्या सुटीमुळे प्राधिकरणातील उद्याने नागरिक व बालगोपाळांनी फुलून जात आहेत.

प्राधिकरणातील संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानांमध्ये सूर्याची तांबूस किरणे बाहेर पडल्यापासूनच मॉर्निंग वॉकसाठी गर्दी होत आहे. उद्याने सकाळी दहापर्यंत खुली असल्याने हिरवळीवर नागरिक गप्पागोष्टी करतात. सूर्य मावळतीला झुकायला लागला की, आबालवृद्ध उद्यानाकडे धाव घेतात. सायंकाळी सहाच्या दरम्यान उद्यानांमध्ये मोठी गर्दी होत आहे.

पोलीस ठाण्यांना कारभार्‍याची प्रतीक्षा

पोलीस ठाण्यांना कारभार्‍याची प्रतीक्षा: - चिंचवड वाहतूक विभागाचे निरीक्षक नेवे यांची बदली

पिंपरी : सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शांताराम तायडे यांना सहायक पोलीस आयुक्त म्हणून बढती मिळाली आहे, तर गुन्हे निरीक्षक भागवत सोनवणे यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून मुंबईला बदली झाली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश देवरे यांच्या जागी अद्याप कोणी पदभार स्वीकारलेला नाही. चिंचवड वाहतूक विभागाचे निरीक्षक सुभाष नेवे यांचीही बदली झाली आहे. शहरातील चार निरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून, त्यांच्या जागी कोण कारभारी पदभार स्वीकारणार याची उत्सुकता पोलीस वतरुळाला लागली आहे.

तलाठी नसल्याने कामे रखडली

तलाठी नसल्याने कामे रखडली: - रहाटणी परिसरातील नागरिक त्रस्त

रहाटणी : येथील तलाठी कार्यालयात अनेक दिवस तलाठीच हजर नसल्याने नागरिकांच्या विविध कामांना विलंब लागत आहे. तलाठय़ाची रोज प्रतीक्षा करून नागरिक हैराण झाले आहेत. १५ एप्रिलला बदलून आलेले तलाठी नक्की कोण, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

१५ एप्रिल २0१३ रोजी रहाटणी येथील तलाठी कार्यालयात सचिन मोरे यांनी पदभार स्वीकारला. मात्र त्यांच्याकडे देहू येथील अतिरिक्त कार्यभार असल्याने ते रहाटणी कार्यालयास वेळ देत नसल्याच्या तक्रारी आहेत. उत्पन्नाचे दाखले, सात-बारा, बोजा चढवणे-उतरवणे, सातबारावर नाव चढवणे, उतरवणे यांच्यासह विविध कामांसाठी नागरिक अर्ज करीत आहेत. तलाठीच नसल्याने या कामांना मुहूर्तच सापडत नाही.

‘काळाबाजार रोखण्यात अधिकार्‍यांचे दुर्लक्ष’

‘काळाबाजार रोखण्यात अधिकार्‍यांचे दुर्लक्ष’: पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्याकडे अन्न धान्य वितरण विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने जिल्हाधिकारी विकास देशमुख यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

घरगुती गॅसचा होणारा काळाबाजार गॅसच्या गाडीवरील कामगारांचे होणारे शोषण आदीबाबत १४ मे रोजी निवेदन दिले होते. ते निवेदन पुढील कार्यवाहीकरिता अन्न धान्य परवाना विभाग, जिल्हा पुणे कार्यालयात पाठविण्यात आले.

पुण्याला थेट अनुदान?

पुण्याला थेट अनुदान?

पुणे -&nbsp सिलिंडर ग्राहकांच्या बॅंक खात्यात थेट अनुदान जमा करण्याच्या दुसऱ्या टप्प्यातील योजनेत केंद्र सरकारकडून पुणे शहराचा समावेश होण्याची शक्‍यता आहे.