Thursday 31 August 2017

Moshi resident to enjoy farm fress vegitables directly from farmers

Residents from Moshi will enjoy farm fresh vegetables
Green Mall inagurated in Moshi; farmers sell directly to consumers in area

'ट्रान्स्पोर्ट हब'चे काम सहा महिन्यांत सुरू करा - मुख्यमंत्री फडणवीस

पुणे - एकात्मिक वाहतूक आराखड्यांतर्गत (इंटिग्रेटेड मल्टिमोड्यूल ट्रान्स्पोर्ट हब) "महामेट्रो'ने पिंपरी-स्वारगेट मार्गावरील जेधे चौकातील भूमिगत मेट्रो स्थानकाचे काम सहा महिन्यांत सुरू करण्याची तयारी करावी, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईतील आढावा बैठकीत दिला. महामेट्रोतर्फे नागपूर आणि पुण्यात मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असून मुख्यमंत्र्यांनी या कामांचा आढावा घेतला.

PCMC plans multipurpose public ground on HAL land

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has invited suggestions and objections from citizens for its proposal to purchase 59 acres of land currently under the possession of Hindustan Antibiotics Limited (HAL), Pimpri, and reserve it ...

Explore ways to trim traffic, says Bapat

Interacting with reporters, the ruling party leader of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), Eknath Pawar, said that Bapat issued the directives while inspecting the Pune-Mumbai highway at Bopodi along with office-bearers of the civic body and ..

Health officials get 14 days to clean up Chinchwad's mess

Pimpri Chinchwad: Displeased with the overall cleanliness situation, the municipal corporation (PCMC) on Wednesday decided to initiate action against zonal ...

Rise in demand for electricity: Power utility proposes five extra high-voltage sub-stations

Considering the rising demand for power, Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MSEDCL) has proposed five Extra High Voltage (EHV) sub-stations in the city and Pimpri Chinchwad. The MSEDCL has 27 lakh registered consumers in Pune ...

3-day Pimpri Chinchwad fest from tomorrow

Ramkrishna More auditorium in Chinchwad at noon. It will be followed by talent shows. Geeta Sharma group will perform Bharatnatyam at Ankush Landge auditorium, Bhosari, on Sunday around noon. Chinchwad Malayali Samajam will hold Kerala festival ...

पिंपरी पालिका भाजपकडे आल्यापासून विस्कळीत कारभार कसा?

पिंपरी पालिकेच्या विस्कळीत कारभारावर तीव्र नापसंती व्यक्त करत 'कारभारी' आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांनी मंगळवारी (२९ ऑगस्ट) पालिकेच्या 'प्रस्थापित' अधिकाऱ्यांना चांगले फैलावर घेतले. सहा महिन्यांपूर्वी शहर स्वच्छ व सुंदर ...

महापालिकेतील कामचुकार अधिकाऱ्यांना घरी बसवा

चौफेर न्यूज –  महापालिका आरोग्य, वैद्यकीय विभागातील कामचुकार अधिकाऱ्यांमुळे स्वच्छतेसह नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण होवू लागला आहे. प्रभावी उपाययोजना न केल्यामुळे कचऱ्यांच्या प्रश्‍नासह स्वाईन फ्लू, डेंग्यूसह अन्य साथीचे आजार वाढू लागले आहेत. संबंधित विभागप्रमुखांनी जबाबदारी पुर्वक कामे न केल्यास त्यांना घरी बसवा, अशी मागणी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पक्षनेते एकनाथ पवार यांनी केली आहे.

महापालिका तलाव आर्थिकदृष्ट्या न परवडणारे, लवकरच नवीन धोरण

चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालकीचे जलतरण तलाव चालविणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे हे तलाव सेवाशुल्कावर चालवायला देण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन आहे. याकरिता लवकरच नवीन धोरण ठरविले जाणार आहे, अशी माहिती क्रीडा, कला व सांस्कृतिक समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते यांनी दिली.

स्वच्छतेच्या गुणवत्तेसाठी महापालिकेचा स्वतंत्र आराखडा

चौफेर न्यूज –  केंद्र सरकारची स्वच्छ सर्व्हेक्षण मोहीम 4 जानेवारी 2018 पासून सुरू होणार आहे. या अनुषंगाने शहरातील स्वच्छतेची गुणवत्ता वाढविण्यासाठी महापालिकेने आराखडा तयार केला आहे. 1 सप्टेंबरपासून त्याची अंमलबजावनी करण्यात येणार आहे. त्यामध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा राहणार आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या सर्वेक्षणच्या दृष्टीने पूर्वतयारी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिले आहेत. यामध्ये 1 सप्टेंबरपासून दर शुक्रवारी सकाळी 7 ते 9 या कालावधीत दोन तासाचे श्रमदान करून वॉर्ड व परिसरातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यात येणार आहे. दर पंधरा दिवसांनी एक विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात येणार आहे.

जून्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी ग्रेडसेपरेटर बनविणार

 चौफेर न्यूज – जून्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते खडकी सिग्नलपर्यंत वाहतुक कोंडीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी दोन्ही मनपाकडून नदीवर नव्याने हरिश ब्रीजला समातंर पुल बांधण्यात येत आहे. तसेच, रस्त्यावरील घराचे अतिक्रमण तत्काळ हटवून ग्रेडसेपरेटर बनविण्यात यावा, अशा सूचना पालकमंत्री गिरीष बापट यांनी पुणे मनपाचे आयुक्‍त कुणालकुमार यांना दिल्या.

शहरातील मनपा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सक्षम करा – आमदार जगताप

चौफेर न्यूज –  शहरातील स्वच्छतेसाठीची यंत्रणा सक्षम करावी तसेच यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागावरील ताण कमी करण्यासाठी शहरातील इतर मनपा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सक्षम करावा, अशा सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिल्या. आज सकाळी शहरातील विविध विकास कामांबाबत तसेच स्वच्छता, अतिक्रमण व अनधिकृत बांधकामाबाबत अधिकारी व पदाधिकारी यांची संयुक्त बैठक स्थायी समिती सभागृहात झाली त्यावेळी ते बोलत होते.

Ganesh Utsav Celebration 2017 : घरगुती गणपती देखाव्यातून दिला दुष्काळ मुक्तीचा संदेश

पिंपरी चिंचवड भागात राज्यभरातील दुष्काळी भागातील लोक मोठ्या संख्येने उदरनिर्वाहासाठी स्थायिक झाले आहेत. यापैकी बरीचशी मंडळी भागवत कुटुंबीयांचा देखावा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थिती दर्शवतात. याच दुष्काळग्रस्त जनतेला पाणी ...

Wednesday 30 August 2017

दापोडी ते खडकी हॅरिस ब्रिजजवळ होणाऱ्या वाहतूककोंडीची पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली पाहणी

पालकमंत्री गिरीश बापट, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दापोडी येथे हॅरिस ब्रिजजवळ होणाऱ्या वाहतूककोंडीची मंगळवारी (दि. २९) पाहणी केली.
त्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांचे आयुक्त व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली.
त्यात दापोडी ते खडकीपर्यंत होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी या भागात उड्डाणपूल की भुयारी मार्ग उभारता येईल, यावर चर्चा करण्यात आली. त्याबाबत संयुक्तिक अभ्यास करून आठवडाभरात अहवाल देण्यास त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

Nitin Gadkari’s call for shift to e-transport: PMPML to start ‘planning’, activists call for transit oriented system

PMPML Chairman and Managing Director said, “We do have a plan to run e-buses, but, since electric buses are not plying anywhere in the country, we will have to rope in the buses and plan accordingly.

पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच

पिंपरी-चिंचवडमधील निगडी, बौद्ध नगर झोपडपट्टी परिसरात अज्ञाताने चार ते पाच चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्या. ही घटना ... सांगवी, पिंपळे गुरव, नेहरू नगर, साने चौक, निगडी या ठिकाणी देखील वाहनांच्या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत.

अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर चौकशीची मागणी

पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी लोकशाही संस्थेचे अध्यक्ष अजय लोंढे यांनी पालिकेकडे केली आहे. तसेच, कारवाईस टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

नगमंगला येथील नगरसदस्य व अधिका-यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेला भेट; विविध प्रकल्पांची घेतली माहिती

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांची माहिती जाणून घेण्यासाठी कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यातील टाऊन पंचायत नगमंगला येथील नगरसदस्य व अधिकारी यांनी पालिकेला भेट दिली. त्यांचे स्वागत कर संकलन विभागाचे सहआयुक्त दिलीप गावडे यांनी केले.

फेस्टीवलमधून पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार सांस्कृतिक मेजवानी

महापौर, पक्षनेत्यांकडून  फेस्टीवलचा कार्यक्रम जाहीर
गणेशोत्सवाच्या काळात यावर्षी पिंपरी-चिंचवड फेस्टीवल सुरु करण्यात येत असून येत्या १ ते ३ सप्टेंबर २०१७ दरम्यान हे फेस्टीवल होत आहे. त्यानमित्ताने आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती महापौर नितीन काळजे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार व स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी दिली.

शहर स्वच्छतेवरून भाजप पदाधिका-यांनी घेतली झाडाझडती

भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे आणि इतर पदाधिका-यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत मंगळवारी (दि. २९) आढावा बैठक घेतली. शहराची स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. आता नागरिकांची कामे न झाल्यास त्याचे परिणाम अधिकाऱ्यांना भोगावे लागतील, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

नाशिक फाटा ते पिंपळे सौदागरमार्गे हिंजवडी आयटीपार्कपर्यंत बसच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी

राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे आणि नगरसेविका शीतल काटे यांनी पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना दिले निवेदन

महापालिकेच्या योजनांकडे लाभार्थ्यांनी फिरवली पाठ

चौफेर न्यूज –  कल्याणकारी योजनेंतर्गत नागरिकांना अर्थसहाय्य देण्यासाठी महापालिकेने आवाहन करुनही त्याला अपेक्षित प्रतिसाद न देता लाभार्थ्यांकडून योजनांकडे पाठ फिरविली जात आहे. गरजूंना विविध योजनांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tuesday 29 August 2017

पालिकेच्या प्रसिध्दीसाठी नेमली जाणार ठेकेदारी संस्था

सोशल मिडिया व प्रसारमाध्यमांमधून महापालिकेची चांगली प्रसिध्दी करून घेण्यासाठी एक खासगी ठेकेदारी संस्था नेमण्यात येणार आहे. तशी तयारी महापालिका प्रशासनाने चालविली असून हे काम करणा-या संस्थांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र, पालिकेच्या पैशांची उधळपट्टी करण्यासाठी नवीन मार्ग प्रशासनाने शोधलाय का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शहरातील विस्कळीत पाणी सुरळित करा – महापौर नितीन काळजे

शहरातील अनेक भागात विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या तक्रारी येत असल्याने हा पाणीपुरवठा सुरळित करा, अशा सूचना महापौर नितीन काळजे यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिका-यांना दिल्या.

बीआरटीसाठी प्रकल्प सल्लागार, महापालिकेचा प्रस्ताव

पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरात बीआरटीएसचे प्रकल्प सुरू आहेत. औंध-रावेत आणि दापोडी-निगडी बीआरटीएस रस्त्यावर उड्डाणपूल, सब-वे, ग्रेडसेपरेटर, पादचारी पूल तसेच रस्ता रुंदीकरण अशी विविध कामे करण्यात येत आहेत. या वेगवेगळ्या कामांसाठी ...

सतरा नंबर फॉर्मचा गैरवापर

पिंपरी - दहावीचा निकाल शंभर टक्के लागावा, यासाठी अध्ययनात कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांकडून १७ नंबरचा फॉर्म भरण्यासाठी पालकांवर सक्ती केली जात आहे. मोरवाडीतील एका नामांकित इंग्रजी शाळेत हा प्रकार उघडकीस आला. या निमित्ताने शंभर टक्के निकाल लावणाऱ्या शाळांमधील १७ नंबरी ‘शाळा’ विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र या विषयाकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

मुलगी झाली, लक्ष्मी आली...

पिंपळे सौदागर येथील कोकणे मित्र मंडळाचा अभिनव उपक्रम
पिंपरी - अलीकडे ‘बेटी बचाओ’चा नारा प्रत्येक जण लगावतो..पण,
त्यातील किती जण त्याला कृतीची जोड देतात.. कसलेही शुल्क न आकारता मुलींच्या जन्माचे स्वागत करणारा डॉ. गणेश राख यांच्यासारखा एखादाच असतो. मात्र, ज्या घरी मुलगी जन्माला येईल, त्या कुटुंबाला पाच हजार रुपये देण्याचा उपक्रम पिंपळे सौदागर येथील कोकणे मित्र मंडळाने हाती घेऊन समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. मंडळाचे अध्यक्ष उल्हास कोकणे यांनी तो मोठ्या नेटाने सुरू ठेवला असून, आतापर्यंत त्यांनी २० मुलींचे असे अनोख्या पद्धतीने स्वागत केले आहे. 

निगडी-प्राधिकरणात पर्यावरणपूरक गणेशोत्सव

महापालिका गणेश फेस्टिव्हल : महोत्सवावरून रूसवे फुगवे

पिंपरी : महापौरांनी पिंपरी-चिंचवड गणेश फेस्टिव्हलची घोषणा केल्यानंतर क्रीडा, कला व सांस्कृतिक समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते यांनी पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल दिवाळीपर्यंत राबविण्याची अजब योजना आखली आहे. 'पिंपरी-चिंचवड ...

पिंपरी शहरात प्रथमच जीएसबी गणेशोत्सव

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रंगास्वामी पेरूमल सभागृहात या गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.जीएसबी समाज कोकण किनारपट्टी ते केरळ किनारपट्टीलगत वसलेला समाज असून, त्यामध्ये व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. या समाजात विविध ...

जलपर्णीच्या नावाखाली ठेकेदारावर मेहेरनजर?

एकाच कंपनीला ठेका : सुमारे 40 लाखांचा खर्च
पिंपरी – पवना, मुळा व इंद्रायणी नदी पात्रातील जलपर्णी हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. पावसाळा संपल्यानंतर जलपर्णी झपाट्याने वाढून नदी पात्रात जलपर्णीचा विळखा वाढत असतो. त्यामुळे जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेने सन 2017-18 या एका वर्षांची वेगवेगळ्या निविदा प्रक्रिया राबवून कामांचा ठेका एकाच कंपनीला दिला आहे. यावर सुमारे 40 लाख रुपये खर्च होणार आहे.

ताथवडे गावात जेएनएनयुआरएम योजनेतंर्गत पाणीपुरवठ्याच्या कामासाठी 31 ऑगस्टपर्यंतची “डेडलाईन’

चौफेर न्यूज – पिंपरी- चिंचवड महापालिका हद्दीतील ताथवडे गावात जेएनएनयुआरएम योजनेतंर्गत पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत पाईपलाईन टाकण्याची कामे सुरू असून, 20 टक्के कामे अद्याप शिल्लक राहिली आहे. ही कामे 31 ऑगस्टपर्यंत मार्गी लावा, असे आदेश आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

वाकड रस्ता चौकात पथदिव्यांची मागणी

चौफेर न्यूज – वाकड रस्ता चौकात विद्युत व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना रात्री अंधाराचा सामना करावा लागतो, अशी तक्रार मानवी हक्क संरक्षण संघटनचे शहराध्यक्ष अविनाश रानवडे यांनी ग क्षेत्रीय कार्यालयाकडे केली आहे.

Monday 28 August 2017

टीम PCCF तर्फे घरकुल, चिखली येथे शून्य कचरा विषयावर प्रबोधन

Waste Composting Awareness session by Team PCCF at Gharkul Housing Society, Chikhali. Session to enlight & encourage citizen on home composting. अतिशय वेगळ्या पद्धतीने घरकुल, सेक्टर 17-19 चिखली येथील साई हौसिंग सोसायटीने त्यांचा वर्धापन दिन साजरा केला. वर्धापनदिनाचे औचित्य साधून बाबासाहेब काळे, समन्वयक पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम यांनी शून्य कचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांचे शंकानिरसन, प्रात्यक्षिक यातून प्रबोधन केले. यावेळी प्रमुख पाहुणे श्री. नितिन यादव (संस्थापक अध्यक्ष अखिल महाराष्ट्र माहिती अधिकार समिती, महाराष्ट्र राज्य) जागृत नागरिक महासंघ पुणे, विशेष कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. मान्यवरांनी या प्रसंगी सोसायटीच्या नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले

पिंपरी-चिंचवडची शिब्रा तुपके झाली 'मिस एशिया पॅसिफिक'

Congratulations Shibra, You have made us all PCMCkar proud of your super achievement Your hard work has surely paid off. Keep achieving more success पिंपरी-चिंचवडची शिब्रा तुपके झाली 'मिस एशिया पॅसिफिक'. पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात मानाचा तुरा... मराठी चित्रपट करण्याची शिब्राची इच्छा
Image may contain: 1 person, standing

विमानतळ, रेल्वे स्थानकांवर फळविक्री केंद्रे उभारू - नितीन गडकरी

मुख्यमंत्री घेणार पदाधिकाऱ्यांची “शाळा’

राज्यभरातील महापालिकांच्या कामाचा स्वतंत्र आढावा
प्रभात वृतसेवा
पुणे, दि. 27 – राज्यसरकारला तीन वर्षे पुर्ण होत असल्या निमित्ताने आणि पुढील दोन वर्षात येत असलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकींच्या तयारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभरातील महापालिका पदाधिकाऱ्यांची शाळा घेणार आहे. या महापालिकांच्या कामकाजाचा आढावा घेण्या बरोबरच राज्यशासनाची मागील तीन वर्षातील कामगिरीचा आढावा सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी मिरा-भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधीनी मध्ये प्रत्येक महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची आणि शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची तीन दिवसांची कार्यशाळा घेतली जाणार आहे. या कार्यशाळेसाठी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना नुकत्याच सूचना देण्यात आल्या असून मागील सहा महिन्या केलेल्या कामांचा आढावा तयार ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

मंदीचा फटका

पिंपरी - नोटाबंदी, जीएसटी यामुळे उद्योग धंद्यावर परिणाम झाल्याने वर्गणीदारांनी आखडता हात घेतला. याचा फटका गणेश मंडळांना बसला आहे. याशिवाय बांधकाम व्यावसायिक, पतसंस्था या हमखास जाहिरात देणाऱ्यांनी देखील पाठ फिरविल्याने यंदा अनेक मंडळांनी देखावे सादर केले नाहीत. मात्र मोठ्या उत्साहात भर पावसात देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडलेल्या गणेश भक्‍तांचा हिरमोड झाला आहे.

सामाजिक उपक्रम हीच ओळख

– एसकेएफ मंडळ : स्त्री शक्‍तीवर जिवंत देखावा
पिंपरी – केवळ सार्वजनिक गणेशोत्सव नव्हे, तर वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविणारे गणेश मंडळ अशी चिंचवड येथील एसकेएफ इंडिया लिमिटेड गणेशोत्सव मंडळाची ओळख आहे. यंदा हे मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवाचे 47 वे वर्ष साजरे करत आहे.

'ती'ला सन्मान दिल्यास समानता प्रस्तापित - नितीन काळजे

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत बुद्धीची देवता गणरायाचे आगमन झाले आहे. त्यामुळे शहरात वेगळेच चैतन्य संचारले आहे. महिला सबलीकरण, स्त्री-पुरूष समानता हे शब्द कागदावरच न रहाता, प्रत्येक नागरिकांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी, समान वागणूक ...

स्टेडिअमचे झाले गोदाम; छताला चिरे, आसन व्यवस्थेची दुरवस्था

आसनव्यवस्थेची दुरवस्था... मैदानावर वाढलेले गवत अन् अस्ताव्यस्त पडलेले साहित्य आहे. अशी दुरवस्था नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमची झाली आहे. औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची क्रीडानगरी म्हणून ...

Sunday 27 August 2017

BJP councillor urges civic body to build public toilets for women

PUNE: BJP corporator Anuradha Gorkhe has demanded that Pimpri Chinchwad Municipal Corporation(PCMC) construct public toilets for women at busy places to reduce the inconveniences of women. Gorkhe has written letters to municipal commissioner ...

PMPML's ring route to ease commuters this Ganpati

To provide better services to commuters during the ongoing Ganpati festival, the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) will be providing a special night bus across Pune and Pimpri-Chinchwad for those visiting from outside the city. Also ...

गुणवत्ता सुधारल्याने पटसंख्येत वाढ, जानकीदेवी बजाज ग्राम शिक्षण संस्थेचा उपक्रम

पिंपरी-चिंचवड महापालिका व जानकीदेवी बजाज ग्राम शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ९९ शाळांची निवड शैक्षणिक दर्जा सुधारणासाठी करण्यात आली आहे. त्यासाठी सर्व शिक्षा अभियान व शिक्षणाचा अधिकार कायद्याच्या ...

आरोग्य विभागातील डिझेल घोटाळ्याप्रकरणी आयुक्‍तांच्या आदेशाची पायमल्ली

चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागातील ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धुरीकरणासाठी जादा डिझेल वापरून सुमारे सव्वा लाख लिटरचा घोटाळा केला होता. या डिझेल घोटाळ्यातील १४ अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ५४ लाख १६ हजार ९७२ रुपये वसूल करण्याचा आदेश आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी पाच महिन्यापूर्वी दिला होता. मात्र, मुदत संपुनही त्यापैकी कोणीही पैसे भरलेले नाहीत.

शिवसेना शहरप्रमुखाला पक्ष चालवता येत नसेल तर अन्य पक्षातील चाणक्यांना दोष देणे चुकीचे – प्रा. सचिन काळभोर

शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद कुटे यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आकुर्डी भागातून शिवसेनेला सर्वाधिक मतदान मिळवून दिले आहे. महापालिका निवडणुकीत ते स्वतः विजयी झाले आणि शिवसेनेच्या एका उमेदवारालाही त्यांनी निवडून आणले. असे असताना वशिल्याचे टट्टू आणि भाजपच्या संगनमताने नगरसेवक झालेल्या अमित गावडे यांनी प्रमोद कुटे यांना बालिश म्हणणे म्हणजे ते स्वतः बौद्धिक दिवळखोर असल्याचे सिद्ध करत आहेत. शहरप्रमुखाला पक्ष चालवता येत नसेल तर गावडे यांच्यासारख्या बाटग्या चमच्यांनी अन्य पक्षातील चाणक्यांना दोष देणे चुकीचे ठरते. शहरातील शिवसेना ही वाघाची राहिली नसून, शहरप्रमुख राहुल कलाटे यांच्या मागे मागे फिरणाऱ्या शेळ्यांची झाली आहे, अशी घणाघाती टिका आकुर्डीतील शिवसैनिक प्रा. सचिन काळभोर यांनी केली आहे.

बाप्पांच्या मोदकांनी दिली “स्टार्ट-अप’ कल्पना

“बीबीए’करुनही “फूड इंडस्ट्री’त उडी : चिन्मय गोगटे याचा प्रवास
पिंपरी – पिंपरी-चिंचवड हे “आयटी’पासून “ऑटोमोबाईल’पर्यंत सर्वच उद्योगांचे शहर म्हणून ओळखले जाते. संगणकाचे आणि व्यवसायविषयक शिक्षण घेणाऱ्या तरुणांना येथे खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. परंतु, “बीबीए’ झालेल्या तरुणाने बाप्पांसाठी मोदक बनविताना आपल्या करियरसाठी एक वेगळेच क्षेत्र निवडले. भांडवल, जागा असे कोणतेही विशेष पाठबळ नसताना ही शहरातील या तरुणाने आपले एक वेगळे “स्टार्ट-अप’ सुरू केले आहे आणि बऱ्यापैकी यशस्वितेची वाटचाल सुरू केली आहे. चिंचवड येथील चिन्मय गोगटे या तरुणाने हा एक आगळा-वेगळा प्रयत्न केला आहे.

पिंपरी-चिंचवड में विसर्जन के लिए बनाए गए 26 घाट, २ हजार पुलिस होगी तैनात

पुणे / पिंपरी :.शनिवार से शुरू हो चुके विसर्जन के लिए पिंपरी-चिंचवड में विसर्जन की जगह निर्धारित कर दी गई है. यह विसर्जन शहर के 26 घाटों पर किये जाएंगे. इन घाटों पर शांति व सुरक्षा बनाये रखने के लिए अग्निशमन दल व पुलिस के दो हजार जवान तैनात ...

गणेशोत्सावानिमित्त ब क्षेत्रीय कार्यालयामध्ये विशेष स्वच्छता मोहिम

चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गणेशोत्सवानिमित्त विशेष स्वच्छता मोहिम राबविणेचे निर्देश महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिलेले होते. त्या अनुषंगाने सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये दिनांक २१ ऑगस्ट व २२ ऑगस्ट रोजी गणेशोत्सवापुर्वी विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

शाडू मातीच्या मूर्ती वापराचा कल वाढला

40 टक्‍के मूर्तीचा वापर : पर्यावरण पूरक गणेशोत्सवाला हातभार
पिंपरी – पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी होत असलेल्या जनजजागृतीला हळुहळू यश येताना दिसत अहे. त्याचाच परिणाम म्हणून, यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरण पूरक गणेश मूर्तींचा बाजारपेठेत टक्‍का वाढला असून, तो 40 टक्‍क्‍यांवर पोचला आहे. पुढीलवर्षी यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.

Saturday 26 August 2017

देशात पिंपरी-चिंचवड प्रथम आणूया!

आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांचा संकल्प : मिशन स्वच्छ भारत अभियान
पिंपरी – स्वच्छ भारत अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रत्येक नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. 4 जानेवारी 2018 पासून केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्व्हेक्षण मोहिमेला प्रारंभ होत आहे. या स्वच्छ सर्व्हेक्षण मोहिमेची महापालिकेने पुर्वतयारी करण्यासाठी आराखडा तयार केला असून, 1 सप्टेंबरपासून स्वच्छतेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

'स्वारगेट'सारखा न्याय 'निगडी'ला मिळणार का?

ट्रान्सपोर्ट हबचे महत्व मुख्यमंत्र्यांनी ओळखले म्हणूनच 5 वर्षांपूर्वी स्वारगेट येथील जेधे चौकाच्या मंजूर प्रकल्पाचे आता नव्याने नियोजन केले जाणार... निगडी येथेही ट्रान्सपोर्ट हबचीनितांत गरज आहे. भक्ती-शक्ती चौकात सध्या PCMC, PCNTDA, State Transport, PMPML, MahaMetro यांचे वेगवेगळे नियोजन चालले आहे यातून वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी तो जटिल होईल नाहक वेळ व पैसा वाया जाईल. भक्ती-शक्ती चौकाचा पुढील 30 वर्षांचा विचार करून सक्षम यंत्रणेला 'मल्टिमोडलं ट्रान्सपोर्ट हब'चा मास्टर प्लॅन बनवण्याचा आदेश मुख्यमंत्री महोदयांनी द्यावा हि पिंपरी-चिंचवड शहरातील जाणकार नागरिकांची मागणी आहे. 

SSC HSC मार्कशीट आता डिजीलॉकर वर उपलब्ध

#DigiLocker touches a new milestone. Maharashtra State Education Board's 26 years digital marksheets & certificates (1990-2016) are now available on DigiLocker. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या SSC HSC मार्कशीट (1990-2016) आता डिजीलॉकर वर उपलब्ध

 

डिजिटल पोलीस, आता FIR व अन्य सेवा ऑनलाईन शक्य

डिजिटल पोलीस पोर्टलच्या साहाय्याने आता FIR, भाडेकरू, कामगार पडताळणी, सभा/मिरवणूका/आंदोलनाच्या परवानग्या, हरवले व सापडले, वाहन चोरीच्या तक्रारी ऑनलाईन नोंदवणे आता शक्य आहे

PCMC corporators to talk to Fadnavis on people's problems

... Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) and Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) limits. The authority began sending notices to 2,000 affected houses and shops in Walhekarwadi, Chinchwadenagar, Akurdi and ...

एच. ए. च्या 59 एकर जागेबाबत मागविल्या हरकती

आयुक्‍तांचे आदेश : बहुउद्देशीय सार्वजनिक मैदानाचे आरक्षण टाकणार
पिंपरी – पिंपरी-वाघेरे येथील मे. हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स (एच. ए.) लिमिटेड कंपनी ताब्यातील अतिरिक्‍त 59 एकर जमीन विक्रीस शासनाने परवानगी दिली. ती जमीन महापालिका खरेदी करुन त्यावर बहुउद्देशीय सार्वजनिक मैदान विकसित करणार आहे. याकरिता पालिका नगररचना विभागाने त्या जमिनीवरील आरक्षण फेरबदलाची कार्यवाही सुरु केली असून, नागरिकांच्या हरकती व सूचना 8 सप्टेंबरपर्यंत मागविल्या आहेत.

वरुणाभिषेकात 'बाप्पा'चे आगमन; ढोल-ताशांसह पारंपरिक वाद्यांच्या दणदणाटात मिरवणूक

शहरातील पिंपरीचिंचवडभोसरीनिगडी, प्राधिकरण, दापोडी, सांगवी, काळेवाडी, रहाटणी, थेरगाव परिसरातील बाजारपेठांमध्ये पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. तसेच गणपती मूर्ती विक्रीच्या ठिकाणीही लगबग दिसत होती.

क्रीडा धोरणाविषयी शनिवारी आकुर्डीत निषेध सभा

पिंपरी – राज्य सरकारने क्रीडा धोरणात बदल करुन 41 खेळांच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत. याविरोधात या 41 खेळांच्या राज्य संघटनांनी राज्य सरकारच्या या धोरणाला कडाडून विरोध केला आहे. येत्या शनिवारी (दि. 26) या निर्णयाच्या निषेधार्थ खेळ वाचवा कृती समितीने आकुर्डीत निषेध सभा आयोजित केली आहे.

गणपतीसाठी जादा बस

तर, पिंपरी-चिंचवडसाठी भोसरी-नेहरूनगर-पिंपरी-चिंचवड-निगडी-पिंपरी रोड-नेहरूनगर-भोसरी या मार्गवरही प्रतिप्रवासी दहा रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे. ही सेवा ३१ ऑगस्ट ते पाच सप्टेंबर या दरम्यान सायंकाळी सहा मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ...

Friday 25 August 2017

उद्योगनगरीच्या ढोल-ताशांचा आवाज थेट दिल्लीत!

आवर्तन पथकाची झेप : राजधानीतील बाप्पांना देणार मानवंदना
पिंपरी – शतका नु शतकांपासून मराठमोळ्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेले आणि गणेशोत्सव आसमंत दुमदुमून टाकणारे ढोल-ताशे आता थेट देशाच्या राजधानीत श्री गणेशास मानवंदना देणार आहेत.

चिखलीत दहा बांधकामांवर हातोडा

चिखली – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने चिखली येथे चालू असलेल्या दहा अनधिकृत बांधकामावर आज (गुरुवारी) कारवाई केली.

आयुक्तांकडून कुंदन गायकवाड यांचे नगरसेवकपद रद्द

पिंपरी-चिचंवड महापालिकेचे भाजपचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी (दि. २४) त्यांचे नगरसेवकपद रद्द केले आहे. त्यांनी नियमानुसार ही प्रक्रिया पूर्ण केली असून संबधितांना पुढील कार्यवाहीसाठी तसे आदेश दिले आहेत.

PMC and PCMC caught in a garbage war across Mula

In a mockery of the Swachh Bharat pledge, several hoteliers, sweet shop owners and street vendors in the densely populated Aundh have been found dumping their daily garbage on open land owned by the Pimpri- Chinchwad Municipal Corporation (PCMC) ...

Curbs on sale of alcohol within city limits likely to be lifted soon

n a major relief to the hospitality sector, the apex court on Wednesday modified its earlier order banning the sale of alcohol within 500 metres of a highway.

साई चौकातील वाहतूककोंडीची आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडून पाहणी ; अधिकाऱ्यांना केल्या सूचना

सांगवी-किवळे बीआरटी मार्गावरील साई चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे संपूर्ण पिंपळेसौदागर आणि पिंपळेनिलख भागातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याची दखल घेऊन भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काटे व अधिकाऱ्यांसोबत साई चौकाची पाहणी केली. या चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आमदार जगताप यांनी महापालिका व प्राधिकरणाचे अधिकारी आणि वाहतूक पोलिसांना विविध सूचना केल्या.

गणेशोत्सवात पीएमपीची वर्तुळाकार मार्गावर सेवा

पुणे - गणेशोत्सवादरम्यान पीएमपी प्रशासनाने शहराच्या मध्य भागातून, तसेच पिंपरी चिंचवडमध्येही वर्तुळाकार मार्गाची आखणी केली असून, शुक्रवारपासून (ता. 25) प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. या मार्गावर दर दहा मिनिटांनी प्रवाशांना बससेवा उपलब्ध होणार असून, तिकीट दरही फक्त दहा रुपये असेल. तसेच, उत्सवादरम्यान रात्र बससेवा सुरू होणार असून शहर आणि पिंपरी- चिंचवडसाठी तब्बल 694 जादा बस पीएमपीने उपलब्ध केल्या आहेत. 

गणेशोत्सवाच्या काळात पिंपरी-चिंचवडमध्ये पीएमपीएमएलच्या २४० बस रात्रभर धावणार

महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार व स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांची माहिती
शुक्रवारपासून (दि. २५) सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात देखावे पाहण्यासाठी पीएमपीएमएलमार्फत पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात रात्रभर बससेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये विविध उपनगरांना जोडणारा वर्तुळमार्ग सुरू केला जाणार आहे. संपूर्ण शहरात विविध मार्गांवर एकूण २४० बस धावणार आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये अशा प्रकारे प्रथमच पीएमपीएमएलची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आणि स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी दिली.

लाडक्या श्रीगणरायाचे स्वागत करण्यासाठी अवघी उद्योगनगरी सज्ज

गुरूवारचा पूर्वदिवस महिलांसह गणेश मंडळाच्या कार्यकतर््यांसाठी अधिकच गडबडीचा होता. पिंपरीचिंचवडनिगडीभोसरी या परिसरातील चौकाचौकांत गणेशमूर्तींचे स्टॉल लागले असल्याने भाविक श्रींच्या मूर्तीचे बुकिंग करताना दिसत होते.

अजगराची चोरी केली सर्पमित्रानेच? दोन सुरक्षारक्षकांवर कारवाई; तक्रार दाखल करण्यास लागले तीन दिवस

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संभाजीनगरात सर्पोद्यानाची निर्मिती केली आहे. या ठिकाणी आजपर्यंत ४ मगरींचा मृत्यू, ७ मगरी गायब, ५० मृत सापांचा खच, २ अजगर गायब, किंग कोब्राचा मृत्यू, कासवाची पिलेचोरी असे प्रकार घडले आहेत. मात्र ...

पिंपरी-चिंचवड पालिकेत सभापतींची ट्रॅक्टरवरुन एन्ट्री

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते यांच्या वाहनावर गेल्या तीन दिवसांपासून नाही. या समस्येकडे लक्षवेधण्यासाठी गुरुवारी त्यांनी चक्क ट्रॅक्टर घेऊन पालिकेत एन्ट्री केली. पालिकेच्या प्रवेश ...

बीआरटीसाठी पदाधिका-यांची टूर, अहमदाबादमध्ये अभ्यास दौरा करणार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरात विविध ठिकाणी बीआरटीएस प्रकल्प सुरू आहेत. त्यासाठी अभ्यास दौरा आयोजित केला असून महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी तीन टप्प्यांमध्ये अहमदाबादमध्ये अभ्यास दौरा करणार आहेत. त्यास खर्चास ...

“आरटीई’अंतर्गत शालेय साहित्यासाठी उपोषण

पिंपरी – महापालिकेच्या शाळांना शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आरक्षित कोट्यातून प्रवेश मिळाला आहे. मात्र, त्यांना जाणिवपूर्वक साहित्य दिले जात नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते सुभाष जिनवाल यांनी पिंपरी चौकात बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

कुदळवाडी शाळेला मुख्याध्यापक मिळेना

चिखली – महापालिकेच्या कुदळवाडी शाळेला सहा महिन्यांपासून मुख्याध्यापक नाहीत. शिक्षकांची संख्या देखील अपुरी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याची तक्रार आमदार महेशदादा लांडगे युवा मंचचे अध्यक्ष दिनेश यादव यांनी केली आहे.

पिंपरीगावातील पाणी प्रश्‍न सुटणार

पिंपरी – महापालिकेच्या वतीने पिंपरीगाव येथील कै. अनुसया नामदेव वाघेरे शाळेच्या प्रांगणातील नवीन पाण्याच्या टाकीचे भूमीपूजन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते झाले. यामुळे पिंपरी गावातील पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे.

पॅनकार्ड क्‍लब गुंतवणूकदार करणार आंदोलन

पुणे – देशभरातील सुमारे 55 लाख गुंतवणूकदार पॅनकार्ड क्‍लब्ज लि. कंपनीच्या जाळ्यात फसले असून, राज्यातील जवळपास 40 लाख गुंतवणूकदारांच्या परताव्याचे भवितव्य टांगणीला लागले आहे. मात्र राज्यातील एकाही खासदाराला हा प्रश्न संसदेत निकाली काढावा असे वाटले नाही. राज्यातील गुंतवणूकदारांचा हा आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोहचवण्यासाठी राज्यातील सर्व खासदारांच्या घराबाहेर “घंटानाद आंदोलन दि. 10 ते 12 सप्टेंबर रोजी करण्यात येणार असल्याचे राष्ट्रशक्ती संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दारवटकर यांनी सांगितले.

Thursday 24 August 2017

स्वच्छता मोहिमेत हवाप्रत्येक नागरिकाचा सहभाग

त्या अनुषंगाने पूर्वतयारीसाठी चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये कार्यशाळा घेण्यात आली. त्या वेळी हर्डीकर बोलत होते. या वेळी महापालिकेचे सहआयुक्त दिलीप गावडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी विजय खोराटे, सर्व क्षेत्रीय अधिकारी, ...

मिशन विकास आराखडा

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्याची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सत्ताधारी भाजपने पहिले पाऊल टाकले आहे. महापालिकेच्या चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात शहर विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी तरतूद केलेल्या २०५ कोटीपैकी ११२ कोटी रुपये ३५ आरक्षणे, ४१ प्रमुख पर्यायी रस्ते आणि उड्डाण पुलांच्या कामांसाठी वर्गीकरणास स्थायी समिती सभेत बुधवारी (ता.२३) मंजुरी देण्यात आली.  

2 pythons go missing at zoo run by PCMC

Two pythons have gone missing from the Pimpri-Chinchwad Municipal Corporation-run (PCMC) Bahinabai Chaudhary Zoo at Akurdi. The establishment has long lacked basic security, despite an earlier incident of baby crocodiles being stolen. Now, the ...

पिंपरी-चिंचवडमधील प्राणी संग्रहालयातील दोन अजगरांची चोरी

पिंपरी-चिंचवडमधील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातून दोन अजगर चोरीला गेल्याची घटना घडली. संग्रहालयातून ...

‘स्मार्ट सिटी’वर निबंध स्पर्धा

पिंपरी – भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने “माझी सिटी, स्मार्ट सिटी’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली आहे.
निबंधामध्ये आपले शहर “स्मार्ट’ होण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या बाबींचा उल्लेख व उपाययोजना नमूद करणे आवश्‍यक आहे. निबंध मराठी, हिंदी, इंग्रजी यापैकी कोणत्याही एका भाषेत लिहावा. ही स्पर्धा दोन गटात होणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रथम क्रमांकास एक हजार, द्वितीय क्रमांकास सातशे, तृतीय क्रमांकाला पाचशे रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे.

अत्रे रंगमंदिर नऊ महिने बंद

पिंपरी – पिंपरी प्रभाग क्रमांक 20 मधील आचार्य अत्रे रंगमंदिर स्थापत्य व दुरूस्तीच्या कामासाठी तब्बल नऊ महिने बंद राहणार आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे प्रेक्षागृह बंद असल्याने शाळा, तसेच शहरातील विविध कलाप्रेमींच्या कार्यक्रमाची मात्र तारांबळ उडणार आहे. स्थापत्य व विद्युत विषयक कामांसाठी हे रंगमंदिर बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय घुबे यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार दुसरे सभागृह

दैनिक प्रभातच्या बातमीची घेतली दखल
पिंपरी – महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयासाठी थेरगाव येथील शाळेच्या मूळ इमारतीच्या रचनेत कसलाही बदल होणार नाही. शाळेतील सांस्कृतिक सभागृहाच्या बदल्यात विद्यार्थ्यांसाठी शाळेतच सभागृह उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत पालक किंवा शिक्षकांनी गैरसमज करून घेण्याचे कारण नाही, अशी माहिती शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी बी. एस. आवारी यांनी दिली. शाळेच्या सभागृहाचा अधिकाऱ्यांनी ताबा घेतला होता. दै. प्रभातने हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर प्रशासनाने सभागृह उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे.

विनापरवाना मंडप उभारणाऱ्यांवर कारवाई

महापालिकेचा इशारा : गणेश मंडळांना परवानगी बंधनकारक
पिंपरी – शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असून दुसरीकडे महापालिका प्रशासनाने शहरातील गणेश मंडळांना कायद्याचा हंटर उगारला आहे. विनापरवाना मंडप उभारल्यास ते बेकायदेशीर ठरवून त्यावर तातडीने कारवाई केली जाईल. तसेच अशा मंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.

Ministerial berth: Laxman Jagtap or Mahesh Landge? Pimpri-Chinchwad awaits its first honour

BJP MLAs Laxman Jagtap and Mahesh Landge are the two top contenders from Pimpri-Chinchwad for a ministerial berth, especially after the party's resounding victory in PCMCelections where it ended the three-decade old reign of the NCP-Congress. In fact ...

क्‍लस्टर विकासात उदासीनता राहिली- केंद्रीय मंत्री कलराज मिश्रांची कबुली

पिंपरी : औद्योगिक क्‍लस्टर विकासात दहा वर्षानंतरही उदासीनता राहिल्याची कबुली केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री कलराज मिश्र यांनी आज (ता. 23) पिंपरी-चिंचवडमध्ये दिली. त्यामुळे आता हे क्‍लस्टर उभारणीवर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मूलभूत सेवासुविधा आणि पुरेशा विजेअभावी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये स्थलांतरित होत असल्याचे, मात्र त्यांनी अमान्य केले. वीजटंचाईवर सौरऊर्जा हा पर्याय असून त्याला प्राधान्य देत असल्याचेही ते म्हणाले.

राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षपदी वैशाली काळभोर

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षपदी नगरसेविका वैशाली काळभोर यांची आज (बुधवारी) निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काळभोर यांच्या निवडीची घोषणा केली.

आधार आणि डिमॅट खाते संलग्नीकरण होणार

सेबीकडून तडजोड होणार नाही 
नवी दिल्ली -शेअर आणि म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीसाठी आधार क्रमांक बंधनकारक करण्याचा निर्णय भांडवली बाजार नियंत्रक सेबीने घेतला आहे. मुंबई शेअरबाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअरबाजार (एनएसई) दोन्ही एक्‍स्चेंजेसना सेबीने सूचना केल्या आहेत. 31 डिसेंबरपर्यंत गुंतवणूकदारांना त्यांचे डिमॅट आणि म्युच्युअल फंड खाते आधार क्रमांकाशी संलग्न करावे लागणार आहे.

Wednesday 23 August 2017

State to fund 18 JNNURM projects across 14 cities

Neelkanth Poman, chief information and technology officer for PCMC, said, "We have received only the first instalment of central and state governments' funds for Tathawade and phase I of 24x7 water supply projects, and for the drainage scheme for the ...

Pimpri school won't let 'weak' students sit for Class X boards

SNBP insists that teachers have been told to pay extra attention to students. PIC: DATTATRAYA ADHALGE. Not wanting to mar its 100 per cent pass record, SNBP International School asked over 20 students to fill out forms and give the test externally; ...

‘तोंडी तलाक’च्या निर्णयामुळे महिलांची वाटचाल सुकर’

पुणे - तोंडी तलाक हा घटनाबाह्य ठरविणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने लाखो मुस्लिम महिलांचा विजय झाला असून, त्यांना आता न्याय मिळणार आहे. खरंतर हा निर्णय यापूर्वीच होणे अपेक्षित होते, पण असो. मुस्लिम महिलांच्या हक्कांची जाणीव याद्वारे अधोरेखित झाली आहे. या निर्णयामुळे सर्व समावेशकता आणि सक्षमीकरण या दिशेने मुस्लिम महिलांच्या वाटचालीचा मार्ग सुकर झाला आहे, अशी समाधानकारक भावना विविध स्तरातून व्यक्त होत आहे.

भोसरीत जिल्हास्तर शालेय कुस्ती स्पर्धा सुरू

पिंपरी– पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तर शालेय कुस्ती स्पर्धेला मंगळवारी (दि.22) भोसरीतील महेशदादा स्पोर्टस्‌ फाऊंडेशन येथे सुरुवात झाली. महापौर नितीन काळजे व भोसरी तालीम संघाचे वस्ताद किसनराव लांडगे यांच्या हस्ते या स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी क्रीडा समिती सभापती लक्षमण सस्ते, ई प्रभाग अध्यक्षा भीमाताई फुगे, ह प्रभाग अध्यक्ष अमर कांबळे, नगरसेवक संतोष लोंढे, नितीन लांडगे, सागर गवळी, सोनाली गव्हाणे आदी उपस्थित होते. भोसरी तालीम संघाचे वस्ताद कालीदास लांडगे, बाळसाहेब लांडगे, हिरामण लांडगे, पितांबर शिंदे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. स्पर्धेचे संयोजन पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष पोपटराव फुगे, सचिव धोंडीबा लांडगे, संतोष माचुत्रे, मनोज दगडे, विजय कुटे, सचिन खांदवे, प्रशांत उबाळे यांनी केले. अनिल मगर यांनी प्रस्ताविक केले. विश्‍वास गेंगजे यांनी सूत्रसंचालन केले. क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे यांनी आभार मानले.

सुमारे 50 हजार ग्राहक अंधारात!

पिंपरी –  मान्सून पूर्व देखभाल दुरुस्ती केल्याचा दावा करणाऱ्या महावितरणचे नियोजन कसे तकलादू आहे, याचा अनुभव शाहूनगर, कुदळवाडी परिसरातील सुमारे 50 हजार वीजग्राहकांना आला. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापारेषणच्या अभियंत्यांना टेल्को सब स्टेशनमध्ये धाव घ्यावी लागली. शेवटी महावितरणची केबल नादुरुस्त झाल्याचे समोर आले. अद्यापही वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही.

गणेशोत्सवासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठा सजल्या, गौरीच्या दागिन्यांना वाढली मागणी

पिंपरी : विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी लागणाºया विविध प्रकारच्या सजावटीच्या आकर्षक साहित्याने पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. लाडक्या गणपती ...

पिंपरीत बोगस वकिलांचा वाढलाय वावर, परप्रांतीय व्यक्तींच्या सहभागाचा संशय

पिंपरी : आॅल इंडिया बार कौन्सिलकडे नोंदणी नाही़ वकिली व्यवसायाची सनद न मिळविता, राजरोसपणे न्यायालयात परिसरातील बोगस वकिली करणारे वकील संघटनेलाही शिरजोर झाले आहेत. वकिली व्यवसाय हा प्रतिष्ठेचा व्यवसाय आहे़ मात्र त्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचेल अशी वर्तणूक ...

4 corporators may lose membership

Speaking to TOI on Tuesday, Pravin Ashtikar, assistant commissioner and chief of election department of PCMC, said, "The BJP has still not submitted the caste validity certificate or a written order of stay from the high court that the elected ...

भाजपच्या दोन नगरसेविकांना दिलासा

पिंपरी - भाजपच्या नगरसेविका कमल घोलप आणि मनीषा प्रमोद पवार यांनी जातवैधता प्रमाणपत्र महापालिका निवडणूक विभागाकडे मंगळवारीदेखील (ता. 22) सादर केले नाही. मात्र, त्यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश आणला असल्याचे सहायक आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांना मंगळवारी दूरध्वनीवर कळविले. त्यामुळे त्यांना दिलासा मिळू शकतो. 

शहरबात पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादीच्या 'खाऊगल्ली'त भाजपचाही 'डल्ला'

पिंपरी पालिकाजिंकून द्या, तुम्हाला मंत्रिपद मिळेल, असा शब्द शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप तसेच आमदार महेश लांडगे यांना देण्यात आला होता. प्रत्यक्षात, त्यांच्या हाताला अद्यापही काही लागलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ...

उत्सवाला 'चाकरमानी चल्ले गावाक'...

त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून गौरी-गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. प्रवाशांची वाढती ही संख्या पाहून एसटीच्या पुणे विभागातर्फे दर वर्षी जादा गाड्यांचे नियोजन केले जाते. स्वारगेट, पिंपरी ...

Tuesday 22 August 2017

Wider road to link Sangvi phata and Pimple Gurav

Pimpri Chinchwad: Traffic congestion on the internal roads in Pimple Gurav, Pimple Saudagar and Sangvi will reduce as the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has proposed the widening of the 5km road from Pimple Gurav to Sangvi Phata ...

जुनी सांगवीत गणपती उत्सवासाठी घाट सज्ज

जुनी सांगवी : पिंपरी चिंचवड शहराचे उपनगर असलेल्या जुनी सांगवीत दरवर्षी प्रमाणे पालिका प्रशासनाकडुन गणपती उत्सवासाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
मुळा व पवना नदीच्या कुशीत संगमावर वसलेल्या जुनी सांगवीत गणेश उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. गणरायाच्या आगमनाच्या तयारीत  गणेश मंडळाची लगबग सध्या परिसरात सुरू असुन पालिका प्रशासनकडुनही चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याबाबत नगरसेवक हर्षल ढोरे म्हणाले जुनी सांगवीत सात ते दहा दिवसांचा गणपती उत्सव साजरा करण्यात येतो. उत्सवासाठी संपुर्ण व्यवस्था ठेवण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. येथील मुळा पवना नदी परिसरातील घाटांच्या दुरूस्ती बरोबरच घाटांची स्वच्छता, विसर्जन हौदांची स्वच्छता आरोग्य व स्थापत्य विभागाकडुन करण्यात आली आहे. याच बरोबर मिरवणुक रस्त्यावरील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यात येत आहेत.

Dist fines Maha-Metro contractor Rs 20L for unauthorised excavation

The Pune district administration has now slapped a notice and a fine of close to Rs 21 lakh on a contractor of Maharashtra Metro Rail Corporation Limited (Maha-Metro) for the unauthorised excavation of raw minerals for work on the Pimpri-Chinchwad to ...

बेकायदा उत्खनन : महामेट्रोला २१ लाखांचा दंड, दहा दिवसांत जमा केला नाही तर कडक कारवाई

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशन (महामेट्रो) च्या वतीने सध्या पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या कामासाठी विनापरवाना जास्त गौणखनिज उत्खनन केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने तब्बल २० ...

पाणी गळती दुरूस्तीसाठी खोदलेला खड्डा जैसे थे

अपघाताच्या धोक्याबरोबरच रहिवाशांचे आरोग्य धोक्यात- पाणी पुरवठा व स्थापत्य विभागाचा बेजबाबदारपणा.
जुनी सांगवी - पिंपरी चिंचवड शहरातील उपनगर असलेल्या जुनी सांगवी येथील डाँ.बाबासाहेब आंबेडकर चौक पाटबंधारे कामगार वसाहतीजवळ पाणी पुरवठा विभागाकडुन पाणी गळतीच्या दुरूस्तीसाठी गेली अनेक महिन्यांपासुन खोदण्यात आलेला खड्डा दुरूस्त केला नसल्याने हा खड्डा धोकादायक ठरत आहे. साधारण पाच ते सहा फुट खोल व सात ते आठ फुट रूंद असलेल्या या खड्डयात पावसाचे पाणी व कचरा साचल्याने येथील रहिवाशी नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे

देखाव्यांतून चालू घडामोडींवर भाष्य, सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह

पिंपरी : गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असून, पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची जोरदार तयारी सुरू आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय देखावे सादर करण्यावर मंडळांनी भर दिला आहे. जिवंत देखाव्यांच्या ...

BJP unit begins groundwork for Maval and Shirur LS seats

TNN | Aug 21, 2017, 09:32 AM IST. BJP unit begins groundwork for Maval and Shirur LS seats. PIMPRI CHINCHWAD: After winning the state assembly elections, municipal council, and Pimpri Chinchwad municipal elections, the BJP's Pimpri Chinchwad unit is ...