Wednesday 16 May 2018

नाशिक फाटा चौकात मेट्रोचे ‘मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब’

पिंपरी-चिंचवड शहराच्या दक्षिण व उत्तर विभागास जोडणार्‍या कासारवाडीतील नाशिक फाटा चौकात महामेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने ‘मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब’ विकसित केले जाणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी मेट्रो, एसटी., पीएमपीएल बस, लोकल-रेल्वे आणि खासगी रिक्षा व टॅक्सी उपलब्ध होणार आहे. हे उद्योगनगरीतील पहिले अद्ययावत एकत्रित प्रवासी वाहतूक स्थानक ठरणार आहे.

एचए जमिनीचा प्रस्ताव मान्यतेच्या प्रतीक्षेत

पिंपरी - भविष्यनिर्वाह निधी विभाग (पीएफ) कार्यालयाने हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍स कंपनी (एचए) कडे मागणी केलेल्या साडेतीन एकर जमिनीचा प्रस्ताव अद्याप पीएफच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयाकडे मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. केंद्रीय बोर्डाने हिरवा कंदील दिल्यानंतर तीन महिन्यांत त्यावर निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

विकासकामांच्या गतिमानेसाठी ‘अ‍ॅप’

पिंपरी-चिंचवड महापालिकेने विकासकामांच्या गतिमानतेसाठी ‘एम-पीसीएमसी’ हे नवे अद्ययावत मोबाइल अ‍ॅप कार्यान्वित केले आहे. अ‍ॅपवर कामापूर्वीचे, काम सुरू असतानाचे आणि काम पूर्ण झाल्यानंतरचे छायाचित्र व व्हिडिओ चित्रीकरण अपलोड करण्याची सक्ती संबंधित ठेकेदार व पालिकेच्या अधिकार्‍यांना केली आहे. त्यामुळे काम मुदतीमध्ये पूर्ण होऊन नागरिकांना विविध सेवा व सुविधा वेळेवर उपलब्ध होणार आहेत. या अ‍ॅपद्वारे शहरातील सर्व विकासकामांची माहिती आयुक्तांसह सर्व अधिकार्‍यांसह सर्वसामान्य नागरिकांना एका ‘क्‍लिक’वर समजणार आहे.

पिंपरी शहरात रुजतेय अवयवदानाची चळवळ

पिंपरी - अवयवदानाचे महत्त्व वाढत असून, तरुण वर्गात याबाबत चांगली जागरूकता झाल्याचे समोर आले आहे. गेल्या सात वर्षांत शहरात झालेल्या अवयवदानाचा आकडा ५५०च्या पुढे गेला आहे. वाढत्या सहभागामुळे येत्या काळात ही चळवळ वाढीला लागणार आहे.

सोसायट्यांना टॅंकरचेच पाणी

पिंपरी - लाखो रुपये कर्ज काढून, दागिने मोडून सदनिका घेतल्या. हक्काचे घर म्हणून मिळाले या आनंदात राहायला आले. महापालिकेला हजारो रुपये पाणीपट्टी भरुनही पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे स्थानिक शेतकरी व जागामालकांकडून बोअरवेलचे किंवा टॅंकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. ही परिस्थिती चिखली-मोशी परिसरातील बहुतेक गृहनिर्माण सोसायट्यांमधील आहे.

शाहूनगर मध्ये भव्य राज्यस्तरीय “महापौर चषक” फुटबॉल स्पर्धा

पिपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने व भाजपा नगरसेवक तुषार हिंगे, केशव घोळवे व अनुराधा गोरखे यांच्या पुढाकाराने शाहूनगर येथील बहिरवाडे क्रीडांगणावर दि 15 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान “महापौर चषक” राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा होणार आहे.

वाकडच्या वाय जंक्शनच्या उदघाटनाचा घाट कशासाठी; नगरसेवक नाना काटे यांचा संतप्त सवाल

गेल्या काही दिवसापासून वाकड येथील वाय जंक्शनचे काम सुरु होते. अनेक वर्षांनंतर काम पूर्ण झाले असे दाखवून नुकतेच महापालिकेच्या सत्ताधारी भाजपने काम पूर्ण नसतानादेखील अपूर्ण कामाचे मोठ्या थाटामाटात जाहिरात बाजी करून घाईनेघाईने उदघाटन केले. मात्र अवघ्या काही दिवसातच हा ग्रेडसेपरेटर पुन्हा बंद केल्याने उदघाटनाचा घाट कशासाठी असा संतप्त सवाल नगरसेवक नाना काटे यांनी केला आहे.

अवैध बांधकामांची समस्या कायम

पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी उच्च न्यायालयाने अनेक वेळा आदेश दिले.

‘पीएमआरडीए’मध्ये विलिनीकरणास विरोध

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्राच्या पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए) विलीनीकरणास शिवसेनेने पुन्हा एकदा विरोध दर्शविला आहे. प्राधिकरणाच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी आणि हजारो कोटींच्या जमिनीवर डोळा ठेवून या प्रकराचा निर्णय होत असल्याचा आरोप खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे.

प्राधिकरणाच्या विलीनीकरणावरून भाजपमध्ये संभ्रम?

बापट यांनी विलीनीकरणाची घोषणा केल्याने भाजप वर्तुळातच संभ्रमावस्था आहे.

शहरबात पिंपरी : पालकमंत्र्यांची पुन्हा-पुन्हा तीच आश्वासने

पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाचे प्रश्न जैसे थे आहेत.

Centre plans Rs. 9k cr sops to push eco-friendly cars

NEW DELHI: As part of a Rs. 9,400-crore package for electric and hybrid vehicles, the government may offer incentives of up to Rs 2.5 lakh to those scrapping old petrol- or diesel-fired vehicles along with sops for investment to manufacture parts such as motors in the country.

charginfpoint-REU

MSRTC to issue Aadhaar-linked smart cards

Pune: Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) will soon launch smart cards for passengers aiming at bringing in transparency in the corporation. The card will be linked with the Aadhaar number of the passenger.

वृद्ध पालकांची आबाळ केल्यास सहा महिने कैद

वृद्ध पालकांची आबाळ करणाऱ्यांना किंवा त्यांना वाईट वागणूक देणा-यांना सहा महिन्यांच्या कैदेच्या शिक्षेची तरतूद करण्याचा नरेंद्र मोदी सरकारचा विचार आहे

Six months imprisonment for elderly parents | वृद्ध पालकांची आबाळ केल्यास सहा महिने कैद

मोफत शिक्षणासाठीही डोनेशन

केंद्र सरकारने २००९ मध्ये बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, अधिनियम आणला. या कायद्याने सहा ते चौदा वर्षे वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याची, त्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्याची जबाबदारी सरकारवर सोपवली. खरेतर खूप वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा कायदा प्रत्यक्षात आला व त्याची २०१०पासून प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली. वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा, ही गरजूंना दिलासा देणारी बाब ठरली. या तरतुदीचे समाजातील सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले. राज्य सरकारनेही मोठा गाजावाजा करत २५ टक्के राखीव जागांसाठी स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सुरवात केली. सुरवातीला पारंपरिक आणि आता ऑनलाइन पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. पण ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या सुरवातीपासूनच मोफत शिक्षणाचा उद्देश धुळीस मिळत असल्याचे दिसून येत आहे.

जुनी सांगवीत व्यावसायिक बांधकामावर पालिकेची कारवाई

जुनी सांगवी (पुणे) - प्रियदर्शनीनगर येथील भाऊबंदकीच्या वहिवाटीच्या वादातील बांधकामावर मंगळवार ता. १६ पालिका अतिक्रमण विभागाने कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. येथील रहिवाशी सौ.सरिता ज्ञानोबा काची या स्वताच्या जागेतील वहिवाट रस्त्यासाठी गेली सहावर्षापासुन न्यायालयीन लढा देत होत्या.