Friday 14 February 2014

नगरसेवकांकडे तक्रारी करणा-या शिक्षकांना 'शो-कॉज' पाठवा

अतिरिक्त आयुक्तांची मोगलाई 
महापालिकेच्या शाळांमधील समस्यांकडे लक्ष वेधणा-या शिक्षकांबरोबर अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे सूडबुद्धीने वागत असल्याचा धक्कादायक प्रकार स्थायी समिती सभेत आज (गुरूवारी) समोर आला. सांगवीतील एका शाळेत मुख्याध्यापक नसल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महिला

अनधिकृत बांधकामांविषयीचे धोरण अन् ‘तारीख पे तारीख’

पिंपरी-चिंचवड शहरातील व त्याअनुषंगाने राज्यभरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी नेत्यांनी सातत्याने केली.

दापोडी येथील ड्रेनेज लाईन दुरुस्त करण्याची मागणी

दापोडी येथील झोपडपट्टी भागात अनेक ठिकाणी गटार तुंबणे, ड्रेनेज तुंबणे व अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने त्वरित उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.

प्रशासकीय बदल्यांनतरही वेबसाइट अपडेट नाही



पिंपरी चिंचवड महापलिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकपदी, पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांची पुणे महापलिकेच्या आयुक्तपदी, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक एस.

रेडझोन प्रश्नावर संरक्षण मंत्र्यांशी झालेली बैठक सकारात्मक - तरस

निवडणुकीपूर्वी तोडगा निघेल ?
रेडझोन संघर्ष समितीच्या 'रेडझोन उठाव'च्या आंदोलनानंतर केंद्रीय सरंक्षण मंत्र्यांशी बैठक झाली. त्यात सरंक्षण मंत्र्यांनी रेडझोन प्रश्न समजावून घेत सकारात्मक भूमिका दाखवली. संबधित अधिका-यांकडून अहवाल मागवून निर्णय घेऊ, असे आश्वासनही दिले, अशी

तळवडे-चिखली औद्योगिक क्षेत्राला घरघर

'रेडझोन'मुळे सोई-सुविधा पुरविण्यास केली जाणारी आडकाठी, विविध शासकीय ना हरकत दाखले मिळण्यास होणारी अडचण, अनधिकृत बांधकामांना मिळकतकराच्या दुप्पट दंड, एलबीटीचा बोजा आदींमुळे नव्याने उदयास आलेल्या तळवडे-चिखली औद्योगिक परिसराला घरघर लागली असल्याची व्यथा रवी इंडस्ट्रीजचे रवींद्र पाठक यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे मांडली आहे.  

पोस्ट कर्मचार्‍यांचा दुसर्‍या दिवशीही बंद

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर व ग्रामीण भागातील पोस्ट खात्यातील कर्मचार्‍यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केले. चिंचवडला सभा झाली. या वेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. त्यामुळे टपाल वाटपव्यवस्था कोलमडली होती.

वाकडमध्ये धान्यासाठी रांग

वाकड : येथील रहिवाशांना पौड (मुळशी) तहसीलदार कार्यालयामार्फत अन्न सुरक्षा योजना कायद्यांतर्गत लाभार्थ्यांना धान्याचे वाटप करण्यास सुरुवात झाली. या वेळी सुमारे ६0 लाभार्थ्यांना पुरवठा निरीक्षक पोपट कांबळे यांच्या हस्ते धान्याचे वाटप वाकडकर वस्ती येथे करण्यात आले. 
येथील रास्त भाव धान्य दुकानात हा कार्यक्रम झाला. येथे ४५७ लाभार्थींना या महिन्याच्या धान्य पुरवठय़ाचे वाटप चार दिवसांत केले जाणार आहे. लोकांनी धान्य घेण्यासाठी हातात रेशनकार्ड घेऊन रांग लावली होती. (वार्ताहर)