Tuesday 22 April 2014

बीआरटीएस लेन सुरक्षित करावी

पिंपरी : बीआरटीएस मार्गिका (लेन) सुरू करण्यापूर्वी महापालिकेने सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करीत आहेत. 
झेब्रा क्रॉसिंग, रिफ्लेक्टर, सूचना फलक, दिशादर्शक चिन्हे अद्याप लावली नसल्याने मार्गिका धोकादायक ठरत आहे. यातूनच पिंपरीतील एच.ए. कंपनीसमोर एक कार बीआरटीएस ‘लेन’ला धडकून नुकताच अपघात झाला.

पिंपरी शहरात अर्धा तास मुसळधार पाऊस


पिंपरी - शहरास सोमवारी (ता. 21) सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपले. अचानक आलेल्या पावसाने चाकरमान्यांची चांगलीच त्रेधा उडाली. काही ठिकाणी झाडे पडल्याने वाहतूक विस्कळित झाली. विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह ...चिंचवड स्टेशन येथेही झाड पडले ...

पिंपरीत पिस्तुलधारी टोळक्याचा राडा

सशस्त्र टोळक्याचा गोळीबार, तोडफोड आणि दहशत
काळेवाडी येथे दोन दिवसापूर्वी झालेल्या भांडणाचा सूड घेण्यासाठी काल (रविवारी) पिंपरीतील मिलिंदनगरमध्ये सुमारे 30-35 जणांच्या टोळक्याने तलवारी, कोयते घेऊन दहशत माजवत हवेत गोळीबार केला. तसेच तिथल्या काही वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर या टोळक्यातील काहींनी आज (सोमवारी) पुन्हा याच ठिकाणी दहशत माजवली. लहान मुले व नागरिकांच्या डोक्याला पिस्तुल लावून आणि वाहनांची तोडफोड करीत राडा केला. दरम्यान, हा सगळा प्रकार अंतर्गत टोळीवादातून घडला असून, गुन्ह्यात पिस्तुल असले तरी या ठिकाणी गोळीबार झाल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.

बजाज व्यवस्थापन व कामगार संघटनेतील ...

बजाज ऑटो कंपनीतील कामगार प्रश्नावरुन सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे बजाज ऑटो कामगार संघटना आणि व्यवस्थापनातील वाद विकोपाला गेले आहेत. व्यवस्थापनाने आरोप थांबवून कामगारप्रश्नी बैठक बोलवावी अन्यथा कामगारांमध्ये उद्रेक होईल, असा इशारा विश्व कल्याण कामगार संघटनेने दिला आहे.

१५ डब्यांची लोकलसेवा कागदावरच

पुणे-लोणावळा दरम्यान लोकल प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने या मार्गावर १५ डब्यांची लोकलसेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. या संदर्भातील प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने मुख्यालयाकडे पाठवला असला, तरी त्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

चार लाख नागरिकांना मतदानाची संधी द्या

वालचंदनगर : पुणे जिल्ह्यातील पुणे, मावळ, बारामती व शिरूर या चार मतदारसंघांतील मतदानापासून वंचित राहिलेल्या सुमारे चार लाख मतदारांना मतमोजणीपूर्वीच मतदान करण्याची संधी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून द्यावी. हक्कापासून वंचित ठेवू नये, अशी मागणी वालचंदनगर नागरी हक्क कृती समितीचे निमंत्रक अतुल तेरखेडकर यांनी केली आहे.

मतदान न करणार्‍यांची नावे जाहीर करावीत

किवळे : यंदा लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली असली तरी अनेक मतदारांनी लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाकडे पाठ फिरविली. मतदान करणार्‍या सर्व मतदारांची नावे निवडणूक आयोगाकडे आहेत. त्यामुळे मतदान न करणार्‍या सर्व मतदारांची नावे आयोगाने जाहीर करावीत. तसेच मतदान न करण्याचा कारणांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. 

उन्हाळा आला ! पोहायला चला !!

हिवाळ्यात तंदुरुस्तीसाठी भल्या सकाळी 'मॉर्निंग वॉक' करणारी व जीममध्ये जाऊन एक्सरसाईज करणा-या तरुणाईची पावले आता उन्हाळ्यात पोहण्याच्या तलावाकडे वळत आहेत. त्यामुळे वर्षभर तुरळक गर्दी असणारे शहरातील जलतरण तलाव गेल्या आठ दिवसांपासून पोहणा-यांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.

ज्ञानप्रबोधिनी क्रीडाकुलच्या पाच खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

आंतर जिल्हा राष्ट्रीय स्पर्धेसाठी ज्ञानप्रबोधिनी क्रीडाकुलच्या पाच खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. हरिव्दार येथे  25 ते 27 एप्रिल दरम्यान या स्पर्धा होणार आहेत. 
यामध्ये प्रणव सोरटे (धावणे), प्रणव जाधव,श्वेता घोलप  (गोळा फेक) यांची 14 वर्षे वयोगटातून तर ओंकार भोसले (उंच उडी), शुभम ताम्हाणे (थाळी फेक) यांची 16 वर्षे वयोगटातून  आंतर जिल्हा राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्वांची निवड पुणे जिल्हा निवड चाचणी स्पर्धेतून करण्यात आली आहे. 

विशेष स्वच्छता मोहिमेत आयुक्तांनी उचलला कचरा

वेळ सकाळी आठची..., विशेष स्वच्छता मोहिमेचा पहिला दिवस..., आकुर्डी रेल्वेरुळालगतच्या मोकळ्या प्लॉटपासून मोहिमेची सुरुवात होणार होती..., आयुक्त राजीव जाधव तेथे आले आणि थेट कचरा उचलायला सुरुवात केली..., आयुक्तच 'ऑन फिल्‍ड' उतरल्याचे पाहून त्यांच्यासोबतचा अधिका-यांचा फौजफाटाही कामाला लागला..., अन् पाहता-पाहता दोन तासातच दोन ट्रक कचरा गोळा झाला. 
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी आजपासून विशेष स्वच्छता मोहिम सुरु केली आहे. प्रशासकीय कामकाजावर कोणताही ताण पडू नये यासाठी कार्यालयीन कामकाज सुरु होण्यापूर्वी सकाळी आठ ते दहा अशी वेळ निवडण्यात आली आहे.

विनापरवाना विक्री होत असलेल्या खाद्यपदार्थांची तपासणीची मागणी

नागरिकांच्या आरोग्यास असलेला धोका टाळण्यासाठी विनापरवाना विक्री होत असलेल्या खाद्यपदार्थांची तपासणी करणे गरजेचे असल्याची मागणी पर्यावरण संवर्धन संस्थेने महापालिका आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे केली आहे.
(प्रातिनिधीक छायाचित्र)

समितीचे अध्यक्ष विकास पाटील यांनी या संदर्भात आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात विनापरवाना खाद्यपदार्थ विकणारे मोठय़ा प्रमाणात वावरताना दिसत आहेत. नागरिकांना अशास्त्रीय पद्धतीने कुल्फीसारखे पदार्थ विकले जात आहेत. त्यामुळे विशेषत: लहान मुले आजारी पडू लागली आहेत.