Saturday 8 March 2014

Landge elected civic panel chief in PCMC

Although both Landge and Lande belong to the NCP, political differences have cropped up between the two.Lande himself is a strong NCP contender for the Bhosari assembly seat.

Pawar intervenes to help ailing HAL

PIMPRI: Union Agriculture Minister and Nationalist Congress Party Chief Sharad Pawar, is understood to have intervened to help the ailing PSU, Hindustan Antibiotics Limited (HAL).

मतदार नोंदणीसाठी रविवारी विशेष मोहीम

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रातील 423 मतदान केंद्रांच्या ठिकाणी रविवारी (दि. 9) मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी भानुदास गायकवाड यांनी दिली.
सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यात नागरिकांना 31 मार्च 2014 रोजी प्रसिध्द झालेली मतदान केंद्रनिहाय छायाचित्र मतदार यादी, छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी, 2012-2013 मधील विशेष मोहिमेत वगळण्यात आलेल्या स्थलांतरीत, दुबार व मृत मतदारांच्या नावाची यादी अवलोकनासाठी ठेवण्यात येणार आहे.

ताथवडे विकास आराखडा मंजुरीवर अखेर महापौरांची स्वाक्षरी

गेली कित्येक महिने अडकलेला ताथवडे विकास आराखडा मंजुरीचा ब्रेक अखेर निघाला. महापौर मोहिनी लांडे यांनी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी 1 दिवस अगोदर म्हणजे 4 मार्च रोजी सभावृत्तांतावर स्वाक्षरी केली. स्वाक्षरीअभावी 50 दिवसाहून अधिक काळ रखडलेला ताथवडे विकास आराखडा आता राज्य सरकारकडे पाठविण्याचा मार्ग मोकळा झाला. नियोजन समिती सदस्यांसह महासभेने सुचविलेल्या 15 उपसूचना संमत झाल्या असल्या तरी राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे ताथवडेवासियांचे लक्ष लागले आहे.    

पवना बंद जलवाहिनीसाठी 'लॉबिंग' करु

आयुक्त जाधव यांचे विधान 
पवना बंद जलवाहिनीसाठी केंद्र सरकारने जेएनएनयुआरएम अंतर्गत पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. या प्रकल्पाचा कुठेतरी  'लॉजिकल एंड' काढण्यासाठी समन्वयातून तोडगा काढावा लागणार आहे. त्यासाठी 'लॉबिंग' करु असे धक्कादायक विधान महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी आज (शुक्रवारी) पत्रकारांशी बोलताना केले.

शिरुरमध्ये मनसेकडून अमोल कोल्हे ?

शिरुर लोकसभा मतदार संघातून मनसेने प्रसिध्द सिनेअभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना उतरविण्याची तयारी केली असल्याची जोरदार चर्चा आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे व डॉ. अमोल कोल्हे यांच्यात यासंदर्भात एक बैठक झाल्याचे समजते. शिवसेनेला आजच सोडचिठ्ठी दिलेले माजी जिल्हाप्रमुख उमेश चांदगुडे यांच्यासह जुन्नर तालुक्यातील काही नाराज शिवसैनिक मनसेच्या गळाला लागले आहेत, त्यांच्यासोबत डॉ. कोल्हे पुन्हा एकदा राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची खासगी मालमत्ता नाही - महेश लांडगे

अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेल्या महेश लांडगे यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत, हे पद फक्त अजितदादांनी मिळवून दिले असून स्थानिक नेत्यांचे योगदान शून्य आहे, असल्याचे स्पष्ट केले.

स्थायी समिती अध्यक्षपदी महेश लांडगे

लांडगे यांची निवड आमदार लांडेंच्या पथ्यावर की मुळावर?

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक महेश लांडगे यांची आज बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदासाठी लांडगे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने आज त्यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिक घोषणा करण्यात आली.

ओढ्याचा प्रवाह बदलण्याचा डाव ...

पिंपळे गुरव येथील ओढ्याचा प्रवाह काटकोनात वळविण्यास मनसे पर्यावरण विभाग; तसेच स्थानिक नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे सद्य:स्थितीत हे काम थांबविण्यात आले आहे.
मनसे पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष राजू सावळे यांनी याबाबत अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मनसेचे गटनेते अनंत कोऱ्हाळे, शिवाजी पाडुळे, दीपक कोकीळ, कृष्णा सोनवणे उपस्थित होते. प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे देखील सावळे यांनी याबाबत तक्रार दिली. त्या अर्जावर 45 स्थानिक नागरिकांच्या स्वाक्ष-या आहेत.