Tuesday 15 January 2019

बोगस डॉक्‍टरांचा सुळसुळाट

पिंपरी - ‘पोटाचे विकार, लैंगिक समस्या अशा अनेक आजारांवर आमच्याकडे शंभर टक्के जालीम उपाय आहे, महिन्याभरात आम्ही संपूर्ण आजाराचा नायनाट करतो,’ अशा जाहिरातींद्वारे रुग्णांना फसवणाऱ्या बोगस डॉक्‍टरांच्या बनवेगिरीला अनेक जण बळी पडत आहेत. मात्र, फसवणुकीनंतरही बदनामी अथवा प्रतिष्ठेमुळे त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यास कुणीही तयार नाही व तक्रार असल्याशिवाय कारवाई करणार नाही, अशी महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाची भूमिका असल्यामुळे बोगस डॉक्‍टरांना मोकळे रान मिळाले आहे. 

पुणे-लोणावळा लोकल जूनपासून ‘इनटाइम’

पिंपरी - पुणे ते लोणावळादरम्यानच्या लोकलचे अचूक वेळापत्रक तयार करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. येत्या जून महिन्यापर्यंत या मार्गावरील सर्व लोकल ‘इन टाइम’ धावणार आहेत. त्यामुळे उशिरा धावणाऱ्या लोकलमुळे होणारा प्रवाशांचा त्रास वाचणार आहे. सध्या ही लोकल ९४ टक्‍के वेळेवर धावत असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. 

रावेतजवळ रेल्वेचा आजपासून ब्लॉक

पिंपरी - निगडीकडून किवळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलासाठी लोहमार्गावर ५० मीटर लांबीचे सात लोखंडी गर्डर टाकण्याचे काम मंगळवारपासून (ता. १५) चार दिवस करण्यात येणार आहे. त्यासाठी रेल्वेकडून रोज दुपारी एक तास दहा मिनिटे कालावधीचा ब्लॉक मंजूर केला आहे.

रोझव्हॅली सोसायटीत खतनिर्मिती प्रकल्प

नवी सांगवी - पिंपळे सौदागर येथील रोझव्हॅली सोसायटीच्या वतीने ओल्या व सुक्‍या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्पाची सुरवात करण्यात आली. 
२७६ सदनिका असलेल्या या सोसायटीत रोज एक टन कचरा संकलित केला जातो. त्याचे कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा वीस बाय चार फुटांच्या हौदात एकत्र केला. नगरसेवक नाना काटे, शीतल काटे यांनी सेंद्रिय पदार्थांचे 
विघटन करणारे जिवाणू हौदात टाकून या प्रकल्पाचे उद्‌घाटन केले. या वेळी सचिव रूपेश भंडारे, जयदेव दवे, विवेक महाजन, आनंद कुर्तडीकर, वेंकट शंकर, श्‍वेताभ कुमार यांच्यासह कुणाल आयकॉनचे अध्यक्ष विनोद सुर्वे, पंकज भाकरे उपस्थित होते. 

9 हजार 858 भटक्‍या श्‍वानांचा चावा

पिंपरी – शहरातील विविध भागात दिवसें-दिवस भटक्‍या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. शहरातील नागरिकांवर अनेक वेळा भटक्‍या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्याने या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांमध्ये 9 हजार 858 व्यक्तींना भटक्‍या कुत्र्यांनी नागरिकांचा चावा घेतला आहे. या आकडेवारीवरुन दर महिन्याला सरासरी 800 ते 850 जणांना कुत्रा चावणाच्या घटना घडत असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सचिन चिखले यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड मधील संस्कार प्रतिष्ठान वतीने दर वर्षी दिला जाणारा राज्यस्तरिय श्री स्वामी विवेकानंद समाजरत्न पुरस्कार यावर्षी पिंपरी चिंचवड महापालिकेचे विद्यमान नगरसेवक, मनसे शहराध्यक्ष व गटनेते सचिन चिखले यांना प्रदान करण्यात आला.

123 schools to get e-classrooms

PIMPRI CHINCHWAD: A total of 15 private agencies submitted suggestions for e-classrooms in 123 primary and secondary schools with the objective of increasing the learning rate among students as a part of the Pimpri Chinchwad Smart City project.

इंद्रायणीथडी जत्रेसाठी महिला व बचतगटांनी नाव नोंदविण्याचे आमदार लांडगे यांचे आवाहन

पिंपरी (दि. १४ जाने.) :- आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून इंद्रायणीथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. बचतगटांच्या विकासासाठी व महिला सक्षमीकरनास चालना मिळण्याकरीता खास महिलांसाठी इंद्रायणीथडी जत्रा (८ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी) दरम्यान भोसरीतील गावजत्रा मैदानावर होणार आहे.

Pimpri : रोटरी क्लब ऑफ निगडीच्या रनेथॉनमध्ये धावले सात हजार स्पर्धक

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ निगडी यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या रनेथॉन ऑफ होप 2019 या स्पर्धेत आदित्य आर याने एक तास सतरा सेकंदांत मॅरेथॉन पूर्ण करुन प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत सात हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. निगडी, प्राधिकरणातील सेक्टर 27 येथील महापौर बंगल्यासाठी राखीव असलेल्या मैदानातून रविवारी सकाळी पावणेसहा वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. 

‘मेट्रो’ला हवे आणखी मनुष्यबळ

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर अखेरपर्यंत शहरात मेट्रो धावण्याचे जाहीर केल्याने महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला (महामेट्रो) निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी दोन्ही मार्गांवर अतिरिक्त ४० टक्के मनुष्यबळाची गरज पडणार आहे. महामेट्रोने संबंधित कंत्राटदारांना नुकत्याच त्यासंबंधी स्पष्ट सूचना दिल्या असून, मनुष्यबळ वाढले तरच पंतप्रधानांनी दिलेली 'डेडलाइन' पूर्ण करणे शक्य होणार आहे.

विद्यापीठात लवकरच फूड मॉल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी फूड मॉल उभारण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असून, विधी विभागाच्या इमारतीसमोरच्या मोकळ्या जागेत विविध प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध होणाऱ्या फूड मॉलची निर्मिती केली जाईल. येत्या सहा ते आठ महिन्यांत काम पूर्ण करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली आहे. 

‘सफलता पोर्टल’वर नोंदणी न करणाऱ्या कॉलेजांवर कारवाई

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांची पडताळणी ऑनलाइन करण्यासाठी 'सफलता पोर्टल'वर नोंदणी न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रवेश नियामक प्राधिकरणाचे सचिव आनंद रायते यांनी शनिवारी स्पष्ट केले.

आयटी पार्क, ऑटो हबवर ‘वॉच’

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्क आणि ऑटोमोबाइल हब म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या तळेगाव, चाकण परिसरातील मुख्य चौकांमधे आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’ राहणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाने या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्याचे काम हाती घेतले असून, येत्या महिन्यात तो मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. 

पालिकेतर्फे दोन उद्यानांचा विकास

पिंपरी - पिंपळे सौदागर येथील शिवार चौक आणि पिंपळे निलखमधील बाणेर पुलाजवळ महापालिकेच्या वतीने दोन नवीन उद्याने विकसित केली जात आहेत. तर पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानाचे नूतनीकरण केले जात आहे. 

'डे केअर' संस्थांची उलाढाल दोन कोटींच्या घरात

पुणे : शहरात पाळीव प्राण्यांची संख्या वाढत आहे. मात्र, त्यांचा सांभाळ करण्यासाठी मालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. नेमकी हीच गरज ओळखून "पेट डे केअर संस्था' उभ्या राहिल्या आहेत. सध्या या क्षेत्रातील वार्षिक उलाढाल दोन ते अडीच कोटींच्या घरात जाऊन पोचली आहे. 

आणखी 33 “तेजस्विनी’ महिनाभरात

पुणे – गतवर्षी महिलादिनाचे औचित्य साधत खास महिलांसाठी सुरू केलेल्या “तेजस्विनी’ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सद्यस्थितीत महिलांसाठी शहरात 30 बसेसच्या माध्यमातून सेवा देण्यात येत असून इतर मार्गांवरही मागणी वाढत आहे. यातच येत्या महिन्याभरात नव्या 33 तेजस्विनी बसेस शहरात दाखल होणार आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली.

प्राधिकरणबाधितांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

पिंपरी – सन 1972 ते 1984 दरम्यान पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (पीसीएनटीडीए) भूसंपादन बाधीत शेतकऱ्यांचा साडेबारा टक्के जमीन परताव्याचा गेल्या 20 वर्षापासूनचा प्रलंबित असलेला प्रश्न निकाली काढण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

“एचसीएमटीआर’ बाधितांना 13 कोटी

पिंपरी – शहरातील अकरा ठिकाणचे मंजूर विकास योजनेतील रस्ते आणि उच्चक्षमता द्रुतगती मार्गाने (एचसीएमटीआर) बाधीत क्षेत्र महापालिकेच्या ताब्यात घेण्यात येणार आहे. बाधीत क्षेत्राचा मोबदला संबंधित मालमत्ताधारकांना खासगी वाटाघाटीने देण्यासाठी जागेचे मुल्यांकन ठरविण्यात आले आहे. ही मुल्यांकन रक्कम तब्बल 13 कोटी 54 लाख रूपये झाली आहे.

बोपखेलकडे जाण्यासाठी मिळणार पर्यायी मार्ग

पुणे – बोपखेलकडे जाणारा रस्ता मिलिटरी इंजिनीअरिंग कॉलेजने (सीएमई) बंद केल्यामुळे येथील रहिवाशांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना पर्यायी रस्ता देण्यासाठी “सीएमई’ची जागा ताब्यात घेऊन, त्याच्या मोबदल्यात सीएमईला तेवढ्याच किंमतीची जागा देण्याचा निर्णय मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पर्यायी जागा येत्या पंधरा दिवसांत शोधून त्या संदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

न्यायालयीन कामकाजात मराठीचा वापर करावा!

पिंपरी – पिंपरी न्यायालयात पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनतर्फे “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने असोसिएशनच्या वतीने न्यायालयीन कामकाजात मराठीचा वापर करावा, अशी मागणी करण्यात आली.

उद्याने, क्रीडांगणांची वेळेत देखभाल दुरुस्ती करा; महापौरांच्या संबंधित अधिकार्‍यांना सूचना

चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ’क’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असलेल्या मिळकती, उद्याने, क्रीडांगणे, बॅडमिंटन हॉल, टेनिस कोर्ट यांना महापौरांनी भेटी दिल्या. तसेच, महापालिकेची उद्याने, व्यायामशाळा, बॅडमिंटन हॉल, क्रीडांगणे, जलतरण तलाव, भाजी मंडई इत्याची देखभाल दुरूस्ती वेळेत करण्यात यावी, अशा सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिकार्‍यांना दिल्या. यावेळी ’क’ प्रभाग अध्यक्षा नम्रता लोंढे, नगरसदस्य समीर मासुळकर, अश्‍विनी जाधव, राजेंद्र लांडगे, क क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, देशमुख, क्रीडा प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, आरोग्य विभागाचे कांबळे, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंके उपस्थित होते.