Monday 19 February 2018

‘स्मार्ट सिटी’ ऑप्टीकल फायबर नेटवर्कने जोडणार

पिंपरी-चिंचवड ‘स्मार्ट सिटी’ ऑप्टीकल फायबर नेटवर्कने जोडण्यात येणार आहे. या योजनेमुळे शहरातील वाहतूक, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, वाहनतळ, बसथांबे आदींचा एकत्रित समन्वय साधत सेवा व सुविधा गतिमान केल्या जाणार आहेत. या कामासाठी खासगी एजन्सीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यास ‘स्मार्ट सिटी’च्या संचालक मंडळाच्या शनिवारी (दि. 17) झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 

पिंपरी-चिंचवडवर पालिका ‘कंट्रोल रूम’मधून वॉच

तब्बल 25 लाख लोकसंख्येची पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी तब्बल 750 किलोमीटर अंतर भूमिगत ऑप्टीकल फायबर नेटवर्कने जोडली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहरावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कंट्रोल व कंमाड रूमद्वारे (सिटी ऑपरेशन सेंटर) ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. ही यंत्रणा 24 तास कार्यरत असल्याने एखाद्या ठिकाणी अधिक तातडीने मदत पोहचविणे शक्य होणार आहे. विकसित देशातील ही अद्ययावत यंत्रणा शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसह खबरदारी, विविध सोई-सुविधा आणि जनजागृतीसाठी अधिक लाभदायक ठरणार आहे. 

पुणे-मुंबई हायस्पीड कॉरिडोर

पुणे-मुंबई दीड तासांत?
'हायस्पीड कॉरिडॉर'मध्ये समावेश; रेल्वे करणार १० हजार किमीचे मार्ग

बुलेट ट्रेन प्रकल्पातून पुण्याला वगळण्यात आले असले, तरीही आता रेल्वेच्या 'हायस्पीड कॉरिडॉर'मध्ये पुणे-मुंबई मार्गाचा समावेश करण्यात आला असून, हा प्रकल्प पूर्ण झाल्यास पुणे-मुंबई हे अंतर रेल्वेद्वारे एक ते दीड तासात पूर्ण करता येणार आहे.

pune-mumbai high speed ​​corridor

BJP leaders talk at cross purposes about extension of Metro till Nigdi

PIMPRI CHINCHWAD: Guardian minister Girish Bapat said the extension of Pune Metro rail routes will be conducted in the second phase at the bhoomipoojan of the first Metro station at Sant Tukaramnagar in Pimpri.

Dehu village shuts down in opposition to PCMC merger

The resolution will be sent to the state government for final approval.“A gram sabha was held on Tuesday wherein many villagers opposed the merger. We later decided to observe a bandh today in support of this demand,” said sarpanch Usha Chavan.“Dehu village is famous due to Sant Tukaram Maharaj. Pimpri Chinchwad: Shops in Dehu village downed their shutters on Saturday to protest against the merger of the village in the Pimpri Chinchwad Municipal Corporation limits.The villagers demanded that the village be granted the status of a nagar panchayat.A week ago, the PCMC general body had approved the merger of nine villages into its municipal limits — Gahunje, Jambhe, Marunji, Hinjewadi, Maan, Nere and Sanagawade, Dehugaon and Vitthalnagar. Its identity will be lost once it becomes a part of Pimpri Chinchwad,” Chavan said, explaining the reason for the opposition.“The gram panchayat has provided the village with good roads, water supply and drainage facilities, so we don’t need PCMC,” she said, “We have sent letters to the chief minister, collector and others conveying our opposition and demanding nagar panchayat status.”

PCMC Budget 2018-19: Major emphasis on central government schemes this year

The Pimpri-Chinchwad Municipal Corporation’s (PCMC) annual budget for 2018-19, which was announced on Thursday, has given high importance to central government schemes and has allocated Rs 329 crore for projects undertaken by the Centre.

जैव कचरा रस्त्यावर टाकणाऱ्या डॉक्‍टरला पाच हजारांचा दंड

पिंपरी : वैद्यकीय क्षेत्रातील निर्माण होणारा जैविक कचरा नष्ट करण्याचे नियम कायद्याने घालून दिलेले आहेत. महापालिका त्यासाठी लाखो रुपये दरवर्षी खर्च करते. जैविक कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेची गाडी असते. मात्र, अनेक दवाखाने, रुग्णालय व मेडिकलवाले याकडे दुर्लक्ष करतात. अशा पद्धतीने रस्त्यावर जैव कचरा फेकणारा डॉक्‍टर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कचाट्यात सापडला असून, त्याला पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. डॉ. अभिजित कांबळे असे दंड केलेल्या डॉक्‍टरचे नाव आहे.

भोसरीत चौक, रस्त्यांना अतिक्रमणांचा विळखा

भोसरी - येथील पुणे-नाशिक महामार्गाचा सेवा रस्ता, आळंदी रस्ता, भोसरी-आळंदी रस्ता चौक, भोसरी-दिघी रस्ता चौक, चांदणी चौक आदी भागातील रस्त्यांसह पदपथ फळे व विविध वस्तू विक्रेत्यांनी व्यापल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे येथील रस्ता आणि चौकांत नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्यातून सुटका होण्यासाठी अतिक्रमणे हटवून विक्रेत्यांसाठी हॉकर्स झोनची निर्मिती करणे आवश्‍यक आहे. त्याचप्रमाणे नो पार्किंगमध्ये वाहने लावणाऱ्यांवरही कारवाई करणे गरजेचे आहे. 

निगडीत विविध विकासकामांचे भुमीपूजन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील साईनाथनगर भागातील विविध विकासकामांचे भूमीपूजन शनिवारी (दि.१७) आमदार महेश लांडगे यांच्या झाले.

ज्ञानप्रबोधिनीत बुधवारपासून संगीत संमेलन

पिंपरी - विद्यार्थ्यांमध्ये संगीतविषयक अभिरुची वाढावी, या उद्देशाने निगडी-प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयात बुधवार (ता. २१) आणि गुरुवारी (ता. २२) संगीत संमेलन आयोजित केले आहे. त्यानिमित्त सूर, ताल आणि वाद्याचा अनोखा संगम विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहे. 

बांधकाम विभागाला आता प्रवक्‍ता

पिंपरी – महापालिकेच्या बांधकाम परवाना व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे प्रवक्ते म्हणून उपअभियंता आबासाहेब ढवळे यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते शहरातील बांधकामांवरील कारवाईबाबत विभागांतर्गत समन्वय साधणार आहेत, असे सहशहर अभियंता राजन पाटील यांनी सांगितले.

मावळात औद्योगीक विकासाला गती!

विधायक : वाहणगाव येथे एक हजार कोटींचा प्रकल्प
टाकवे बुद्रुक, (वार्ताहर) – सेंटर फॉर परफेक्‍ट हेल्थ हा राज्यातील एकात्मिक प्रकल्प मावळ तालुक्‍यातील वाहणगाव येथे साकारला जात आहे. सुमारे एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक यासाठी केली जाणार आहे. महर्षि वेदोद्वारक फाउंडेशन व महर्षि वेदिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड या घटक यंत्रणेची यासाठी स्थापना करण्यात आली आहे. राज्य मंत्रीमंडळात या प्रकल्पाला प्रायोगिक तत्त्वावर मान्यता देण्यात आली आहे.

पाणीपट्टी दरवाढ म्हणजे सत्ताधाऱ्यांचा मलाई खाण्याचा प्रयत्न : राष्ट्रवादी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड कष्टकरी कामगारांची नगरी आहे. गेल्या दहा वर्षात या नगरीला विकासनगरी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राष्ट्रवादीने शहरातील करदात्यांना "किमान कर, कमाल सुविधा' अशी करप्रणाली ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. परंतु, आता महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पाणीपट्टीत दुपटीने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकार म्हणजे करदात्यांच्या खिशात हात घालून स्वतः:च्या घशात मलाई टाकण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा, आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला.

राष्ट्रवादीचा हल्लाबोल आणि भाजपची ‘अळिमिळी...’!

पिंपरी चिंचवड महापालिकेत वर्षापूर्वी भाजपची सत्ता आली; पण आजही ते जाणवत नाही. शेळीने वाघाचे कातडे पांघरले म्हणून शेळी वाघ होत नाही. तद्वत राष्ट्रवादीच्याच काही जुन्या मंडळींनी फक्त टोपी फिरवली आणि भाजपचा अंगरखा घातला. अशीच काही मंडळी सत्तेत आल्याने हे चित्र झाले. भाजपचे संस्कार, आचार, विचार याचा कुठेही ताळमेळ नाही. त्याचाच परिणाम सध्या रोज भाजपचे प्रतिमाभंजन सुरू आहे. या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या वेळी विकासकामांचा आढावा घेतला; पण त्याहीपेक्षा पक्षाबद्दल रोज येणाऱ्या उलटसुलट बातम्यांबद्दल अधिक चर्चा झाली असे म्हणतात. पक्षाचे खासदार-आमदार आणि महापालिकेतील पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफूस सुरू होती आणि आजही कायम आहे. भाजपांतर्गत कलह एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने ‘हल्लाबोल’ केल्याने शहराची राजकीय हवा चांगलीच तापली. महापालिका निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांतील एका एका मुद्यावर राष्ट्रवादीचे स्थानिक नेते जाब विचारतात. त्यावर समर्पक उत्तर नसल्याने भाजपची पळापळ होताना दिसते. राष्ट्रवादीने प्रश्‍नांचा भडिमार सुरू केला असताना भाजपचे नेते मूग गिळून बसल्याने लोकांनाही आरोपांत तथ्य वाटते. त्यातच भाजपच्याच राज्यसभा खासदाराकडून महापालिकेतील स्थायी समितीच्या निर्णयांवर जाहीर आरोप झाल्याने आणखीच मनोरंजन झाले.

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रवादीचे आयुक्तानां निवेदन

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या विविध मागण्यासाठी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने महापौर, आयुक्त तसेच क्षेत्रीय अधिका-यांना निवेदन देण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अनेक वर्षानंतर सत्तांतर झाले व त्यानंतर या शहरात नवनवीन आर्थिक संकल्पना रुजत आहेत व करदात्या नागरिकाकडून पठाणी वसुली करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे दिसून येत आहे. शहरात चालू असणा-या विकासकामासाठी सत्ताधारी वाढीव दराने देत असलेली मंजुरी हे या सत्ताधा-यांच्या भ्रष्टाचारासाठीच असणारे नियोजन आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नसल्याचे या निवेदनात नमूद केले आहे.

‘स्थायी’च्या २ जागांसाठी राष्ट्रवादीचे २१ इच्छुक

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या २ सदस्य पदांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल २१ नगरसेवक इच्छुक आहेत. त्यामध्ये दोन माजी महापौर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व सदस्यांचाही समावेश आहे. 

Pune chucks beer for harder drinks

When it comes to alcohol, it seems Pune residents have chucked their pint of beer for something stronger. Statistics from the state excise department show that consumption of beer has gone down while sale of Indian Made Foreign Liquor (IMFL) has shown a healthy rise across the city. The dip in sale of beer is due to a steep price rise, hoteliers say.

Case registered after liquor bottles worth Rs 28,000 ‘stolen’ from restaurant in Mumbai

Illegal stalls to be razed in Chakan

PUNE: The police and the Chakan Municipal Council (CMC) will jointly launch a drive to decongest industrial town’s roads.

किल्लेभ्रमंतीतून इतिहास, भूगोलाची माहिती

पिंपरी - दैनंदिन जीवनात आपल्या मुलांना किल्ल्यावर फिरायला घेऊन जाण्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. मुलांना गडकिल्ल्यांचा इतिहास आणि भूगोलाची माहिती व्हावी, यासाठी पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या चिंचवड विभाग आणि गडकिल्ले सेवा समितीच्या वतीने महिन्यातून एकदा गडकिल्ल्यावर नेण्याचा उपक्रम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. 

“प्रीमियम’ कामगारांना साडेचार हजारांची वेतनवाढ

पिंपरी – चिंचवड येथील प्रीमियम ट्रान्समिशन लिमिटेड कंपनीतील कामगारांना 4 हजार 450 रुपये वेतनवाढीचा त्रैवार्षिक करार पार पडला. युनियनचे नवीन सभासद झालेल्या ज्युनिअर मॅनेजर केडर (जेएमसी) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कामगारांचा प्रलंबित प्रश्‍न होता. करारामुळे या कामगारांनाही कायम कामगारांप्रमाणे वेतन, सर्व भत्ते आणि न्यायालयीन संरक्षण मिळणार आहे. त्यानुसार व्यवस्थापन व युनियनमध्ये करार झाला.

पोस्टपेड कनेक्‍शन प्रिपेड करून घेणे फायद्याचे

पोस्टपेड आणि प्रिपेड कनेक्‍शनचे आपापले फायदे आणि तोटे आहेत. पण रु. 199 च्या रिचार्जमध्ये 28 दिवसांसाठी 28 जीबी 4-जी डेटा, फ्री कॉलिंग, आणि 100 मेसेजिस (दररोज) ग्राहकांना मिळत असल्यामुळे पोस्टपेड कनेक्‍शन वापरण्यात अर्थ उरला नाही.

मोरवाडी कोर्ट प्रवेशद्वारासमोर वकीलांचे “काम बंद आंदोलन’

पुण्याला उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाकारल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेटस्‌ बार असोसिएशनच्या वतीने काम बंद आंदोलन केले. यामुळे दिवसभरात कोणतेही न्यायालयीन कामकाज ठप्प पडले. पिंपरीतील मोरवाडी कोर्ट प्रवेशद्वारासमोर हा निषेध करण्यात आला.