Monday 28 May 2018

शहर परिवर्तन नागरिक सर्वेक्षण | शहर परिवर्तनाच्या लाटेवर आरूढ होत आहे त्याला गरज आहे तुमच्या सहभागाची...

#PCMCFirst पुण्याला ऑक्सफोर्ड ऑफ ​द ईस्ट, मुंबईला आर्थिक राजधानी, बंगळुरूला सिलिकॉन सिटी ऑफ इंडिया किंवा ग्रीन सिटी ऑफ इंडिया असे संबोधले जाते... मग आपल्या पिंपरी-चिंचवडला काय म्हणून संबोधले जाते? 'उद्योगनगरी/ट्वीन टाऊन' असे तुमचे उत्तर असेल तर असे सतराशे साठ उद्योगनगरी/ ट्वीन टाऊन भारतभर पसरले आहे. पिंपरी-चिंचवडची शहराची जागतिक ओळख प्रस्थापित झाली तर येथील जीवनमान उंचावेल तसेच मोठ्या शहरांशी तुलनात्मक स्पर्धा झाल्याने नागरिकांची जीवनशैली सुधारण्याची संधी मिळणार आहे

याचाच विचार करून पालिकेने शहर परिवर्तन कार्यालयाची स्थापना केली आहे. त्याचा पहिला भाग म्हणून लोकप्रतिनिधी, अधिकारी, तज्ञ नागरिक यांच्याशी चर्चा करून एक सर्वेक्षण तयार करण्यात आले आहे. सर्वेक्षण पूर्ण करण्यास फक्त 20 मिनिटे लागतील. सर्वेक्षण स्वतः भरून आपल्या परिचितांना शेअर करावे

...शहर परिवर्तनाच्या लाटेवर आरूढ होत आहे त्याला गरज आहे तुमच्या सहभागाची
----------------------
City Transformation Citizen Survey | शहर परिवर्तन नागरिक सर्वेक्षण
# English https://tinyurl.com/yatd9weo
# Marathi https://goo.gl/juYAXk

पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनद्वारा वाकड येथे ग्राउंड ​वॉटर हार्वेस्टिंग विषयावर परिसंवाद

पिंपरी चिंचवड को-ऑप हाउसिंग सोसायटीज फेडरेशन आणि पिंपरी चिंचवड सिटिझन फोरम (PCCF) यांचे संयुक्त विद्यमाने आज भू-जलाचे सामुहिक पुनर्भरण (CommunityGround Water Recharge) आणि पर्जन्य जल संचयन (Rain Water Harvesting) या विषयवार परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. परिसंवादाद्वारे ज्येष्ठ भूजल संशोधक डॉ हिमांशू कुलकर्णी आणि वरिष्ठ भू-वैज्ञानिक श्री. शशांक देशपांडे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत या विषयावरील विविध पैलूंचे विवेचन केले.

PCMC tells citizens to pay property tax without bills

PIMPRI CHINCHWAD: The civic body is yet to print and disburse property tax bills, but has asked citizens to meet the June 30 deadline and avail themselves of concessions.

[Video] मुक्या भिंती बोलू लागल्या, चित्रांद्वारे सामाजिक संदेश

Pimple Saudagar,Pimpri Jinjar Society Kids And Residential Give Social Message Through Paint The Wall

पावसातही मेट्रोचे काम सुसाट

पुणे - पावसाळा सुरू होणार असला तरी, मेट्रो प्रकल्पाच्या कामाच्या वेगात तो अडथळा आणू शकणार नाही, कारण त्यासाठीची तयारी महामेट्रोने पूर्ण केली आहे. पिंपरी स्वारगेट आणि वनाज- रामवाडी मेट्रो मार्ग आणि आणि स्थानकांसाठी 191 खांबांचे फाउंडेशन पूर्ण झाले असून, 51 खांब वर्षात उभे राहिले आहेत. त्यामुळे पिंपरीतील 20 टक्के आणि पुण्यातील 15 टक्के कामाचा टप्पा महामेट्रोने गाठला आहे. असाच धडाका राहिला, तर पुढील वर्षी नोव्हेंबरपर्यंत एका मार्गावरील काही अंतराची चाचणीही शक्‍य आहे. कारण, त्या वेळी विधानसभेच्या निवडणुका आहेत. 

गणेश तलावातील दुर्मिळ “महाशीर’ नामशेषाच्या मार्गावर

पिंपरी – तीव्र उन्हाळ्यामुळे आकुर्डी येथील गणेश तलावातील पाण्याची पातळी घटली आहे. यामुळे तलावातील गाळामुळे ऑक्‍सिजनची पातळी घटल्याने, या तलावातील जलचरांचे अस्तित्वच धोक्‍यात आले आहे. यामुळे गाळात रूतून अनेक मासे दगावले आहेत. ही बाब लक्षात काही जागरुक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर लोकप्रतिनिधी व महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.

Amnesty Scheme 2018: MSEDCL relief for industrial consumers with pending power bills

From July 1 to August 31, 2018, the customer would have to pay 25 per cent of basic outstanding balance and interest, and the remaining 75 per cent interest and 100 per cent delay charges would be waived, said MSEDCL.

‘एअर पोल्युशन कंट्रोल सिस्टिम’ युनिट गायब

पिंपरी-चिंचवड शहरातील वर्दळीच्या ठिकाणी होणारे वायू प्रदूषण नियंत्रित करून ते स्वच्छ करून शुद्ध हवा वातावरणात सोडणारे ‘एअर पोल्युशन कंट्रोल सिस्टिम’ युनिट (यंत्र) गायब झाले आहे. सत्ताधारी भाजपने मोठा गाजावाजा करीत पिंपरी चौकात हे युनिट बसविले होते; मात्र, पहिलाच प्रयोग फसल्याचे या घटनेवरून उघड होत आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेची 69 वाहने भंगारात

पिंपरी - परिवहन विभागाच्या नियमावलीनुसार आयुर्मान संपलेली ६९ वाहने महापालिकेने भंगारात काढली आहेत. त्यांच्या लिलावासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविली होती. प्राप्त निविदांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. परिवहन विभागाच्या नियमावलीनुसार वाहनांचे वायुर्मान १५ वर्षे निश्‍चित केले आहे. त्यानंतर वाहनांच्या वापरावर बंदी आहे. त्यामुळे महापालिकेने आयुर्मान संपलेली व अपघात अथवा अन्य कारणांनी वापरात नसलेली ६९ वाहने भंगारात काढली आहेत.

पिंपरीला पाणी देणार नाही

पवनानगर - ‘‘पवना धरणग्रस्तांकडून सोमवारी (ता.२८) पवना धरणावर पाणीबंद आंदोलन करण्यात येईल,’’ अशी माहिती पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मुकुंदराज काऊर व पवना धरणग्रस्त परिषदेचे अध्यक्ष रविकांत रसाळ यांनी दिली. ‘‘पिंपरी-चिंचवडसाठी एकही थेंब पाण्याचा जाऊन देणार नाही,’’ असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. 

काळेवाडीतील स्मशानभूमीलाच मरणयातना

पिंपरी – महापालिकेच्या दुर्लक्षामुळे कोट्‌यावधी रुपये खर्चून काळेवाडीमध्ये उभारलेली स्मशानभूमी आज मरणयातना सहन करत आहे. विविध सोयी सुविधांच्या अभावामुळे याठिकाणी येणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. मोकाट कुत्र्यांनी याठिकाणी ठिय्या मांडला असून सुरक्षा रक्षक गायब असल्याचे याठिकाणी पहायला मिळाले.

खड्डेच खड्डे चोहीकडे; गेली मनपा कुणीकडे?

पिंपरी : पाणीपुरवठा, महावितरण, एमएनजीएल, मोबाईलच्या केबल टाकणे आदी कामांसाठी शहरातील रस्ते खोदण्यात आले आहेत. यामुळे दुचाकी वाहनचालक व पादचारी हैराण झाले आहेत. पावसाळा तोंडावर आला असतानाही डांबरीकरण होत नाही. महापालिकेचे अधिकारीही याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. शहरात खड्डेच खड्डे असताना महापालिका कुठे गेली, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

पोलिसातील माणूसकी -वर्दीतील माणुसकीने वाचले प्राण

चिखली : सायकलस्वाराला मोटारीची धडक बसल्याने गंभीर जखमी झालेली व्यक्ती बेशुद्ध होऊन पडते. बघ्यांची गर्दी होते. मात्र, त्या व्यक्तीला मदत करण्यास कोणीही पुढे येत नाही. तेवढ्यात कुटुंबासह गावी जात असलेला एक पोलिस अधिकारी हा प्रकार पाहतो. त्यांच्यात वर्दीतला माणूस जागा होतो. बेशुद्ध अवस्थेतील व्यक्तीला आपल्या गाडीत घालून ते रुग्णालयात दाखल करतात. देवदूतासारखे धावून आलेल्या त्या अधिकाऱ्यामुळे गंभीर जखमी झालेल्या त्या व्यक्तीला जीवदान मिळते.

जॉगींग ट्रॅकचे काम प्रगतीपथावर

सांगवी :  सांगवी येथील साईचौक, इंद्रप्रस्थ, महाराणा प्रताप चौक इथपर्यंत करण्यात येणाऱ्या जॉगींग ट्रॅकचे काम प्रगतीपथावर आहे. पी.डब्ल्यु.डी. मैदानाच्या किनाऱ्यालगत सुरू असलेल्या या जागेत महापालिकेकडुन जॉगींग ट्रॅक बनविण्यात येत आहे. पावसाळ्यात मैदानावरील माती ट्रॅकवर येवु नये यासाठी ठिकठिकाणी चौकोणी आकाराच्या भिंती बांधण्यात येत आहेत. उद्यान विभागाकडून पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानाच्या कामादरम्यान काढण्यात आलेल्या झाडांचे या जॉगींग ट्रॅकच्या कडेने पुनररोपण करण्यात आलेले आहे. येथे फायकस, चाफा, नांद्रुक, साग आदी प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. पन्नासच्यावर पुनररोपण केलेली जवळपास सर्व झाडे जगली आहेत. यामुळे जॉगींग ट्रॅक व पी.डब्ल्यु.डी.मैदानाचा ओसाडपणा जावुन किनारा हिरवागार होणार आहे. 

मुळा नदीने घेतला मोकळा श्वास, डासांचा उपद्रव झाला कमी

जुनी सांगवी - मुळा, पवना नद्यांच्या संगमावर वसलेल्या सांगवीकरांना जलपर्णी व डासांच्या त्रासाचा सामना दरवर्षी करावा लागतो. गेली अनेक वर्षापासुन जलपर्णी हे सांगवीकरांच कायमचं दुखणं झालं आहे. या हंगामात तर साचलेली जलपर्णी व त्यामुळे वाढलेल्या डासांचा उपद्रव सांगवीकरांना नको नकोसा झाला होता. महापालिकेकडुन या विषयांकडे झालेले दुर्लक्ष तोकडी यंत्रणा, ठेकेदाराने कामास लावलेली दिरंगाई, बोपोडी पुलाच्या कामासाठी टाकलेला भराव व त्यामुळे प्रवाह थांबलेले पाणी आणी त्यावर जोमाने फोफावलेली जलपर्णी यामुळे उकाड्याबरोबरच सांगवीकरांना डासांमुळे घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. नदी किनारा भागातील रहिवाशांना डासांच्या उपद्रवाबरोबरच जलपर्णीमुळे दुर्गंधीयुक्त वासाचा सामना करावा लागत होता. पिंपरी चिंचवड शहरातील काही स्वयंसेवी सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने पवना नदीतील दशक्रिया विधी घाट ते सांगवी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुलापर्यंतची जलपर्णी दोनदा काढण्यात आली.

कॅन्टोन्मेंटचा निकष बोपखेल, पिंपळे सौदागरच्या रस्त्यांना लावा

पिंपरी – केंद्रीय संरक्षण मंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतील वानवडी बाजारातील राइट फ्लॅंक रस्ता आणि घोरपडीतील एलाइट लाइन्स रस्ता नागरिकांसाठी खुला केला आहे. याच निकषावर बोपखेल येथील रस्ता व पिंपळे सौदागर येथील रक्षक सोसायटी ते कुंजीरवस्ती रस्ता नागरिकांना खुला करण्यात यावा, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे.

विलिनीकरणाला वाढता विरोध

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे (पीसीएनटीडीए) विलिनीकरण पुणे महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रात करण्यास शहरातून वाढता विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही सावध भूमिका घेण्याचे आश्वासन दिले आहे.

निगडीत गुंडांचा धूडगूस, ११ वाहनांची तोडफोड

अल्पवयीन मुलांचा सहभाग; तीन दिवसात चौथी घटना

'सावरकरांचा इतिहास लिहिणं हाच पुढील कार्यक्रम'

२०१४ च्या लोकसभा निवडणुकी देशातील सर्व हिंदू एकत्र आल्यानं भाजपची केंद्रात सत्ता आली असून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जो खरा इतिहास लिहिला आहे, तोच इतिहास आता लिहिणे हाच आमचा पुढील कार्यक्रम असणार आहे, असे स्पष्ट संकेत भाजप खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी आज पुण्यात दिले.

पिंपरीत दुचाकीच्या नंबर प्लेटवर महापौरांचे नाव; पोलीस कारवाई करणार का?

पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये अनेक पक्षातील बड्या नेत्यांचे किंवा स्थानिक नगरसेवकांचे नाव हे नंबर प्लेटवर टाकण्यात आले असून अशा महाभागांवर वाहतूक पोलीस कारवाई करणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोदींच्या 'प्रचारक ते पंतप्रधान' प्रवासाच्या छायाचित्र व बातम्यांचे प्रदर्शन

वाल्हेकरवाडी  : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “प्रचारक ते पंतप्रधान” सर्व या प्रवासाविषयी महाराष्ट्रातील नामांकित मराठी माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या छायाचित्र व बातम्याचे प्रदर्शन पिंपरी-चिंचवड येथील नितीन चिलवंत यांनी बालगंधर्व कलादालन  पुणे येथे दि. २७, २८, २९ रोजी भरविले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे व पिंपरी- चिंचवड परिसरातील महानगरपालिकेचे स्वच्छता कामगार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी या प्रदर्शनात भारत सरकारच्या नवीन योजनांचा शुभारंभ करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मन कि बात मध्ये साधलेला संवादाची कात्रणे, मोदी यांचे भारतातील विविध राज्यातील विधानसभा रण संग्रामातील प्रचारक, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध देशातील पंतप्रधान राष्ट्रप्रमुख यांच्या पंतप्रधान मोदी यांच्याशी भेट-गाठी व देशांतर्गत विविध करार, विविध कार्यक्रमाचे केलेले उद्घाटन, पंतप्रधान पदाचे उमेदवार लोकसभा निवडणूक २०१४, नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय नेतृत्त्व, पंतप्रधान यांचे विदेशातील दौरे इ. छायाचित्र व वृत्तपत्रातील बातम्याच्या कात्रणाचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी २ ऑक्टोबर २०१४ रोजी नवी दिल्ली येथून स्वच्छ भारत अभियानाचा शुभारंभ केला. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीपर्यंत आपला संपूर्ण भारत देश स्वच्छ भारत करण्याचे स्वप्न पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदींनी पाहिले आहे आणि ते साकारण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वच्छ भारत अभियानातून प्रेरणा घेऊन सामाजिक बांधिलकीतून स्वच्छ भारत समृध्द भारत चित्रप्रदर्शन भरविणार आले आहे. त्यांना
सहकार्य शिवकुमार बायस यांनी केले आहे. 

कॅन्टोन्मेंटचा निकष बोपखेल, पिंपळे सौदागरच्या रस्त्यांना लावा

पिंपरी – केंद्रीय संरक्षण मंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतील वानवडी बाजारातील राइट फ्लॅंक रस्ता आणि घोरपडीतील एलाइट लाइन्स रस्ता नागरिकांसाठी खुला केला आहे. याच निकषावर बोपखेल येथील रस्ता व पिंपळे सौदागर येथील रक्षक सोसायटी ते कुंजीरवस्ती रस्ता नागरिकांना खुला करण्यात यावा, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे.

महापालिका प्रशासनाने “खेळ मांडला’

“क्रीडा’ समितीची बैठक : जलतरण तलाव ठेकेदारांना “अभय’
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरात एकूण 12 जलतरण तलाव उभारण्यात आले आहे. मात्र, संबंधित तलावांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. पाच महिन्यांपूर्वी संबंधित ठेकेदारांच्या कामाची मुदत संपली आहे. मात्र, तरीही प्रशासनाकडून कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती संजय नेवाळे यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत.

भीम ऍपला दहा हजार रुपये ग्राहकाला परत देण्याचा ग्राहक मंचाचा आदेश

पाठविलेल्या खात्यातून पैसे गेले : मात्र, दुसऱ्या खात्यात जमाच नाही                             नुकसानभरपाईपोटी पाच हजार आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून 3 हजार रुपये देण्यात यावेत
पुणे – भीम ऍपद्वारे कॉर्पोरेशन बॅंकेतून ऑनलाईन आयडीबीआय बॅंकेत वर्ग करुनही 10 हजार रुपये जमा न झालेल्या ग्राहकाला ग्राहकाच्या बाजूने ग्राहक मंचाने निकाल दिला आहे. ऍपमधील त्रुटीमुळे रक्कम जमा झाली नसल्याचे निरीक्षण नोंदवत ग्राहकाला दहा हजार रुपये परत देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक न्यायमंचाचे अध्यक्ष एम. के. वालचाळे, सदस्य शुभांगी दुनाखे, एस. के. पाचरणे यांनी दिला आहे. याबरोबरच नुकसानभरपाईपोटी पाच हजार रूपये आणि तक्रारीचा खर्च म्हणून तीन हजार रूपये देण्यात यावेत, असेही मंचाने आदेशात नमुद केले आहे.

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर

चौफेर न्यूज –  राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी आज शनिवारी (दि.२६) जाहीर करण्यात आली. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष तळागाळात रुजविण्यासाठी युवक राष्ट्रवादीच्या तब्बल ३७ युवकांची नवीन पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे.