Monday 3 December 2012

पिंपरीत भाज्या कडाडल्या

पिंपरीत भाज्या कडाडल्या:आडत दहा टक्‍क्‍यांवरून सहा टक्‍क्‍यांवर आणण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आडत्यांनी बेमुदत बंद पुकारल्याने पिंपरी कॅम्प येथील भाजी मंडईत फळभाज्यांची जेमतेम 20 ते 30 टक्केच आवक झाली. त्यामुळे सर्वंच भाज्यांचे भाव कडाडले. काही ठिकाणी फळभाज्याच विक्रीसाठी शिल्लक न राहिल्याने व्यापाऱ्यांना ऐन रविवारच्या दिवशी गाळे बंद ठेवावे लागले.
पिंपरीत भाज्या कडाडल्या

शहराच्या पर्यावरण संवर्धनाला राजकीय पाठबळाची गरज

शहराच्या पर्यावरण संवर्धनाला राजकीय पाठबळाची गरज: पिंपरी- चिंचवडच्या भौतिक विकासाबरोबर पर्यावरण संवर्धनासाठी राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळ मिळावे, यासाठी पर्यावरण संवर्धन समितीने केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे विविध समस्या आणि त्यावर करता येणा-या उपायांचे निवेदन रविवारी (२ डिसेंबर) सादर केले.

सीडॅक शोधणार दुबार गॅसजोडण्या

सीडॅक शोधणार दुबार गॅसजोडण्या: गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून देशभरात दुबार गॅसजोडणी घेतलेल्या ग्राहकांचा शोध सुरू आहे. ही वेळखाऊ प्रक्रिया टाळण्यासाठी पुण्याच्या ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग’ला (सिडॅक) यश मिळाले आहे. ‘नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर’च्या (एनआयसी) सॉफ्टवेअरला सीडॅकमधील ‘हायपरफॉर्मन्स कम्प्युटिंग’ ची (एचपीसी) जोड मिळाल्याने हे साध्य झाले आहे.

हिंजवडीत आढळली ३ दिवसांची चिमुरडी

हिंजवडीत आढळली ३ दिवसांची चिमुरडी: हिंजवडीतील कचराकुंडीत शनिवारी सकाळी दुपारी नवजात बालिका आढळून आली. मात्र, नागरिकांच्या सर्तकतेमुळे तीन दिवसांच्या चिमुरडीचा जीव वाचला. तिला उपचारासाठी ससून हॉ‌स्पिटलमध्ये दाखल केले आहे. गेल्या काही काळात राज्याच्या विविध भागांमध्ये स्त्री भ्रूणहत्या आणि बालिकांना टाकून देण्याच्या पार्श्वभूमीवर उघडकीस आलेल्या या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.

Maharashtra govt to launch its first hsg plan for disabled

Maharashtra govt to launch its first hsg plan for disabled: Pune Zilla Parishad will launch its disabled-friendly housing project on the occasion of World Disabled Day on December 3, thereby by earning the distinction of being the first to build houses for the disabled.

Sharad Pawar Pimpri Visit

(title unknown):
Sharad Pawar Pimpri Visit
www.youtube.com
ग्राहकांच्या उदासीनतेमुळे होतेय प्रचंड फसवणूक - शरद पवार पिंपरी, 2 नोव्हेंबर ग्राहकाच्या उदासीन प्रवृत्तीमुळे वस्तू व सेवाची खरेदी विक्री करताना ग्राहकांची म...

ग्राहकांच्या उदासीनतेमुळे होतेय प्रचंड फसवणूक - शरद पवार

ग्राहकांच्या उदासीनतेमुळे होतेय प्रचंड फसवणूक - शरद पवार
पिंपरी, 2 नोव्हेंबर
ग्राहकाच्या उदासीन प्रवृत्तीमुळे वस्तू व सेवाची खरेदी विक्री करताना ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. त्यासाठी त्यांच्यामध्ये जागृतीची खरी गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या '80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण' या तत्वाप्रमाणे पक्षाने पुढाकार घेऊन ग्राहक संरक्षण समितीची स्थापना केली. तेंव्हा बाकीच्या गोष्टींकडे लक्ष घालण्यापेक्षा, चांगले काम करणा-या कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घ्या आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करा, असा सल्ला केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.
www.mypimprichinchwad.com

कामशेत खिंडीमध्ये गॅस टँकर उलटला, जिवितहानी नाही

कामशेत खिंडीमध्ये गॅस टँकर उलटला, जिवितहानी नाही
लोणावळा, 2 डिसेंबर
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. चार वर कामशेत खिंडित आज सकाळी सात वाजता एक गॅसचा टँकर रस्त्यात उलटल्याने महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. टँकरमध्ये 17 टन घरगुती वापराचा गॅस होता. सुदैवाने अपघातात गॅस गळती झाली नाही.

वडगाव महामार्ग पोलिसांनी व कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माऊ येथून चाकण्‍ा येथील एच पी गॅसच्या प्रकल्पाला प्रदीप रोडवेज कंपनीचा टँकर क्र. (जीजे. 16 एक्स 7907) हा 17 टन गॅस घेऊन येत होता. कामशेत खिंड उतरताना जय मल्हार ढाब्याजवळील तीव्र वळणावर चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले.

रस्ता दुभाजकाला 50 फुट घासत हा टँकर पुण्‍याहून मुंबईकडे जाणा-या लेनवर आडवा झाला. प्रथमदर्शनी गॅस लिकेजची शक्यता ध्यानात घेता राष्ट्रीय महामार्गावरील सर्व वाहतूक थांबवून नंतर ती द्रुतगती महामार्गावर वळवण्यात आली. अपघातामध्ये टँकरचा चालक हा जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, कामशेत पोलीस, आयआरबी कंपनीचे देखभाल व दुरुस्ती विभाग प्रमुख्‍ा पी. के. शिंदे, पिंपरी चिंचवड येथील अग्नीशमन दल, क्रेन दाखल झाल्या. अकरा वाजण्‍याच्या सुमारास चाकण्‍ा येथील एच. पी. गॅस कंपनीचे तांत्रिक अभियंत्याचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले.
दहा वाजल्यानंतर पुण्याकडे जाणारी सर्व वाहतूक लोणावळा येथून द्रुतगती महामार्गावर वळवण्यात आली असून मुंबईकडे जाणारी वाहतुक एकेरी मार्गाने सोडण्यात आली आहे. यामुळे मार्गावर कोठेही वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र नव्हते.
http://www.mypimprichinchwad.com/