Wednesday 20 September 2017

Residents demand integrated hub for transport in Nigdi

Claiming that Nigdi has been ignored in the Pune Metro plan, the PimpriChinchwadCitizens' Forum (PCCF) has started approaching several politicos, including Prime Minister Narendra Modi and Union minister Nitin Gadkari, asking that all the ongoing ...

Chinchwad Temple Trust wins land dispute cases, but compensation is Rs 5

The Trust, which presides over the Morgaon, Siddhatek, Theur and Chinchwad temples, has been fighting the members of its founder-family, the Deos, since 1980 for compensation for hundreds of acres of prime land in Aundh, Baner, Ravet, Chinchwadand ...

पवना जलवाहिनीसाठी भाजप पुढाकाराची गरज

पिंपरी - पवना धरणापासून महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या प्रकल्पाचा अंदाजित खर्च नियोजित रकमेच्या दुप्पट झाला आहे. उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने प्रकल्पाविरुद्धच्या याचिका फेटाळल्या आहेत. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेला "जैसे थे'चा आदेश विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे घेतल्यास, हा प्रकल्प सुरू करण्याचा महत्त्वाचा अडथळा दूर होईल. 

घंटागाडी कर्मचा-यांना पंधरा हजारांचा बोनस

महापालिकेत मानधनावर काम करीत असलेल्या घंटागाडी कर्मचा-यांना १५ हजार रुपये दिवाळी बक्षीस देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मंगळवारी (दि. १९) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ऐनवेळच्या प्रस्ताद्वारे मान्यता दिली.
सिमा सावळे स्थायी समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. महापालिकेच्या आरोग्य विभागामध्ये सव्वातिनशेहून अधिक घंटागाडी कर्मचारी मानधनावर कार्यरत आहेत. महापालिका कर्मचा-यांप्रमाणे या कर्मचा-यांना ८.३३ टक्‍के बोनस व सानुग्रह अनुदान देता येत नाही. यामुळे २०११  पासून घंटागाडी कर्मचा-यांना 13 हजार रुपये दिवाळी बक्षीस म्हणून दिले जात आहे.

पालिकेकडून रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी स्वतंत्र सेल

शहरात ठिकठिकाणी होणा-या अतिक्रमणांमुळे नागरिकांना जीव मुठीत घेवून चालावे लागते. ही अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिकेत स्वतंत्र सेल निर्माण करून अतिक्रमणांवर धडक कारवाई मोहीम राबवा, अशा सूचना स्थायी समितीने आज (मंगळवारी) सभेत दिल्या आहेत.

लक्ष्मण जगताप यांचे बारणेंना आव्हान

पिंपरी - हिंमत असेल तर खासदार श्रीरंग बारणे यांनी आगामी लोकसभेची निवडणूक शिवसेनेतर्फे लढवून दाखवावी. भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेनेचे नाराज कार्यकर्ते त्यांना निवडणुकीत पराभूत करतील, असे आव्हान देत भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी मंगळवारी या वादात उडी घेतली. 

पाणी प्रश्नावरून महापौर भडकले, पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास कारवाई करणार

पिंपरी-चिंचवड शहराला मावळ परिसरातील पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे दिवसाआड सुरू असणारा पाणीपुरवठा नियमित करण्यात आला. समाधानकारक पाणीसाठा असूनही शहरातील विविध भागांत पिण्याचे ...

स्टार्टअप्सला तंत्रज्ञानासह मदत करणार

पुणे - "स्मार्ट सिटी', "स्मार्ट मोबिलिटी' आणि "इंटरनेट ऑफ थिंग्ज' (आयओटी) या क्षेत्रातील स्टार्टअप्सला तंत्रज्ञानासह सर्व प्रकारची मदत करण्यासाठी पिनॅकल इंडस्ट्रीज आणि इस्रायलच्या तेल अविव युनिव्हर्सिटीच्या "कॅप्स्युला स्टुडिओ'शी करार झाला आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीओईपी) "भाऊ इन्स्टिट्यूट' या स्टार्टअप इन्क्‍युबेशन सेंटरमध्ये या विशिष्ट क्षेत्रातील स्टार्टअप्सला जागेसह सर्व सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत. 

‘डीम्ड कन्व्हेयन्स’ सहज

पुणे - मानीव अभिहस्तांतर (डीम्ड कन्व्हेयन्स) करण्यासाठी आता सोसायट्यांना भोगवटा प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. त्याऐवजी गृहनिर्माण संस्थेकडून आता इमारतीचा प्रत्यक्ष ताबा घेण्यात आल्याचे, तसेच इमारतीच्या सर्व जबाबदाऱ्या आणि दायित्व स्वीकारण्यास तयार असल्याचे स्व-प्रमाणपत्र घेण्याच्या सूचना सरकारने दिल्या  आहेत.

पिंपरी : पोलिसच आरोपींचे "हात'

पिंपरी - माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या खुनाची सुपारी घेतलेल्या सराईत गुन्हेगारांना पळवून लावण्यास मदत करणाऱ्या दोन पोलिसांना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने पुणे पोलिस मुख्यालयातून अटक केली. त्यांना पिंपरी न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (ता. 22) पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील अटक केलेल्यांची संख्या सात झाली आहे. 

‘तेज’वरून 24 तासात 1.8 कोटी व्यवहार

मुंबई – सोमवारी सायंकाळी गुगलने तेज हे डिजीटल व्यवहारसाठीचे ऍप सुरू केल्यानंतर 24 तासाच्या आत भारतातील 4 लाख 10 हजार नागरीकानी हे ऍप डाऊन लोड केले आहे. त्याचबरोबर 1.8 कोटी वस्तूची खरेदी केली असल्याचे या कंपनीने म्हटले आहे.

शहरबात पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये चाललंय तरी काय?

पिंपरी-चिंचवड शहराला वाढत्या गुन्हेगारीचा विळखा बसला आहे. वाहनांच्या तोडफोडीचे सत्र, चोऱ्या, घरफोडय़ा, हाणामाऱ्या, खून याबरोबरच गेल्या आठवडय़ात झालेल्या गोळीबाराच्या दोन घटना आणि वकिलानेच दिलेली माजी नगरसेवकाच्या खुनाची ...

तुमच्यानंतर तुमच्या नॉमिनीलाच पैसे मिळतील का?

वरील प्रश्‍नाचे उत्तर तुम्ही off course असेच द्याल पण तरीही पुन्हा विचारतो !
तुम्ही तुमच्या आयुष्यात फिक्‍स्ड डिपॉझिट, ppf, इन्शुरन्स पॉलिसी, मुच्युअल फंड आणि शेअर्समध्ये पैसे गुंतवले असतील पण तुमच्या नंतर हे पैसे तुमच्या नॉमिनीला मिळतील याची तुम्हाला खात्री आहे का?
‘nomination’ बद्दलच्या कायद्याची तुम्हाला माहिती आहे का?

उद्योगनगरीत संततधार!

जनजीवनावर परिणाम : बाजारपेठांमध्ये शुकशुकाट
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या संततधारेचा जनजीवनावर परिणाम झाला. पावसामुळे नागरिक बाहेर पडू न शकल्याने शहरातील बाजारपेठांमध्ये दिवसभर शुकशुकाट होता. तर महामार्गावर वाहनांची तुरळक वर्दळ होती. दुपारी चार वाजता पाऊस उघडल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली.

भाजपा नगरसेविका कमल घोलप यांचे जात प्रमाणपत्र वैध

भाजपा नगरसेविका कमल घोलप यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचे उस्मानाबाद जिल्हा जात पडताळणी समितीने आज जाहिर करत त्याचे प्रमाणपत्र घोलप यांना सुपुर्द केले, यामुळे कमल घोलप यांचे नगरसेवक पद शाबुत राहणार आहे.