Thursday 29 May 2014

संसदेतलं पहिलं पाऊल अन् जबाबदारीचे ओझे!

नगरसेवकपदावरुन थेट खासदार म्हणून संसदेत जाण्याची संधी मिळाली. भारतातील सर्वोच्च असलेल्या लोकशाहीच्या मंदिरात पहिलेच पाऊल ठेवले. तेथे लोकशाहीच्या भव्य-दिव्यतेचे अनोखे दर्शन घडले आणि मनावर जबाबदारीचे प्रचंड ओझे आले, अशा शब्दात नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेतील पहिल्या दिवसाबद्दलची प्रतिक्रिया 'एमपीसी न्यूज'शी बोलताना दिली.

Pimpri Chinchwad devp authority razes four illegal wedding halls

Pune: The Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) took its drive against illegal structure further by demolishing four unauthorized wedding halls. Although the operators of these halls resisted, the structures were razed on Tuesday ...
Marriage halls razed in demoltion drive

Safety measures in place for Nigdi-Dapodi BRT corridor

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has started implementing the road safety measures suggested by an audit report on the Nigdi-Dapodi BRT corridor on the Pune-Mumbai highway.

Pimpri Chinchwad Municipal Corporation will start disaster management cell

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will start its central flood disaster management cell from June 1.

New ST terminus for 50 buses opens in Sangvi


PUNE: Residents of Sangvi, Aundh, Pimple Saudagar and Dapodi will not have to travel far to catch Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) buses as the state transport body has started a new bus terminus in Sangvi. This is MSRTC's fourth ...

आमदारांच्या शाळेवरील कारवाईसाठी पालिकेची चालढकल

सांगवीत पवना नदीपात्रात भराव टाकून बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांची शाळा 31 मे पूर्वी पाडून टाकण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, सुरुवातीला शाळा रिकामी करण्यासाठी व त्यानंतर पावसाळ्याचे कारण पुढे करत ही कारवाई टाळण्याच्या हलचाली महापालिका प्रशासनाकडून सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

मार्च 2012 नंतरही तब्बल 3,473 अवैध बांधकामे

महापालिकेकडून बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरु असतानाही मार्च 2012 नंतर तब्बल 3,473 बांधकामे उभारण्यात आली. त्यापैकी स्वतःच्या जागेत कायदेकानून धाब्यावर बसवून उभारलेल्या बांधकामांची संख्या 1,967 आहे. ही बांधकामे किचकट नियमावली की चुकीचे काम करण्याच्या मानसिकतेतून करण्यात आली, याचा शोध महापालिका प्रशासनाने घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

'आरटीई'मुळे महापालिकेने थांबविली प्रवेश प्रक्रिया

शिक्षण हक्क कायद्यामुळे (आरटीई) पाचवी आणि आठवीचे वर्ग प्राथमिक शाळेला जोडण्याचे आदेश आहेत. यामुळे महापालिकेतील 21 शिक्षक अतिरीक्त ठरणार आहेत. 'आरटीई'मुळे नव्या शैक्षणिक वर्षात कायद्याची अंमलबजावणी करताना गुंतागुंत वाढणार आहे. त्यामुळे महापालिकेने आठवीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया तूर्त थांबविली आहे.

पडझड झालेल्या घरांची माहिती देण्याचे महापालिकेचे आव्हाहन

पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमुळे जुन्या, पडझड झालेल्या घरे पडून हानी होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा घरांची माहिती महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला द्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहेत.

ज्येष्ठ खासदार म्हणून आढळरावांकडे जिल्ह्य़ातील वीज ग्राहकांचे नेतृत्व?

जिल्ह्य़ातील सध्याच्या खासदारांमध्ये शिवाजीराव आढळराव हे ज्येष्ठ असल्याने आता त्यांच्याकडे वीज ग्राहकांचे नेतृत्व जाण्याची शक्यता आहे.

मूक-बधीर मुलीवर अत्याचार; दामिनी ब्रिगेडच्या महिलांकडून बेदम चोप

मूक-बधीर मुलीवर आठ महिन्यांपासून अत्याचार करून गर्भपात करण्यास भाग पाडणा-या नराधामास दामिनी ब्रिगेडच्या महिलांनी चोप देवून भोसरी पोलिसांच्या हवाली केले. 

पिंपळे-गुरवमध्ये जात पंचायत राज...!

निनावी तक्रारअर्जामुळे जात पंचायतीचे रहस्य उलगडले
झपाट्याने विकसित होणा-या आणि सुशिक्षितांचा गोतावळा असलेल्या शहरात आजही जात पंचायत अस्तित्वात आहे. समाजातील लोकांना पंचायतीच्या परंपरेनुसार बांधून ठेवण्याचा प्रयत्न ती करते. एखाद्यावर अन्याय होत असेल, तरी जात पंचायतीला त्याची पर्वा नाही. हडपसर पोलिसांकडे आलेल्या निनावी तक्रारअर्जामुळे पिंपळे-गुरवमधील वैदु समाजाच्या जात पंचायतीचा एक प्रकार पुढे आला. पंचायतीच्या परंपरेविरुध्द तिस-याच पोटजातील मुलीशी विवाह जुळवल्याने हा विवाह पंचायतीला मान्य नव्हता. मात्र, या विवाहाला आमचा विरोध नसून यापुढे असे विवाह होणार नाही, अशी भुमिका या पंचायतीने मांडली आहे.

पिंपरीत जेष्ठ नागरिकांची एकेरी कॅरम स्पर्धा

सलीम सय्यद प्रथम तर नागुल पेल्ली व्दितीय
पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाशी संलग्न असलेल्या पिंपरीगावातील ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने नुकत्याच एकेरी कॅरम स्पर्धा घेण्यात आल्या. ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या सभासद असणा-या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही स्पर्धा आयोडजित केली आहे. या स्पर्धेमध्ेय सलीम सय्यद हे विजेता तर, नागुल पेल्ली हे उपविजेता ठरले.

पिंपरी -चिंचवड शहरात गुरूवारी 'आई महोत्सवाचे' आयोजन

आईच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातोश्री प्रतिष्ठानच्यावतीने शहरात प्रथमच 'आई महोत्सवाचे' आयोजन 29 ते 31 मे दरम्यान करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत 'मातोश्री व्याख्यानमाला' महाराष्ट्रातील नामवंत वक्त्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.