Thursday 12 October 2017

वर्धापनदिन विशेष! पिंपरी चिंचवड शहराबद्दल ठळक नोंदी

शहराच्या 35 व्या वर्धापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा 














💐

पिंपरी चिंचवड ठरतोय सुख-सोयींनी संपन्न शहर

शहर स्वच्छ असावे यासाठी पिंपरी चिंचवड पालिकेने अनेक उपाययोजना आखल्या आहेत. त्याअंतर्गत त्यांनी जनजागृती करून घनकचरा व्यवस्थापनाचे धडे नागरिकांना दिले होते. एवढंच नव्हे तर उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांमध्येही आता घट झाली आहे.

PCMC to give PMPML Rs 160 cr

Meanwhile, in another proposal tabled at the meeting, PCMC submitted detailed report to the state government on an overhaul of the sewage system in the old areas of the twin township, under the Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation ...

आकुर्डी मंडईच्या समस्येबाबत आयुक्तांशी चर्चा

आकुर्डीतील खंडेराया भाजी मंडईतील समस्यांबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत बैठक घेत चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये भाडेवाढ, पार्कीग, सीसीटीव्ही व्यवस्था व विद्यूतविषयक समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
उपमहापौर शैलजा मोरे यांच्या पुढाकाराने ही बैठक पार पडली. यावेळी नगरसेवक प्रमोद कुटे, कमल घोलप, अनुराधा गोरखे, भाजी विक्रेते संघटनेचे अध्यक्ष माणिक सुरसे, सचिव सुनिल शिरोडे, अजय गुप्ता, अण्णा जोगदंड, प्रविण राक्षे, नंदकुमार गुप्ता, हौसला प्रजापती आदी उपस्थित होते.

Learning to play with fire: Pune's fire department organise pre-Diwali fire-safety campaign

To safeguard citizens, especially children, the fire departments of Pune Municipal Corporation(PMC) and Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC), along with a NGO Safe Kids Foundation, has launched a pre-Diwali firecracker safety awareness ...

प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करा; अमित गोरखे यांचे आवाहन

पिंपरी (प्रतिनिधी):- सर्व सण-उत्सव साजरे करताना हवेचे प्रदूषण, ध्वनीप्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. प्रदूषणमुक्त निरोगी वातावरणासाठी कुठेही पर्यावरणाचा -हास होणार नाही, याची दक्षता विद्यार्थ्यांपासून सर्वांनी घेतली पाहिजे. स्वच्छ व निरोगी वातावरणासाठी यंदाची दिवाळी प्रदूषण मुक्त साजरी करण्याचा पिंपरी चिंचवड शहरवासियांनी संकल्प करावा, असे कळकळीचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अमित गोरखे यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे नगरसेवक तुषार हिंगे यांच्यावर निगडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल केल्यानंतर हिंगे यांनी मारहाण केली, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे. याप्रकरणी नगरसेवक तुषार ...

अनधिकृत धार्मिक स्थळांचे नियमितीकरण!

पिंपरी – शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले होते. त्यानुसार शहरात आढळून आलेल्या 198 धार्मिक स्थळांपैकी 124 अनधिकृत धार्मिक स्थळे नियमीत केली आहेत. उर्वरित 14 स्थळांबाबत नियमितीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. तसेच 37 धार्मिकस्थळे स्थलांतरीत आणि 23 धार्मिक स्थळे हलवण्याची कारवाई करण्यात येणार आहे. यावरील अहवाल महापालिकेने राज्य शासनाला सादर केला आहे.

महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त आयुक्तांसह नगरसेवकांनी केले रक्तदान

पिंंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महापालिकेचा आज ३५ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त महापालिकेच्या मुख्यालयात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वत: रक्तदान केले. यावेळी त्यांच्यासोबत सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे यांनी देखील रक्तदान केले. आयुक्त हर्डीकर यांनी यावेळी रक्तदानाचे महत्व पटवून देत सर्वांनीच रक्तदान करावे असे आवाहन केले.

चवदार मिठाईची लज्जत

पिंपरी - दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव. या सणाला घरोघरी दिवे पेटवून अंधारवाटा पुसत जाण्याचाच जणू आपण निश्‍चय करतो. दिवाळीनिमित्त नातेवाईक, मित्र परिवाराला खास भेट देण्यासाठी ड्रायफ्रूट कॅडबरी, विविध कॅडबरींचे सेलिब्रेशन पॅक, मिक्‍स मिठाई, सुक्‍यामेवा असे विविध प्रकार बाजारपेठेत पाहण्यास मिळत आहेत. दीपोत्सवानिमित्त तयार फराळाबरोबरच चवदार मिठाई सोबत असल्यास त्याची लज्जत नक्कीच वाढणार आहे.

पेट्रोल पंपचालकांचा उद्याचा बंद मागे

पुणे - पेट्रोलियम कंपन्यांनी विविध मागण्यांवर चर्चा करण्याचे आश्‍वासन दिल्याने पेट्रोल पंपचालकांनी शुक्रवारी (ता. 13) पुकारलेला देशव्यापी बंद मागे घेतला आहे, अशी माहिती पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे (पुणे) अध्यक्ष बाबा धुमाळ व प्रवक्ते अली दारूवाला यांनी कळविली आहे. 

“हॅण्डलिंग चार्जेस’ची बेकायदा आकारणी

वाहन चालकांची सर्रास लूट : विक्रेते-आरटीओची मिलीभगत?
तुषार रंधवे 
पिंपरी – तुम्ही कोणतेही दुचाकी अथवा चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी गेलात, तर तुमच्याकडून “हॅण्डलिंग चार्जेस’च्या नावाखाली नियमबाह्य पद्धतीने अतिरिक्त रक्कम उकळण्याचा प्रकार वाहन विक्रेत्यांकडून होत आहे. मात्र, आरटीओ अधिकाऱ्यांची “सेटींग’ असल्याने “तेरी भी चूप, मेरीभी चूप’ अशी स्थिती असून, यामध्ये विनाकारण सर्वसामान्य ग्राहकांची लूट होत आहे. याबाबतच्या तक्रारी परिवहन आयुक्तालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर संबंधित वाहन विक्रेत्याचे व्यापार प्रमाणपत्र रद्द करण्याचे, तसेच वाहन उत्पादक कंपनीला ही बाब कळविण्याचे निर्देश आयुक्तालयाने दिले आहेत.