Friday 24 April 2020

COVID-19 PCMC War Room | 24 Apr - City Dashboard


Prepare for more quarantine provisions till May end: Central panel to Pune admin

The teams held meeting with CM Uddhav Thackeray, state healt

थेरगाव सोशल फाऊंडेशनचे प्रेरणादायी जनसेवेचे कार्य; ३३ दिवसांपासून दररोज हजारों गरजूंना अन्नदान..!

पिंपरी (Pclive7.com):- कामगारनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात लॉकाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आलीयं. संकटाच्या या परिस्थितीत शहरातील अनेक दानशूर व्यक्ती तसेच संस्था या गरजूंच्या मदतीला धावून गेले आहेत. थेरगाव सोशल फाउंडेशनने देखील अखंडपणे जनसेवेचे कार्य गेल्या ३३ दिवसांपासून सुरू ठेवले आहे. थेरगाव, वाकड, रहाटणी काळेवाडी परिसरातील हजारों गरजू नागरिकांसाठी या सोशल फाउंडेशन दररोज अन्नदानाची अविरत सेवा सुरू ठेवले आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या दिघी, च-होलीत कोरोनाचे 25 तर रुपीनगरमध्ये 12 रुग्ण; रावेत, थेरगाव ‘कोरोनामुक्त’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मागील सोहळा दिवसांपासून दररोज नवीन कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. आजपर्यंत शहरातील 81 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये भोसरी, दिघी, डुडुळगाव, च-होली हा भाग येत असलेला ‘इ’ प्रभाग कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. या प्रभागात सर्वाधिक 25 रुग्ण आहेत. तर, तळवडे, रुपीनगर परिसर येत असलेल्या ‘फ’ प्रभागात कोरोनाचे 12 रुग्ण आहेत. […]

कोरोना मृतदेहांवरील अंत्यसंस्कारासाठी सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकार; महापालिकेचीही संमती

एमपीसी न्यूज : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहाची हेळसांड होऊ नये,  अशा मृतदेहांवर रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीय व नातेवाईक पुढे येत नसल्याचे समोर आले आहे. तसेच मृताच्या नातेवाईकांनी मृतावरील कायदेशीर हक्क नाकारल्यास  पिंपरी-चिंचवड मुस्लिम सुरक्षा संघटनेने अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर  यांनीही लेखी संमती दिली आहे.  दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या […]

#CoronaVirus: पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ८०

पिंपरी-चिंचवड शहरात एकाच दिवसात तब्बल ११ जण करोना बाधित असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे शहरातील आणखीच चिंता वाढली असून एकूण आकडा हा ८० वर पोहचला आहे. यापैकी २१ जणांना करोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आलं आहे तर तीन जणांचा आत्तापर्यंत करोना ना बळी घेतलाय.

पोलिसांच्या “करोना’विरोधातील लढ्याला उपमहापौरांचे “बळ’

पिंपरी, दि. 24 (प्रतिनिधी) – करोना विरोधातील पोलिसांच्या लढ्याला बळ देण्याच्या उद्देशाने तसेच माणुसकीच्या नात्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी आपले तारांकित हॉटेल पोलिसांना क्वारंटाइन करण्यासाठी तसेच त्यांना राहण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे. हिंगे यांनी घेतलेल्या हा निर्णय पोलीस कर्मचारी, अधिकारी व पालिका प्रशासनाला दिलासा देणारा ठरला आहे.

टवाळखोरांकडून सव्वाचार लाखांचा दंड वसूल

पिंपरी: वारंवार सांगूनही फिरणाऱ्या टवाळखोरांची संख्या कमी होताना दिसत नाही. यामुळे नाकाबंदी करताना आता अशा टवाळखोरांकडून पूर्वीच्या वाहतूक नियमभंगाच्या गुन्ह्यातील दंड वसूली पोलिसांनी सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसात चार लाख 17 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

अबब…! रुपीनगरमध्ये ११ जण करोनाबाधित

पिंपरी – रुपीनगर परिसरातील तब्बल 11 जणांना करोनाची लागण झाली आहे. शहरात एकाच दिवशी 11 जणांना लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे. तर ओटास्कीम, निगडी परिसरात राहणाऱ्या एकाचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील करोना बळींची संख्या चारवर गेली आहे

पिंपरीतील नागरिकांनोे 'या' उपक्रमाचा फायदा घ्याच!

जुनी सांगवी (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरात परिसरातील काही भागात सध्या भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे गुरव, जवळकर नगर येथे डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

शाळांच्या निकालाबाबत शासनाने घेतलेला मोठा निर्णय काय?

पिंपरी : आरटीईअंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे प्रथम सत्र, व्दितीय सत्रातील आकारिक मूल्यमापनानुसार आणि इयत्ता नववी व अकरावीचे प्रथम सत्र अखेरचे मूल्यमापन आणि व्दितीय सत्रातील अंतर्गत मूल्यमापनापैकी वीस गुणांच्या विविध प्रकारांपैकी जे कामकाज 13 मार्चअखेर उपलब्ध आहे. या दोन्हींची सरासरी घेऊन निकाल तयार करावा, असे आदेश शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी आज (ता.२४) जारी केले आहेत.

खरेदीवेळी दुकानात सोशल डिस्टंसिंग ठेवणार 'सोडी' अॅप; पुण्यातील तरुणांचे संशोधन!

पुणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू असली तरी अत्यावश्‍यक सेवांसाठी नागरिकांना मोकळीक देण्यात आली आहे. परंतु एकाच वेळी दुकानावर होणारी गर्दी संचारबंदीसह मूळ उद्देशालाच हरताळ फासते. यावर उपाय म्हणून घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने दुकानातील 'टाइम स्लॉट' बुक करणारे 'सोडी' (सोशल डिस्टंसिंग) ऍप पुण्यातील तरुणांनी विकसित केले आहे.

पुण्यात प्लाझ्मा थेरपीची तयारी पूर्ण

पुणे - कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. रुग्णाचा विमा आणि अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) मान्यता या दोन तांत्रिकबाबींच्या पूर्ततेतनंतर प्लाझ्मा थेरपी प्रत्यक्षात करण्यात येईल. 

पिंपरी- चिंचवडसह पुणे जिल्ह्यात उद्योगांच्या चाकांना गती

पुणे - कुरकुंभ, इंदापूर, भिगवण, जेजुरी पाठोपाठ वालचंदनगर इंडस्ट्रीही गुरुवारपासून सुरू झाली. त्यामुळे पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात सुरू झालेल्या उद्योगांची संख्या आता सुमारे 720 झाली. त्यातून सुमारे 24 हजार कामगारांना रोजगार मिळाला आहे. तर सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्येही काही उद्योगांना गुरुवारी परवानगी देण्यात आली. 

पिंपरी चिंचवडकरांनो खूशखबर : पवना धरणात 31 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

पिंपरी : कोरोनामुळे सर्वत्र भितीचे वातावरण आहे. महिन्यापासून नागरिक लॉकडाऊनचे जीवन अनुभवत आहेत. शहर सील आहे. मात्र, शहरवासियांसाठी एक सुखद बातमी आहे. कारण, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट साठा आहे. तो 31 जुलैपर्यंत पुरेल इतका आहे. 

बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयामधील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

पिंपरी : संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाचे काम अजून पूर्ण झालेले नाही. मात्र, तेथे 'सोशल डिस्टन्सिंग'चे पालन केले जात असून, चार कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे.

‘वायसीएम’मधील कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सेवेत घेण्याची मागणी

पिंपरी – महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांवर तुटपुंज्या पगारावर अनेक हंगामी डॉक्‍टर व परिचारिका जीव धोक्‍यात घालून उपचार करीत आहेत. प्रशासनाने या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी म्हणून त्यांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे, अशी मागणी नगरसेवक तुषार कामठे यांनी केली आहे.