Tuesday 25 March 2014

PCMC seeks nod to act against ex-staff

The civic administration said, in the budget session of the legislative council in 2013, the question of the machine lying unused since its purchase was raised.

Sena's Adhalrao Patil worth Rs 25.35cr

Shiv Sena candidate from Shirur Lok Sabha constituency Shivajirao Adhalrao Patil on Monday declared assets worth Rs 25.35 crore in an affidavit filed before the returning officer.

Pune’s TDR king lists assets worth mere Rs 4.5 crore, has no vehicle

Laxman Jagtap (51), who is known as the TDR (transfer of development rights) King of Pune, on Monday set tongues wagging by putting his collective assets at a measly Rs 4.5 crore in his affidavit filed at the Maval election office at PCMC headquarters in Pimpri. Not stopping at this, he also identified himself as “an ordinary person”.

Toll free helpline for TB patients

Pune: The State health department launched a toll free helpline 1800-102-2248 on Monday in 10 districts to provide assistance to TB patients and their relatives, regarding hospitals for treatment and medicines, to mark World TB Day 2014.

विश्व कल्याण कामगार संघटनेचा भापकर यांना जाहीर पाठिंबा

बजाज ऑटो लिमिटेड चाकण व आकुर्डी येथील विश्व कल्याण कामगार संघटनेच्या सर्व सभासदांनी मावळ लोकसभा मतदार संघातील आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार मारूती भापकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मारूती भापकर यांच्यासारख्या प्रामाणिक, लढवय्या, निर्भिड, कामगार हितासाठी रात्रंदिवस लढणा-या व्यक्तीस कामगारांचे प्रश्न संसदेमध्ये मांडण्यासाठी त्यांना ही एक संधी देण्याचे आवाहन इतर सर्व कामगार संघटनांनी केले आहे. भापकर यांच्याबरोबर सर्व सभासद कामगार कल्याणासाठी भापकर यांना सर्वतोपरी मदत करतील असे आश्वासन दिले आहे.

गंगानगर, पांढारकर चाळ येथील बचतगटांचा श्रीरंग बारणे यांना पाठिंबा

गंगानगर, पांढारकर चाळ येथे नुकतीच मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांची प्रचार सभा पार पडली. यावेळी येथील बचतगटांनी श्रीरंग बारणे यांना आपला पाठिंबा जाहीर केला.

जगतापांची संपत्ती साडेचार कोटी

पिंपरी : शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्याकडे ४ कोटी ६६ लाखांची मालमत्ता असून, साडेबावीस लाखांचे कर्ज आहे, असे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. मात्र, त्यांच्याकडे कोणतेही दुचाकी, चारचाकी वाहन नाही. स्वसंरक्षणासाठी एक रिव्हॉल्व्हर आणि एक पिस्तूल आहे. 

शक्तीप्रदर्शन करीत जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरला.

सपाचे टेक्सास गायकवाड यांचाही अर्ज दाखल
आलिशान मोटारी, मोठ्या बस आणि दुचाक्यांच्या फौजफाट्यासह शक्तीप्रदर्शन करीत  शेकाप-मनसे पुरस्कृत उमेदवार लक्ष्मण जगताप आणि बहुजन समाज पार्टीच्या टेक्सास गायकवाड यांनी आज (सोमवारी) मावळ लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. खासदार गजानन बाबर यांच्यासह शेकाप-मनसेचे नेते जगतापांबरोबर उपस्थित होते.

६२ अर्जांची विक्री

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी पाचव्या दिवशी १२ उमेदवारी अर्ज वितरित झाले. पाच उमेदवारांनी अर्ज भरून दिले. पाच दिवसांत ६२ अर्जांचे वितरण तर एकूण ८ अर्ज भरले.
सोमवारी अर्ज दाखल केलेल्यांमध्ये शेकापचे लक्ष्मण जगताप त्यांचे बंधू शंकर जगताप, बसपचे टेक्सास गायकवाड, धर्मपाल तंतरपाळे आणि अपक्षमध्ये अभिजित आपटे यांनी अर्ज सादर केले. आजअखेर एकूण ६२ अर्जांचे वितरण झाले आहे. (प्रतिनिधी)