Saturday 13 July 2013

अतिक्रमणविरोधात १४0 बीट निरीक्षक

- प्रत्येकाला दिली हद्द : दररोज अहवाल बंधनकारक
पिंपरी : अतिक्रमण निर्मूलनासाठी महापालिकेने १४0 बीट निरीक्षक नेमले असून, त्यांना रोज अहवाल सादर करणे बंधनकारक केले आहे. त्यांना नेमून दिलेल्या हद्दीत अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता त्यांना घ्यायची आहे. शिवाय नव्याने उभारण्यात येणार्‍या टपर्‍या, हातगाड्या अशा अतिक्रमणावरदेखील लक्ष ठेवायचे आहे. अशा सूचना बीट निरीक्षक आणि अधिकार्‍यांच्या बैठकीत आयुक्त श्रीकर परदेशी यांनी दिल्या. 

Only 16 PCMC corporators, mayor attend all GB meets

7 may be disqualified for abstaining 3 times

PCMC renames ward offices as zonal offices

PIMPRI: The ward offices of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) would be known as zonal offices from August 15.

पिंपरी महापालिकेत 48 टक्के नगरसेवक ...

सलग तीन सभांना 7 नगरसेवकांची दांडी
निशा पाटील,
पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होवून दीड वर्षे झाली आहेत. मात्र, निवडून येण्यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करणा-या नगरसेवकांना महापालिकेच्या सभांबाबत अनास्था असल्याचे समोर आले आहे. स्वीकृत

बेकायदा 129 फलकांवर कारवाई

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत विनापरवाना उभारण्यात आलेल्या 129 फलकांवर 24 जून ते 1 जुलै या कालावधीत कारवाई करण्यात आली.
महापालिका कायद्यानुसार महापालिका क्षेत्रात परवानगी शिवाय कोणत्याही प्रकारचा जाहिरात फलक, पोस्टर्स, बॅनर्स लावता येत

55 नागरिकांनी घेतले वृक्ष दत्तक

वृक्षारोपणाबरोबरच त्याचे संगोपन व्हावे यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाकडून यंदा वृक्ष दत्तक योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 55 जणांनी वृक्ष दत्तक घेतले असल्याची माहिती महापालिकेचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांनी दिली.

वाढीव मागणीचा आराखडा जलसंपदाकडे सादर

पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील वाढत्या नागरीकरणामुळे शहरासाठी ३४१ दशलक्ष घनमीटर (एमएलडी) वाढीव पाण्याचा आराखडा जलसंपदा विभागाकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली.

थेरगाव येथे अतिक्रमणविरोधी कारवाई

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने थेरगाव येथे शुक्रवारी (१२ जुलै) केलेल्या कारवाईत सुमारे पाच हजार चौरस फुटाच्या बांधकामाची तीन मजली इमारत आणि सहा गाळ्यांवर अतिक्रमण विरोधी कारवाई केली.

पुणे, पिंपरीचे प्रश्‍न अधिवेशनात मार्गी लागणार का?

पुणे -&nbsp पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांच्या प्रादेशिक आराखड्याप्रमाणेच "ईपी', एक्‍सक्‍ल्युडेड पार्ट किंवा वगळलेल्या भागांसाठीचा प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपासून राज्य शासनाकडे धूळ खात पडून आहे.

दांडीबहाद्दर नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार

पिंपरी -&nbsp सलग तीनपेक्षा अधिक सर्वसाधारण सभांना अनुपस्थित राहिल्याने 14 नगरसेवकांवर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे.

योगेश बहल यांचे समर्थकांना आवाहन

उत्तरांचलमध्ये झालेली नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच बिहारमधील बौध्दगया येथील बॉम्बस्फोटच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साधेपणाने व समाजपयोगी उपक्रमाद्वारे साजरा करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी त्यांच्या समर्थकांना केले आहे.

बनावट कागदपत्रे तयार करणा-या ...

पॅनकार्ड, जन्म-मृत्यु दाखला, आयटी रिटर्न यांसारखी महत्त्वाची बनावट कागदपत्रे घरच्याघरी तयार करुन त्याची विक्री करणा-या काळेवाडीतील एका भामट्याला सांगवी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्याच्याकडून या बनावट कागदपत्रांसह, ती बनविण्याचे साहित्य, शिक्के जप्त करण्यात आले आहेत.

नव्या दोन प्रभाग निर्मितीचा प्रस्ताव

पिंपरी : शहराचा वाढता विस्तार आणि सुविधांवर येणारा ताण लक्षात घेऊन सुलभ कामकाज प्रक्रियेसाठी आणखी दोन प्रभागांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव २0 जुलैला होणार्‍या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येणार आहे. चारचे सहा प्रभाग होणार असल्याने महापालिकेचा पदनिर्मितीचा मार्गही सुलभ होणार आहे. परंतू यापुढे प्रभाग कार्यालयांऐवजी क्षेत्रीय कार्यालय असे संबोधले जाणार आहे. 

राज्यपाल पाटील, मंत्री शिंदे यांचा उद्या सत्कार

पिंपरी : सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल श्रीनिवास पाटील, तर राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल शशिकांत शिंदे यांचा सपत्नीक सत्कार सातारा जिल्हा मित्र मंडळ, सांगली जिल्हा मित्र मंडळ, सोलापूर जिल्हा मित्र मंडळ, नामदार शशिकांत शिंदे सत्कार सोहळा समिती यांच्या वतीने शनिवारी (दि. १३) दुपारी ४.३0 वा. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे आयोजित केला आहे.