Tuesday 13 March 2018

ज्येष्ठांसाठी एक कोटी

पिंपरी - शहरातील एकूण लोकसंख्येच्या १८-२० टक्के असणारा ज्येष्ठ नागरिक हा घटक महापालिका स्तरावर आतापर्यंत दुर्लक्षित राहिला होता. मात्र, ज्येष्ठांची ही व्यथा जाणून घेत यंदा प्रथमच पिंपरी-चिंचवड महापालिकेने सर्वसमावेशक असे ज्येष्ठ नागरिक धोरण तयार केले आहे. हे धोरण तयार करतानाच त्यासाठी स्वतंत्रपणे एक कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. महापालकेच्या या निर्णयामुळे ज्येष्ठांमध्ये सध्या आनंदाचे वातवरण आहे.

पिंपरीत विविध गुन्हय़ांमध्ये सिमेंटच्या ठोकळय़ांचा वापर

पिंपरी पालिकेतील बरेचसे अर्थकारण या सिमेंटच्या ठोकळय़ांभोवती फिरते आहे

पोलिस भरतीची प्रक्रिया आजपासून

पुणे - शहर पोलिस भरती प्रक्रिया सोमवारपासून (ता.१२) होणार आहे. पोलिस शिपाई पदाच्या २१३ जागांसाठी तब्बल ४९ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. याबरोबरच ग्रामीण पोलिस भरतीची प्रक्रियाही होणार आहे. 

‘केमिस्ट असोसिएशन’ची पोलिसांकडे धाव

पुणे - अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचा अधिकारी असल्याचे भासवून शहर व राज्यातील औषध विक्रेत्यांची फसवणूक करणाऱ्या तोतया ‘ड्रग इन्स्पेक्‍टर’विरोधात ‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्‍ट’ने (सीएपीडी) पोलिसांकडे धाव घेतली आहे. आतापर्यंत शहरातील एकूण सहा औषध विक्रेत्यांनी त्यांना धमकावणारे दूरध्वनी आल्याची माहिती दिली. त्याआधारे असोसिएशनने पोलिसांकडे धाव घेतली आहे.

नफ्यात धावेल एसटी

पिंपरी - कॉरिडॉर ऑपरेशन, भत्ता योजना, इन्फ्रास्ट्रक्‍चर शेअरिंग, खासगी वाहतूकदारांना बुकिंगची परवानगी, प्रवास भाडे आकारणीसाठी कार्ड सुविधा आदी आकर्षक योजना राबविल्यास शेकडो कोटी रुपयांच्या तोट्यात अडकलेली एसटी बाहेर पडेल व अल्पावधीतच नफ्यामध्ये धावेल, असा विश्‍वास भोसरीतील केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेने (सीआयआरटी) व्यक्त केला आहे. विविध प्रकारचे सर्वेक्षण, तुलनात्मक अभ्यासातून त्यांनी एसटी महामंडळाला उपाययोजनाही सुचविल्या आहेत. 

दिव्यांगांचा डबा काढल्याने प्रवाशांची गैरसोय

पिंपरी - सिंहगड आणि प्रगती एक्‍स्प्रेसला दिव्यांगांसाठी असणारे डबे रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीसाठी काढल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. दरम्यान, सिंहगड एक्‍स्प्रेसला अपंगांसाठीचा एक डबा कार्यरत असून, दुसरा डबा लवकरच बसवण्यात येणार आहे. प्रगती एक्‍स्प्रेसचा एक डबा मंगळवारपासून बसवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

बाजारपेठा सजल्या साखरगाठींनी

पिंपरी - साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि हिंदू नववर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडव्यानिमित्त शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. गाठी, गुढीचे साहित्य, काठी यासह पाडव्यासाठी नवी उत्पादने खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी उसळली आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेबरोबर कारागिरांच्या मजुरीच्या दरात वाढ झाल्याने साखरगाठी महागल्या आहेत.

Man Infraconstruction receives orders worth Rs 220.75 crore from PCMC

Man Infraconstruction has received orders worth Rs 220.75 crore from Pimpri Chichwad Municipal Corporation (PCMC) for the construction of 2,376 residential units within the jurisdiction of PCMC under the Pradhan Matri Awas Yojna (PMAY) housing scheme.

Kalewadi-Pimpri Rd mired in traffic chaos

Haphazard parking, illegal halting of pvt tourist buses, rampant traffic violations and unauthorised hawkers add to the mess

Chinchwad petrol pump battles slur on social media

Jaihind has been falsely implicated in a viral video showing a Ulhasnagar outlet indulging in pilferage

Staff working at the Jaihind Highway Service Station — a petrol pump near Chinchwad railway station — have been receiving strange stares from customers over the last three days. The hint seems to be that the men at the pump are engaging in unscrupulous acts.

शहरातील १ लाख १३ हजार मिळकतींना जप्तीची नोटीस

पिंपरी (Pclive7.com):- मिळकत कराची थकबाकी ५ हजार रुपये पेक्षा अधिक असणाऱ्या मिळकतधारकांना नोटीसा बजाविल्यानंतरही सात दिवसांच्या आत मिळकत कराची रक्कम भरणा केली नाही. त्यामुळे अशा १ लाख १३ हजार मिळकतधारकांना जप्तीच्या नोटीसा बजावण्यात येत आहेत. त्यानंतर मिळकतीवर जप्तीची कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती कर संकलन विभागाचे सहआयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

Corporators' wait to add budget proposals still on

PIMPRI CHINCHWAD: The civic body’s general body meeting was postponed on Saturday for the third consecutive time. This time, the BJP’s dilemma over including supplementary proposals in the 2018-19 civic budget was the reason.

BJP MLA pushes for development in Wakad, Sangvi

PIMPRI CHINCHWAD: Efforts will be made to include Wakad and Sangvi areas also in the area based development component of the Smart City project to be implemented in Pimpri Chinchwad, BJP MLA Laxman Jagtap told TOI.

Event: Computational Science Symposium 1-day conference on CS for Science from ThoughtWorks’

This year, ThoughtWorks’ Engineering for Research arm is organizing the first Computational Science and Engineering Symposium. The forum will host scientists and researchers from across scientific disciplines, alongside engineers and technologists to discuss and design solutions for computation challenges. We see this as the beginning of a computational-science community building exercise in Indian context.

यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे चिंतन करण्याची गरज – सचिन साठे

पिंपरी (Pclive7.com):- अखंड लोकशाही गुण्यागोविंदाने वृध्दींगत व्हावी म्हणून घटना समितीने राजकीय सत्तेवर कायद्याने मानवी हक्क अबाधित ठेवणारी बंधने घातली आहेत. सत्तास्थान हे लोककल्याणाचा एक मार्ग आहे. त्यामुळे सत्ताधा-यांनी आपले काम लोकशाही पध्दतीने चालले आहे कि नाही, याचे कठोर आत्मपरिक्षण नित्य केले पाहिजे. असे लोककल्याणाला मार्गदर्शक ठरणारे विचार यशवंतराव चव्हाण यांचे होते. आज त्यांच्या विचारांचे सर्व सत्ताधा-यांनी चिंतन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केले. 

झी मराठी सारेगमप विजेता अक्षय घाणेकरने केले जलपर्णीमुक्त पवना अभियानात श्रमदान

पिंपरी (Pclive7.com):- रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम’ या अभियानाला १२८ दिवस पूर्ण झाले. रविवार दि.११ रोजी केजुबाई बंधारा थेरगाव बोट क्लब येथे १२८ वा दिवस उत्साहात पार पडला. आजवर या अभियानात संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवला आहे. रविवारी झी मराठी सारेगमप घे पंगा कर दंगा विजेता अक्षय घाणेकर या अभियानात सहभागी झाला.

ना जंगलांचा -हास, ना धुराची कटकट; पिंपळोली गावात सुरु झाले 18 बायोगॅस प्रकल्प

रोटरी क्लब ऑफ निगडीचा नाविन्यपूर्ण उपक्रम
निर्भीडसत्ता न्यूज –
ग्रामीण भागातील महिलांना वरदान ठरणारा बायोगॅस प्रकल्प रोटरी क्लब ऑफ निगडी आणि जिल्हा परिषद कृषी विभाग पुणे यांच्या वतीने मुळशी तालुक्यातील पिंपळोली शेळकेवाडी येथे सुरु करण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने पिंपळोली शेळकेवाडी गावात तब्बल 18 बायोगॅस प्रकल्प पूर्ण झाले असून त्याच्या वापरास सुरुवात करण्यात आली आहे.

पिंपळे निलख आणि रावेत येथील पदपथाची रचना आधुनिक पद्धतीने करणार – पक्षनेते एकनाथ पवार

पिंपळेनिलख आणि रावेत येथील पदपथाची रचना पुणे महापालिकेच्या धर्तीवर नव्याने आधुनिक पद्धतीने पिंपरी-चिंचवड महापालिका करणार आहे. प्रायोगिक तत्वावर पिंपळेनिलख आणि रावेत येथील पदपथाचे काम करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पदपथवार पार्किंगची व्यवस्था, नागरिकांना चालण्यासाठी जागेस प्राधान्य, बाकडे, दिशादर्शक फलक असणार आहेत. तसेच पदपथाचे सुशोभीकरण देखील केले जाणार आहे, अशी माहिती सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकारांना दिली.

डांगे चौकातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ग्रेडसेप्रेटर करा; आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अधिका-यांना सूचना

डांगेचौक येथील वाहतुकीची समस्या भेडसावत आहे. या वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी डांगे चौक येथे ग्रेडसेप्रेटर करण्याच्या सूचना पिंपरी चिंचवड भाजपचे शाहराद्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी अधिका-यांना दिल्या. महापालिकेच्या आयुक्त कार्यालयात आज (सोमवारी) बैठकीतचे आयोजन करण्यात आले होते.

सांगवीत आजी-माजी नगरसेवकांत जुंपली

पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे आलेल्या नैराश्‍येतून स्मशानभूमी तसेच रस्त्यांची कामे अडविली असल्याचा आरोप करत भाजपच्या स्थानिक चारही विद्यमान नगरसेवकांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे धाव घेत दाद मागितली.