Monday 28 August 2017

टीम PCCF तर्फे घरकुल, चिखली येथे शून्य कचरा विषयावर प्रबोधन

Waste Composting Awareness session by Team PCCF at Gharkul Housing Society, Chikhali. Session to enlight & encourage citizen on home composting. अतिशय वेगळ्या पद्धतीने घरकुल, सेक्टर 17-19 चिखली येथील साई हौसिंग सोसायटीने त्यांचा वर्धापन दिन साजरा केला. वर्धापनदिनाचे औचित्य साधून बाबासाहेब काळे, समन्वयक पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम यांनी शून्य कचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांचे शंकानिरसन, प्रात्यक्षिक यातून प्रबोधन केले. यावेळी प्रमुख पाहुणे श्री. नितिन यादव (संस्थापक अध्यक्ष अखिल महाराष्ट्र माहिती अधिकार समिती, महाराष्ट्र राज्य) जागृत नागरिक महासंघ पुणे, विशेष कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. मान्यवरांनी या प्रसंगी सोसायटीच्या नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले

पिंपरी-चिंचवडची शिब्रा तुपके झाली 'मिस एशिया पॅसिफिक'

Congratulations Shibra, You have made us all PCMCkar proud of your super achievement Your hard work has surely paid off. Keep achieving more success पिंपरी-चिंचवडची शिब्रा तुपके झाली 'मिस एशिया पॅसिफिक'. पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात मानाचा तुरा... मराठी चित्रपट करण्याची शिब्राची इच्छा
Image may contain: 1 person, standing

विमानतळ, रेल्वे स्थानकांवर फळविक्री केंद्रे उभारू - नितीन गडकरी

मुख्यमंत्री घेणार पदाधिकाऱ्यांची “शाळा’

राज्यभरातील महापालिकांच्या कामाचा स्वतंत्र आढावा
प्रभात वृतसेवा
पुणे, दि. 27 – राज्यसरकारला तीन वर्षे पुर्ण होत असल्या निमित्ताने आणि पुढील दोन वर्षात येत असलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकींच्या तयारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभरातील महापालिका पदाधिकाऱ्यांची शाळा घेणार आहे. या महापालिकांच्या कामकाजाचा आढावा घेण्या बरोबरच राज्यशासनाची मागील तीन वर्षातील कामगिरीचा आढावा सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी मिरा-भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधीनी मध्ये प्रत्येक महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची आणि शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची तीन दिवसांची कार्यशाळा घेतली जाणार आहे. या कार्यशाळेसाठी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना नुकत्याच सूचना देण्यात आल्या असून मागील सहा महिन्या केलेल्या कामांचा आढावा तयार ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

मंदीचा फटका

पिंपरी - नोटाबंदी, जीएसटी यामुळे उद्योग धंद्यावर परिणाम झाल्याने वर्गणीदारांनी आखडता हात घेतला. याचा फटका गणेश मंडळांना बसला आहे. याशिवाय बांधकाम व्यावसायिक, पतसंस्था या हमखास जाहिरात देणाऱ्यांनी देखील पाठ फिरविल्याने यंदा अनेक मंडळांनी देखावे सादर केले नाहीत. मात्र मोठ्या उत्साहात भर पावसात देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडलेल्या गणेश भक्‍तांचा हिरमोड झाला आहे.

सामाजिक उपक्रम हीच ओळख

– एसकेएफ मंडळ : स्त्री शक्‍तीवर जिवंत देखावा
पिंपरी – केवळ सार्वजनिक गणेशोत्सव नव्हे, तर वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविणारे गणेश मंडळ अशी चिंचवड येथील एसकेएफ इंडिया लिमिटेड गणेशोत्सव मंडळाची ओळख आहे. यंदा हे मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवाचे 47 वे वर्ष साजरे करत आहे.

'ती'ला सन्मान दिल्यास समानता प्रस्तापित - नितीन काळजे

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत बुद्धीची देवता गणरायाचे आगमन झाले आहे. त्यामुळे शहरात वेगळेच चैतन्य संचारले आहे. महिला सबलीकरण, स्त्री-पुरूष समानता हे शब्द कागदावरच न रहाता, प्रत्येक नागरिकांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी, समान वागणूक ...

स्टेडिअमचे झाले गोदाम; छताला चिरे, आसन व्यवस्थेची दुरवस्था

आसनव्यवस्थेची दुरवस्था... मैदानावर वाढलेले गवत अन् अस्ताव्यस्त पडलेले साहित्य आहे. अशी दुरवस्था नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमची झाली आहे. औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची क्रीडानगरी म्हणून ...