Thursday 24 April 2014

PCMC areas expand, so do water needs

The population of the twin township has increased from a 2.49 lakh in 1982 to 17.29 lakh as per the 2011 census.

दापोडी-निगडी रस्त्यावर पडणार 3 कोटीचे डांबर!

पिंपरी-चिंचवड महापालिकेने गेल्या सात वर्षात निगडी ते दापोडी दरम्यानच्या पुणे-मुंबई महामार्गावर तब्बल 337 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. एवढेच नव्हे तर जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नाशिकफाटा चौकात सुमारे 120 कोटी रुपये खर्चून आधुनिक स्वरूपाचा उड्डाणपूल उभारला. त्यामुळे साडेअकरा किलोमीटर लांबीच्या महामार्गावर 457 कोटी रुपयांचा 'महाखर्च' झाला असताना आता महामार्गावरील डांबरीकरण व इतर कामांसाठी 3 कोटी रुपयांच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत.

निगडी-देहूरोड रस्त्याचे लवकरच चौपदरीकरण

पुणे-मुंबई जुन्या हायवेवर निगडी ते देहूरोड या रस्त्याच्या गेली अनेक वर्षे रखडलेल्या चौपदरी करणाच्या कामाला लवकरच मुहूर्त मिळणार आहे. या कामासह या रस्त्यावर सुमारे २८५ कोटी रुपयांची विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत.

वायसीएममधील 'शवागार' तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बंद

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील 'शवागार' तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बंद पडले आहे. वारंवार बंद पडणारे शवगार गोरगरीबांसाठी असून नसल्या सारखेच आहे. या शवगारासाठी माफक दर आहेत. इतरत्र रुग्णालयांत आकारले जाणारे अव्वाच्या सव्वा दर गरिबांना परवडणारे नाहीत. प्रशासनाच्या चुकीच्या पध्दतीमुळे शवगाराअभावी नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय.

पिंपरी आयुक्तांकडून कुदळवाडीमध्ये सफाई - तिसऱ्या दिवशीही मोहीम सुरूच

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी बुधवारी कुदळवाडी परिसरात साफसफाई करून तिसऱ्या दिवशीही साफसफाई मोहीम सुरु ठेवली.

प्रभाग सभापतिपदासाठी उदासीनता

पिंपरी : महापालिकेच्या सहा प्रभाग समितीच्या (क्षेत्रिय कार्यालय) सभापतिपदाची निवडणूक २८ एप्रिलला होत आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि सहयोगी पक्षाच्या इच्छुकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज मागवले होते. अर्ज सादर करण्याच्या मुदतीत केवळ चारच अर्ज आले असून, प्रभाग समिती सभापतिपदासाठीची उदासीनता त्यातून दिसून आली आहे.

कमी उंचीचे फलाट ठरतायेत प्रवाशांसाठी धोकादायक

पुणे-लोणावळा दरम्यान असणा-या बहुतांश रेल्वे स्थानकामधील प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे लोकलमधून चढणे-उतरणे प्रवाशांसाठी धोकादायक बनले आहे. मुंबईमध्ये काही महिन्यांपूर्वी  कमी उंचीच्या फलाटामुळे एका मुलीला आपले दोन्ही हात गमवावे लागल्याची घटना घडली होती. मात्र अजूनही रेल्वे प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने पाहत नाही अशी तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे.

वाबळे यांचा दाखला रद्द

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे भोसरी, इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक २९ चे नगरसेवक संजय वाबळे यांचा कुणबी जात पडताळणीचा दाखला रद्द ठरविणारा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. २७ जुलैपर्यंत वाबळे यांनी पडताळणी समितीकडे आवश्यक ते पुरावे सादर करून फेरपडताळणी प्रक्रिया करून घ्यावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. वाबळे यांच्या जात दाखल्याप्रकरणी प्रतिस्पर्धी उमेदवार योगेश भगवान लोंढे यांनी आक्षेप घेणारा दावा दाखल केला होता. त्याची सुनावणी झाली असून, या प्रकरणी शेवटपर्यंत न्यायालयीन लढा देण्याची भूमिका लोंढे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

अर्जाची मुदत संपणार असल्याची अफवा

पिंपरी : अकरावी वर्ग ऑनलाइन प्रवेशअर्ज भरताना थोडीशी जरी चूक झाल्यास तो स्वीकारला जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. याबाबत काही शाळांचे शिक्षक मार्गदर्शन व सहकार्य करीत नसल्याच्या विद्यार्थी व पालकांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यात अर्ज भरण्याची मुदत दहावी निकालापर्यंत नसून ३0 एप्रिलपर्यंतच असल्याची अफवा पसरल्याने अर्ज भरण्यासाठी त्यांची धांदल उडाली आहे.