Tuesday 7 August 2018

भक्ती-शक्ती चौक वर्षात सिग्नल फ्री

पिंपरी - निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात एकाच वेळी सुरू असलेले ग्रेड सेपरेटर आणि उड्डाण पुलाचे काम सुमारे ४० टक्के पूर्ण झाले असून, पुढील वर्षाच्या अखेरीला प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा चौक ‘सिग्नल फ्री’ होईल. चहूबाजूंनी येणारी वाहने वेगाने मार्गस्थ होत पादचाऱ्यांसाठीही जागा उपलब्ध होणार आहे. 

Why Pune, the city which approved its third metro line in March, faces pressure for route extensions

A little known fact about Pune is of the number of private vehicles plying its streets being greater than its official population. A ratio of 1.05 for the number of private vehicles per person in 2018 only highlights the need for an upgrade of its public transport system. It was with this in mind that the authorities approved a third Metro corridor (23.30 km in length) for the city in March, 2018. To be built under PPP mode, the project saw Tata Realty Infra Pvt Ltd-Siemens Project Ventures GmbH emerging as the winning private bidder last Friday. It would partner with the Pune Metropolitan Region Development Authority for the work.

“बॅचलर्स’ना निवारा मिळेना!

पिंपरी – देशभरातून पिंपरी-चिंचवड शहरात शिक्षण, नोकरीसाठी युवक मोठ्या प्रमाणात येत आहे. या विद्यार्थ्यांसाठी शहर नवीन असल्याने राहण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते. काही ठिकाणी “मध्यमवर्गीय’ व “उच्चभू’ सोसायटीधारक युवकांना भाड्याने घर देण्यास नकार देत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे, सरसकट सर्व विद्यार्थ्यांना दोषी ठरवून राहण्यासाठी नकारघंटा वाजविणे चुकीचे असल्याचे, मत अनेक विद्यार्थ्यांनी “प्रभात’शी बोलताना सांगितले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस उपायुक्त पदावर स्मार्तना पाटील

पिंपरी-चिंचवडनव्याने सुरु होणाऱ्या पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस उपायुक्त पदावर स्मार्तना पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी (दि. 27) काढलेल्या आदेशानुसार नम्रता पाटील आणि विनायक ढाकणे यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे स्मार्तना पाटील पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दुस-या महिला पोलीस आयुक्त आहेत.

‘पवना’ फुल्ल, टेन्शन गुल

पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासीयांची तहान भागवणारे पवना धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, पुढील वर्षभराचे पाणीटंचाईचे टेन्शन आता दूर झाले आहे. धरणातील पाणीसाठा ९९.५० टक्के झाला असून १३०० क्युसेक्स वेगाने विद्युत निर्मितीसाठी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत पावसाच्या जोर पुन्हा वाढल्यास नदीपात्रात पाणी सोडले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

वृक्षमित्रांनी काढली अंतयात्रा

पिंपरी : विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करणार्‍या शहर आणि परिसरात यमुनानगर अवैध वृक्षतोड मोठया प्रमाणावर सुरू आहे. वृक्षतोडीबाबत अनेक कायदे आणि नियम असले तरीही ते डावलून वनखात्याच्या कार्यक्षेत्रातच सुरू झालेल्या वृक्षतोडीमुळे या खात्याच्या कार्यदक्षतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या अवैध वृक्षतोडीचा निषेध म्हणून शहरातील काही वृक्षप्रेमी नागरिक एकत्र आले. व वृक्षाविषयी असलेले प्रेम अशा सहवेदक वृक्षमित्रांनी आज प्रतिकात्मक अंतयात्रा काढली. मोशी स्पाईन येथे ही अंतयात्रा काढण्यात आली. यामध्ये वृक्षमित्र, भुगोल फाऊंडेशन, आंघोळीची गोळीयांचेही सभासद यावेळी उपस्थित होते. या अवैध वृक्षतो़डीचा निषेध करण्यासाठी डॉ. संदीप बहोत, प्रशांत राऊळ, प्रवीण जाधव, सूर्यकांत मुथियान, धनंजय शेंडबाळे, अशोक तनपुरे, संदीप रांगोळे, दिलीप राजपुत, हृषीराज डोंगरे, संदीप पाटील, महेश मैंदनकर, शरद सोनवणे, समीर कालेकर, निकल रेंगे आदी उपस्थित होते.

तांत्रिक बिघाडामुळे दुपारी शहर ‘अंधारात’

महापारेषण कंपनीच्या लोणीकंद ४०० केव्ही उपकेंद्रात सोमवारी दुपारी एक वाजता तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पुणे जिल्ह्यातील २२० केव्ही आणि १३२ केव्ही क्षमतेचे २९ अतिउच्चदाब उपकेंद्र बंद पडले. त्यामुळे शहरातील काही भागांसह पिंपरी चिंचवड, भोसरी, चाकण, सणसवाडी, रांजणगाव एमआयडीसी आदी परिसरातील वीजपुरवठा सुमारे सव्वातास खंडित झाला.

ढोल पथकांवर कारवाईचे संकेत

पुणे : पुढील महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तयारीसाठी शहरात नदीपात्रामध्ये आणि इतर मोकळ्या मैदानांमध्ये विनापरवाना सराव करणाऱ्या पथकांवर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत पुण्याचे नवनियुक्त पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी सोमवारी दिले. शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सध्या अनेक ढोल-ताशा पथकांकडून सराव सुरू आहे. अनेक पथकांनी परवाना न घेताच, गेल्या अनेक दिवसांपासून ढोलताशांचा सराव सुरू केला आहे. या सरावादरम्यान ढोलताशांमुळे होणाऱ्या आवाजाचा त्रास होत असल्याने स्थानिक नागरिकांनी त्या विरोधात पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याचे गाऱ्हाणे मांडण्यात येत आहे. त्या विषयी पोलिस आयुक्तांकडे विचारणा केली असता, त्यांनी विनापरवाना सराव करणाऱ्या ढोलताशा पथकांविरोधात नागरिकांनी तक्रारी केल्यास निश्चित कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आधार सक्‍ती रद्द

जिल्हा रुग्णालयांत दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी दिव्यांगांना आधार कार्डची सत्यप्रत सादर करणे सक्‍तीचे होते. पण आता ही अट सार्वजनिक आरोग्य विभागाने रद्द केली आहे. त्यामुळे त्यांना आता आधार कार्ड सादर करणे आवश्यक नसून रहिवासी पुरावा म्हणून इतर कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत. या नव्या निर्णयामुळे दिव्यांगांना दिलासा मिळाला आहे.

On first day in office, PCMC mayor says ‘sorry’

“My supporters were celebrating my victory... In their overenthusiasm, they threw bhandara (turmeric powder)... As it was raining, the road had become slippery, resulting in injuries to two-wheeler riders,” the mayor said


Turmeric, rainwater 'cocktail' fete at PCMC office has commuters skidding on roads

As many as eighteen commuters fell down while manoeuvring their vehicles on the road, which was covered with a thick layer of mud, turmeric and gulal, used by the supporters of newly elected mayor Rahul Jadhav of Pimpri Chinchwad during his victory celebrations.

pune,maharashtra,pcmc

अखेर महापौर राहुल जाधव यांनी या घटनेवरून मागितली माफी

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपाचे राहुल जाधव यांची निवड झाल्यानंतर त्याचा आनंद साजरा करताना भाजपा कार्यकर्त्यांनी सुमारे १०० पोती भंडारा उधळून पालिका मुख्यालयाचा रंग पालटून टाकला होता. त्यातच पाऊस पडल्याने सर्वत्र पिवळा चिखल तयार झाला, त्याचा नागरिकांना त्रास झाला. काही दुचाकीस्वार घसरूनही पडले होते. अखेर महापौर जाधव यांनी माफी मागितली आहे. तसेच यापुढील काळात अशा घटना घडणार नाहीत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

भंडारा उधळणाऱ्या २०० जणांवर खटला

महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीनंतर पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्य भवनात जेसीबी लावून भंडारा उधळणाऱ्या २०० जणांवर पिंपरी पोलिसांनी खटला दाखल केला आहे. शनिवारी (४ ऑगस्ट) महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी मुक्तहस्ते भंडारा उधळला होता. त्यातच या वेळी पावसाचा शिडकावा झाला. यामुळे या भंडाऱ्याचा चिखल होऊन १७ ते १८ जण घसरून पडले होते. यामध्ये एका दिव्यांग कर्मचाऱ्याचा देखील समावेश होता. या सर्व प्रकारानंतर अग्निशमन विभागाला बोलावून रस्ता धुवून काढावा लागला होता.
case against 200 people

महापालिका डॉक्टरने केला खासगी दवाखाना

पिंपरी : महापालिकेच्या आस्थापनेवर असलेल्या वायसीएमएच् रुग्णालयातील शल्यचिकित्सक डॉ. संजय विजयराव पाडळे हे बिबेवाडी येथे खासगी दवाखाना चालवित आहेत. तसेच पालिकेकडून व्यवयायरोध भत्ता (छझ-)देखील घेत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या दोन वेतनवाढ स्थगित करण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला असून त्यांच्याकडून आठ लाख 24 हजार 297 रुपये व्यवयायरोध भत्ता वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे कोणत्याही स्वरुपाचे कार्यालयीन कामकाजामध्ये गैरवर्तन केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर जबर शास्तीची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच याची नोंद पाडळे यांच्या सेवा पुस्तकात करण्यात येणार आहे.

उपलेखापालासह तिघांची वेतनवाढ स्थगित : आयुक्त

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएमएच्) रुग्णालयातील आर्थिक अनियमिततेस जबाबदार असणार्‍या उपलेखापाल, मुख्य कारकून, दोन कारकून अशा चार जणांची वेतनवाढ स्थगित करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला. उपलेखापाल बबलू भिमराव तेलंगी, मुख्य कारकून काळुराम पांडुरंग बवले, कारकून सुरज विश्‍वनाथ पाटकर आणि इस्माईल अहमदमियॉ शेख अशी वेतनवाढ स्थगित केलेल्यांची नावे आहेत.

जन्म-मृत्यू दाखले देणार्‍या संस्थेस काळ्या यादीत टाकावे

नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली मागणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागांंतर्गत महानगर पालिका हद्दीतील नागरिकांच्या जन्म-मृत्यू नोंद ठेऊन, ते दाखले वितरीत केले जातात. हे काम ज्या संस्थेस देण्यात आले आहे त्या संस्थेला या कामाची माहिती नाही असे वाटते. आजपर्यंत करण्यात आलेल्या कामकाजाचा आढावा घेतला असता असे निदर्शनास आले की, संस्थेमार्फत अनुभव नसल्या कारणामुळे नागरिकांना दाखले मिळण्यासाठी अतोनात हाल होत आहेत. तसेच जन्म-मृत्यू नोंदी ठेवणे ही एक महत्वपूर्ण बाब आहे. कामामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा अपेक्षित नाही. तसेच हे कामकाज शासनाच्या ‘सर्व्हिस टू ऑदर’ या कायद्याअंतर्गत येत आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांवर ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे दंडात्मक कारवाई होऊ शकते. तरी आपण याची पडताळणी करावी, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले.

पोलीस आयुक्तालयासाठी आठ कर्मचार्‍यांची नियुक्ती

चिखलीसाठी 22 कर्मचार्‍यांची बदली

पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकीकरण वाढते आहे. औद्योगिक शहर असल्याने येथे कामधंद्यासाठी येणार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथील गुन्हेगारी ही दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळेच या शहरात पोलीस आयुक्तालय करावे, अशी मागणी राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्त्यांकडून वारंवार होत होती. आता नव्याने सुरु होत असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांपासून ते कर्मचार्‍यांपर्यंत नियुक्ती करण्यात येत आहेत. पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, पोलीस उप आयुक्त, पोलीस निरीक्षक यांच्या बरोबरच पोलीस कर्मचार्‍यांची देखील नियुक्ती करण्यात येत आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस फौजदार पदावरील 235 कर्मचार्‍यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आठ पोलीस कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलीस आयुक्तालयासोबत नव्याने सुरु होत असलेल्या चिखली पोलीस ठाण्यात 22 कर्मचार्‍यांची बदली करण्यात आली आहे.

Three civic bodies owe cops Rs 18 crore in bandobust fees

PUNE: The three civic bodies in the city owe the Pune police in excess of Rs 18 crore for the bandobust services provided to them during anti-encroachment and drives over the past few years.

Maval leaders stand against pipeline from Pavana dam

Pimpri Chinchwad: Shiv Sena, Bharatiya Janata Party (BJP) an ..

चिखलीतील घरकुलवासी टवाळखोरीने हैराण

चिखली - चिखलीतील घरकुलमध्ये प्रवेश केल्यावर काही इमारतींखाली पत्ते खेळणारे तरुण नजरेस पडतात.. रात्रीच्या वेळी उघड्यावर मद्यपान करणारेही सोळा ते पंचविशीतील तरुण पाहायला मिळतात, नव्हे तर महिला आणि मुलींची छेडछाड करणारे गुंडांचे टोळकेही येथे आहे. परिणामी, घरकुल परिसरातील महिलांसह सर्वसामान्य नागरिक दहशतीखाली वावरत आहेत.

फ्यूज गेला असेल तर अंधारात बसा

पिंपरी - ‘या मोबाईलवर फोन करू नका, हा माझा पर्सनल नंबर आहे.’’ ‘‘एक फ्यूज गेली असेल तर अंधारात बसा.’’ ‘‘काम सुरू आहे, जरा दम धरा.’’ ही वक्तव्ये आहेत, महावितरण अभियंते व कर्मचाऱ्यांची.  

मोबाईल लोकअदालतीमुळे न्याय तुमच्या दारी...

पुणे - रमेश (नाव बदलले आहे) हडपसरमधील एक रहिवासी. पिंपरी - चिंचवड परिसरातून प्रवास करताना मोटर वाहन कायद्याचा भंग केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मागील ३ महिन्यांपासून खटल्याच्या कामकाजासाठी न्यायालयात अनेकदा जावे लागले, कामावरून सुटी न मिळाल्याने एकदा न्यायालयात हजर राहता न आल्याने समन्सही मिळाले.

बचतगटातर्फे मोफत शिवणकाम प्रशिक्षण

जुनी सांगवी : दापोडी येथील संघर्ष चँरीटेबल ट्रस्टच्या संघर्ष महिला बचतगटाच्यावतीने गरजु महिलांना मोफत शिवणकाम प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. गटाच्या माध्यमातुन गरजु महिलांना संस्थेच्यावतीने शिवणकाम प्रशिक्षण देण्यात येत आहे.

विविध रंगी साड्यांमध्ये खुलला “देस मेरा रंगिला’

पिंपरी – कुणी बारा बलुतेदारांची मक्तेदारी, तर कुणी गुजराती, मारवाडी चोली-घागरा पेश केला, कुणी कोकणी काष्टा, मालवणी कोळीण सादर केली, तर कुणी ठसकेबाज नऊवारी अन्‌ बेळगावी इरकलचा पदर उडविला, कुणी पांरपारिक सासू, तर कुणी आधुनिक सून मांडली…मग काय, विविधरंगी-ढंगी साड्यांमध्ये अख्खा “देस मेरा रंगिला’च दिसला.

#Betterindia: गाडी शोधण्यासाठी ऍपची मदत घ्या

वाहन पार्क करणे ही एक समस्याच मानली जाते. कारण गाड्यांच्या वाढत्या संख्येमुळे वाहन कोठे पार्क करावे, हा एक गंभीर प्रश्‍न चालकाला पडतो. जर गाडी योग्य रितीने पार्क केली नाही तर पोलिसांचा दंड बसतो किंवा अन्य गाडीमालकांची बोलणी खावी लागतात. चालक जर निपुण असेल तर कमी जागेतही चांगल्या रितीने गाडी पार्क करू शकतो. परंतु नवशिखा चालक असेल तर गाडी पार्क करताना जरा गोंधळ उडतो.