Wednesday 9 August 2017

Happy Birthday Dear Shrikar Pardeshi Sir!

MH14 News celebrating Dr Shrikar Pardeshi's birthday today! Wish him on his official support page
https://www.facebook.com/SupportDrShrikarPardeshi

DJ associations boycott festivals across the city

Sunil Ovhal, secretary of the Pune District Musical Band Association, lamented, “Recently, the Pune guardian minister appealed to the Pune and Pimpri-Chinchwad Ganpati mandals to celebrate this year's festival without DJ systems. Also, in the Pune ...

भंगार मालाच्या अनधिकृत दुकानांमुळे प्रदूषण

चिखली - कुदळवाडी- मोशी रस्त्याच्या दोनही बाजूने मोठ्या प्रमाणात भंगार मालाची अनधिकृत दुकाने थाटण्यात आली आहेत. या दुकानांना वारंवार आगी लागतात. रसायनमिश्रित पिंप धुतले जातात, त्यामुळे हवा आणि पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. परंतु, या दुकानांवर कारवाईच होत नसल्याने या अनधिकृत दुकानांनी सर्व परिसर व्यापला आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास भविष्यात नागरिकांना श्वास घेणेही मुश्‍कील होईल. 

म्हाडा कॉलनी-मोरवाडीतील बसशेड गायब

पिंपरी - पिंपरी गावातील स्वच्छतागृहांपाठोपाठ आता म्हाडा कॉलनी - मोरवाडी मार्गावरील एका टोलेजंग व्यापारी इमारतीशेजारील बसथांब्याचे शेड रात्रीतून गायब झाले. सकाळपासून थांबा जागेवर नसल्याने दिवसभर प्रवाशांकडून त्याची शोधाशोध सुरू होती. गेल्या काही महिन्यात महापालिकेच्या ‘प्रॉपर्टी’वर डल्ला मारण्याचे प्रकार सुरू असताना, महापालिका मात्र ‘मूग गिळून गप्प बसली’ असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दुसरीकडे बसथांबे पळवून नेण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

स्वातंत्र्य दिनानिमित्त लष्करी प्रात्यक्षिकांसह प्रदर्शनाचे आयोजन

पिंपरी – भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महापालिका व बॉम्बे इंजिनिरिंग ग्रुप खडकी यांच्या संयुक्‍त विद्यमानाने भारतीय लष्करी जवानांचे प्रात्यक्षिक व लष्करी साहित्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले असून, शालेय विद्यार्थी व नागरिकांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात आले आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे व आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी सभापती सीमा सावळे, सहआयुक्‍त दिलीप गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सीएमई हॅरिस पुलाजवळील वायू गळती नियंत्रणात

पिंपरी-पुणे-मुंबई महामार्गावर सीएमई हॅरिस पुलाजवळ मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र, एमएनजीएल वायू वाहिनीची झालेली गळती आता नियंत्रणात आली आहे. असे महामेट्रोच्या वतीने कळविले आहे. दरम्यान, महामेट्रोचे काम करताना याठिकाणाहून एमएनजीएल वायू वाहिनी गेलेली आहे. याबाबत कोणीही माहिती अगर कुठे फलक लावला नसल्याचा खुलासा महामेट्रोच्या वतीने करण्यात आला.

अन्‌ं आयुक्‍त झाले निःशब्द !

पिंपरी – बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला सहा वर्षे पुर्ण झाली. तरीही जलवाहिनी प्रकल्प रेंगाळलेला अवस्थेत असून, पालिकेचा या प्रकल्पावरील खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यासह प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामचुकार धोरणाकडे आयुक्‍त दुर्लक्ष करीत आहेत. त्यांचा प्रशासनावर कसलाही जरब राहिलेला नाही. त्यामुळे बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कधी मार्गी लागणार? बीआरटी मार्ग कधी सुरु होणार? अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामाला शिस्त कधी लागणार? या प्रश्‍नांना आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी बगल देवून त्यावर बोलण्यास आवर्जून त्यांनी टाळले.

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रखडल्याने महापालिकेचे अडीचशे कोटी गेले पाण्यात

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायिनी असणाºया पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प गेली नऊ वर्षांपासून रखडला आहे. भाजपाची सत्ता येऊनही पिंपरी-चिंचवड महापालिका व शेतकरी यांच्यात तोडगा निघालेला नाही. यामुळे जलवाहिनीसाठी ...

शहरबात पिंपरी-चिंचवड : पवना बंदनळ योजनेत उभयमान्य तोडगा हवा

पिंपरी-चिंचवड शहराला थेट पवना धरणातून पाणी आणण्याच्या (बंद नळ ) योजनेचे काम सहा वर्षांपूर्वी बंद पडले, ते पुन्हा सुरूच झाले नाही. मात्र, तरीही त्यासाठी तब्बल १४२ कोटी रूपये खर्च झालेले आहेत. कोणतेही नियोजन नसताना, पूर्णपणे जागा ...