Saturday 29 December 2018

शहरात ६५ टक्के रस्ते पदपथाविना

पिंपरी - शहरातील ६५ टक्के रस्ते पदपथविरहित असून वेगवेगळे अडथळे, असमान रचना, कचरा, राडारोडा, दुरवस्था, विक्रेत्यांची अतिक्रमणे, अशा गर्तेत सापडले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना धोकादायकरीत्या मार्गक्रमण करावे लागत असल्याचे वास्तव पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. 

‘नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल पहाटे पाचपर्यंत’ - आर. के. पद्मनाभन

पिंपरी - ‘‘नववर्षाच्या स्वागतासाठी सरकारने पहाटे पाचपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याचा अध्यादेश काढला आहे. यामुळे सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल,’’ असे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी सांगितले.

पिंपरीत इमारतीवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

पिंपरी : राहत्या घराच्या इमारतीवरून उडी मारून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. 27) सकाळी पिंपरीगाव येथे घडली. प्रथमेश विजय अबनावे (वय 17, रा. पिंपरीगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश याने तो राहत असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून गुरुवारी सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास उडी मारली. 

पीसीईटीच्या विज्ञान स्पर्धेत शिवाजी विद्यालय प्रथम

चिंचवड : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस.बी.पाटील कॉलेज ऑफ सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्समध्ये घेण्यात आलेल्या विज्ञान, वाद-विवाद आणि प्रश्‍नोत्तर स्पर्धेत देहूरोड येथील शिवाजी विद्यालयाला प्रथम क्रमांक मिळाला. तर एस.बी.पाटील कनिष्ठ विद्यालयास द्वितीय आणि एच.ए.स्कूलला तृतीय क्रमांक मिळाला. या स्पर्धेस शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी) चे विज्ञान अधिकारी वैभव घोलप यांच्या हस्ते विजेत्या संघांचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. 

31 डिसेंबरला रुफ टॉप पार्ट्यांना परवानगी नाही

पिंपरी : राज्य शासनाच्या आदेशानुसार हॉटेल्सच्या रुफ टॉपवर केल्या जाणर्‍या पार्ट्यांना प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. मोकळ्या आणि बंदिस्त जागेत 31 डिसेंबरच्या पार्टीला परवानगी देण्यात आली आहे. तसेच मद्य विक्रीची परवानाधारक दुकाने पहाटे दीड वाजेपर्यंत तर हॉटेल्स पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तरुणाईने मोठ्या प्रमाणात नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी केली आहे. नववर्षाचे स्वागत करताना कायदा आणि सुव्यवस्था पाळण्यासाठी प्रशासन देखील विविध पातळ्यांवर सज्ज झाले आहे. हॉटेल, मद्य विक्रीची दुकाने यापासून ते मद्यपींवर होणार्‍या कारवायांबाबत देखील पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. सध्या 15 पोलीस ठाण्यांमध्ये 15 ब्रीद अ‍ॅनालायझर आहेत. त्यापैकी आठ नादुरुस्त आहेत. तसेच ऑनलाइन चलन करण्यासाठी 63 यंत्रे आहेत. आणखी 145 यंत्रांची मागणी पोलिसांनी सरकारकडे केली आहे. त्यामुळे वाहनचालक तळीरामांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने ११ महिन्यात पाडली तब्बल १ हजार ५५ अनधिकृत बांधकामे

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने २०१८ मधील ११ महिन्यात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी २५१ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल केले असून १०५५ अनधिकृत बांधकामे पडली आहेत. तर ५३४८ बांधकामधारकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

Pimpri: भाजपच्या नाकर्तेपणामुळेच शहरातील संरक्षणखाते विषयक प्रश्न प्रलंबित

एमपीसी न्यूज – संरक्षण मंत्रालयाशी संबंधित महाराष्ट्रातील प्रलंबित विकास कामांविषयी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या बैठकीत पुण्यातील संरक्षण विषयक प्रश्न मार्गी लागले. परंतु, पिंपरी-चिंचवड शहरातील संरक्षणखाते विषयक सर्व प्रश्न प्रलंबित आहेत. यासाठी शहरातील भाजपच्या बेजबाबदार पदाधिका-यांनी पाठपुरावा केला नाही. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच शहरातील संरक्षण विषयक प्रश्न प्रलंबित राहिले असल्याचा आरोप राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी केला

Pimpri : वाढीव दराच्या नावाखाली कोट्यवधीची लूट; ‘सीआयडी’ चौकशीची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत शहरातील रस्ते विकास कामात मूळ अंदाजीत खर्चात वाढीव दराच्या नावाखाली पदाधिकारी, अधिकारी, ठेकेदार आणि सल्लागार संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार व भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करत या प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) मार्फत चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. 

महामार्गावर एकाचा खून

पिंपरी : पुणे-मुंबईवरील बावधन परीसरात एका अनोळखी व्यक्तीचा खून झाला आहे. ही घटना बावधन उघडकीस आली. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नसून व्यक्तीचे वय अंदाजे 45 ते 50 वर्ष आहे. अंगावर निळ्या रंगाची हाफ पॅन्ट, चॉकलेटी रेघा असलेला पांढरा शर्ट आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी पुणे-मुंबई महामार्गावर बावधन येथे सर्व्हिस रस्त्यावर एक अनोळखी इसम मृतावस्थेत पडलेला आढळून आला. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. 

सांगवीच्या पाच पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

पिंपरी चिंचवड : पोलीस आयुक्तालयात पुन्हा फेरबदल करण्यात आला आहे. दोन पोलीस उप आयुक्तांसाह तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दोन पोलीस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस उपनिरीक्षक अशा एकूण दहा अधिकार्‍यांच्या अचानक बदल्या करण्यात आल्या आहेत. या दहा अधिकार्‍यांमध्ये पाच अधिकारी सांगवी पोलीस ठाण्यातील आहेत. अचानक एकाच पोलीस ठाण्यातील पाच अधिकार्‍यांची बदली झाल्याने पोलीस वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. 

सात अल्पवयीन मुलांकडून मौजमजेसाठी चोरलेल्या 56 सायकल जप्त

पिंपरी चिंचवड : मौजमजेसाठी सायकल चोरी करणार्‍या सात अल्पवयीन मुलांकडून 4 लाख 17 हजार 500 रुपये किमतीच्या 56 सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई निगडी पोलिसांनी केली. जप्त करण्यात आलेला यामुळे निगडीतील चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. याबाबत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी माहिती दिली.

गुणवंत कामगार परिषदेचे जानेवारीत अधिवेशन

पिंपरी – कामगारांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी, त्यांच्या मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी राज्यव्यापी गुणवंत कामगार कल्याण विकास परिषदेचे जानेवारी 2019 मध्ये दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन घेण्यात येणार आहे. स्वागताध्यक्षपदी भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, अध्यक्षपदी भारती चव्हाण यांची निवड करण्यात आल्याची माहिती कामगार नेते यशवंत भोसले यांनी दिली.

महापालिकेचा सांडपाणी पुनर्वापर आराखडा तयार

पिंपरी – पिंपरी – चिंचवड सह हिंजवडी, चाकण आणि तळेगाव – दाभाडे एमआयडीसीत रोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचे पुनर्चक्रिकरण व पुनर्वापर प्रकल्प उभारण्याचा आराखडा महापालिकेने तयार केला आहे. त्यानुसार, कासारवाडी व चिखलीत प्रकल्प प्रस्तावित असून सहा ठिकाणी जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून रोज 312 दशलक्ष लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आहे.

December 2019 deadline: MahaMetro struggles to find sponsors for stations in Pune

Racing against time to meet the December 2019 deadline to launch the Pune Metro, officials are struggling to find sponsors for Metro stations, with the corporate sector in the city giving it a cold response.

सांगवीतील पी. डब्ल्यू. डी. मैदानावर ‘अटल महाआरोग्य शिबिर २०१९’ चे आयोजन

महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्य संयोजक आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वतीने मोफत ‘अटल महाआरोग्य शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे.
शिबीर सांगवी येथील पी. ड्ब्लु. डी मैदानावर ११, १२ व १३ जानेवारी २०१९ रोजी होणार आहे. ‘’अटल महाआरोग्य शिबीरा’’ मध्ये विशेषतः गंभीर आजारावर लक्ष्य केंद्रित केले असून, त्यात हृदयरोग, शस्त्रक्रिया व प्रत्यारोपण, किडनी विकार व प्रत्यारोपण, लिवर प्रत्यारोपण, कॅन्सर व शस्त्रक्रिया आदी आजारांवर गोर-गरीब रुग्णांसाठी शस्त्रक्रिया पूर्णत: मोफत करण्यात येणार आहेत.

पुणे ते लोणावळा मार्गावर सीसीटीव्ही

केंद्र सरकारच्या निर्भया फंड अंतर्गत पुणे - लोणावळ्याच्या दरम्यान असणाऱ्या सर्व पंधरा स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. प्रवासादरम्यान सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने हे कॅमेरे बसवण्यात येणार असून, मार्च २०१९ पर्यंत हे काम पूर्ण केले जाईल,' अशी माहिती रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलींद देऊस्कर यांनी दिली. 

वल्लभनगर आगाराचे पालटतेय रूप

पिंपरी - नवीन नळ, आकर्षक टाइल्स, बेसिन, दरवाजे, इलेक्‍ट्रिक फिटिंग्ज, सीसीटीव्ही कॅमेरे, रंगकाम यांसारख्या कामांमुळे एसटी महामंडळाच्या वल्लभनगर आगारातील वाहकांना विश्रांती घेण्यासाठीच्या जागेचे रूप पालटले आहे. गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेले काम अंतिम टप्प्यात आले आहे. 

केबल व्यावसायिकांमध्ये संभ्रम

पिंपरी - भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी नव्याने जाहीर केलेले नियम शनिवारपासून (ता. २९) लागू होणार आहेत. मात्र, या नियमांचे नेमके स्वरूप स्पष्ट नसल्यामुळे ग्राहकांसह केबल व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. 

हिंजवडीत भूसंपादन रखडले

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियोजित नव्या रस्त्याचे काम भूसंपादनाअभावी अडकले आहे. 
मर्सिडीज बेंझ शोरूम ते माणदरम्यान नवा सहा किलोमीटरचा रस्ता प्रस्तावित आहे. मात्र, केवळ दोन किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित चार किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी एमआयडीसीला १४.४ हेक्‍टर जमिनीची आवश्‍यकता असून, त्याचे संपादन ‘पीएमआरडीए’कडून करण्यात येणार आहे. मात्र, ही जमीन अद्याप ‘एमआयडीसी’ला मिळाली नसल्याने रस्त्याचे काम अडकून पडले आहे. या ठिकाणी सहा लेनचा रस्ता प्रस्तावित आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शिवाजी व भूमकर चौकातील वाहतूक कोंडी कमी होईल.

श्‍वान नसबंदीची आकडेवारी संशयास्पद

पिंपरी – महापालिकेने मागील चार वर्षात श्‍वान नसबंदीवर कोट्यावधी रुपये खर्च केले असताना शहरात श्‍वानांची संख्या वाढत आहे. श्‍वान नसबंदीची आकडेवारी संशयास्पद असून याची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्तेमारुती भापकर यांनी महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महापालिका कंत्राटी कामगारांच्या हाती

पिंपरी – महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी व मानधन तत्वावर कर्मचारी नेमणूक मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. यामध्ये 4 हजार 347 कर्मचारी हे कंत्राटी तत्त्वावर; तर 815 कर्मचारी मानधन तत्त्वावर महापालिकेत कार्यरत आहेत. ही संख्या एकून कर्मचाऱ्यांच्या 39 टक्के एवढी आहे. त्यामुळे महापालिकेतील सुरक्षित वाटणारी कायमस्वरुपी नोकरी सुशिक्षित बेरोजगारांसाठी आता दिवास्वप्न ठरले आहे. मात्र, या कंत्राटी कामगारांना किमान वेतनही मिळणे अवघड झाले आहे.