Monday 1 May 2017

पिंपरी-चिंचवड शहरात उद्यापासून पाणीकपात

पिंपरी - पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरात 25 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे मंगळवारपासून (ता. 2 मे) दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असून, त्यासाठी महापालिकेने वेळापत्रक जाहीर केले आहे. 

बसपाससाठी 'पीएमपी'ला अडीच कोटी

पिंपरी : विविध प्रकारच्या सवलतीच्या दरातील पासपोटी सुमारे दोन कोटी ३७ लाख रुपये इतकी रक्कम पिंपरी-चिंचवड महापालिका पुणे महानगर परिवहन महामंडळाला अदा करणार आहे. पीएमपीतर्फे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नागरिक, ...

पिंपरी चिंचवड आरटीओचा बोजवारा

बेल्हे, दि. 30 (वार्ताहर)-गेल्या पंधरा दिवसांपासून पिपरी-चिंचवड आरटीओच्या खासगी वाहन विभागात ग्राहकांची कामेच होत नाहीत. या आरटीओत कामाचा पूर्णपणे बोजवारा वाजल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पिपरी-चिंचवड आरटीआतील मनमानी कारभारामुळे वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून त्याचा त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. पिंपरी-चिंचवड आरटीओत माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना शासन आदेशा प्रमाणे स्पीड गव्हर्नर (वेग वहातुक नियंत्रक) वाहन पासिंग करतांना सक्तीचे करण्यात आले, मात्र याबाबत अंमलबजावणी करताना पिंपरी चिंचवड व पुणे तसेच बारामती या कार्यालयात वेगवेगळे निकष लावून अंमलबजावणी होत असल्याने वाहनधारकांमध्ये सभ्रम निर्माण होत आहे.