Thursday 30 January 2014

मुख्यमंत्री महोदय, कर्तबगार अधिकाऱ्याच्या मागे उभे राहाल?

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांस, 
स. न. वि. वि. 
"राजकारणात असूनही स्वच्छ प्रतिमा असलेले नेते' अशी आपली ख्याती पार देशभर झाली आहे. ती तशी असल्यानेच एका कार्यक्षम अधिकाऱ्याबाबतचे गाऱ्हाणे तुमच्या कानी घालण्यासाठी हा पत्रप्रपंच मी करतो आहे. 

Will you not support an efficient bureaucrat, Mr Chief Minister?

Dear mr Prithviraj Chavan, Your have won accolades as a leader with a clean image.

Rs 470-crore budget for PCNTDA gets approval

The Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) on Tuesday approved the annual draft budget for 2014-15 with a total outlay of Rs 470.42 crore.The budget shows a surplus of Rs 105.42 crore.

High prevalence in Pimpri Chinchwad

Of the 777 new cases the state health department recorded in Pune district last year, over 60% were multibacillary, which means they had progressed to an advanced stage.

'रेडझोन हटाव'ने दणाणला भक्ती-शक्ती चौक

अण्णांच्या अनुपस्थितीत झाले जनआंदोलन    
रेडझोनची हद्द कमी करण्याच्या मागणीसाठी रेडझोन संघर्ष समितीच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात आयोजित जनआंदोलनाला रेडझोनबाधितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 'रेडझोन हटाव'चा नारा देत या प्रश्नी संरक्षण खात्याने तातडीने बैठक न बोलविल्यास खासदार,

परदेशींची बदली थोपविण्यासाठी नेटिझन्स सरसावले

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्‍त डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली थांबविण्यासाठी सर्व राजकीय पक्षाबरोबरच फेसबुक, ट्विटर, वॉट्‌स अपसारखे सोशल मीडिया सरसावलेला दिसत आहे. काही दिवसांत हजारो "लाइक' आणि शेकडो "कॉमेंट्‌स' सोशल मीडियावर जागृत नागरिकांनी केल्याने आता तरी बदली रद्द करा; अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा नेटिझन्सनी दिला आहे. पुण्यातील "इंडिया अगेन्स्ट करप्शन'चे यतीश देवादिगा यांनी chn.ge/Kkcv69 ऑनलाइन सह्यांची याचिका नेटिझन्ससमोर ठेवली आहे. आतापर्यंत या याचिकेवर सुमारे एक हजारांहून अधिक जणांनी ऑनलाइन स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यावर प्रतिक्रिया दिल्यानंतर थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार व महापौर मोहिनी लांडे यांच्या "ई-मेल'वर "नोटिफिकेशन' जाणार आहे. विशेष म्हणजे देश-विदेशातून सोशल मीडियावर लाइक होत असून, आयुक्‍तांच्या विरोधात एकही प्रतिक्रिया औषधालाही सापडत नाही; तर निगडी-प्राधिकरण सिटिझन्स फोरमचे अमोल देशपांडे यांनी facebook.com/SupportDrShrikarPardeshi ही फेसबुकवर लिंक निर्माण केली आहे. त्यावर बाराशेहून अधिक नागरिकांनी लाइक केले आहे. 

श्रीकर परदेशी यांच्यापाठोपाठ योगेश म्हसे यांच्या बदलीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जोर

पिंपरी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मुदतपूर्व बदलीसाठी राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी जोर लावला असल्याची माहिती पुढे आली आहे.

आयुक्त बदलीविरोधात आंदोलन तीव्र करणार

पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची संभाव्य बदली रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवायचे आणि टप्प्याटप्प्याने ते तीव्र करायचे, असा निर्णय बुधवारी शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. आयुक्तांना पाठिंब्यासाठी उद्यापासून शहरातील चौकाचौकांत सह्यांची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उद्या शहरात असून त्यांनीही या मोहिमेत सहभागी व्हावे, असा प्रयत्न आहे. 

सांगवी बसस्थानक महिनाभरात सुरू


शिवाजीनगर बसस्थानकावर वाढलेला एसटीच्या वाहतुकीचा भार लवकरच कमी होणार आहे. येत्या महिन्याभरात सांगवी येथील बसस्थानक सुरू करण्यात येणार आहे. या नव्या स्थानकामुळे औेंध, सांगवी, वाकड भागातील प्रवाशांची सोय होणार आहे.

अ‍ॅबॅकस व वेदीक गणित स्पर्धेत ...

ऑराकिडस कंपनीच्या वतीने कोरेगाव पार्क येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय अ‍ॅबॅकस व वेदीक गणित स्पर्धेत चिंचवडच्या पॉवरमॅथसच्या दहा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये देशभरातून विद्यार्थी सहभागी झाले होते.

हातभट्टीवर पेटती काडी टाकली कोणी?

पिंपरी : निराधारनगरात हातभट्टी दारूनिर्मितीच्या साठय़ावर टाकलेल्या छाप्यात आरोपी नागेशचा सहभाग संशयास्पद असून, त्याच्यावरच आगीच्या दुर्घटनेबाबत गुन्हे दाखल झाल्याने या प्रकरणाची गुंतागुंत वाढली आहे. छापा टाकण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादनशुल्क विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या पथकातच आरोपी नागेशचा सहभाग असणे ही संपूर्ण प्रकरणाला कलाटणी देणारी घटना असल्याची चर्चा शहरात आहे. 

तुटलेल्या खुर्च्या, फाटलेले छत अन्‌ प्रवासी उन्हात

पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी दरम्यान पीएमपीच्या सुमारे 24 बसस्थानकांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.

पिंपरी चौकातील बसस्टॉप महिलांसाठी असुरक्षित

(अमृता ओंबळे)
पिंपरी चौकातील बसथांब्यावर रात्री साडेआठ नंतर बसची वाट पाहणे ही गोष्ट महिलांसाठी मोठी क्लेशदायक ठरत आहे. बसची वाट पाहताना आपल्या जीवावर उदार होत थांबावे लागत आहे. त्यातच काही रुटच्या बसची संख्या कमी असल्याने त्या बससाठी अर्धा-अर्धा

वाढदिवसाच्या खर्चाऐवजी प्रभागात बसविले 60 सीसी टीव्ही कॅमेरे

नगरसेवक समीर मासुळकर यांचा उपक्रम
नगरसेवक समीर मासुळकर यांच्या वाढदिवसानिमित्त समीर मासुळकर मित्र परिवाराच्या वतीने मासुळकर कॉलनी

ज्येष्ठ नागरिकांतर्फे निगडीमध्ये दोन विनोदी नाटिका सादर होणार

गेली दोन वर्षे सामाजिक विषयावरील नाटक सादर केलेल्या प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शुक्रवारी (दि. 31)  'नात्यात आलो गोत्यात' आणि 'विठ्ठल तो आला आला' या दोन विनोदी नाटिका सादर करण्यात येणार आहेत.

'पवनाथडी'त सर्व बचत गटांना सामावून ...

पवनाथडी जत्रेत गाळेवाटप करताना सर्व बचत गटांना सामावून घ्यावे, अशी मागणी शिवसेना नगरसेविका सुलभा उबाळे यांनी केली आहे.
नगरसेविका उबाळे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी तसेच महिला व