Monday 20 May 2013

मुंब्य्राची पुनरावृत्ती पिंपरीत नको- अजितदादांनी केले पाडापाडी कारवाईचे समर्थन

मुंब्य्राची पुनरावृत्ती पिंपरीत नको- अजितदादांनी केले पाडापाडी कारवाईचे समर्थन
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com

Bus Rapid Transit System delay cost Pimpri Chinchwad Municipal Corporation Rs100 cr: Corporator


Bus Rapid Transit System delay cost Pimpri Chinchwad Municipal Corporation Rs100 cr: Corporator

Kumar asked municipal commissioner Shrikar Pardeshi to order an inquiry. He said that if the inquiry is not initiated, he would write to chief minister Prithviraj Chavan and deputy chief minister Ajit Pawar.

Pimpri Chinchwad Municipal Corporation seeks its share of Pavana water

Pimpri Chinchwad Municipal Corporation seeks its share of Pavana water: Municipal commissioner Shrikar Pardeshi said, "We have written to the irrigation department to reserve water in Pavana dam for meeting the drinking water needs of Pimpri Chinchwad city up to July 31.

Rs 370cr property tax dues pending

Rs 370cr property tax dues pending: The Pimpri Chinchwad Municipal Corporation will initiate steps to recover property tax arrears worth Rs 370.53 crore accumulated till 2012-13.

अशोक मुंढे यांचा पिंपरी पालिकेला ‘रामराम’?

अशोक मुंढे यांचा पिंपरी पालिकेला ‘रामराम’?: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एलबीटीचे प्रमुख अशोक मुंढे प्रदीर्घ रजेवर गेले असून ते पुन्हा महापालिकेत रुजू होतील की नाही, याविषयी साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

एलबीटीप्रश्नी राष्ट्रवादीत फूट

एलबीटीप्रश्नी राष्ट्रवादीत फूट: चिंचवड : स्थानिक संस्था कराला (एलबीटी) आता राजकीय वळण आल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे. व्यापार्‍यांनी पुकारलेल्या बेमुदत बंदला पाठिंबा देण्यासाठी तर काही जण विरोध करण्यासाठी आक्रमक झाल्याने एलबीटीचा मुद्दा कळीचा विषय झाला आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाच्या नेतेमंडळींमध्ये एकमत नसल्याने परस्पर विरोधी भाष्य केली जात आहेत. आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यासपीठावर येऊन व्यापार्‍यांच्या बंदला पाठिंबा दिला.

व्यापारी नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोप शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी करीत आहेत. सोमवारपर्यंत दुकाने उघडली नाही, तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जबरदस्तीने दुकाने उघडतील असा इशारा शहराध्यक्ष योगेश बहल यांनी पत्रकार परिषदेतून दिला होता. फेडरेशन ऑफ पिंपरी-चिंचवड ऑफ असोसिएशनचे अध्यक्ष खासदार गजानन बाबर यांनी जशास तसे उत्तर देऊ असा पवित्रा घेतल्याने एलबीटीचा हा विषय प्रतिष्ठेचा ठरत आहे. शहरात व्यापार्‍यांच्या भूमिकेशी पाठिंबा देण्यासाठी मनसे, भाजप, शिवसेना व काँग्रेससह राष्ट्रवादीच्या काही नगरसेवक, पदाधिकार्‍यांनी व्यासपीठावर उपस्थित राहून पाठिंबा जाहीर केला. बहल व बाबर यांच्या अंतर्गत वादामुळे विरोधात बहल चुकीची भूमिका घेत असल्याचे मत व्यापार्‍यांनी व्यक्त केले. तोडगा काढण्यासाठी मी गृहमंत्री आर.आर. पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आज चर्चा करणार असून, व्यापार्‍यांच्या पाठीशी राहणार असल्याचे आमदार बनसोडे यांनी सांगितले. बहल यांच्या केलेल्या वक्तव्याविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

शॉपिंग मॉलमध्ये उच्चांकी गर्दी

शॉपिंग मॉलमध्ये उच्चांकी गर्दी: पिंपरी : एलबीटीच्या विरोधात बंदमुळे आज रविवार साप्ताहिक सुटीच्या दिवशीही सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय झाली. बाजारपेठा बंद असल्याने त्यांना किराणा मालाची खरेदी करता आली नाही. मात्र, दुसरीकडे शॉपिंग मॉलमध्ये खरेदीसाठी उच्चांकी गर्दी झाली होती.

बेदमुत बंदचा आजचा १२वा दिवस होता. साप्ताहिक सुटीमुळे बहुसंख्य नागरिक खरेदीस बाहेर पडतो. मात्र, शहरातील मुख्य बाजारपेठा बंद असल्याने त्यांना खरेदी करता आली नाही. ऐन लग्नाच्या हंगामात पिंपरी कॅम्प या मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट होता. चहाची टपर्‍या वगळता सर्वच दुकाने बंद होती.

चिखलीत सिलिंडर स्फोटाने एक जखमी

चिखलीत सिलिंडर स्फोटाने एक जखमी: चिखली : नादुरुस्त सिलिंडरची दुरुस्ती करतेवेळी अचानक भडका उडून त्याचा स्फोट झाला. सिलिंडरचा काही भाग पायावर आदळून एकजण गंभीर जखमी झाला आहे. चिखलीतील मोरेवस्तीमध्ये रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. अचानक झालेल्या या स्फोटामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. तर सिलिंडर दुरुस्तीसाठी आणणारे दोघेजण या स्फोटानंतर पसार झाले.

सफी अन्सारी (४0, रा. मोरेवस्ती, चिखली) असे या घटनेत जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांच्या डाव्या पायाचे हाड मोडले असून संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. मोरेवस्तीमध्ये भैरवी मेटल्स अँन्ड इलेक्ट्रीकल्स नावाचे दुकान आहे. सायंकाळी सव्वासातच्या सुमारास दोघेजण तेथे अडीच किलो वजनाचे सिलिंडर दुरुस्तीसाठी घेऊन आले. व्यावसायिकाने ते बाहेरच ठेवण्यास सांगितले. तेथे जाऊन तो त्यातील दोष शोधू लागला. परंतु, त्याचवेळी सिलिंडरचा भडका उडाला. चहूबाजूनी पेटलेले सिलिंडर विझविण्याचा प्रयत्न व्यावसायिक आणि अन्य नागरिक करू लागले. परंतु त्याचक्षणी त्याचा स्फोट झाला. दोन तुकडे झाले. बाजूलाच खरेदीसाठी आलेल्या सफी यांच्या पायावर एक तुकडा जोराने लागला. त्यामुळे गुडघ्याखाली त्यांच्या
पायाचे हाड मोडले आहे. नागरिकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. तर
दुसरा तुकडा इलेक्ट्रीकल्सच्या दुकानावर आदळल्याने शटरला मोठा खड्डा पडला आहे. (वार्ताहर)

दोन महिने पुरेल इतके पाणी

दोन महिने पुरेल इतके पाणी: - पवना धरणात ३३ टक्के साठा
पवनानगर : पवनाधरणात १९ मे रोजी ३३.४३ टक्के इतका पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा साठा ५ टक्केने जास्त आहे.

पिंपरी-चिंचवड, मावळ तालुक्यातील तळेगाव, वडगाव, चिखलसे, पाटण, पवनमावळची ४0 गावे, देहूरोड, सोमाटणे आदी भागाला पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या पवना धरणामध्ये १९ मे २0१२ रोजी २९.२६ टक्के इतका पाणीसाठा होता. या वर्षी तो ५ टक्क्याने जास्त आहे.

धरणामधून दररोज ७ तास १२00 क्युसेसने पवना नदीमध्ये पाणी सोडले जात आहे. यात कुठल्याही प्रकारची घट करण्याचा सध्यातरी विचार नाही. धरणामध्ये पाणीसाठा चांगला असल्याने किमान दोन महिने धरणावर अवलंबून असलेल्या भागास चिंतेचे कारण नाही. (वार्ताहर)

दापोडीत सख्ख्या भावडांकडून सख्ख्या भावडांवर वार

दापोडीत सख्ख्या भावडांकडून सख्ख्या भावडांवर वार
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com

आल्टो कारच्या धडकेने दोन पादचा-यांचा मृत्यू

आल्टो कारच्या धडकेने दोन पादचा-यांचा मृत्यू
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com

आयपीएल खेळाडूंच्या बस अडवून गहुंजे येथे भाजपाचे आंदोलन

आयपीएल खेळाडूंच्या बस अडवून गहुंजे येथे भाजपाचे आंदोलन