Saturday 22 July 2017

'बांधा-पाडा-पुन्हा बांधा' या तत्वावर पालिकेचे नियोजन

निगडी, भक्ती शक्ती चौक हा वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत मोक्याचा आहे तिथे Multimodal Transport Hub (बहुआयामी वाहतूक हब) होणे गरजेचे आहे 
... हि गोष्ट आम्ही गेली अनेक वर्षे सांगतोय पण त्याची दखल घेतली गेली नाही, आता सत्त्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याने याबद्दल वाचा फोडली आहे. बघुयात पालिका प्रशासन या विषयाकडे डोळसपणे पाहणार का? अन्यथा नियोज़नशून्यता, दूरदृष्टीचा अभाव हि नवी विशेषणे पालिकेला जोडली जातील. 'बांधा-पाडा-पुन्हा बांधा' या तत्वावर काम करून नागरिकांचा कराचा पैसा वाया घालवणे कधी थांबणार

Civic building to get 50KW solar power

Pimpri Chinchwad: The civic administration will implement a solar power generation project at the Pimpri Chinchwad Municipal Corporation building in Pimpri, in a bid to cut costs. Pravin Tupe ... The project is estimated to save PCMC Rs20 lakhin power ...

Civic body acquires plot for public toilet

PIMPRI CHINCHWAD: The civic authorities, under police cover, removed the barricades and took possession of a contentious piece of land in Pimpri on Thursday. Recommended By Colombia. The plot has been in the news ever since a public toilet was ...

पिंपरी-चिंचवडसाठी समान आणि पुरेसा पाणीपुरवठ्याच्या सूचना


Hinjewadi techie molested on way home by two men

A 33-year-old female IT professional was allegedly molested by two people on Wednesday evening at Hinjewadi, while she was returning home from work.

हिंजवडीच्या आयटी कंपनीतील तरुणीचा विनयभंग

पुणे/औंध - हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एका नामांकित आयटी कंपनीतील तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्‍कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. हा प्रकार पौड पोलिस ठाण्याच्या हद्दीत चांदे-नांदे परिसरात बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडला. या घटनेमुळे तरुणीला मानसिक धक्‍का बसला असून तिच्यावर बाणेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

शेकडो ‘आधार’ डिऍक्‍टिव्ह!

नागरिक गोंधळात : “पॅन’शी जोडण्याची मुदत तोंडावर
पुणे – आधार कार्ड नोंदणीतील घोळ आता समोर येवू लागले आहेत. केंद्र सरकारने पॅन-कार्ड आधार-कार्डशी “लिंक’ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुआर पॅनकार्ड आधारशी लिंक करताना आधार कार्ड “डिऍक्‍टिव्ह’ असल्याचे समोर आले आहे. त्यातच आधार नोंदणी बंद आणि पॅनकार्ड आधारशी “लिंक’ करण्यास अवघे 10 दिवस राहिले असल्याने नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

माण-हिंजवडी रस्त्याची दैना

  • प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची नागरिकांची मागणी
हिंजवडी, (वार्ताहर) – माण-हिंजवडी एमआयडीसीतील रस्त्याची अक्षरश: चाळण होवून रस्ता पाण्यात गेला आहे. जागोजागी खड्डे पडले असून रस्त्यावर राडारोडा आल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे.
मुळशीकरांच्या नशिबी कायम सार्वजनिक बांधकाम विभागामुळे अवहेलना सहन करावी लागत आहे. तालुक्‍यात फिरताना कुठेही चांगले रस्ते आढळणे हे फारच दुर्मिळ आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दिरंगाईमुळे 10 कोटी 30 लाखांचा निधी मंजूर होवून उपलब्ध झालेला असला तरी माण-हिंजवडी रस्ता जो फेब्रुवारी 2017 पर्यंत होणे आवश्‍यक होता. तो न झाल्याने या रस्त्यामुळे मुळशीकरांची नक्कीच दैना झाली आहे.

भोसरीत युवा मतदार नोंदणी मोहीम

भोसरी – राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि 207 भोसरी विधान सभा मतदार संघ यांच्या संयुक्‍त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यामध्ये मतदान नाव नोंदणी व जनजागृती करण्यासाठी “युवा मतदार नोंदणी मोहीम’ राबविली.

घरात पाळीव प्राणी असावेत की नसावेत…. (प्रभात open house)

घरात पाळीव प्राणी असावेत की नसावेत, यावरून नेहमीच थोडेफार वाद होत असतात. याबाबत आपला काय विचार आहे. पाळायचे असेल तर काय काळजी घ्यावी, नसेल का नको… कुत्रा-मांजर पाळणे ही काही आताची फॅशन नाही… तर पूर्वापार आपल्याकडे प्राणी पाळण्याची पद्धत आहे. आपल्याकडेच नाही तर अनेक देशांमध्येही ही प्रथा आहे. प्राणी पाळण्याबाबत कोणाचाच विरोध नसतो- विरोध असतो तो बहुधा त्यांची काळजी घेण्याबाबत… आणि सध्याच्या विभक्‍त कुटुंबपद्धतीत आणि आपण आपल्या घरच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून त्या प्राण्यांची हेळसांड होणार नाही नाही याचाही विचार करायला हवा. याबाबत आपले मत काय आहे ते कळवा, खरे तर ही तुमची आवड आहे. मात्र त्याबाबत तुम्ही काय विचार कराल… कशी सोडवावी ही समस्या… तुम्हीच सांगा…      

मिलिंदनगर प्रकल्पातील सदनिकांचा मिळणार ताबा

पिंपरी – गेली अनेक वर्षापासून पिंपरी येथील मिलींदनगर येथील लाभार्थींना 224 सदनिकांचे वाटप रखडले आहे. आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेत, यातील तांत्रिक समस्यांवर चर्चा केली. त्यावर सकारात्मक भूमिका घेत, येत्या महिनाभरात लाभार्थींना या सदनिका वाटप करण्याचे आश्‍वासन आयुक्त हर्डीकर यांनी दिले. त्यामुळे या लाभार्थींना सदनिका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भोसरी एमआयडीसीतील वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

भोसरी – एमआयडीसीच्या “टी ब्लॉक’मधील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही याची दखल घेण्यात आलेली नाही. लघुद्योजकांना याचा फटका बसत आहे. ही बाब लक्षात घेऊन, हा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी भोसरी येथील कामगारांनी केली आहे.