Thursday 19 May 2016

[Video] दुष्काळग्रस्तांची भूक भागविण्यासाठी टीसीएसची धाव

एमपीसी न्यूज - सध्या महाराष्ट्रातील मराठवाडा, खानदेश सारखे भाग दुष्काळाच्या झळांनी होरपळून निघत आहेत. त्यांना पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी वेळोवेळी स्वतः किंवा नाम फाउंडेशनच्या माध्यमातून रोख रक्कम किंवा इतर साहित्याच्या माध्यमातून मदत केली आहे. त्याच मदतीचा कळस म्हणजे टीसीएस (टाटा कन्सलटंन्सी अॅन्ड सर्व्हिसेस) ग्रुपने दाखवलेले औदार्य होय. टीसीएसतर्फे याच दुष्काळग्रस्तांसाठी अवघ्या चार दिवसात तब्बल 28 टन धान्य गोळा करून त्यांनी नाम फाउंडेशनला सुपूर्द केले आहे. याविषयी माहिती देताना पिंपरी-चिंचवडमधील नाम फाउंडेशनचे सदस्य धनंजय शेठबळे म्हणाले की, टीसीएस ग्रुपने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, शहरातील लोक केवळ बोलतच नाहीत तर ते कृतीशील सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांनी नामला दिलेली ही मदत दुष्काळग्रस्तांसाठी लाखमोलाची ठरणार आहे. त्यांनी अवघ्या चारच दिवसात रात्रंदिवस एकत्र करून टीसीएसच्या कर्मचारी व इतर इच्छुकांच्या माध्यमातून तब्बल 28 टन धान्य गोळा केले आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी, साखर व डाळींचा समावेश आहे. हे धान्य मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर हिंगोली या चार जिल्ह्यात 1600 कुटुंबांना वाटप केले जाईल. ज्यामध्ये साधारण पाच किलो तांदूऴ, पाच किलो गहू, पाच किलो ज्वारी किंवा बाजरी व एक-एक किलो साखर व डाळी, असे वाटप केले जाणार आहे. यासाठी नाम फाउंडेशनचे स्वयंसेवक व टीसीएसचे 15 स्वयंसेवक, बजाज ऑटो, तसेच शहरातील स्वयंसेवी संस्था ज्यामध्ये पीसीसीएफ, वृक्षवल्ली, सावरकर मंडळ आदी स्वइच्छेने सहभागी होत आहेत, अशी माहिती शेठबळे यांनी दिली. टीसीएसच्या मदतीचा हा 'पसा' नक्कीच काही प्रमाणात का होईना दुष्काळग्रस्तांची भूक मिटवणार आहे. जेणेकरून पावसाळ्यात बळीराजा जोमाने शेतकामाला लागेल व त्याच्या शेतात स्वतःचे धान्य पिकवेल.

PCMC turns to satellite images


Due to the vast workload of mapping 86 sq kms of PCMC land and the size of structures, human resources on the job had to undertake field work for days or even months. Now, we have decided to deploy a team of experts who will use satellite images. PCMC ...

Water recycling on PCMC agenda

The need for water recycling has assumed greater importance now.

आयुक्त साहेब, "अनधिकृत' आवरा


अनधिकृत बांधकामांमुळे पिंपरी-चिंचवड गाजले. गेली दोन वर्षे शहराचे राजकारण या एकाच मुद्याभोवती गोलगोल फिरते आहे. लोकसभा, विधानसभेला याच प्रश्‍नाच्या तापल्या तव्यावर विरोधकांनी बाजी मारली. आता महापालिकेलाही तेच गाजर दाखवून ...

चिंचवड हे माझे घर आहे, इथे आले की लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात - मुक्ता बर्वे

एमपीसी न्यूज -  ज्या भागात वाढलीस, सायकल घेऊन भटकलीस अशा चिंचवड गावात वलयांकित होऊन येताना काय वाटते? असा प्रश्न मुलाखतीत…

आता नदी पात्रावरही असणार तिस-या डोळ्याची नजर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील वाहणा-या नद्यांमध्ये जो राडारोडा टाकला जातो किंवा अतिक्रमण केले जाते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नदीपात्राच्या कडेला…

पवना जलवाहिनीचा मार्ग खुला


गेल्या मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या या निर्णयाचा अध्यादेशही लवकर काढण्यात येणार असल्याने पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी पुरविण्याचा मार्ग आपोआपच खुला होणार आहे. पवना ...

Illegal road digging invites Pawar's ire

Pimpri Chinchwad: NCP leader Ajit Pawar has asked civic officials to file police complaints against people who dig roads for laying cables without seeking permission. Pawar was speaking at a ... The PCMC officials have refuted the charge. Bookmark or ...

MSEDCL installs tin sheet covers to protect 744 transformers

After one person died in a transformer blast in Chinchwad on May 7, the Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MSEDCL) have started installing tin sheet covers over 744 dangerous transformers in the city to improve public safety and reduce accidents.

पिंपरी-चिंचवडमधील कचरा वेचक कामगारांचे 'सैराट'

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडमधील दररोज शहरात फिरून कचरा गोळा करून घर चालवणा-या तब्बल 500 कष्टकरी महिलांनी आज 'सैराट'चा आनंद लुटला.…