Sunday 14 January 2018

Metro may stretch to Nigdi, Katraj in first phase

PIMPRI CHINCHWAD: The Maharashtra Metro Rail Corporation Limited (MMRCL) has proposed to extend the Pimpri-Swargate Metro route up to Nigdi and Katraj in the first phase itself. Work is on to create a detailed project report (DPR) for the two extensions.

India’s first IT trade union registered in Pune, aims to fight ‘illegal layoffs’


सुदर्शननगर येथे ग्रेडसेपरेटर

पिंपरी – कासारवाडी ते पिंपळे सौदागर या मार्गावर सुदर्शननगर येथील बीआरटीएस बस स्टॉप येथे ग्रेडसेपरेटर तयार करण्यात येणार आहे.

55 अनधिकृत क्रॅशगार्ड व बुलबार्स लावलेल्या वाहनांवर सांगवीत कारवाई

पिंपरी - केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या आदेशानुसार अनधिकृतपणे वाहनांना क्रॅशगार्ड व बुलबार्स लावणाऱ्या 55 वाहनांवर सांगवी वाहतूक विभागाने धडक कारवाई करत 30 हजारांचा दंड वसूल केला. तर त्यापैकी 17 वाहनांवर कडक कारवाई करण्याबाबतचे प्रस्ताव आरटीओकडे पाठवले आहेत. 

पिंपरी-चिंचवडमध्ये लाकडाच्या वखारीला भीषण आग; लाखोंचे आर्थिक नुकसान

सहा बंब आणि दोन खाजगी टँकरच्या मदतीने आगीवर नियंत्रण

पिंपरी: चिखलीत भंगाराच्या गोदामाला आग

पिंपरी : चिखली येथील भंगाराच्या गोदामाला रविवारी पहाटे आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांनी दिलेल्या माहिती नुसार, आज (रविवारी) पहाटे ४.४५ वाजताच्या मिसल अहमद खान यांच्या गोदामाला आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अग्निशामक दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे.

शहरातील अवैध धंद्यांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. मात्र, या गुन्हेगारांना राजकीय पाठबळ मिळत असल्याचा खळबळजनक आरोप खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्याने शहरातील अवैध धंद्यांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

“पिफ’च्या उद्‌घाटनाचा “फ्लॉप शो’

पिंपरी – लाखो रुपये खर्च करून पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) आयोजित केला. त्याचा उद्‌घाटन सोहळा पार पडला. मात्र, सत्ताधाऱ्यांची उदासिनता आणि प्रशासनाच्या नियोजशून्य कारभारामुळे मोठा गाजावाजा केलेल्या “पिफ’चे उद्‌घाटन “फ्लॉप शो’ ठरले आहे. महापालिकेच्या आयुक्तांसह पदाधिकारी आणि नगरसेवकांनीही या सोहळ्याकडे पाठ फिरविल्याने “पिफ’चे संचालक व दिग्दर्शक जब्बार पटेल यांनीही प्रशासनाचे कान टोचले.

पीएमपीएमएल बसचे ब्रेक फेल

चालकाचे प्रसंगावधान : सुदैवाने जीवीतहानी टळली
पिंपरी – पीएमपीएमएल बसचे ब्रेक फेल होऊन होणारे अपघात घडण्याचा सिलसिला सुरुच आहे. बुधवारी सकाळी (दि.13) दहा वाजता जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर या प्रकाराची पुनरावृत्ती झाली. मात्र, चालकाने प्रसंगावधान दाखवत ब्रेक फेल झालेली बस रस्त्याकडेच्या वीज खांबाला धडकविल्याने अनर्थ टळला.

पिंपरीत आयुर्वेदाविषयी आंतरराष्ट्रीय परिषद आजपासून

डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे येथे दि. 14 व 15 जानेवारी 2018 रोजी स्वास्थरक्षणासाठी आयुर्वेद या विषयी आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात येत आहे. डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय व इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातील आरोग्यतज्ज्ञ, संशोधक, विद्यार्थी असे एकूण 560 सहभागार्थी असणार आहेत. परिषदेचा प्रमुख उद्देश – आयुर्वेदाद्वारे स्वास्थ्यरक्षण असा आहे.

संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने सोमवारी रोजगार मेळावा

पिंपरीतील संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने सोमवार (दि.१५ जानेवारी) रोजी सकाळी १० वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन खासदार अमर साबळे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे महापौर नितीन काळजे, आमदार तथा भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, ज्येष्ठ नेते आझम पानसरे आदी उपस्थित राहणार आहेत.

लघु उद्योगांसाठी “झेड सर्टीफिकेशन कॅम्प’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या पुढाकाराने व केंद्र सरकारच्या उद्योग मंत्रालयातर्फे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी “झेड सर्टीफिकेशन कॅम्प’ आयोजित करण्यात आला आहे. त्याकरिता लघु उद्योग संघटनेकडे नाव नोंदणी करणे आवश्‍यक आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या सल्ल्यानुसार इंडिअन बॅंक असोसिएशनने “झेड सर्टिफिकेशन’ प्राप्त सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना व्यवसायासाठी कर्ज देताना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

इलेक्‍ट्रीकल कॉन्ट्रॅक्‍टरचे अभिनव आंदोलन

अखेर उद्योग संघटनांची एकजूट

पिंपरी – गेल्या कित्येक दशकांपासून वेगवेगळ्या समस्यांशी झुंजत असलेल्या पिंपरी चिंचवडच्या उद्योग जगताने आपल्या समस्या सोडविण्यासाठी उद्योग संघटना एकजूट झाल्या आहेत. पिंपरी चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स, सर्व्हिसेस ऍण्ड ऍग्रीकल्चर, पिंपरी चिंचवड लघु उद्योजक संघटना, पिंपरी चिंचवड प्लॅस्टिक मॅन्युफॅक्‍चर्स असोसिएशन, पिंपरी चिंचवड रबर इंडस्ट्रीज असोसिएशन, पिंपरी चिंचवड औद्योगिक व बिल्डींग मटेरियल उत्पादक व पुरवठादार असोसिएशन या पाच संघटनांनी एक होऊन पिंपरी चिंचवड एम.एस.एम.ई इंडस्ट्रीज असोसिएशन फोरमची स्थापना केली आहे. याची अधिकृत रित्या घोषणा फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी एका पत्रकार परिषदेत केली.

नागरी समस्या तात्काळ सोडवण्यासाठी “हमारा साथी’

संदीप पवार यांचा उपक्रम: ताथवडे-पुनवळे-काळाखडकसाठी हेल्पलाईन
पिंपरी – ताथवडे-पुनवळे-काळाखडक आणि वाकड परिसरातील नागरी समस्या तात्काळ मार्गी लावता याव्यात. यासाठी स्थानिक नागरिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार यांनी मोफत “हमारा साथी’ हेल्पलाईन सुरू केली आहे.

४२५ कोटीच्या कामात भाजपकडून १०० कोटीचा भ्रष्टाचार – शिवसेनेचा आरोप

पिंपरी (Pclive7.com)):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रस्ते विकासकामासाठी जागा ताब्यात नसतानाही आयुक्तांनी ४२५ कोटी रुपयांची रस्ते विकासाची कामे काढली. या कामांमध्ये ठेकेदारांनी संगनमत केल्याने सर्व कामे निविदा रकमेच्या चार ते दहा टक्के वाढीव दराने देण्यात आली आहेत. ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेऊन अटी-शर्ती निश्चित करण्यात आल्या. या सर्व व्यवहारात करदात्यांच्या १०० कोटी रुपयांची लूट झाली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या सहमतीनेच भाजप नेत्यांनी महापालिका तिजोरीवर दरोडा टाकला आहे, असा गंभीर आरोप आज शिवसेनेने पुराव्यानिशी केला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री, लाचलुचपत प्रतिबंध विभाग आणि अमंलबजावणी संचानलय (ईडी) यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही, शिवसेनेने पत्रकार परिषदेत सांगितले.

भाजपचा महापालिकेत “होलसेल’ भ्रष्टाचार

पिंपरी – महापालिकेतील सत्ताधारी भाजपने नऊ महिन्यांच्या कारकिर्दीत 200 ते 300 कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. एकदम शिताफीने आणि वेगात भ्रष्टाचार सुरू आहे. आजवर अशा पद्धतीने होलसेल भ्रष्टाचार कधीच झाला नव्हता. भाजपने ए. राजा. कनिमोळी, सुरेश कलमाडी आणि छगन भुजबळ यांना देखील भ्रष्टाचारात मागे टाकले आहे. तात्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने चोरी केली होती; पण हे तर आता करदात्यांच्या पैशांवर दरोडा टाकत आहेत, असा आरोप शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

भाजपच्या विरोधात सर्वपक्षीय एकवटले

पिंपरी – अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण, बाधकामांवर आकारला जाणारा जुलमी शास्ती कर, रिंग रोडचा जटील प्रश्‍न आणि विविध धर्मियांच्या स्मशान व दफनभूमीतील अंत्यविधीचा खर्च पालिकेने उचलावा, या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सत्ताधारी भाजपच्या विरोधात 20 जानेवारी रोजी सर्व पक्षीय आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी दिली.