Saturday 15 September 2012

देहू-आळंदी रस्त्याच्या कामासाठी आयुक्तांची ठेकेदाराला तंबी

देहू-आळंदी रस्त्याच्या कामासाठी आयुक्तांची ठेकेदाराला तंबी
पिंपरी, 14 सप्टेंबर
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील देहू आणि आळंदी या तीर्थक्षेत्रांना जोडणा-या रस्त्याच्या कामाची आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आज (शुक्रवारी) अचानक पाहणी केली. त्यामुळे ठेकेदार आणि अधिका-यांची चांगलीच धांदल उडाली. या रस्त्याचे संथगतीने सुरु असलेल्या कामाबाबत आयुक्तांनी उघड नाराजी व्यक्त केली. हे काम मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश देत मुदत न पाळल्यास कारवाई करण्याची तंबीही त्यांनी ठेकेदाराला दिली.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

बावीस सप्टेंबरपासून पिंपरी-चिंचवड फेस्टिवल

बावीस सप्टेंबरपासून पिंपरी-चिंचवड फेस्टिवल
पिंपरी, 14 सप्टेंबर
गणेशोत्सवाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी-चिंचवड फेस्टिवल 2012 चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्‌घाटन प्रसिध्द अभिनेते सचिन खेडेकर यांच्या हस्ते 24 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. 22 ते 26 सप्टेंबर दरम्यान होणा-या या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा अशा विविधरंगी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. यंदाचे फेस्टिवलचे 17 वे वर्ष आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


पिंपरी-चिंचवड बंद पाळावा ; 95.75 टक्के नागरिकांचा कौल

पिंपरी-चिंचवड बंद पाळावा ; 95.75 टक्के नागरिकांचा कौल
पिंपरी, 14 सप्टेंबर
अनधिकृत बांधकामाच्या विरोधात महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईच्या विरोधात संपूर्ण पिंपरी-चिंचवड बंद करायचे की नाही या निर्णयासाठी शिवसेना आणि अन्य विरोधी पक्षांनी नागरिकांचे मत आजमावण्यासाठी गुरूवारी घेतलेल्या मतदानात 95.75 टक्के नागरिकांनी पिंपरी-चिंचवड बंद पाळावा असा निर्णय मतदानातून दिलेला आहे. 59175 नागरिकांनी प्रत्यक्ष मतदान केले तर त्यापैकी 1697 नागरिकांनी ऑनलाईन मतदान केले.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


बालेवाडीत आजपासून 'ट्रॅव्हल आणि टुरिझम फेअर'

बालेवाडीत आजपासून 'ट्रॅव्हल आणि टुरिझम फेअर'
पिंपरी, 14 सप्टेंबर
ट्रॅव्हल आणि टुरिझम फेअर (टीटीएफ) हा भारतातील सर्वात मोठा सहल मेळावा बालेवाडी येथील व्हिटस् हॉटेल मधील ऑर्कीड कन्व्हेशन सेंटरमध्ये भरविण्याच आला आहे. 14 ते 16 सप्टेंबर असे तीन दिवस चालणा-या या मेळाव्याचे उद्‌घाटन पिंपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे यांनी केले.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


बेकायदा बांधकामांबाबत बैठकीचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_33216&To=1
बेकायदा बांधकामांबाबत बैठकीचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकाम प्रश्नाबाबत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले.


'पिंपरी-चिंचवड बंद'साठी मतदानास सुरुवात

'पिंपरी-चिंचवड बंद'साठी मतदानास सुरुवात
पिंपरी, 13 सप्टेंबर
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाईबाबत जनतेचा कौल आजमाविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मतदानाला आज (गुरुवारी) सकाळी साडेनऊ वाजता सुरुवात झाली. या मतदानाच्या निकालावरच शिवसेना, भाजप, आरपीआय, मनसे, नागरी हक्क सुरक्षा समिती 'शहर बंद' आंदोलन पुकारण्याबाबतचा निर्णय घेणार आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

शासनाने निवारा धोरण आखावे - गो.रा. खैरनार

शासनाने निवारा धोरण आखावे - गो.रा. खैरनार
पिंपरी, 12 सप्टेंबर
शासनाने निवारा धोरण आखावे, या धोरणासाठी एक देशव्यापी आंदोलन उभारायला हवे, बेकायदेशीर घरांचा प्रश्न हा केवळ पिंपरी-चिंचवड पुरताच मर्यादित नाही. त्यासाठी शासनाने निवारा धोरण आखले पाहिजे. या धोरणासाठी एक देशव्यापी आंदोलन उभारायला हवे, असे मत मुंबई महापालिकेचे माजी उपायुक्त गो.रा.खैरनार यांनी आज चिखली येथे आयोजित सभेत केले. घर बचाव कृती समितीची अधिकृत घोषणा केल्यावर ते बोलत होते.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

Good samaritans give stray dog another day

Good samaritans give stray dog another day: Astray dog that was knocked down by a car and left wounded for an entire night on Dehu Road, was operated upon by the Pimpri Chinchwad Muncipal Corporation (PCMC) veterinary department. ...

Counting on public support

Counting on public support: Responding to the call of opposition parties, over 50,000 people came out to cast their opinion on Thursday on observing a bandh to protest Pimpri Chinchwad Municipal Corporation’s anti-encroachment drive against illegal construction.

12-year-old dies of dengue fever

12-year-old dies of dengue fever: "The girl died on September 7.She had tested positive for dengue at the hospital's laboratory," said a PCMC medical officer.

No bandobast for demolition drive during Ganesh festival

No bandobast for demolition drive during Ganesh festival: The police will not provide bandobast to the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) to conduct the demolition drive during the Ganesh festival starting from September 19.

सोसायट्या, व्यापारी संकुलात आधार कार्डाची नोंदणी शक्‍य

सोसायट्या, व्यापारी संकुलात आधार कार्डाची नोंदणी शक्‍य: पुणे -&nbsp व्यावसायिक इमारती, मोठी गृहसंकुले यांसारख्या खासगी ठिकाणी आधार कार्डाची नोंदणी केंद्रे करण्यास राज्य सरकारने अखेर परवानगी दिली आहे.

एच.ए.च्या पुनर्वसनासाठी 502 कोटींचा दुसरा प्रस्ताव

एच.ए.च्या पुनर्वसनासाठी 502 कोटींचा दुसरा प्रस्तावहिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स (एच.ए.) कंपनीचे आर्थिक स्थैर्य आणि कामगारांची देणी भागविण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा पुनर्वसन पॅकेज देण्याची तयारी दाखविली आहे, अशी माहिती एच.ए. कामगार संघटनेचे सरचिटणीस अरुण बोऱ्हाडे यांनी मंगळवारी (ता. 11) दिली. त्यासाठी कंपनीने नुकताच सरकारकडे सुमारे 502 कोटी रुपयांचा दुसरा प्रस्ताव सादर केला असल्याचे त्यांनी सांगितले. 
एच.ए.च्या पुनर्वसनासाठी 502 कोटींचा दुसरा प्रस्ताव

'West of Pune' property show starts today

'West of Pune' property show starts today:  There's good news for prospective buyers looking for property deals in the western parts of the city. The Times of India has planned a two-day property exhibition - 'West of Pune' - showcasing 200 housing projects under one roof.
The exhibition will be held at the VITS hotel near Shree Shiv Chhatrapati Sports Complex in Balewadi on Saturday and Sunday between 10.30 am and 7.30 pm. Thirty top builders will participate in the event.

PCMC to repair bad roads before Ganesh before festival

PCMC to repair bad roads before Ganesh before festival: The civic officials of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) have assured mayor Mohini Lande that roads that are in a bad condition and have developed potholes will be repaired before the Ganesh festival.

20 held in raid at Pimpri restaurant

20 held in raid at Pimpri restaurant: The Pimpri police arrested 20 people in a late-night raid on Tuesday at Saloni Restaurant and Bar in Pimpri Camp and took action against the owner for keeping the place open past the 11.30 pm deadline.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation to prepare revised Pune development plan for second phase of JNNURM

Pimpri-Chinchwad Municipal Corporation to prepare revised Pune development plan for second phase of JNNURM: Neelkanth Poman, co-ordinator of JNNURM, PCMC, said, "The civic body has started the process to prepare the plan and is involving elected representatives and other stake holders in the process.

PCMC to repair bad roads before Ganesh Chaturthi festival

PCMC to repair bad roads before Ganesh Chaturthi festival: The civic officials of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) have assured mayor Mohini Lande that roads that are in a bad condition and have developed potholes will be repaired before the Ganesh festival.

नागरिकांचा कौल ‘शहर बंद’च्या बाजूने

नागरिकांचा कौल ‘शहर बंद’च्या बाजूने: अनधिकृत बांधकामांवर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात शहर बंद करण्यासाठी शिवसेना, भारतीय जनता पक्ष,मनसे आणि नागरी हक्क सुरक्षा समितीच्या वतिने घेण्यात आलेल्या मतदानामध्ये साठ हजार नागरिकांनी मतदान केले. पैकी ९५.७५ टक्के नागरिकांनी शहर बंद करण्याच्या बाजूने कौल दिला असून, ९६.०८ टक्के नागरिकांनी बेकायदा बांधकामांवरील कारवाई अयोग्य असल्याचे मत नोदविले आहे.

आयुक्तांनी घेतली ठेकेदारांची झाडाझडती

आयुक्तांनी घेतली ठेकेदारांची झाडाझडती: शहरातील संथगतीने सुरू असणारी विकासकामे वेगाने पूर्ण करा आणि त्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करा, असे आदेश देत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी ठेकेदारांची शुक्रवारी झाडाझडती घेतली.

पुणेकर वापरतात वर्षाकाठी सरासरी १० सिलिंडर

पुणेकर वापरतात वर्षाकाठी सरासरी १० सिलिंडर: सर्वसाधारणपणे चार जणांच्या कुटुंबाला वर्षभरात नऊ ते दहा सिलिंडर लागतात. त्यामुळे, यापुढे सर्वसामान्यांना तीन चे चार सिलिंडर जादा दराने घेण्याचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

प्रदर्शन केंद्र उभारणीतील अडसर दूर

प्रदर्शन केंद्र उभारणीतील अडसर दूर: पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे मोशी येथे उभारण्यात येणार्या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्रासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जागा ताब्यात घेण्याचा प्रश्न मार्गी लागला असून, त्यामुळे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा मुख्य अडसर दूर होण्यास मदत झाली आहे.

कारवाईच्या विरोधात पिंपरी बंदच्या निर्णयास नागरिकांचे समर्थन

कारवाईच्या विरोधात पिंपरी बंदच्या ...:
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम कारवाईच्या विरोधात पिंपरी-चिंचवड शहर बंद पुकारण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. तथापि, त्याआधी मतदारांचा कौल जाणून घेतला. तेव्हा झालेल्या सुमारे ६० हजार मतदानापैकी ९५ टक्क्य़ाहून अधिक नागरिकांनी बंद पुकारण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
Read more...

पिंपरीच्या महापौरांनाही हवीय नवीन मोटार

पिंपरीच्या महापौरांनाही हवीय नवीन ...:
पिंपरी / प्रतिनिधी
‘श्रीमंत’ पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर मोहिनी लांडे यांनाही नवीन आलिशान मोटार हवी आहे. त्यासाठी त्यांनी महापालिका प्रशासनाकडे तगादा लावला आहे. मात्र, निर्धारित साडेसात लाख रुपये खर्चाच्या मर्यादेपेक्षा महाग असलेली मोटार घेण्याचा महापौरांचा आग्रह असल्याने याबाबतचा प्रस्ताव मंत्रालयात ‘विचाराधीन’ आहे.
Read more...

रेल्वेच्या ‘सायन्स एक्स्प्रेस’ चे प्रदर्शन सुरू

रेल्वेच्या ‘सायन्स एक्स्प्रेस’ चे ...:
प्रतिनिधी, गुरुवार, १३ सप्टेंबर २०१२
जैववैविध्यता व विज्ञानाशी संबंधित विषयांची माहिती, फलक व वस्तूंचा समावेश असलेली रेल्वेची ‘सायन्स एक्स्प्रेस’ पुण्यात दाखल झाली असून, बुधवारपासून खडकी रेल्वेस्थानकावर प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली. १५ सप्टेंबपर्यंत सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत हे प्रदर्शन सर्वासाठी मोफत खुले राहणार आहे. प्रदर्शनाबरोबरच या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
Read more...

पिंपरीत चुलीवर स्वयंपाक

पिंपरीत चुलीवर स्वयंपाक: पिंपरी । दि. १४ (प्रतिनिधी)

गॅस, डिझेल दरवाढीविरोधात पिंपरी-चिंचवड तसेच मावळमधील सामाजिक संस्थांनी आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला. नागरी हक्क कृती समितीने चुलीवर स्वयंपाक करून भावना व्यक्त केल्या. भाजपनेही निषेध केला. सत्तेत सहभागी असणार्‍या राष्ट्रवादीनेही पिंपरी चौकात आंदोलन करून तसेच इंडियन युथ काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. सरकारला घरचा आहेर दिला.

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात इंधनावरील सवलत काढल्याबद्दल केंद्रीय पेट्रोलियम खात्याचा निषेध करण्यात आला. ग्राहकाला घरगुती वापराचे किमान १२ सिलिंडर मिळावे तसेच डिझेलच्या दराचा फेरविचार सरकारने करावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केले.

‘भाववाढ त्वरित मागे घ्यावी.’ १२ गॅस सिलिंडर मिळालेच पाहिजे या घोषणा देत चौकात निदर्शने करण्यात आली. या वेळी महापौर मोहिनी लांडे, उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समिती सभापती जगदीश शेट्टी, पक्षनेत्या मंगला कदम, शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे, युवक अध्यक्ष मयूर कलाटे, ज्येष्ठ नेते हनुमंत गावडे, महिला अध्यक्ष सुरेखा लांडगे, फजल शेख, श्रीधर वाल्हेकर, नगरसेवक जितेंद्र ननावरे, समीर पठाण, नंदा ताकवणे, नीता पाडाळे, अरुण बोर्‍हाडे, किरण मोटे, अतुल शितोळे, शुभांगी बोराडे, वैशाली काळभोर, सुरेश म्हेत्रे, शांताराम भालेकर, उल्हास शेट्टी, अरुणा कुंभार, धनंजय भालेकर आदी सहभागी झाले.

मावळ तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवाढीचा निषेध केला. या वेळी माजी आमदार दिगंबर भेगडे, रूपलेखा ढोरे, भास्करराव म्हाळसकर, मंगल भेगडे आदी उपस्थित होते. मावळ तालुक्यात दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.

Pimpri hotel raided for violating rules

Pimpri hotel raided for violating rules: The hotel owner, Rajesh Lalwani, was booked for running the hotel beyond the time limit and 11 people were booked for consuming liquor without liquor licence.

कत्तलखान्यासाठी पिंपरीतील आरक्षण फेरबदलाला शिवसेनेचा आक्षेप

कत्तलखान्यासाठी पिंपरीतील आरक्षण फेरबदलाला शिवसेनेचा आक्षेप
पिंपरी, 12 सप्टेंबर
मूळ ठराव आणि उपसूचनांमधील विसंगती, आरक्षण फेरबदलाबाबत हरकती व सूचना मागविताना प्रसिध्द केलेला अपूर्ण आशय यामुळे पिंपरीतील कत्तलखान्यासाठी आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव बेकायदेशीर ठरत असल्याचा आक्षेप शिवसेना नगरसेविका सीमा सावळे यांनी केला आहे. हा ठराव रद्द करुन पिंपरी ऐवजी च-होलीतील कत्तलखान्याचे आरक्षण कायम करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in



राष्ट्रीय सूक्ष्मजीव ठरविण्यासाठी सायन्स एक्सप्रेसमध्ये मतदान केंद्र

राष्ट्रीय सूक्ष्मजीव ठरविण्यासाठी सायन्स एक्सप्रेसमध्ये मतदान केंद्र
पिंपरी,12 सप्टेंबर
राष्ट्रीय सूक्ष्मजीव ठरविण्यासाठी आज सकाळी खडकी स्थानकात दाखल झालेल्या सायन्स एक्सप्रेसमध्ये मतदान घेण्यात येणार असून त्यासाठी आठ सूक्ष्मजीव दावेदार आहेत. मानवाला उपयोगी असणा-या सूक्ष्मजीवांची यामधून निवड करण्यात येणार आहे. सायन्स एक्सप्रेससोबतच संकेतस्थळावरही मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये हैद्राबाद येथे जैवविविधता आंतरराष्ट्रीय करार या अकराव्या परिषदेचे औचित्य साधून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातर्फे राष्ट्रीय सूक्ष्मजीव जाहीर करण्यात येणार आहे. www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in