Friday 13 July 2012

मैलाशुद्धीकरण प्रकल्प, पंपिंग स्टेशनवरही 'स्काडा'

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31385&To=9
मैलाशुद्धीकरण प्रकल्प, पंपिंग स्टेशनवरही 'स्काडा'
पावणे सहा कोटींचा खर्च
पिंपरी-चिंचवड महापालिकेने पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी यापूर्वी कार्यान्वित केलेली 'स्काडा प्रणाली' आता दहा मैलाशुद्धीकरण प्रकल्प आणि सोळा पंपिंग स्टेशनच्या ठिकाणीही कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्वयंचलित संगणकीय प्रणालीसाठी महापालिका सुमारे पावणे सहा कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव येत्या मंगळवारी (दि. 10) होणा-या स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

विश्व हिंदू परिषदेचे आंदोलन

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31386&To=2
विश्व हिंदू परिषदेचे आंदोलन
केंद्र सरकारने नेमलेल्या त्रिसदस्य समितीने काश्मिर संदर्भात सादर केलेल्या अहवालाच्या निषेधार्त विश्व हिंदू परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे शुक्रवारी (दि. 6) पिंपरीत आंदोलन करण्यात आले.

रेबीज लसीकरणाने जागतिक पशुसंवर्धन दिन साजरा

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31384&To=1
रेबीज लसीकरणाने जागतिक पशुसंवर्धन दिन साजरा
शहरातील पाळीव प्राण्याचे रेबीज लसीकरण करुन पिंपरी-चिंचवड महापालिका, महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन खाते आणि इंडियन इम्युनोलॉजिकल यांनी अनोख्या पध्दतीने जागतिक पशुसंवर्धन दिन साजरा केला.

कर्नाटक सरकारच्या बरखास्तीसाठी बेळगावच्या महापौरांची पिंपरीकरांना साद

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31382&To=6
कर्नाटक सरकारच्या बरखास्तीसाठी
बेळगावच्या महापौरांची पिंपरीकरांना साद
बेळगाव महापालिका सलग दुस-यांदा बरखास्त करुन कर्नाटक सरकारने मराठी द्वेष्ठपणा सिध्द केला आहे. उच्च न्यायालयाने थोबाड फोडूनही मराठी भाषकांची महापालिका वारंवार बरखास्त करणारे कर्नाटक सरकारच राष्ट्रपतींनी बरखास्त करावे आणि सीमा भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करावा, अशी मागणी बेळगावच्या महापौर मंदा बाळेकुंद्री यांनी शुक्रवारी (दि. 6) केली. बरखास्त केलेली बेळगाव महापालिका पुनःस्थापित करण्याच्या मागणीचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

नाशिकफाटा उड्डाणपुलाला गती मिळणार

नाशिकफाटा उड्डाणपुलाला गती मिळणार भुसंपादन मोबदल्याचा प्रस्ताव स्थायीपुढे ना...: नाशिकफाटा उड्डाणपुलाला गती मिळणार
भुसंपादन मोबदल्याचा प्रस्ताव स्थायीपुढे
नाशिकफाटा उड्डाणपुलासाठी जागेचा ताबा देण्याची तयारी संबंधित जागा मालकांनी दर्शविल्याने उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळणार आहे. नाशिकफाटा ते सीआयआरटी रस्ता रुंदीकरणाने बाधित नागरिकांना 386.16 चौरस मीटर जागेच्या मोबदल्यात सुमारे 55 लाख 74 हजार रुपये चुकते करणार आहे. त्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव येत्या मंगळवारी (दि. 10) होणा-या स्थायी समितीच्या सभेपुढे ठेवण्यात आला आहे.
for details
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31358&To=9

चिंचवडमध्ये स्कूलबसला अपघात

चिंचवडमध्ये स्कूलबसला अपघात: पुण्यातील चिंचवड येथे गुरुवारी सकाळी एका स्कूलबसला झालेल्या अपघातात ५ विद्यार्थ्यी जखमी झाले. सुदैवाने या विद्यार्थ्यांपैकी कुणालाही गंभीर इजा झालेली नाही. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले नसून पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

पिंपरी प्राधिकरणाचा अध्यक्ष अराजकीयच

पिंपरी प्राधिकरणाचा अध्यक्ष अराजकीयच: पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (पीसीएनटीडीए) अध्यक्षपदासाठी अनेक राजकीय नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कल मात्र अराजकीय व्यक्तीच्या नेमणुकीकडे असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

YCM hospital to expand intensive care unit

YCM hospital to expand intensive care unit: The Pimpri Chinchwad Municipal Corporation is planning to expand the intensive care unit at the corporation-run Yashwantrao Chavan Memorial Hospital.

Pune's metro dream on fast track as Centre backs project in Kochi

Pune's metro dream on fast track as Centre backs project in Kochi: The Union Cabinet's approval to the Kochi metro rail project on Wednesday has paved the way for more such projects in cities with a population in excess of 20 lakh.

Malyalee community welcomes direct flight from Pune to Kochi

Malyalee community welcomes direct flight from Pune to Kochi: Earlier, people had to spend heavily on travel to Kerala from Pune in case of any urgent work or during emergencies.

आयुक्तांची धडाडी अन् ‘गावखाती’ ...

आयुक्तांची धडाडी अन् ‘गावखाती’ ...:
पिंपरीत अजितदादांनीच केली आमदारांची पंचाईत
बाळासाहेब जवळकर
अतिशय वेगाने वाढणारे शहर असले, तरी ‘गावखाती’ राजकारण असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका आयुक्त म्हणून आलेल्या डॉ. श्रीकर परदेशी यांच्या सरळ व रोखठोक कारभारामुळे आतापर्यंत स्वत:च्याच धुंदीत असणारे अधिकारी आणि मनमानी करणारे पुढारी  बऱ्यापैकी धास्तावले आहेत.
Read more...

रस्त्यांच्या जागांसाठी पिंपरी ...

रस्त्यांच्या जागांसाठी पिंपरी ...:
पिंपरी / प्रतिनिधी
रस्ते व रुंदीकरणाच्या कामासाठी संरक्षण खात्याच्या जागा घेण्याकरिता आणखी ५३ कोटी रुपये देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून याबाबतच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
Read more...

निगडीच्या स्मशानभूमीत दाखल्याविना अंत्यसंस्कार

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31334&To=6
निगडीच्या स्मशानभूमीत दाखल्याविना अंत्यसंस्कार
पिंपरी, 4 जुलै
स्मशान दाखल्याशिवाय स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करण्यास मनाई आहे. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडीतील 'अमरधाम' या स्मशानभूमीत दाखल्याविनाच अंत्यसंस्कार होत असल्याचा खळबळजनक प्रकार चव्हाट्यावर आला आहे. स्मशान दाखला तपासण्यासाठी याठिकाणी सुरक्षा रक्षकच नसल्याने हा प्रकार घडत आहे. एका राजकीय पुढा-याच्या ठेकेदार संस्थेपुढे महापालिका प्रशासन हातबल झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. संस्थेच्या या मुजोरपणामुळे एखाद्या गंभीर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी या स्मशानभूमीचा वापर होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

पीएमपीएमएलच्या संकेतस्थळवर सुमन पवळे स्थायी समिती अध्यक्ष

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31333&To=7
पीएमपीएमएलच्या संकेतस्थळवर
सुमन पवळे स्थायी समिती अध्यक्ष
पिंपरी, 4 जुलै
पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन सुमारे चार महिने झाले. त्यानंतर महापौरांसह सर्व समित्यांची नव्याने निवड करण्यात आली. मात्र, पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) याबाबत अजुनही अनभिज्ञ आहे. त्यामुळे पीएमपीएमएलच्या वेबसाईटवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा म्हणून सुमन पवळे अजुनही विराजमान आहेत. वाहतूक व्यवस्थेबाबत पीएमपीएमएल उदासीन नाही तर आपल्या संकेत स्थळाबाबतही येथील अधिकारी फारशी उत्सुकता दाखवित नाहीत हे दिसून येत आहे.

शहरातील चार प्रमुख घटनांमधील
गुन्हेगार अद्याप मोकाट !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31326&To=10
शहरातील चार प्रमुख घटनांमधील<br>गुन्हेगार अद्याप मोकाट !
पिंपरी, 4 जुलै
चार सराफांना गंडा घालून साडेसात किलो सोन्याची लूट करणारे आरोपी, पोलीस उपायुक्त कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरील सोयायटीमधून भरदिवसा लांबविलेला 12 लाखांचा ऐवज, रुपीनगर येथे एका जुन्या विहिरीत आढळलेला 250 किलो गांजा आणि पुणे विद्यापीठाच्या रखवालदाराचा खून या परिमंडळ तीनच्या हद्दीत झालेल्या चार प्रमुख घटना. मात्र या घटनांचे धागेदोरे अजुनही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. चारही घटनांमधील गुन्हेगार अद्याप मोकाट फिरत असल्यामुळे परिमंडळ तीनमधील पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शिवसेनेकडून अतिक्रमण कारवाईचा सचित्र पंचनामा

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31314&To=8
शिवसेनेकडून अतिक्रमण कारवाईचा सचित्र पंचनामा
पिंपरी, 3 जुलै
बेकायदा बांधकामे..., अतिक्रमित जागेवरील घरे... आरक्षित जागेवरील इमले... रेडझोनच्या हद्दीतील बांधकामे... नदीपात्रातील इमारती... या नावाखाली कामगारनगरीतील गोरगरिबांची घरे उध्वस्त करून त्यांना देशोधडीला लावायला निघालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता म्हणजे काळीकृट्ट राजवट ! याचाच अनुभव पिंपरी-चिंचवडकर घेत आहेत. संपूर्ण शहरच बेकायदा वसल्याचे सांगून रहिवाशांच्या घरादारांवर नांगर फिरवायला निघालेल्या काँग्रेसी सरकारच्या काळयाकुट्ट कारभाराचा पंचनामा शिवसेनेने केला आहे. 'निष्पाप नागरिकांवर अत्याचार का ?’ असा मार्मिक सवाल करणा-या या पत्रिकेचे पिंपरी-चिंचवडकरांनी जोरदार स्वागत केले असून राज्यकर्त्यांची तोंडे मात्र, काळवंडली आहेत.

पिंपरी बाजारपेठेत साडेपाच लाखाचा ...

पिंपरी बाजारपेठेत साडेपाच लाखाचा ...:
जकात चुकविल्याप्रकरणी कारवाई; सव्वाचार लाखाचा दंड
प्रतिनिधी, पिंपरी
जकात चुकवून शहरात आणण्यात येणारा ११ लाखाचा विमल गुटखा काल मोशीत पकडण्यात आला असतानाच मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही पिंपरीतील नदीच्या रस्त्यावर साडेपाच लाखाचा गुटखा पकडण्यात आला. जकात चुकवून जाणारी मोटार पालिकेच्या भरारी पथकाने पकडली.
Read more...

४० वाहनांची तोडफोड

४० वाहनांची तोडफोड:

media

प्राधिकरणाच्या आकुर्डी सुविधा केंद्रातील अग्निशमन यंत्रणा मनुष्यबळाअभावी 'पोरकी'

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31298&To=9
प्राधिकरणाच्या आकुर्डी सुविधा केंद्रातील
अग्निशमन यंत्रणा मनुष्यबळाअभावी 'पोरकी'
पिंपरी, 3 जुलै
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने आकुर्डी येथे कोट्वधी रुपये खर्च करून अद्ययावत यंत्रणेने सुसज्ज असे मध्यवर्ती केंद्र उभारण्यात आले आहे. आग लागून आपत्कालीन परिस्थिती ओढावल्यास त्यावर लागलीच नियंत्रण मिळविण्याइतकी सक्षम यंत्रणा या केंद्रात आहे. मात्र, यंत्रणेची देखरेख करण्यासाठी प्राधिकरणाकडे स्वतंत्र विभाग नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलावरच प्राधिकरणाची भिस्त आहे. मंत्रालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेचे धिंडवडे निघाले. अग्निशमन दलातील अपु-या मनुष्यबळाची झळ खुद्द महापालिकेला बसत असल्याने प्राधिकरणाचे काय... असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अद्ययावत साधनसामुग्री असलेली आकुर्डी सुविधा केंद्रातील यंत्रणा मनुष्यबळाअभावी 'पोरकी' राहणार आहे.

चिखलीत 27 कारच्या काचा फोडल्या

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31295&To=6
चिखलीत 27 कारच्या काचा फोडल्या ;
अज्ञात व्यक्तीचा खोडसाळपणा
चिखली, 3 जुलै
चिखली मोरे वस्ती येथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या 27 वाहनांच्या काचा सोमवारी (ता. 2) रात्री उशिरा अज्ञात व्यक्तींने फोडल्याचा प्रकार आज, मंगळवारी (ता. 3) सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आला. याच भागात राहाणा-या व्यक्तीने खोडसाळपणे हे कृत्य केले असावे अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मुरूम माफियांकडून प्राधिकरणातील भूखंडाची लचकेतोड

मुरूम माफियांकडून प्राधिकरणातील भूखंडाची लचकेतोड: मुरूम माफियांकडून प्राधिकरणातील भूखंडाची लचकेतोडपिंपरी-&nbsp "इको हाउसिंग' प्रकल्पासाठी सुमारे पंचवीस कोटी रुपये खर्च करून रस्ते, जलवाहिनी, सांडपाणी वाहिनी यासह तयार केलेला पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा मोशी येथील पेठ क्रमांक 12 मधील 135 एकराचा भूखंड मुरूम चोरांनी उद्‌ध्वस्त केला आहे.

प्राधिकरणातील भूखंडाची लचकेतोड (फोटो फिचर)

प्राधिकरणातील भूखंडाची लचकेतोड (फोटो फिचर): प्राधिकरणातील भूखंडाची लचकेतोड (फोटो फिचर)"इको हाउसिंग' प्रकल्पासाठी तब्बल सुमारे पंचवीस कोटी रुपये खर्च करून रस्ते, जलवाहिनी, सांडपाणीनलिका यांसह तयार केलेला मोशी- प्राधिकरणातील पेठ क्रमांक 12 मधील 135 एकराचा भूखंड मुरूम चोरांनी उध्वस्त केला आहे.

प्राधिकरण प्रशासन म्हणजे, "लोकांसांगे ब्रह्मज्ञान...'

प्राधिकरण प्रशासन म्हणजे, "लोकांसांगे ब्रह्मज्ञान...': पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या 15 ते 27 पेठांपर्यंत "रेडझोन'ची हद्द आल्याने या परिसरातील हजारो रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

"एच. ए.'तील सलाईनचा राजस्थानातील रुग्णाला त्रास

"एच. ए.'तील सलाईनचा राजस्थानातील रुग्णाला त्रास: पिंपरी - येथील हिंदुस्तान ऍन्टिबायोटिक्‍स कंपनीने बनविलेल्या सलाईनमुळे राजस्थानातील मधुमेही रुग्णाला आठ दिवसांपूर्वी त्रास झाला.

माजी महापौर अनिता फरांदे यांना "पीएच.डी.'

माजी महापौर अनिता फरांदे यांना "पीएच.डी.': पिंपरी - आजही महिलांकडे चूल आणि मूल या चौकटीतच पाहिले जाते.

‘बांधकामे पाडू नका, दुप्पट करआकारणी ...

‘बांधकामे पाडू नका, दुप्पट करआकारणी ...:
आमदारांचे आयुक्तांना साकडे
पिंपरी / प्रतिनिधी
महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी शहरातील अनधिकृत बांधकामे पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आणि त्या दृष्टीने कार्यवाही सुरू केल्यामुळे धास्तावलेल्या नगरसेवकांना तसेच संबंधित नागरिकांना दिलासा देण्याच्या हेतूने आमदार विलास लांडे आणि महापौर मोहिनी लांडे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने सोमवारी आयुक्तांची भेट घेतली.
Read more...

मोशीत ११ लाखांचा गुटखा पकडला; सात ...

मोशीत ११ लाखांचा गुटखा पकडला; सात ...:
पिंपरी पालिकेच्या जकात विभागाच्या भरारी पथकाची कामगिरी
प्रतिनिधी, पिंपरी
जकात चुकवून शहरात आणण्यात येणारा जवळपास ११ लाख रुपये किमतीचा गुटखा िपपरी महापालिकेच्या भरारी पथकाने सापळा रचून पकडण्यात आला असून, संबंधितांना सुमारे सात लाख रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे.
Read more...