Thursday 14 June 2018

प्लॅस्टिकबंदी निर्णयाची महापालिकेतही अंमलबजावणी सुरू

पिंपरी - शहरात प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी महापालिकेतर्फे केली जात आहे. ही कारवाई करणाऱ्या महापालिकेतच प्लॅस्टिकचा वापर होत असल्यास "दिव्याखाली अंधार' असे चित्र निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्याबाबत आवश्‍यक दक्षता म्हणून महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये प्लॅस्टिक व थर्माकोलचा वापर करण्यास बंदी घातली आहे. तसेच, त्याचा वापर आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. 

शिक्षकच गुणवत्ता पुर्ण शिक्षणाचे आधारस्तंभ!

पिंपरी – भारतासारख्या देशाला प्रगतीसाठी हजारो उच्चशिक्षित तरुणांची गरज आहे. त्यासाठी गुणवत्तापुर्ण शिक्षणाची गरज असून उत्तम शिक्षक हाच गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आधारस्तंभ असतो, असे प्रतिपादन एआयसीटीईचे सल्लागार डॉ. दिलीप मालखेडे यांनी केले.

महापालिकेचा पूरनियंत्रण कृती आराखडा तयार

पिंपरी - शहरात संभाव्य पूरस्थिती निर्माण झाल्यास आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने पूरनियंत्रण कृती आराखडा तयार केला आहे. महापालिकेचे विविध विभाग, क्षेत्रीय कार्यालयांकडे कामकाजाचे वाटप केले आहे.

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्‍तालय प्रेमलोक पार्कमध्ये

पिंपरी ः प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरासाठी होणारे स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालय चिंचवडमधील प्रेमलोक पार्क येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महात्मा जोतिबा फुले इंग्रजी माध्यम शाळा इमारतीमध्ये सुरू केले जाणार सदर इमारत आयुक्तालयासाठी भाड्याने देण्यास स्थायी समितीने बुधवारी (दि. 13) आयत्यावेळी मान्यता दिली. हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेकडे शिफारस केली आहे

नवी सांगवी : पदपथ व सायकल मार्ग विकसित करण्याची मागणी

नवी सांगवी (पुणे) - नाशिक फाटा ते जगताप डेअरी येथील साईचौक पर्यंत पदपथ व सायकल धावण मार्ग विकसित करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येऊ लागली आहे. भारतरत्न जे आर डी टाटा उड्डान पुलापासून पुढे 45 मिटर रूंदीचा रस्ता पुढे वाकड हिंजवडी पर्यंत गेला आहे. त्यातच पिंपरी चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्यामुळे या रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी पदपथ व सायकल ट्रँकची मागणी स्थानिकांनी ' सकाळ ' च्या माध्यमातून महापालिका प्रशासनाला केली आहे. 

पोलीस आयुक्तालयासाठी शाळेतील विद्यार्थी वेठीला प्रेमलोक पार्क शाळा स्थलांतर करण्याचा घाट


रात्रं-दिन उत्खनन

पिंपरी - मोशी, चऱ्होली, चोविसावाडी येथील दगड खाणींची क्षमता संपल्यामुळे एक जानेवारी २०१९ पासून येथील उत्खनन बंद करण्याचे खनिकर्म विभागाने गेल्या महिन्यात जाहीर केले. तेव्हापासून खाणींमधून रात्रं-दिन उत्खनन आणि खडी मशिन व खडी, डबर, चुरा वाहतूक करणारी वाहनेही सुरू आहेत. आतापर्यंत जमीन सपाटीपासून दीडशे फूट खोल उत्खनन झालेले आहे. 

उपनगरांमध्ये खासगी बसची घुसखोरी

पिंपरी उपनगर टीम – शहर व उपनगर परिसरात बेकायदेशी वाहतूक आता जवळपास बेलगाम झाली आहे. केवळ सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांची कसून तपासणी करणाऱ्या वाहतूक पोलीस विभाग आणि आरटीओने बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस आणि अन्य वाहनांकडे सपशेल डोळेझाक करत आहेत. त्यातच अलीकडेच झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप खासगी वाहतुकदारांच्या जणू काही पथ्यावरच पडला आहे.

प्लास्टिक साठा पडला महागात

पिंपरी – दुकानांमध्ये बेकायदेशीरपणे प्लास्टिकचा साठा करुन ठेवणाऱ्या भोसरी परिसरातील तीन व्यावसायिकांवर इ क्षेत्रीय कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली. प्रत्येकी पाच हजार याप्रमाणे 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

चिंचवडमध्ये “नो कन्स्ट्रक्‍शन’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील चिंचवड विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्पांची कामे सुरु आहेत. पावसाळा सुरु होऊन देखील पावसाचे प्रमाण सध्या कमी आहे. धरणातील पाणी साठा लक्षात घेता पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, ताथवडे, रावेत, वाकड, पुनावळे, मामुर्डी, किवळे या भागांमधील गृहप्रकल्प बांधण्यास तात्पुरत्या स्वरुपात मनाई करण्यात आली आहे. याबाबतचा ऐनवेळचा प्रस्ताव बुधवारी (दि. 13) झालेल्या स्थायी समितीत मंजूर करण्यात आला. एका विधानसभा मतदार संघापुरता हा निर्णय लागू केल्याने यामागे राजकारण असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

निगडीत रंगली गायन, वादन, नृत्याची मैफल

पिंपरी – बहारदार सुगम संगीत गायन, त्याला संवादीनी, तबला वादनाची सुरेल साथ अन्‌ सोबतिला नृत्याचे पदलालित्य, अशा सुंदर मैफलीला रसिकांनी भरभरून दाद मिळाली. निमित्त होते, पिंपरी-चिंचवड महापालिका संगीत अकादमीच्या वर्धापन दिनाचे.

आमदार महेश लांडगे आयोजित ‘रोजा इफ्तार पार्टी’ उत्साहात

पिंपरी (Pclive7.com):- भोसरी येथे आमदार महेश लांडगे आयोजित ‘रोजा इफ्तार पार्टी’ उत्साहात पार पडली. हज यात्रेच्या अनुदानातून वाचलेले दोनशे कोटी रुपये यावर्षी महाराष्ट्र सरकार अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी वापरणार आहे. यामुळे अल्पसंख्यांक समाजाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण आणि रोजगार, व्यवसाय मिळण्यासाठी मदत होईल असे प्रतिपादन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी भोसरी येथे केले.

कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येवर तोडगा काढू

पिंपरी – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढणारी संख्या पाहता दोन्हीही आरटीओ कार्यालयात कर्मचारी संख्या कमी पडत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु, शासनातर्फे जेवढी पदे मंजूर करण्यात आली आहेत, तितकी पदे भरली आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांवर पडणारा कामाचा अतिरिक्त बोजा पाहता त्याच्यावर परिक्षण करून तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती राज्याचे परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी दिली.

पिंपरी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त डोईफोडे यांची नाशिक तर कापडणीस यांची नागपूरला बदली

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची नाशिक महापालिकेत उपायुक्त म्हणून तर क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन कापडणीस यांची नागपूर महापालिकेच्या उपायुक्तपदी बदली झाली आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने हे बदलीचे आदेश काढले आहेत. 

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये मनसेचं जोरदार शक्तीप्रदर्शन; विविध कार्यक्रमांचे आयोजन

पिंपरी (Pclive7.com):- आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवस लक्षवेधून घेणारा ठरणार आहे. राज यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये मनसेच्यावतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले जात आहे. उद्या (गुरूवार दि.१४) रोजी शहरात विविध सामाजिक उपक्रम तसेच कार्यक्रमांनी ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला जाणार असल्याची माहिती शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले यांनी दिली.

भाजप-शिवसेनेत जुंपली

पिंपरी – शिवसेना गटनेत्यांच्या बालेकिल्ला असलेल्या वाकडमधील विकास कामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची भाजपने चौकशी लावल्याने शिवसेना व भाजपमध्ये कमालीची जुंपली आहे. शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर जोरदार तोफ डागली. पिंपरी-चिंचवड महापालिका कोणाची जहागिरी नाही. भाजपचे आमदार पालिका ही आपली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यासारखा कारभार करत आहेत. महापौरांच्या अधिकारावर गदा आणली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत सुनावले जात आहे. आमदारांना पालिका कामकाजात एवढीच ढवळाढवळ करायची असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि नगरसेवक म्हणून पालिका सभागृहात यावे. भाजपच्या शहराध्यक्षांची कार्यपद्धती विरोधकांना संपवण्यासारखी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

टीडीआरमधील चोरी थांबणार

पुणे - हस्तांतर विकास हक्काच्या (टीडीआर) व्यवहारांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला आहे. टीडीआर खरेदी-विक्री व्यवहाराची दस्त नोंदणी करताना रेडीरेकनरमध्ये दर्शविण्यात आलेल्या दराच्या किती टक्के मुद्रांक शुल्क आकारावे, याचा विचार सुरू असून लवकरच तो दर निश्‍चित करून त्यानुसार आकारणी करण्यात येणार आहे. तसे झाल्यास अशा व्यवहारांमध्ये होणारी मुद्रांक शुल्काची चोरी थांबण्यास मदत होणार आहे.

Mandatory caste certificate stumps students

PUNE: Till the last year, caste validity certificate could be submitted by students after getting admission in their respective courses. But this year, the caste validity certificate has been made compulsory even at the time of registration for the admission process.

हायपरलूप केंद्राला आज ‘सीएम’ची भेट

पुणे-मुंबई दरम्यानच्या भविष्यातील अतिवेगवान प्रवासासाठी 'व्हर्जिन हायपरलूप वन'च्या चाचणी केंद्राला आज, गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार आहेत. त्यांच्या या भेटीमध्ये पुणे-मुंबई मार्गावर 'हायपरलूप'साठी बालेवाडी ते गहुंजेदरम्यान 'चाचणी मार्ग' (टेस्टिंग ट्रॅक) उभारण्यावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.

पालिका अधिकार्‍यांवर हल्ला केल्यास पाच वर्षांची शिक्षा

पिंपरी-चिंचवड महापालिकेसह शासकीय अधिकार्‍यांवर विविध प्रकारे हल्ले करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतरही राजकीय दबाव वाढल्यानंतर ते मागे घेतले जातात किंवा ते प्रलंबित राहतात. मात्र, या पुढे अशाप्रकारे पोलिसांत तक्रार नोंद झाल्यास त्यावर 6 महिन्यांच्या आत निकाल द्यावा लागणार आहे. तसेच, दोषी आढळल्यास 2 व 3 वर्षेऐवजी 5 वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. हा गुन्हा अजामीन पात्र ठरणार आहे. राज्य शासनाने कायद्यामध्ये तसा फेरबदल करून नुकतेच राजपत्र प्रसिद्ध केले आहे.