Wednesday 12 July 2017

महावितरणचे आज ग्राहक संपर्क अभियान

– भोसरी, प्राधिकरण, आकुर्डीत उपक्रम
पिंपरी – पुणे शहरात सहा ठिकाणी महावितरण ग्राहक संपर्क अभियान यशस्वीपणे राबविल्यानंतर आता हे अभियान गुरुवारी (दि. 13) प्राधिकरण व भोसरी उपविभागात सकाळी अकरा वाजता राबविण्यात येणार आहे.

PCMC: From 500-crore budget to 5100-crore one in 20 years

TWENTY years ago, the annual budget of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation was about Rs 500 crore. For 2017-18, it has gone up to Rs 5,100 crore, over a 10-fold hike. The current figure includes over Rs 2,000 crore of JNNURM funds and other ...

Reflectors to prevent entry of heavy vehicles at Pimpri grade separator

The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has finally found a solution to the grade separator issue that had been resulting in traffic snarls on the old Mumbai- Pune highway. As heavy vehicles often get stuck at the grade separator, the civic ...

निगडी-दापोडी बीआरटीला सप्टेंबरचा मुहूर्त

पिंपरी – निगडी-दापोडी बीआरटीएस बससेवा सुरु करण्यापूर्वी त्या मार्गावरील प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यानुसार आयआयटीने केलेल्या सर्व्हेक्षणातून काही सुचना मांडल्या आहेत. त्या सुचनांची पुर्ण अंमलबजावणी करण्यास दोन महिने कालावधी लागणार आहे. त्यानंतर सप्टेंबरला हा बीआरटी मार्ग सुरु करण्यात येईल, अशी माहिती आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

“रिंग रोड’चा प्रस्ताव रद्द करा

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : आदिवासी संघटनेची मागणी
पिंपरी – नवनगर विकास प्राधिकरणाने प्रस्तावित “रिंग रोड’ प्रकल्पासाठी व्यावसायिकांना नोटीस देवून जागेचा ताबा घेण्यास सुरुवात केलेली आहे. या प्रकल्पामुळे सुमारे दीड हजार कुटूंबे बाधित होण्याची शक्‍यता आहे. “रिंग रोड’ प्रकल्पामुळे नागरिकांना बेघर होण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी आदिवासी बिरसा मुंढा संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग परचंडराव यांनी केली आहे.

बांधकामे नियमित करण्याचा प्रस्ताव सरकारने फेटाळला

पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील मार्च २०१२ पूर्वीची सुमारे १५ हजार अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाने २०१३ मध्ये शासनाकडे पाठविला होता. मात्र प्राधिकरणाने संपादित केलेल्या जमिनीवर असलेली घरे केवळ अनधिकृत नसून अतिक्रमणेही आहेत. यामुळे ही घरे नियमित करता येणार नसल्याचे शासनाने प्राधिकरणाला कळविले आहे. त्यानंतर घरे अधिकृत करण्याचा कोणताही प्रस्ताव प्राधिकरणाने शासनाकडे पाठविला नसल्याची धक्‍कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे.

रिंगरोडबाधित घरांवर तूर्तास कारवाई नाही - सतीशकुमार खडके

पिंपरी - रिंगरोडच्या आरक्षणातील बिजलीनगर आणि थेरगाव येथील दाट लोकवस्तीमधील घरांवर कारवाई करण्याचा कोणताही प्रस्ताव तूर्तास प्राधिकरणाकडे नाही, अशी माहिती प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
प्राधिकरणाने १९९५ मध्ये विकास आराखडा तयार करून १९९६ पासून त्याची अंमलबजावणी सुरू केली. त्याची मुदत २० वर्षांची होती. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी सुधारित विकास आराखडा प्राधिकरणाने सरकारकडे पाठविला. त्यातही रिंगरोडचे आरक्षण दाखविले आहे. 

बेशिस्त वाहनचालकाच्या तक्रारीवरून पोलिसाची बदली

पिंपरी - बेशिस्त वाहनचालकावर कारवाई केल्याने वाहनचालकाने पोलिस आयुक्तांकडे खोटी तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेत कर्तव्यदक्ष पोलिसाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याचे समोर आले आहे. 

पिंपरीतील दुमजली शौचालय रातोरात गायब

गुन्हा दाखल करण्याची मागणी : महापालिका आयुक्तांना पत्र
पिंपरी – गेल्या अनेक वर्षांपासून नेहरुनगरमध्ये असलेले दुमजली शौचालय रातोरात पाडून टाकल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत सर्वपक्षीय नागरीक एकत्र आले असून, महापालिकेने त्याबाबत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील 58 रुग्णालयांवर कारवाई?

चौकशीत आढळल्या त्रुटी : म्हैसाळ प्रकरणानंतर धडक मोहीम
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी थाटलेल्या रुग्णालयांची धडक मोहीमेतंर्गत चौकशी समितीने तपासणी पुर्ण केली. शहरातील 412 खासगी रुग्णालयांच्या तपासणीत 58 रुग्णालयामध्ये गंभीर त्रुटी आढळल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे संबंधित रुग्णालयाने त्रुटीची पुर्तता करावी, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य आरोग्य उपसंचालकांनी रुग्णालयांना दिला आहे.

राष्ट्रवादीचे पाप

सर्वाधिक बेकायदा बांधकामे असणाऱ्या शहराचा 'मान' पिंपरी चिंचवड या शहराला दिला जातो. ही बांधकामे त्या काळातील सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने झाली. अन्यथा, सामान्य माणसाची काय हिंमत की तो स्वत:च्या जिवावर बेकायदा घर बांधू शकेल ...

शहरबात पिंपरी-चिंचवड : 'दादा' आले अन् 'दादा' गेले!

बालेकिल्ला असूनही पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही विधानसभेच्या जागा गेल्या. जवळपास १५ वर्षे ताब्यात असलेली महापालिकाही हातातून गेली. एवढे होऊनही काही सुधारणा झालेल्या नाहीत. आता लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत.

ई-रिक्षांचा मार्ग खुला

ई-रिक्षांना परवानगी देण्याबाबत अनावश्यक हस्तक्षेप न करण्याचे धोरण परिवहन विभागाने स्वीकारले आहे. त्यामुळे शहरातील सर्व मार्गांवर परवानगी न घेता ई-रिक्षा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे.

1st merit list out under CAP, lots get preference

From being at the top for the last two years, City Pride School is now being preferred more by the students of Pimpri Chinchwad. “As we are now matching the percentage with a college in Deccan, I believe that students have got a centre in PCMC and do ...

अकरावीचा कट ऑफ एक टक्‍क्‍याने घसरला

  • सिटी प्राईड ज्युनिअर कॉलेज व आपटे प्रशाला सर्वात पुढे 
  • वाणिज्य आणि कला शाखेचा कट ऑफ वाढला 
पुणे- इयत्ता दहावीच्या परीक्षेत निकालाचा टक्‍का घसरल्याने इयत्ता अकरावीचा कट ऑफही साधारण एक टक्‍क्‍याने खाली आहे. मागील वर्षी निगडीच्या सिटी प्राईड ज्युनिअर कॉलेजने कट ऑफच्या बाबतीत आपटे प्रशालेचे रेकॉर्ड मोडले होते. मात्र यंदा या दोन्ही महाविद्यायांचा कट ऑफ सारखाच आहे. मागील वर्षी 97.40 चा कट ऑफ होता तर यंदा 96.60 गुणांचा कट ऑफ आहे.

अमरनाथ येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध

पिंपरीत आंदोलन : शहरातील हिंदू संघटनांची निदर्शने
पिंपरी – अमरनाथ येथे झालेल्या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला, तर 16 जण जखमी झाले आहेत. देवदर्शनासाठी जात असलेल्या निरपराध भक्तांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध पिंपरी येथील हिंदू संस्थांकडून करण्यात आला.

“पेन्शन’ योजनेची 105 प्रकरणे मंजूर

पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदार संघातील विधवा, घटस्फोटीत, श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेत सुमारे 105 लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर करुन त्यांना दरमहा पेन्शनचा लाभ देण्यात आला आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेत 89, विधवा महिलांची 57, घटस्फोटीत 4, अपंग 28, श्रावणबाळ योजनेची 16 प्रकरणे मंजूर तर 7 प्रकरणे नामंजूर करण्यात आली, अशी माहिती समितीचे अध्यक्ष गोपाळ माळेकर यांनी दिली.

उद्योगनगरीला कलादालनाची प्रतीक्षा

कलाप्रेमींची नाराजी : प्रशासकीय यंत्रणेची उदासीनता
सुवर्णा नवले
पिंपरी – शहरात प्रेक्षागृह झाले..प्रशस्त मॉल झाले…सिनेमागृह झाली मात्र कलाप्रेमींसाठी आवश्‍यक असलेले कलादालनच अद्याप मिळालेले नाही. “स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करणारी “उद्योगनगरी’ आजही कलादालनाच्या प्रतीक्षेत आहे. शहराचा डामडौल पाहता कित्येक प्रकल्पांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च महापालिकेने केला आहे. मात्र, कलाप्रेमींचा मागणी असूनही कलादालनाबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसत आहे.