Tuesday 1 January 2019

आधार सीडिंगच्या कामासाठी कुशल प्रशासन अन् मुदतवाढ हवी

पिंपरी चिंचवड : सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी व जास्तीत जास्त गरजू व गरीब पात्र लाभार्थ्यांना शासन अनुदानित शिधाजिन्नसाचा लाभ देता यावा, याकरीता रास्त भाव धान्य दुकानदार यांच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील कुटुंबांच्या आधार सिडींगचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यामुळे गैरव्यवहारांना आळा बसणार आहे. तसेच, पात्र ठरविण्यात आलेल्या सर्व लाभार्थ्यांचा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये समावेश करण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्याने हमीपत्र भरून संबंधित शिधावाटप प्राधिकार्‍याकडे जमा करणे आवश्यक राहणार आहे. परंतु, राज्यातील पुरवठा अधिकार्‍यांकडून याबाबत कोणतेही मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे या समस्या सोडावयाच्या तरी कशा? असा प्रश्‍न राज्यातील सर्व परवानाधारकांना पडला आहे. शासनाने मागणी मान्य न केल्यास, फेडरेशन च्यावतीने न्यायालयात जाण्याचा इशारा ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर, जन. सेक्रेटरी व खजिनदार विजय गुप्ता यांनी दिला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये ११९ मद्यपींवर कारवाई !

पिंपरी-चिंचवड- २०१८ ला निरोप आणि नवनवर्षाचे स्वागत या निमित्ताने थर्टी फर्स्टच्या ओल्या पार्ट्या करून परतणाऱ्या ११९ मद्यपी वाहनचालकांवर वाहतूक शाखेने कारवाई केली. निगडी, चिंचवड, चाकण, भोसरी, पिंपरी, हिंजवडी, देहुरोड, तळवडे अशा विविध ठिकाणी ब्रिथ अनालायरच्या साह्याने वाहनचालकांची तपासणी केली असता, त्यात मद्य प्राशन करून वाहन चालविणारे आढळुन आले, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अशी माहिती वाहतुक पोलिसांनी दिली.

Pune: Maha Metro Fails To Find Sponsors On Pimpri-Swargate Route Thanks To Corporate No-Show

Pune: Maha Metro Fails To Find Sponsors On Pimpri-Swargate Route Thanks To Corporate No-Show  Swarajya
Maha Metro Officials are unable to find sponsors for metro stations after drawing a blank from the city's corporate sector over joining the project, the Indian ...

To generate more non ticket revenue, PMPML plans to develop depots with 2.5 FSI


The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) is planning to develop all its depots by using the recently approved 2.5 FSI (Floor Space Index).

Kids’ recreation centres to come up at Balnagari

Pimpri Chinchwad: Amusement, entertainment and recreational centres for children and family, apart from amphitheatre and eco-resorts, would come up at Balnagari on Nigdi-Bhosari Road on 60,000-square metre area.
The project would be developed on design, build, operate, finance, and maintenance basis.

चऱ्होली-लोहगाव रस्त्याच्या कामात ‘रिंग’ – दत्ता साने

पिंपरी (Pclive7.com):- चऱ्होली ते लोहगाव हद्दीपर्यंतचा विकास आराखड्यातील रस्ता विकसित करण्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाच्या निविदेत ‘रिंग’ झाल्याचा आरोप करत याची सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे. पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या बरोबरीने आयुक्‍तदेखील यामध्ये सहभागी आहेत. या अर्थपूर्ण मिलीभगतमुळे महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून, नागरिकांच्या कररूपी पैशांची उधळपट्टी होत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

आमदार लांडगेंच्या आदेशाची दखल घेत महापालिकेने केली अनधिकृत भंगार मालाची दुकाने व गोदामे उध्वस्त

चिखली (दि. २९ डिसें.) :- चिखलीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे भंगार मालाची दुकाने आणि गोदामे सुरू केली आहेत. या भागात मोठ्या प्रमाणावर भंगार जाळले जात आहे. त्यातून वारंवार आगीच्या घटना घडत आहे.

बचतगटांसाठी पवनाथडी जत्रेतील वस्तू विक्रीकरिता स्टॉलची सोडत

पिंपरी (दि. २९ डिसें.) :-  पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येते. तसेच यातून बचत गटांच्या उत्पादनांची माहिती शहरातील नागरिकांना होते. बचतगटातील महिलांना व्यवसाय, विक्री कौशल्ये, बाजार, व्यवहार या गोष्टी जवळून अनुभवता येतात. त्याच उद्देशातून ही जत्रा भरविण्यात येते.

केबल नेटवर्कच्या रस्ते खोदकामात कोट्यावधीचा गैरव्यवहार, सीआयडीमार्फत चौकशी करण्याची भापकर यांची मागणी

पिंपरी (दि. ३१ डिसें.) :- माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी खासगी केबल नेटवर्कच्या (रिलायन्स) रस्ते खोदकामात कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. त्याची राज्य गुन्हे अन्वेषन विभागामार्फत (सीआयडी) चौकशी करावी. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.

2019 अखेर पर्यंत पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो धावणार – ब्रिजेश दीक्षित

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे काम सुरु होऊन दोन पूर्ण झाली आहेत. या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे काम 40 टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर 2019 पर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिका ते दापोडी या मार्गावर मेट्रो धावणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली. 

Pimpri: स्थायी समिती सभा सलग दोनदा तहकूब; विषयांवरुन सत्ताधा-यांमध्ये होईना एकमत ?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक नाड्या हातात असलेली सर्वात शक्तीशाली स्थायी समितीची सभा सलग दोनवेळा तहकूब झाली आहे. सभेच्या विषयपत्रिकेवर सुमारे दोनशे कोटीच्या आसपास विषय मान्यतेसाठी ठेवण्यात आले आहेत. 

Pimpri: पीएमपीएलकडून पिंपरी-चिंचवडला सापत्नपणाची वागणूक – महापौर जाधव

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन मंडळ (पीएमपीएल) कडून पिंपरी-चिंचवड शहराला सापत्नपणाची वागणूक मिळत आहे. महापालिका 40 टक्के अर्थसाहाय्य पीएमपीएलला देतो. परंतु, त्या तुलनेत सुविधा दिल्या जात नाहीत. पुरेशा बस देखील दिल्या जात नाहीत. बीआरटी मार्ग तयार असून देखील बस उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. 

नव्या वर्षांत पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार सुसज्ज नेत्र रुग्णालय

पिंपरी पालिकेच्या वतीने मासूळकर कॉलनी येथे सुसज्ज नेत्र रुग्णालय उभारण्याचे काम सुरू आहे. नव्या वर्षांत हे नेत्र रुग्णालय आणि नागरी आरोग्य केंद्राची सुविधा शहरवासियांना मिळणार आहे.

‘काला सोना’च्या माध्यमातून कंपोस्ट खत निर्मितीची माहिती पोहोचणार घरोघरी

पिंपरी : घरातील ओल्या कचर्‍याचे योग्य व्यवस्थापन करून त्यापासून कंपोस्ट खत निर्मिती केल्यास सेंद्रिय शेतीला चालना मिळेल. तसेच पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित आणि रसायन मिश्रित अन्नधान्यापासून दूर राहील. ओल्या कचर्‍यापासून खत निर्मिती केल्यास घरातून निघणार्‍या कचर्‍याची मोठी समस्या दूर होईल. यासाठी इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडने पुढाकार घेऊन ‘काला सोना’ नावाने जनजागृती अभियान सुरु केले आहे. 

3 बीआरटी मार्ग तयार; पण बसच नाही

पिंपरी-चिंचवड : नागरिकांना विनाअडथळा जलद प्रवास करता यावा यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या काळेवाडी फाटा ते देहू आळंदी चिखली रस्ता, देहू ते आळंदी आणि आळंदी ते बोपखेल या नवीन बीआरटी मार्गावर धावण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपीएल)बस उपलब्ध नाहीत. पीएमपीएलच्या ताफ्यातील 990 बसपैकी बीआरटी संचलनासाठी केवळ 425 बस उपलब्ध होत आहेत. त्यामुळे नवीन बीआरटी मार्गावर बस सोडण्यास महामंडळ असमर्थ असल्याचे, पीएमपीएमएलच्या महाव्यवस्थापकांनी महापालिकेला कळविले आहे. त्यामुळे नवीन बीआरटी मार्ग सुरु होण्यास विलंब होणार आहे.

सातव्या वेतन आयोगासाठी महापालिकेत समिती गठीत करा

पिंपरी चिंचवड : महापालिकेतील शासनाच्या प्रशासकीय कर्मचार्‍यांना सातवा वेतणश्रेणी आयोग लागू करण्यात यावा. त्यासाठी समिती गठीत करून त्या संबंधीत ठरावाला सर्वसाधारण सभेची मान्यता घ्यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने केली आहे.

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आर. टी. ओचे ‘हेल्प डेक्स’

पिंपरी  : राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील व सहाय्यक अधिकारी सुबोध मेडसिकर यांच्या पुढाकाराने  ‘हेल्प डेक्स’ सुरु करण्यात आले आहे.
वाहन परवाना, वाहन नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी, खटला संदर्भातील केसेस, वाहन हस्तांतर आदी कामे कुठे होतील. याबाबत माहिती नागरिकांना नसते. नागरिकांना संपूर्ण कार्यालयात धावपळ होते. त्यामुळे त्यांचा भरपूर वेळ व श्रम वाया जातात. यामुळे अनेकवेळा नागरिकांच्या मनात आरटीओ’च्या कार्यालया संबंधित नकारात्मक भावना निर्माण होती. मात्र, त्यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी नागरिकांसाठी आता हेल्प डेक्स’ सुरु करण्यात आले आहे.

नागरवस्ती विकास योजना विभागातील समाज सेवकांची पदे रिक्त

पिंपरी चिंचवड : महापालिकेच्या नागरवस्ती विकास विभागाकडून महिला बालकल्याण, मागासवर्गीय योजना, अपंग कल्याणकारी योजना राबविल्या जातात. सर्वसामान्य जनतेशी संबंधित कल्याणकारी योजना राबविल्या जात असल्याने या विभागात लोकप्रतिनिधींचा कायम राबता असतो. या विभागात प्रामुख्याने सामाजिक कार्यातील पदवी (एम.एस. डब्ल्यू) असलेले प्रशिक्षित कर्मचार्‍यांची आवश्यकता भासते. मुख्य समाज विकास अधिकारी, समाज विकास अधिकारी व समाजसेवक ही सर्व पदे एम.एस. डब्ल्यू. शैक्षणिक अर्हता असलेल्या कर्मचार्‍यांचा यात समावेश आहे. महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागात समाज सेवक कार्यरत असलेल्या महिला कर्मचार्‍याला जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास विलंब झाल्याने त्यांना महापालिका सेवेतून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे नागरवस्ती विकास योजना विभागातील समाज सेवकांची सर्वच पदे आता रिक्त झाली आहेत.