Friday 25 August 2017

उद्योगनगरीच्या ढोल-ताशांचा आवाज थेट दिल्लीत!

आवर्तन पथकाची झेप : राजधानीतील बाप्पांना देणार मानवंदना
पिंपरी – शतका नु शतकांपासून मराठमोळ्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेले आणि गणेशोत्सव आसमंत दुमदुमून टाकणारे ढोल-ताशे आता थेट देशाच्या राजधानीत श्री गणेशास मानवंदना देणार आहेत.

चिखलीत दहा बांधकामांवर हातोडा

चिखली – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने चिखली येथे चालू असलेल्या दहा अनधिकृत बांधकामावर आज (गुरुवारी) कारवाई केली.

आयुक्तांकडून कुंदन गायकवाड यांचे नगरसेवकपद रद्द

पिंपरी-चिचंवड महापालिकेचे भाजपचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी (दि. २४) त्यांचे नगरसेवकपद रद्द केले आहे. त्यांनी नियमानुसार ही प्रक्रिया पूर्ण केली असून संबधितांना पुढील कार्यवाहीसाठी तसे आदेश दिले आहेत.

PMC and PCMC caught in a garbage war across Mula

In a mockery of the Swachh Bharat pledge, several hoteliers, sweet shop owners and street vendors in the densely populated Aundh have been found dumping their daily garbage on open land owned by the Pimpri- Chinchwad Municipal Corporation (PCMC) ...

Curbs on sale of alcohol within city limits likely to be lifted soon

n a major relief to the hospitality sector, the apex court on Wednesday modified its earlier order banning the sale of alcohol within 500 metres of a highway.

साई चौकातील वाहतूककोंडीची आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडून पाहणी ; अधिकाऱ्यांना केल्या सूचना

सांगवी-किवळे बीआरटी मार्गावरील साई चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे संपूर्ण पिंपळेसौदागर आणि पिंपळेनिलख भागातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याची दखल घेऊन भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काटे व अधिकाऱ्यांसोबत साई चौकाची पाहणी केली. या चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आमदार जगताप यांनी महापालिका व प्राधिकरणाचे अधिकारी आणि वाहतूक पोलिसांना विविध सूचना केल्या.

गणेशोत्सवात पीएमपीची वर्तुळाकार मार्गावर सेवा

पुणे - गणेशोत्सवादरम्यान पीएमपी प्रशासनाने शहराच्या मध्य भागातून, तसेच पिंपरी चिंचवडमध्येही वर्तुळाकार मार्गाची आखणी केली असून, शुक्रवारपासून (ता. 25) प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. या मार्गावर दर दहा मिनिटांनी प्रवाशांना बससेवा उपलब्ध होणार असून, तिकीट दरही फक्त दहा रुपये असेल. तसेच, उत्सवादरम्यान रात्र बससेवा सुरू होणार असून शहर आणि पिंपरी- चिंचवडसाठी तब्बल 694 जादा बस पीएमपीने उपलब्ध केल्या आहेत. 

गणेशोत्सवाच्या काळात पिंपरी-चिंचवडमध्ये पीएमपीएमएलच्या २४० बस रात्रभर धावणार

महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार व स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांची माहिती
शुक्रवारपासून (दि. २५) सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात देखावे पाहण्यासाठी पीएमपीएमएलमार्फत पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात रात्रभर बससेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये विविध उपनगरांना जोडणारा वर्तुळमार्ग सुरू केला जाणार आहे. संपूर्ण शहरात विविध मार्गांवर एकूण २४० बस धावणार आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये अशा प्रकारे प्रथमच पीएमपीएमएलची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आणि स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी दिली.

लाडक्या श्रीगणरायाचे स्वागत करण्यासाठी अवघी उद्योगनगरी सज्ज

गुरूवारचा पूर्वदिवस महिलांसह गणेश मंडळाच्या कार्यकतर््यांसाठी अधिकच गडबडीचा होता. पिंपरीचिंचवडनिगडीभोसरी या परिसरातील चौकाचौकांत गणेशमूर्तींचे स्टॉल लागले असल्याने भाविक श्रींच्या मूर्तीचे बुकिंग करताना दिसत होते.

अजगराची चोरी केली सर्पमित्रानेच? दोन सुरक्षारक्षकांवर कारवाई; तक्रार दाखल करण्यास लागले तीन दिवस

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संभाजीनगरात सर्पोद्यानाची निर्मिती केली आहे. या ठिकाणी आजपर्यंत ४ मगरींचा मृत्यू, ७ मगरी गायब, ५० मृत सापांचा खच, २ अजगर गायब, किंग कोब्राचा मृत्यू, कासवाची पिलेचोरी असे प्रकार घडले आहेत. मात्र ...

पिंपरी-चिंचवड पालिकेत सभापतींची ट्रॅक्टरवरुन एन्ट्री

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते यांच्या वाहनावर गेल्या तीन दिवसांपासून नाही. या समस्येकडे लक्षवेधण्यासाठी गुरुवारी त्यांनी चक्क ट्रॅक्टर घेऊन पालिकेत एन्ट्री केली. पालिकेच्या प्रवेश ...

बीआरटीसाठी पदाधिका-यांची टूर, अहमदाबादमध्ये अभ्यास दौरा करणार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरात विविध ठिकाणी बीआरटीएस प्रकल्प सुरू आहेत. त्यासाठी अभ्यास दौरा आयोजित केला असून महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी तीन टप्प्यांमध्ये अहमदाबादमध्ये अभ्यास दौरा करणार आहेत. त्यास खर्चास ...

“आरटीई’अंतर्गत शालेय साहित्यासाठी उपोषण

पिंपरी – महापालिकेच्या शाळांना शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आरक्षित कोट्यातून प्रवेश मिळाला आहे. मात्र, त्यांना जाणिवपूर्वक साहित्य दिले जात नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते सुभाष जिनवाल यांनी पिंपरी चौकात बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

कुदळवाडी शाळेला मुख्याध्यापक मिळेना

चिखली – महापालिकेच्या कुदळवाडी शाळेला सहा महिन्यांपासून मुख्याध्यापक नाहीत. शिक्षकांची संख्या देखील अपुरी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याची तक्रार आमदार महेशदादा लांडगे युवा मंचचे अध्यक्ष दिनेश यादव यांनी केली आहे.

पिंपरीगावातील पाणी प्रश्‍न सुटणार

पिंपरी – महापालिकेच्या वतीने पिंपरीगाव येथील कै. अनुसया नामदेव वाघेरे शाळेच्या प्रांगणातील नवीन पाण्याच्या टाकीचे भूमीपूजन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते झाले. यामुळे पिंपरी गावातील पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे.

पॅनकार्ड क्‍लब गुंतवणूकदार करणार आंदोलन

पुणे – देशभरातील सुमारे 55 लाख गुंतवणूकदार पॅनकार्ड क्‍लब्ज लि. कंपनीच्या जाळ्यात फसले असून, राज्यातील जवळपास 40 लाख गुंतवणूकदारांच्या परताव्याचे भवितव्य टांगणीला लागले आहे. मात्र राज्यातील एकाही खासदाराला हा प्रश्न संसदेत निकाली काढावा असे वाटले नाही. राज्यातील गुंतवणूकदारांचा हा आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोहचवण्यासाठी राज्यातील सर्व खासदारांच्या घराबाहेर “घंटानाद आंदोलन दि. 10 ते 12 सप्टेंबर रोजी करण्यात येणार असल्याचे राष्ट्रशक्ती संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दारवटकर यांनी सांगितले.