Sunday 22 April 2018

महापालिकेचे तिन दिवसात तेराशे किलो प्लास्टिक संकलन

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पर्यावरण संवर्धन समिती यांच्या संयुक्त विदयमाने सर्व क्षेत्रीय कार्यालय, व्यावसायिक ठिकाणे, मॉल, मार्केट येथे १९ ते २१ एप्रिल या ३ दिवसाच्या राबविलेल्या प्लास्टीक व थर्माकॉल वेस्ट संकलन मोहिमेत सुमारे १३८९ किलो प्लास्टिक व १८ किलो थर्माकोल संकलित करण्यात आले.

महापालिकेचे तिन दिवसात तेराशे किलो प्लास्टिक संकलन

महापौरांचे वाहतूक पोलिसांना पत्र

पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहरात वारंवार वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, अशा मागणीचे पत्र महापौर नितीन काळजे यांनी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांना पाठविले. पत्रात काळजे यांनी म्हटले आहे, पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरात प्रशस्त रस्ते आहेत. मात्र, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले जात नाही. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. शहरातील नागरिक त्रस्त आहेत. रस्त्यांवर दुतर्फा अनधिकृतपणे वाहने उभी केली जातात. वाहनचालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. सध्या लग्नसराई असल्याने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. या दृष्टिने तातडीने उपाययोजना कराव्यात.

पोलिसांची वाहन चालकांना साद

पिंपरी – शहरात वाढलेल्या वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे. वाहतूक शाखेकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे वाहतुकीचे नियम मोडून सिग्नलकडे दुर्लक्ष करण्याचे वाहन चालकांचे प्रमाण जास्त आहे. वाहतुकीचे सर्व नियम वाहन चालकांनी पाळावेत यासाठी वाहतूक शाखेच्या वतीने शहरात प्रमुख चौकांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

बोपखेल पुलाचा प्रश्न अखेर मार्गी, लष्कराकडून महापालिकेला पत्र

चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेलसाठीच्या मुळा नदीवरील उड्डाणपुलासाठी आवश्यक जागा देण्यास संरक्षण खात्याने सहमती दर्शवली आहे. त्यामुळे बोपखेल रस्त्याचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला असून भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. संरक्षण खात्याने या जागेची २५ कोटी ८१ लाख ५१ हजार २०० रुपये इतकी किंमत सांगितली असून या जागेच्या बदल्यात संरक्षण विभागाच्या जागेलगत पर्यायी जागा महापालिकेने उपलब्ध करून द्यावी, असे पत्र पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना पाठविले. त्या संदर्भात महापालिका पातळीवर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

भीम अॅपद्वारे 1 रुपया ट्रान्सफर करा आणि मिळवा 50 रुपये

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी नागपूरमध्ये भीम आधार सेवेचा शुभारंभ केला होता. आता एका वर्षानंतर देखील जास्तीत जास्त लोकांना भीम (BHIM) अॅपकडे आकर्षित करण्यासाठी मोदी सरकारने कॅशबॅकची ऑफर आणली आहे. डिजिटल व्यवहारांना चालना मिळावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा कॅशबॅक ऑफर देऊ केली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहक आणि व्यापारी दोघांना अनुक्रमे 750 रुपये आणि  1 हजार रुपयांपर्यंतची कॅशबॅक मिळणार आहे.

पिंपरीकरांना नाट्यप्रयोग अनुभवण्याची संधी

पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना ऐतिहासिक नाट्यप्रयोग अनुभवण्याची संधी लवकरच मिळणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित संगीतकार आनंद मोडक स्मृती 'शाळा सुटली पाटी फुटली' या कलामहोत्सवाचा शुभारंभ 'आग्र्याहून सुटका' या ऐतिहासिक नाटकाने होणार आहे.

देशातील करोडो कंत्राटी कामगारांना दिलासा: महापालिकेच्या विरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचा निकाल

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या १८ वर्षांच्या लढाईला यश: अवमान याचिकेवर महापालिका आयुक्तांना दणका
निर्भीडसत्ता न्यूज –
कंत्राटी सफाई कर्मचा-यांना किमान वेतनाच्या फरकाची रक्कम अदा करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी न केल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायालयाने निकाल दिला असून ही रक्कम २० जून २०१८ पर्यंत देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कर्मचा-यांना ६५ कोटी १६ लाख ८ हजार १४० रुपये महापालिकेला द्यावे लागणार आहेत. मात्र, या निकालाचा फायदा देशातील करोडो कंत्राटी कामगारांना होणार असून त्यांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी गुरुवारी (दि. १९) पत्रकार परिषदेत दिली.

[Video] पिंपरी चिंचवड शहरात खानदेश जल्लोषाचे आयोजन

अखिल भारतीय खान्देश मंचच्यावतीने खान्देश जल्लोष २०१८ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेरविवार* दि. २२ एप्रिल रोजी चिंचवड परिसरातील आहेर गार्डनयाठिकाणी सायंकाळी ५ वाजता या उपक्रमाला सुरुवातहोणार आहे.

[Video] भोसरीत साध्वी कैवल्य रत्नाजी महाराज महामंगलीक महोत्सवाचे आयोजन !

भोसरीत महामंगलीकचे आयोजन !

तळेगाव दाभाडे “एमआयडीसी’चा टप्पा क्र. 4 रद्द करा!

  • शेतकऱ्यांच्या हरकती : अधिकारी खातेदारांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप
वडगाव मावळ (वार्ताहर) – तळेगाव दाभाडे औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र. 4 जमीन क्षेत्र संपादनासाठी मावळ तालुक्‍यातील आंबळे, निगडे, पवळेवाडी, कल्हाट आदी गावातील 1238 गटातील 3284 खातेदारांचे 2389.298 हेक्‍टर जमीन क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्रस्तावित केले आहे. 27 डिसेंबर 2017 पर्यंत “एमआयडीसी’कडे 515 हरकती दाखल झाल्या. त्या हरकतींवर शनिवारी (दि. 21) अखेरची सुनावणी झाली. मात्र 3284 खातेदारांमधील बहुतेक शेतकरी अशिक्षित व अल्पशिक्षित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल झाली असून, टप्पा क्रमांक 4 चे प्रस्तावित जमीन संपादन रद्द करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे.

पिंपरी – चिंचवड मनपा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोरे तर उपाध्यक्षपदी कुटे यांची निवड

चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी आबा विठोबा गोरे तर उपाध्यक्षपदी संजय दशरथ कुटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

अफवा पसरवणाऱ्यांना दणका देणार व्हॉट्सअॅपचे हे फिचर

चौफेर न्यूज – अफवा पसरवल्यामुळे होणारे नुकसान केवढे घातक ठरू शकते याचे उदाहरण नुकत्याच झालेल्या भारत बंद दरम्यान दिसून आले. पण आता व्हॉट्सअॅपचे अशा अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन फिचर येणार आहे. एखादा मेसेज व्हॉट्सअॅपवर जास्तवेळा फॉरवर्ड झाला, तर तो आता पकडता येणार आहे. अशा अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर व्हॉट्सअॅप घेऊन येत आहे. एखादा मेसेज जर २५ पेक्षा जास्त लोकांना पाठवण्यात आला असेल तर या मेसेजमध्ये काय लिहिले आहे हे लगेच पकडता येईल, असे व्हॉट्सअॅपने सांगितले आहे. फक्त मोबाईलवर येणारे मेसेज हे फिचर रोखणार नाही तर मोबाईलला हॅकिंग आणि डेटा चोरीपासूनही वाचवणार आहे.